निरक्षर
कधीही न भेटणार्या, पण जिवलग मित्रांची ही स्टोरी. न भेटता (किंवा भेटण्याची शक्यता नसताना) ते जिवलग कसे झाले? ...असले प्रश्न विचारायचे नाही. तो भेटणारच नाही म्हटल्यावर ‘मी येड्यासारखा चालतोय कशाला’? नाही, नाही ते पण विचारायच नाही.... फक्त वाचायच.
_________________________________
मुक्कामाचं ठिकाण ठाऊक नाही पण चालयच,... वेड्यासारखं चालायच.
आजूबाजूच्या गर्दीला जुमानतय कोण?
उन्हातान्हातून वणवण त्यात सावली कुठली बोंबलायला ?
आपलीच पावलं म्हटल्यावर झक मारत चालणारच आणि पावलं चालतायत म्हटल्यावर रस्ता न सरून सांगतोय कुणाला?
अरे एक सांगायच राहिलं, वाळवंटातनं चालायच....फार मजा येते.
अचानक वाळूत अक्षरं उमटलेली दिसतात. कोण लिहून गेला कसं कळणार?
चालायची ताकद संपली पण बघायची आहे ना? (बघा!) ...पण दिसलं काहीच नाही.
तरी कुणीतरी आहे असं भासलं...(मला भास होतायत वगैरे निष्कर्ष काढू नका वाळूवरची अक्षर दिसली म्हटलयना?)
चला आता वाळूवरच्या अक्षरांशी खेळू . डोळ्यांची वाट लागली तरी हरकत नाही... ‘आत’ शांत वाटायला हवं.
त्या लिहित्या हाताला उत्तर देतो. ‘कसं देणार’ काय विचारताय? मगाशी सांगीतलं ना ‘कुणी रेखाटलीयेत माहिती नाही’ तरी आपल्याकडे आयडीया आहे ना!.... त्याच वाळूत अक्षरं लिहून उत्तरं द्यायची!
आह..! झाला संवाद चालू! (स्वत:चा स्वत:शी का होईना)...‘काही तरी चालू झालं’ हे महत्त्वाच.
सुरुवातीला वेड्यासारखा वाटणारा हा अनोखा संवाद हळूहळू.. पावलागणिक वाढत गेला (तुम्हाला काय वाटलं थांबलो? छे, .....चालता चालता लिहीतोय ).
अक्षरं उमटत राहिली. कधी वरून खाली कधी खालून वर. (मायला वाचणारेय कोण? मीच ना?) मग कशी लिहीली काय विचारताय?
तू. मी. मी. तू. ..... मी काय वाळूतली हुतूतू खेळत नाय, नीट वाचा... तू. मी. मी. तू. ..आय एम रायटींग संवाद फ्रॉम बोथ साइडस. आता पुन्हा ‘कश्याला लिहीतोय’ विचारू नका... न भेटणार्या `जिवलग मित्रांची' स्टोरी आहे ही (एकदा सांगीतलय ना)
आता वाळूतली अक्षरं डोक्यात गेली. सगळीकडे अक्षरं... पानापानांवर, फुलाफुलावर. कधी वार्याच्या झुळकीवरदेखील. कधी तर थेट मोठ्यांदा वाचायलाच लागलो.
अक्षरांच्या सोबतीनं आता जगणं आलं. इतकं इतकं बोलतोय तुझ्याशी. तुझ्याच शब्दात सांगायचं तर स्वतःशी बोलावं इतकं. (पब्लिक माझ्याकडे विचित्र नजरेनं बघतय,... बघू दे)
येड्यावाणी उर्दू-मराठीची भेसळ चाललीये पण अजूनही अक्षरंच. लिहिणारा हात नाही. त्या अक्षरांना तुझा चेहरा नाही.. कधी येशील समोर? या प्रश्नाला उत्तरही अक्षरीच. समोर येऊन नाही.... (अजून सॅंडवरच चाललय सगळं, आलं ना लक्षात?)
माझ्याकडे तुझा फोन नाही, पत्ता नाही, इ-मेल नाही, फेसबुक कश्याला म्हणतात मला माहिती नाही. अगम्य अश्या `संपर्कमाध्यमांतून आपण एकमेकांचे मित्र आहोत. पण आपण एकमेकांना कॉंटॅक्ट करायचा नाही. आपण फक्त बोलायच. वन वे...वाळूत अक्षरं लिहून.
काही क्षणांत.. किंवा कुठेसं म्हटलंय तसं दोन क्षणांच्या गॅपमधे का होईना पण तुझ्याशी जोडलं राहण्याचं अक्षराशिवाय साधन नाही, हे जाणून फार येड्यासारखं होतं. (तरी मी लिहीणार!)
