हे " शास्त्रीय संगीत" हाय तरी काय राव ? ( भाग १)
लेखनप्रकार
आपल्याला ' मधुबनमे राधिका नाचेरे ' हे गीत आवडत असते पण राग " हमीर" मधे आहे हे आपल्याला ठाउक नसते.
आपल्याला ' अब तो तेरे बिन जी लेंगे हम "' हे गीत आवडत असते पण राग " अहीर भैरव " मधे आहे हे आपल्याला ठाउक नसते.
आपल्याला ' छैया रे छैया ' ( द ट्रेन) ' हे गीत आवडत असते पण राग " मालकंस" मधे आहे हे आपल्याला ठाउक नसते.
आपल्याला ' गोरी तोरी बाँकी ' हे गीत आवडत असते पण राग " भैरवी" मधे आहे हे आपल्याला ठाउक नसते.
आपल्याला ' साज हो तुम आवाज हुम मै ' हे गीत आवडत असते पण राग " पटदीप " मधे आहे हे आपल्याला ठाउक नसते.
आपल्याला ' तू चीज बडी है मस्त मस्त ' ही गीत आवडत असते पण राग " भीममपलास" मधे आहे हे आपल्याला ठाउक नसते.
आपल्याला ' कही आर काही पार ' हे गीत आवडत असते पण राग " पिलू" मधे आहे हे आपल्याला ठाउक नसते.
आपल्याला ' कई सदियॉसे कई जन्मोसे ' हे गीत आवडत असते पण राग " चारूकेशी " मधे आहे हे आपल्याला ठाउक नसते.
आपल्याला ' मेरी मुहबत जवा रहेगी ' ही गीत आवडत असते पण राग " भूप" मधे आहे हे आपल्याला ठाउक नसते.
अशा सर्वांसाठी हा लेख आहे.
खाणे व गाणे यात काहीसे साम्य आहे. कितीही प्रयोग केले तरी श्रीखंडाला लसणीची फोडणी देऊन चालत नाही व मेथीच्या
भाजीत वेलची घातलेली चालत नाही. शास्त्रीय संगीताचे स्टॅन्डर्ड मसाले ठरलेले आहेत. पूर्व सुरीनी सा रूपी लवंग रे रूपी दालचिनी, ग रूपी तमालपत्र, प रूपी बाद्ल ध रूपी दगफफूल व नि रूपी धने असे वेगवेगळया प्रमाणात व वर्ज्यावर्ज्य साधून खाउन पाहिले चार जणाना खायला दिले व जे स्वादिष्ट वाटले त्यांची रेसिपी लिहून ठेवली. त्या रेसिपीलाच " राग " असे म्हणतात.
यः रंजयति सः राग: अशी रागाची साधी सोपी व्याख्या पूर्वजानी केली आहे. अर्थात रंजनाची कल्पना काही प्रमाणात व्यक्तिसापेक्ष असल्याने मला खास करून " हंसध्ननि " राग आवडतो असे लता मंशेशकर म्हणतात. त्याचे इंगित असे आहे.
राग म्ह्णणजे कामगार कायद्यातील standard code of conduct" सारखे असतात त्यात जरा बदल करून पण मूळ गाभा तसाच ठेवून जे राग तयार होतात त्याना जोड राग तसेच अनवट राग असे म्हणतात. जोड व अनवट हे एकमेकाना पर्यायी शब्द नाहीत हे लक्षात ठेवावे.
आता रागातील रंजकता साधण्यासाठी काही अगदी मूलभूत नियम तयार केले आहेत ते वारंवार " रागाच्या मसाल्याची" चव घेऊनच ! ते नियम असे.
१. एका सप्तकात मुख्य व विकृत( कोमल व तीव्र ) धरून बारा स्वर असतात. तरीही रागासाठी यातील कोणतेही सातच स्वर कच्चा माल म्हणून निवडले जातात.( अपवाद- पिलू या रागात बाराही स्वर लागतात ) .
२. या सात स्वरातील कोणते तरी पाच स्वर कमीतकमी हवेतच आरोहात पाच व अवरोहात पाच ( स्वरांचा चढ उतार )
असे स्वर असले की त्यास औडव औडव राग म्हणतात . सहा सहा स्वर असतील तर षाडव षाडव व सात सात स्वर असतील तर संपूणे संपूर्ण राग असे म्हणतात.
३. आरोहात व अवरोहात दोन सलग ( सलग बारा स्वर स्थाना मधले ) स्वरांपेक्षा जास्त अंतर असू नये.
४. ज्या रागात एकाच स्वराची शुध व कोमल स्वर ही दोन्ही रूपे येतात त्यात आरोहात शुध व अवरोहात कोमल स्वर
घेतला पाहिजे ( उदा सारंग रागात ( सावन आये या ना आये हे गीत ) चढताना शुध निषाद व उतरताना कोमल निषाद) .हे नियम पाळून अनेक " मसाले" बारा स्वरांत करता येतात.
