आयटीच्या गोष्टी - नमन
लेखनप्रकार
नॉन आयटीवाल्यांना आयटीवाल्यांबद्दल आणि एकंदरीत आयटी क्षेत्राबद्दल खुपच कुतुहल असते. आयटी म्हटलं की सगळ्यात आधी दोनच गोष्टी नजरेसमोर येतात, एक म्हणजे बक्कळ पैसा आणि दुसरं म्हणजे एसीत बसून काम करणं. दोन्ही गोष्टी आयटीमधील सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट या प्रमुख अंगाबद्दल शब्दशः खर्या असल्या तरी आयटी म्हणजे केवळ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट नाही. आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्येही बक्कळ पैसा आणि एसीमधील काम यांच्या जोडीनेच इतरही असंख्य भानगडी असतात. काही चांगल्या तर काही वाईट.
आपण भारतीय स्वतःला आयटीतील बाप समजतो. पण ते खरं नाही. या क्षेत्रात काम करणारे (आणि वास्तवाचे भान असलेले) चांगलेच ओळखून आहेत की आपण या क्षेत्रातले पाटया टाकणारे हमाल आहोत. आपल्याला मिळणारा बक्कळ पैसा हा केवळ चलनातील फरकाचा प्रताप आहे. तसेच अमेरिका आणि युरोप खंडांमध्ये वाढलेले संगणकीकरण परंतू स्वस्त आणि कुशल संगणक कामगारांची अनुपलब्धता हीसुद्धा आपल्याला सो कॉल्ड आयटीमधले बाप बनवण्यास कारणीभूत आहे. पुढे हे सारं आपण विस्ताराने पाहूच.
बरेच दिवसांपासून मनात होतं की उगाचच प्रतिसादाच्या पिंका टाकण्यापेक्षा काहीतरी चांगलं लिहिण्याचा प्रयत्न करावा. पण टंकायचा कंटाळा येत होता. त्याचबरोबर विषय कुठला निवडावा हे ही कळत नव्हतं. माझा हातखंडा असलेला अध्यात्म हा विषय डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या प्रकाशात उलगडून दाखवावा की मानसशास्त्राचं बोट धरुन मनोविकारांबद्दल सहज सोप्या भाषेत लिहावं हे कळत नव्हतं. संगणक सुरक्षा या विषयावर काही खरडावं असंही कधी कधी वाटायचं. नुकतीच चालू झालेली प्रथम फडणीसांची मोबाईल उत्क्रांतीवरील सुंदर मालिका, त्याहीआधीची सोकाजीनानांची अत्याधुनिक तंत्रज्ञान सहज सोप्या भाषेत सांगणारी लेखमाला वाचून वाटलं की आपण आयटीवर का लिहू नये. आणि ठरवलं की आपण आयटीवरच लिहायचं.
कमी अधिक अशा साडे सात आठ वर्षांच्या माझ्या आयटी करीयरमध्ये खुप काही गोष्टी पाहील्या, अनुभवल्या. काही आनंद देणार्या, काही आपल्या क्षमतेचा कस पाहणार्या, काही मनस्वी चीड आणणार्या, तर काही नैराश्येच्या खोल गर्तेत फेकून देणार्या. या सार्याबद्दल लिहिण्याचा हा प्रयत्न असेल. मिपावर आयटीमधील रथी महारथी आहेत. ते माझ्या लेखनात काही चुका झाल्या तर दाखवून देतीलच. तसेच ते प्रतिसादांमधून आपले अनुभवही सांगतील, वाचकांच्या प्रश्नांना उत्तरेही देतील याची मला खात्री आहे.
नमनाला घडाभर तेल वाहून झालं आहे. मुद्दयाचं असं काही लिहिलंच नाही. ते सारं आपण पुढच्या भागापासून पाहू.
तोपर्यंत, स्टे टयुन्ड* !!!
*स्टे टयुन्ड - हा आयटी मॅनेजर्सचा आवडता शब्दप्रयोग. शब्दशः अर्थ "तुमचा रेडीओ अमुक अमुक फ्रीक्वेंसीला टयून करा" एव्हढाच असला तरी आयटीमध्ये त्याला खुप मोठा अर्थ आहे. तुम्हीच पाहा:
प्रसंग १ : अबक आयटी कंपनी आपली कर्मचारी संख्या वाढवण्याच्या विचारात आहे. दे हॅव एक्स्पान्शन प्लान. या संदर्भात एका नामांकीत सरकारी संगणक शिक्षणसंस्थेच्या नोटीस बोर्डवर नोटीस लावली जाते. पोरं पोरी भराभर आपापले रिझुमे, सीव्ही जे काही असेल ते मॅनेजरच्या ईमेल आयडीवर पाठवतात. (कंपनी सध्यातरी छोटी असल्यामुळे प्रोजेक्ट मॅनेजरच रीक्रुटमेंट, रीसोर्स मॅनेजमेंट पाहत असतात.) पोरांचा भरभरुन प्रतिसाद पाहून मॅनेजर हरखून जातो. रीप्लाय म्हणून केलेल्या ईमेलमध्ये पोरांना तो खुप मोठी मोठी स्वप्नं दाखवतो. शेवटी थोडंसं रीक्रुटमेंट प्रोसेसबद्दल, इंटरव्ह्यू शेडयुलबद्दल लिहितो लिहितो. अगदी शेवटची ओळ असते, स्टे टयुन्ड !!!