नुसतेच शब्द, त्यांचे कधी तू, कधी मी, आणि कधी आपण मिळून लावलेले अर्थ. कळतयं ना तुला? मीच लावतोय अर्थ पण तुला मधे ओढतोय.... (नायतर पब्लिक ट्यांपोत बसवेल)
आनंद देणार्या इतर कोणत्याच गोष्टी तुझ्यासोबत करता येत नाहीत. (....ते केलं तर पारच कामातून गेला म्हणतील सगळे)
स्वतःला दिवसातून केव्हाही आरशात बघतो तेंव्हा तूच दिसायला लागलायस..नाही नाही... असाही दिवस येईल कधी तरी . ( अजून तरी आरश्यात बघीतल्यावर मीच दिसतोय)
तुझंमाझं नातं ते काय मग? निव्वळ शब्द?... नाही नाही... निदान तू तरी असं म्हणू नकोस.
‘आरशाच्या पलिकडे’ बघतो कसलाच शोध लागत नाही. मग तुला बघण्याचा हा विलक्षण सोस तरी का लावून घ्यायचा जिवाला? तू दिसलास कदाचित, तर काय होईल त्याने? स्वप्नपूर्ती? अपेक्षाभंग?.... छे, छे, तू दिसावास अशी अपेक्षा तरी कशाला? (वाळूतली हुतूतू काय कमी मजा आणतेय?) याच विचारात मग्न असताना कुणीतरी एफेम लावला.....
मेरे फोटोको, मेरे फोटोको सीनेसे यार,
चिपकाले सैंय्या फेविकॉल से!
....अचानक उत्तर मिळूनही गेलं. . तू आहेस अशी पाटीच गळ्यात अडकवून घेतली!
आता एकदम झ्याक झालं.. एकरूप असणे, समरस होणे अनुभवतोच आहे प्रत्येक क्षणी. हे ‘नसलेल्याच असलेल्याशी नातं’.... अशी फेविकॉल सोबत मिळणे हे माझं परमभाग्यच!
तेव्हा तुझंमाझं नातं. निरंतर टिकणारं.... फेविकॉल कशाला हवा? कल्पनेची पकड काही कमी नाही.
निरक्षर म्हणजे अक्षर ओळख नसलेला असा नाही. त्याला लिहीता वाचता येतं, पण अर्थ समजत नाही. आता आपलं नातं निव्वळ शब्दात बांधलेलं नव्हे, तर कधी न मिटणारं.... फेविकॉलपेक्षा मजबूत....निरक्षर भ्रमाच्या लेपाचं.
आता तू असलास काय आणि नसलास काय, दिसलास काय आणि नाही काय, काही फरक पडत नाही... माझ्या बाजूनं नातं पक्कं आहे! त्याला स्थळाकाळाचं बंधन नाही....कल्पना हेच त्याचं लिमिट आणि तीच त्याची पॉवर.
वाचने
29058
वाचनखूण
प्रतिक्रिया
147
In reply to :) by अग्निकोल्हा
देव आहे आणि देव नाही याबाबत
धन्याचे सर्व प्रतिसाद पटले.
In reply to धन्याचे सर्व प्रतिसाद पटले. by भीमाईचा पिपळ्या.
काय राव तुम्ही, मरुन रोबच्या
In reply to काय राव तुम्ही, मरुन रोबच्या by धन्या
धनाजीराव, ही पोस्ट स्कोरसेटलींग म्हणून वाचली जातीये त्यामुळे
In reply to काय राव तुम्ही, मरुन रोबच्या by धन्या
@धनाजी शिंदे आणि पार्टी>>>
धनाजी शिंदे आणि पार्टी
स्वतःचे अस्तित्व कबूल करणे
In reply to स्वतःचे अस्तित्व कबूल करणे by बॅटमॅन
मैं कौन हूं??
In reply to मैं कौन हूं?? by कवितानागेश
हम्म
ग्लिफ ह्यांचे प्रतिसाद वाचून
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती !!!
In reply to जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती !!! by अर्धवटराव
+१
देवबिव याबद्दल लिहिणारं दुसरं
सावरकर
चर्चेनं फार सुरेख रंग घेतला आहे
In reply to चर्चेनं फार सुरेख रंग घेतला आहे by संजय क्षीरसागर
आपल्या प्रत्येकाला जो `मी'
In reply to आपल्या प्रत्येकाला जो `मी' by धन्या
हा शब्दांचा खेळ नाही
In reply to चर्चेनं फार सुरेख रंग घेतला आहे by संजय क्षीरसागर
हा दिवस दिसेल असं कधी
In reply to हा दिवस दिसेल असं कधी by अर्धवट
हा दिवस दिसला हे माझं अहोभाग्य!
मला उमजलेलं तात्पर्यः "मी"
In reply to मला उमजलेलं तात्पर्यः "मी" by कवितानागेश
तुम्ही चर्चा पुन्हा अयोग्य मार्गावर नेण्याच्या प्रयत्नात आहात
मी काही देव देव करणार्यातला नाही.
