तीन डझन सूक्ष्मकथा : एक लक्षवेधक , रंजक लेखनप्रकार
दुसर्या एका संकेतस्थळावर एका वेगळ्याच लेखनप्रकाराबद्दल वाचायला मिळालं. कमीत कमी शब्दांत एखादी गोष्ट सांगून जाण्याच्या एका लेखनप्रकाराबद्दल.
त्याचं एक क्लासिकल उदाहरण दिलं जातं ते म्हणजे अर्नेस्ट हेमिंग्वे ह्यानं केवळ सहा शब्दांत लिहिलेली एक कथा:-
"For sale, Baby Shoes, Never Worn." .
.
म्हटलं आपणही असं काही लिहून पाहुयात.
ह्यात थीम एकच; प्रत्येक वाक्याच्या मागं काहीतरी एक अध्याहृत घटना, कथा हवी. ती एका वाक्यावरून लागलिच डोळ्यासमोर यावी. मला पुढील काही गोष्टी सुचल्या :-
.
पुस्तकखरेदेसाठी रोजरोज उपाशी राहणं परवडणारं नव्हतं.
.
झिजलेल्या चपला दडवत व्याह्यांकडे टाकलेले आशाळभूत स्मित.
.
अजगराच्या मिठीत गळाठलेले मृतप्राय हरीण
.
स्फोटानंतरः- हो, माझाच तर हात तो!
.
नवर्यासोबत असल्यानं तिनं बाजूलाच असूनही त्याला ओळखही दाखवली नाही.
.
जाहिर सत्कार होतानाही त्याला खर्या कर्त्याची आठवण पुसता आली नाही.
.
गर्दित खेटल्यावर आपल्याच मुलीचा दिसलेला तो चेहरा.
.
आता तो पोलिसांपासून दूर, निवांत होता.
.
अंत्यविधी(दहनामुळं) संपल्यानं पुरावा नष्ट झाला होता.
.
कवळी बसवतानाही आठवत असलेला रम्य मधुचंद्र.
.
तंत्रज्ञानामुळं का असेना तो बाप बनलाच.
.
शेवटी एकदाचा पाळणा हलला.
.
ओकारीतून सांडलेले घोट नि हास्याचा फवारा.
.
पुन्हा खालमानेनं तो उकिरड्यातलं खरकटं अन्न शोधू लागला.
.
आज पुन्हा डझनभर दारुडे तिच्यावर चढणार होते.
.
नलिनी त्याच्या बाहूंत असतानाच मनिषाचाही आलेला कॉल.
.
रसाळ ट्याहॅच्याऐवजी निष्प्राण बाहेर आलेला मृतदेह.
.
जबरदस्तीनं सुन्नत होउनही विठूचच नाव ओठांवर.
.
तिच्या अगतिकतेवर हसत त्यानं गोलाई हाताळली.
.
लेकराचय जीवाकडे पहात तिनं मांड्या फाकवल्या.
.
ऐसा मत समझ पीके बोल रहा हूं
.
पेढा भरवताना त्यानं सारं श्रेय पालकांनाच दिलं.
.
तुझं गुपित हे ; गुपित ठेवण्या॑त माझा काय फायदा?
.
अरेरे आजपासून तिसर्याही मुलीचाच बाप म्हणवून घ्यावं लागणार.
.
आता अजून काही परिचित वाक्ये :-
मै तुम्हारे बच्चे की मां बनने वाली हू
.
म्हणून सांगते शेखर मला विसरून जा. (courtsey :- "माझे पौष्टीक जीवन" -- पु ल )
.
शत्रूच्या ह्या सुवर्णमोहरा तुझ्याकडे कशा?
.
रश्मी तर म्हणाली तू तिच्याकडे काल झोपायला नव्हतीस.
.
मुलासकट त्याने तिला स्वीकारले होते.
.
"इन्स्पेक्टर सायेब तो खरच त्यो याक्सिडेंट व्हता."
.
काय? नापास झाला म्हणून आत्महत्या??!!
.
मुलाचे मामा मुलाला आणा
.
शरीराने नाही पण मनाने मी त्याचीच झालिये.
.
आजन्म अविवाहित राहण्याची हा शंतनुपुत्र प्रतिज्ञा करीत आहे.
.
हे दशरथा, तुलाही तीव्र पुत्रशोक घडेल.
.
केशवा, माझ्या आप्तांस मी कसा मारु?
.
तू केलेल्या तपोभंगाबद्दल हा शाप, मेनके.
.
आता काही चितपरिचित, इतिहासप्रसिद्ध सूक्ष्मकथा:-
you too Brutus?
.
'Able was I ere I saw Elba'
.
काका मला वाचवा.
.
देवा त्यांना माफ कर.
.
ह्या संन्याशाच्या पोरांना वाळीतच टाका.
.
आम्ही वडीलमस्तकी असता चिंता कोण गोष्टीची?
.
तुम्हालाही अशा काही सुचतात का? वरच्या कथा कशा वाटल्या हे ही कळवा.
.
--मनोबा
वाचने
13323
वाचनखूण
प्रतिक्रिया
49
तू केलेल्या तपोभंगाबद्दल हा शाप, मेनके.
छान विषय...
In reply to छान विषय... by आदूबाळ
+१
हम्म...
In reply to हम्म... by दादा कोंडके
आता खालून वर वाचा
कल्पना आवडली.
खूपच छान
नवर्यासोबत असल्यानं तिनं
छान! बर्याच लिहील्या आहेत
In reply to छान! बर्याच लिहील्या आहेत by नगरीनिरंजन
शेजारचा जोशी नवीन गाडीचे पेढे
माझी एक
मिपावर नवीन सदस्याचा धागा आला
In reply to मिपावर नवीन सदस्याचा धागा आला by परिकथेतील राजकुमार
किंवा
चांगला प्रयत्न.
लेख आवडला
गुर्जी? आणि हिकडं?
एका वेळी
In reply to एका वेळी by निनाद
तुमच्या सूक्ष्मकथा कुठायत?
In reply to तुमच्या सूक्ष्मकथा कुठायत? by स्पंदना
ही घ्या
काही चांगल्या तर काही फारच
In reply to काही चांगल्या तर काही फारच by ५० फक्त
अर्थात वपुंपेक्षा हे फार बरं,
वाहवा!
हनिमून !
In reply to हनिमून ! by तर्री
मि. तर्री, कथा सूक्ष्म हवी
In reply to हनिमून ! by तर्री
अग आई ग!
In reply to हनिमून ! by तर्री
अगायायाया......प्राचीण जोक
शाळा .
In reply to शाळा . by तर्री
मस्तच :)
(अति) सूक्ष्म कथा
आमावस्येच्या रात्री बाहेर
'तिचं फेसबूक स्टेटस् अजूनही
In reply to 'तिचं फेसबूक स्टेटस् अजूनही by मराठे
तिच्या नातवांना, तिचे फेसबुक
त्याला आता तिच्या आधाराची गरज
ती त्याला मारायला म्हणून जोडा
. आज पुन्हा त्याच्या मिठीत
आभार....
आभार....
भारी धागा.
In reply to भारी धागा. by रातराणी
लोल!
In reply to लोल! by चांदणे संदीप
खी खी हे यू वॉना राइड
अतृप्त कि अपूर्ण?
कल्पवृक्ष लावूनी बाबा गेला
कर्णाबद्दल माझीही लघुकथा.!
For sale, Baby Shoes, Never Worn
अतिसूक्ष्म कथा
In reply to अतिसूक्ष्म कथा by गामा पैलवान
किंवा...
देशभक्त !!
एक सूक्ष्मकथा
आजहि