प्रसंग २ : कंपनीत अॅट्रीशन रेट वाढू लागला आहे. मॅनेजमेंटच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. याच गतीने पोरं पोरी जरी कंपनी सोडून जाऊ लागली तर एक दिवस कंपनीला टाळं ठोकावं लागेल याची त्यांना खात्री पटू लागली आहे. काहीतरी करणं भाग आहे. मग एचारमधील चार डोकी/मॅनेजमेंटमधील चार डोकी मिळून काहीतरी प्लान बनवतात. याच कंपनीत पोरांना कसं उज्ज्वल भवितव्य आहे याच्या लंब्याचौडया बाता केल्या जातात. हा प्लान एक खुपच वरचा मॅनेजर एक दिवस टाऊन हॉल नामक मीटींगमध्ये सार्या कर्मचार्यांना समजावून सांगतो. त्याचं ते गाजरदर्षक भाषण संपवता संपवता तो म्हणतो, स्टे टयुन्ड !!!
प्रसंग ३ : अबक नावाच्या भारतीय आयटी कंपनीचा कखग नामक अमेरिकन तेल आणि वायू कंपनीशी आयटी सेवा पुरवण्यासाठीचा करार आहे. कधीतरी या अमेरिकन कंपनीचा एक उच्चपदस्थ अधिकारी अबक च्या भारतातील डेव्हलपमेंट सेंटरला भेट दयायला येतो. त्याच्यासाठी पायघडया घातल्या जातात, त्याला टोपी घातली जाते (सॉरी, पगडी घातली जाते), त्याची आरती केली जाते. या सार्या पाहूणचाराने तो भारावून जातो. शेवटी तो टाऊन हॉल नामक मीटींगमध्ये भाषणाला उभा राहतो. आमच्या कंपनीला या वर्षी इतके इतकी मिलियन की बिलियन डॉलर नफा होणार आहे. पण हा नफा कमावण्यासाठी आम्हाला तुमच्याकडून उत्तम अशा आयटी सेवेची अपेक्षा आहे अशा टाईपचं ते भाषण असतं. भारतीय कंपनीच्या मॅनेजरच्या डोळ्यांसमोर ऑनसाईट अपॉर्च्युनिटीज दिसायला लागतात. तो "क्लायंट" आपलं भाषण एकदाचं संपवतो. त्याचं शेवटचं वाक्य असतं, स्टे टयुन्ड !!!
वाचने
31075
वाचनखूण
प्रतिक्रिया
115
धन्याजीराव, स्टेईंग ट्यून्ड!
In reply to धन्याजीराव, स्टेईंग ट्यून्ड! by आदूबाळ
1 टू आदूबाळ.
सुरुवात
In reply to सुरुवात by मन१
पण जालावर बहुशः आयतीवाले
In reply to पण जालावर बहुशः आयतीवाले by धन्या
वेल...
In reply to पण जालावर बहुशः आयतीवाले by धन्या
=))
In reply to =)) by सोत्रि
आयटीवाले नाना
In reply to =)) by सोत्रि
पिपिटी इझ नॉट रेड्डी येट .
In reply to पण जालावर बहुशः आयतीवाले by धन्या
ईओडी बरोबर सीओडब्ल्यू असा पण
In reply to ईओडी बरोबर सीओडब्ल्यू असा पण by आदूबाळ
आता आता ह्या ईओडीबरोबर ते
In reply to आता आता ह्या ईओडीबरोबर ते by किसन शिंदे
"एएस्एपी"चा कुणी "असॅप" असा
In reply to ईओडी बरोबर सीओडब्ल्यू असा पण by आदूबाळ
आमच्याकडे सी ओबी = क्लोजर ऑफ
मस्तच रे धन्या.
चला आयटीत गेलो नाही तेच कसं
छे छे !
In reply to छे छे ! by परिकथेतील राजकुमार
मालक जरा दमानं घ्या. ज्या
In reply to मालक जरा दमानं घ्या. ज्या by धन्या
ऑक्के सायर !