In reply to मी काही देव देव करणार्यातला नाही. by लंबूटांग
तुमचं म्हणणं इतकंच आहे :
टोलवा टोलवी का?
In reply to टोलवा टोलवी का? by लंबूटांग
भक्तांना त्या कल्पनेचा उपयोग होत असेल! इतकंच तुमचं म्हणणं आहे
In reply to भक्तांना त्या कल्पनेचा उपयोग होत असेल! इतकंच तुमचं म्हणणं आहे by संजय क्षीरसागर
तुम्ही लेख नीट वाचला नाही बहुतेक
आयला या एअरटेलच्या...
In reply to आयला या एअरटेलच्या... by अर्धवटराव
तो फोन एक कल्पना आहे, संवाद वगैरे भ्रम आहे......
In reply to तो फोन एक कल्पना आहे, संवाद वगैरे भ्रम आहे...... by संजय क्षीरसागर
तेच सत्य तर मला उमगलय...
In reply to तेच सत्य तर मला उमगलय... by अर्धवटराव
`पण ज्याच्याशी फोनवर बोलणं सुरु आहे तो कल्पना आहे '....
In reply to `पण ज्याच्याशी फोनवर बोलणं सुरु आहे तो कल्पना आहे '.... by संजय क्षीरसागर
हो हो.. आय गॉट द पॉईण्ट
In reply to हो हो.. आय गॉट द पॉईण्ट by अर्धवटराव
कशाला राव शब्दांचा कीस पाडताय
In reply to कशाला राव शब्दांचा कीस पाडताय by धन्या
सवय हो...
In reply to हो हो.. आय गॉट द पॉईण्ट by अर्धवटराव
अरा तुम्ही बेसिक चूक करताय
In reply to अरा तुम्ही बेसिक चूक करताय by संजय क्षीरसागर
त्याचं कसं आहे साहेब...
In reply to `पण ज्याच्याशी फोनवर बोलणं सुरु आहे तो कल्पना आहे '.... by संजय क्षीरसागर
जाऊदया हो संक्षी. तुमच्याही
In reply to जाऊदया हो संक्षी. तुमच्याही by धन्या
तुमच्याही वरताण लोक आहेत इथे? हा प्रश्नच कुठे आहे
अरा, तुम्ही भक्तीमार्ग काय आहे ते इथे अत्यंत मुद्देसूदपणे मांडलय
In reply to अरा, तुम्ही भक्तीमार्ग काय आहे ते इथे अत्यंत मुद्देसूदपणे मांडलय by संजय क्षीरसागर
परिषिष्ट !!!
In reply to परिषिष्ट !!! by अर्धवटराव
ठाकुरजींना नेमकं काय आणि कसं
In reply to ठाकुरजींना नेमकं काय आणि कसं by धन्या
धाग्याचा अधिक ख.फ. होऊ नये म्हणुन...
In reply to धाग्याचा अधिक ख.फ. होऊ नये म्हणुन... by अर्धवटराव
व्यनी
In reply to धाग्याचा अधिक ख.फ. होऊ नये म्हणुन... by अर्धवटराव
अरा, धाग्याचा ख.फ. होणार नाही झाला तर सांख्य आणि भक्तीचा मिलाफ
In reply to धाग्याचा अधिक ख.फ. होऊ नये म्हणुन... by अर्धवटराव
ओ मलापण व्यनि करा.
In reply to धाग्याचा अधिक ख.फ. होऊ नये म्हणुन... by अर्धवटराव
अरा,
तेजायला मी इथेच टाका कि
अरा, तुम्ही इथे लिहा
होय होय.... इथेच लिहा!
जय श्रीकॄष्ण :)
In reply to जय श्रीकॄष्ण :) by अर्धवटराव
अर्धवटरावांचा "पूर्णवट"
In reply to जय श्रीकॄष्ण :) by अर्धवटराव
परिपुर्ण प्रतिसाद...
In reply to जय श्रीकॄष्ण :) by अर्धवटराव
परीसस्पर्श!
अरा, प्रथम तुमच्या सविस्तर प्रतिसादाबद्दल आभार!
In reply to अरा, प्रथम तुमच्या सविस्तर प्रतिसादाबद्दल आभार! by संजय क्षीरसागर
परमहंस त्यातनं (तोतापुरी या औलियामुळे)
In reply to अरा, प्रथम तुमच्या सविस्तर प्रतिसादाबद्दल आभार! by संजय क्षीरसागर
ऑ ???
In reply to अरा, प्रथम तुमच्या सविस्तर प्रतिसादाबद्दल आभार! by संजय क्षीरसागर
मुळात भक्तीमार्ग ही संज्ञा चुकीची आहे
In reply to मुळात भक्तीमार्ग ही संज्ञा चुकीची आहे by अर्धवटराव
तेच तर सांगतोय सुरूवातीपासनं!