पण असे गणिती permutation combination केले म्हणजे झाला मसाला तयार असे नाही. तो कुटायची पद्धत बदलली की एकाच कच्या मालाचे दोन राग तयार होतात .( उदा मारवा व पूरिया, भैरव व जोगिया ,भूप व देसकार ) पण ते लगाव , श्रुति, अल्पत्व बहुत्व हे बाकी सविस्तर विचार पुढे करू अतः क्रमशः हा शब्द लिहितो..
वाचने
26246
वाचनखूण
प्रतिक्रिया
65
पुभाप्र !!
In reply to पुभाप्र !! by सूड
क्या बात है!
In reply to पुभाप्र !! by सूड
+१
आवडले!
चौरा-गुरुजी: शिकवणीला विद्यार्थी सतरंजी टाकून बसलाय!
बारा
In reply to बारा by सुनील
धन्यवाद, सुनील.
In reply to बारा by सुनील
स्पष्टीकरण
चौरा, उत्तम लेख
ओ काका, जरा आमच्या पीढीची
In reply to ओ काका, जरा आमच्या पीढीची by धन्या
हे घ्या...
In reply to हे घ्या... by मन१
म्हणजे?
In reply to म्हणजे? by सूड
मेघ व मेघ मल्हार दोन्हीही राग आहेत
In reply to हे घ्या... by मन१
की कालिंगडा ?
In reply to की कालिंगडा ? by सूड
मझे जर चुकत नससेल तर
In reply to मझे जर चुकत नससेल तर by चौकटराजा
एक उपयुक्त दुवा
In reply to मझे जर चुकत नससेल तर by चौकटराजा
कलिंगडा आणि भैरव वेगळे आहेत
In reply to ओ काका, जरा आमच्या पीढीची by धन्या
गेस
In reply to गेस by आबा
अहिर भैरव
In reply to अहिर भैरव by रमेश आठवले
वरील दुवा smily शिवाय
In reply to गेस by आबा
मला वाटते
In reply to मला वाटते by चौकटराजा
राग ?
In reply to मला वाटते by चौकटराजा
अहीर भैरवच !
शात्रीय आणि अभिजात
In reply to शात्रीय आणि अभिजात by सुनील
छान छान छान: राग संगीत
In reply to छान छान छान: राग संगीत by चित्रगुप्त
तूर्त या एवढेच म्हणतो..
पाकशास्त्रीय संगीत आवडतंय...
In reply to पाकशास्त्रीय संगीत आवडतंय... by पिवळा डांबिस
पिलू
In reply to पिलू by सव्यसाची
अजून एक पिलुमधील छान गाणे
In reply to अजून एक पिलुमधील छान गाणे by चिंतामणी
पिलू मधील अजून काही गाणी आठवली
In reply to पिलू मधील अजून काही गाणी आठवली by चिंतामणी
नौशाद यांचा हा अत्यंत आवडता
In reply to नौशाद यांचा हा अत्यंत आवडता by अन्या दातार
हो. बरोबर.
In reply to पिलू by सव्यसाची
हे गीत गारा या रागात
In reply to हे गीत गारा या रागात by चौकटराजा
चुक दुरुस्त केल्याबद्दल धन्यवाद..
संगीत सरिता
In reply to संगीत सरिता by रमेश आठवले
आताही अस्मिता वाहिनीवर
In reply to संगीत सरिता by रमेश आठवले
संगीत सरिता नावाचा एक कार्यक्रम ऐकवीत असत नव्हे.
In reply to संगीत सरिता by रमेश आठवले
हा कार्यक्रम अजूनही ...
वाचतोय
वाचतोय, तरि पूर्ण कळत नै. पण
चौराकाका
माहितीपूर्ण...
मस्तच...
छान लिहिताय...
In reply to छान लिहिताय... by योगप्रभू
अगदी..
In reply to छान लिहिताय... by योगप्रभू
चंदन सा बदन
In reply to चंदन सा बदन by मैत्र
चूभुदेघे
In reply to चूभुदेघे by योगप्रभू
चितवन बरोबर आहे.
In reply to चितवन बरोबर आहे. by चिंतामणी
चितवन ..
संगीत सरिता
लिहा...
www.parrikar.org/
अरे वा !
वाह ! उत्तम
वाचतोय.......
In reply to वाचतोय....... by मनराव
+१
कानाला गोड वाटतं ते पुन्हा पुन्हा ऐकत रहाणे एवढच काय ते जमणार.... असो... संगीत कळत नसलं तरी त्याची महिती होणार म्हणुन हि मालिका, नाक्कीच वाचेन...+१ चौरांना पु. भागाच्या शुभेच्छा आणि प्रतिक्षा! तात्यापण खूप छान लिहतात या विषयावर. शा. सं. कळत नसलं तरी चांगल्या गायकाने आळविलेले सूर ऐकताना तल्लीन व्हायला होतं.छान/टेड
In reply to छान/टेड by नंदन
आयला, लेख लैच जब्राट आहे!!!!
In reply to छान/टेड by नंदन
नंदन, धनश्री पंडितच्या लिंकबद्दल धन्यवाद!
लिंक
क्या बात है !...
सुरेल शिकवणी.
In reply to सुरेल शिकवणी. by सस्नेह
थांबा...
सुगम संगीता मधे राग शोधणे बरोबर नाही.
सुबोध मार्गदर्शन. आवडले.