In reply to ऑक्के सायर ! by परिकथेतील राजकुमार
धाग्याच्या लेखकांनी जर
In reply to धाग्याच्या लेखकांनी जर by ५० फक्त
+१
In reply to छे छे ! by परिकथेतील राजकुमार
येऊ द्या
वा, मस्त लिहिलेय!!! आमचे
छान सुरुवात.
बघिंग्ड द वाट!
गुड वन!
श्टेयिंग ट्युन्ड
मस्त सुरुवात.
In reply to मस्त सुरुवात. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
येस सर...
In reply to येस सर... by धन्या
आणखी एक
पहिला भाग नुसताच, 'लिहिणार
प्यार का पंचनामा
In reply to प्यार का पंचनामा by कपिलमुनी
सहमत आहे...
In reply to सहमत आहे... by धन्या
सहमत आहे
धनाजीराव, फक्त तिरप्या अक्षरात लिहू नका, ते वाचायला त्रास आहे
आय
............... आरेरे आय टी
चांगली सुरुवात
>> स्टे टयुन्ड
In reply to >> स्टे टयुन्ड by मराठे
हाहाहा...
बाकी नमनाला घडाभर तेल असं जरी
3 signs that the person is working in IT .....
मानसशास्त्राबद्दल लिहलं असतं तर लिखाण वेगळ्या उंचिवर पोचलं असतं
छान झालाय लेख... पुढचा भाग हि
वाचत आहे
ट्युन्ड..
धनेवाद
In reply to धनेवाद by चौकटराजा
नाही फुटणार हो फुगा. सर्वत्र
हे सगळे विन्टेल/ एस्सॅप वाले
भारतीय आय टी
नॉन आयटीवाल्यांना आयटीवाल्यांबद्दल आणि एकंदरीत आयटी क्षेत्राबद्दल खुपच कुतुहल असते.ज्योक ऑफ द डे! तो जमाना १५ वर्षापूर्वीच संपला, आता आयटीतली लोक काय हमाल आहेत, ते सगळ्याना कळून चुकलंय.आपण भारतीय स्वतःला आयटीतील बाप समजतो.तुम्ही पुढे याचं स्पष्टीकरण दिलं आहेच, आणि या प्रांजळपणाबद्दल तुमचे नक्कीच कौतुक आहे. पण वस्तुस्थिती तेव्ह्ढयापुरतीच मर्यादित नाही. मुळात भारतीय "आयटी" ही नुसती आयटी "सर्विसेस प्रोवायडर" आहे. खर्या व्यवस्थापनशास्त्रात ("स्टे ट्युन्ड"- वगैरे खुळचट प्रकार नव्हे) जी व्हॅल्यू चेन सांगतात त्यानुसार आयटी सर्विसेस ची व्हॅल्यू चेनच्या एका एन्ड ला ओरॅकल, एसएपी इ कंपन्या येतील दुसर्या एन्ड ला इन्फी, विप्रो इ भारतीय कंपन्या येतील- थोडक्यात ज्या फक्त लेबर काँट्रॅक्टर आहेत असं म्हणता येइल अशा. भारतातल्या आयटी क्षेत्राचा (भारतात) कितीही गवगवा झालेला असला तरी दुर्दैवाने ही वस्तुस्थिती आहे की २०-२५ वर्षापूर्वी भारतीय कंपन्या "बॉडी शॉपींग" करायच्या आणि आजही सामान्यपणे त्या तेच करत आहेत. या २०-२५ वर्षात रोजगाराच्या वाढलेल्या अमाप संधी, एक ब्रँड म्हणून भारतात वाढलेले महत्त्व या जमेच्या आणि उल्लेखनीय बाजू असल्या तरी एक इंडस्ट्री म्हणून त्यात गुणात्मक वृद्धी फारशी झाली नाही हे ही तितकंच खरं आहे. माझ्यापुरतं बोलायचं झालं तर- भारत आयटी तला "बाप" तेव्हाच होइल- जेव्हा: - बाजारात एक तरी भारतीय ऑपरेटिंग सिस्टिम असेल- विंडोज वा ओएस एक्स सारखी. - ओरॅकल, एसेपी इ सारखे एक तरी भारतीय प्रॉडक्ट बाजारात असेल ज्याच्यावर जगभरातले संगणकतज्ज्ञ काम करताहेत - अँड्रॉईड, ओएस ५ सारखे एक तरी मोबाईल ओएस वा इंटरनेट ब्राऊसर भारतीय कंपन्यानी बनवलेला आहे - सॅमसंग, अॅपल एवढा तर जाऊ द्याच, जागतिक मोबाईल फोन मार्केटमधे किमान ५% हिस्सा असणारी भारतीय कंपनी असेल - तेच भारतीय बनावटीच्या संगणकाबद्दल चायनाने अमेरिकन/युरोपियन संगणकांचे सुटे भाग बनविण्यापासून सुरुवात करुन ते आज लेनोव्हो विकत घेऊन जागतिक संगणक मार्केटमधला एक महत्त्वपूर्ण हिस्सा बनण्यापर्यंत प्रगती केली. अशी अनेक उदाहरणे चायनाने अलाँग द व्हॅल्यू चेन केल्याची दिसतील. भारतातही, नॉन आय टी क्षेत्रात ही उदाहरणे दिसतील ( टाटा मोटर्स, भारत फोर्ज, सझलन, बजाज इ. अनेक). २५ वर्षापूर्वी जो भारत ओबड्धोबड अँबेसिडर्/पद्मिनी गाड्या बनवायचा तो आज जॅग्वार्/लँड रोव्हर सारख्या आलिशान गाड्यांपासून ते नॅनो पर्यंतच्या गाड्या बनवतो. अशी नेत्रदीपक प्रगती (गुणवत्तेच्या दृष्टीने) भारतीय आय टी ने केलीय असं मला तरी वाटत नाही. (किंबहुना, हे संकेतस्थळ ज्याच्यावर चालतेय ते ड्रुपल (? चूभूद्याघ्या) सुद्धा भारतीय नाहिये)In reply to भारतीय आय टी by बाळकराम
हम्म...
In reply to भारतीय आय टी by बाळकराम
हे जग आयटीयन्स आणि
In reply to हे जग आयटीयन्स आणि by खटासि खट
हा हा हा!
In reply to भारतीय आय टी by बाळकराम
भारत आयटी तला "बाप" तेव्हाच होइल- जेव्हा:....
यु गाईज नीड तो फोकस ऑन
In reply to यु गाईज नीड तो फोकस ऑन by अमोल खरे
हाहाहा...
In reply to हाहाहा... by धन्या
येस आय डू अग्री विथ मि.अमोल.
हमाल असे म्हणणे चुकीचे आहे.
In reply to हमाल असे म्हणणे चुकीचे आहे. by मयुरपिंपळे
अधिक वाचायला आवडेल...
In reply to अधिक वाचायला आवडेल... by धन्या
आमच्या सरामुळे आयटी मधे काम
In reply to आमच्या सरामुळे आयटी मधे काम by ५० फक्त
विनय सर काय?
In reply to विनय सर काय? by स्पा
विनयशील असावेत बहुदा. बाकी
In reply to विनयशील असावेत बहुदा. बाकी by ५० फक्त
काय सांगता काय?>
In reply to काय सांगता काय?> by स्पा
संस्कार वगैरेचं माहिती नाही...
In reply to संस्कार वगैरेचं माहिती नाही... by धन्या
होय होय्,पार सिडनी मध्ये
In reply to अधिक वाचायला आवडेल... by धन्या
ज्याना कामाची आवड नसते ते
In reply to हमाल असे म्हणणे चुकीचे आहे. by मयुरपिंपळे
आय टी मध्ये डाऊन टाइमला
धन्या, सुरुवात झकास रे.
वाचतीये.
लेख...
लेखाची सुरूवात आवडली. काही
In reply to लेखाची सुरूवात आवडली. काही by चावटमेला
looping
In reply to looping by चिरोटा
Its not a rocket science
In reply to Its not a rocket science by कपिलमुनी
रॉकेट सायन्स" सोपा असतय... **
In reply to रॉकेट सायन्स" सोपा असतय... ** by धन्या
थांबताहेत कशाला अॅप्रेझल
In reply to थांबताहेत कशाला अॅप्रेझल by ५० फक्त
ते ही खरं आहे म्हणा...
In reply to ते ही खरं आहे म्हणा... by धन्या
खर आहे
In reply to looping by चिरोटा
थोडी दुरुस्ती
फार वरवरचे होतय
In reply to फार वरवरचे होतय by प्रसाद१९७१
आणि स्वताच्या काँमेन्ट्स पाहिजेत च
In reply to आणि स्वताच्या काँमेन्ट्स पाहिजेत च by ५० फक्त
नाही हो...
In reply to फार वरवरचे होतय by प्रसाद१९७१
हा लेख खुपच वरवरचा झाला आहे
वाचतोय आतल्या (आय.टी. च्या)
सुरवात चांगली आहे, तपशिलवार
धन्याचा
In reply to धन्याचा by विलासराव
हम्म...
In reply to हम्म... by दादा कोंडके
नाही हो...
हम्म
सुरवात आवडली आहे.
मुलींना आयटी वालाच हमाल का
In reply to मुलींना आयटी वालाच हमाल का by आशु जोग
हा प्रश्न नक्की कोणाला आहे ?
डोमेन एक्स्पर्ट