प्रिय मित्रहो,
वरिल घटना १०० % सत्य आहे.
एखादा सैनिक जर युद्धात व तत्सम परिस्थितीत जर हरवला गायब झाला तर त्याचे प्रेत सापडेपर्यंत त्याला (missing इन action ) जाहीर करतात. यानंतर
पुढील ७ वर्षे त्याची वाट बघण्यात त्याच्या कुटुंबाची अवस्था गंभीर होते. ज्यावेळी विमान दुर्घटनाग्रस्त होते आणि कोसळते किंवा आग लागते अथवा पाणबुडी जर बुडाली आणि त्यात एखादा सैनिक वाचण्याची शक्यता नसेलच तर तेंव्हा त्याची न्यायालयीन चौकशी करून (missing in action, presumed dead)(आघाडीवर गहाळ बहुधा मृत) हे जाहीर करतात. त्यावर त्याच्या कुटुंबाची मान्यता स्वाक्षरी घेतात आणि मग त्या कुटुंबाला सर्व भरपाई विमा निवृत्तीवेतन इ. दिले जाते.या परिस्थितीत प्रेत मिळाले नाही तरी कुटुंबाला सर्व आर्थिक फायदे त्वरित मिळू शकतात. पण जर कोणताच ठावठिकाणा नसेल तर सात वर्षे थांबण्याशिवाय पर्याय नाही. युद्धकैदी समजून कुटुंबाला ७ वर्षे पर्यंत अर्धा पगार दिला जातो आणि त्यानंतर वरीलप्रमाणे पूर्ण आर्थिक फायदे दिले जातात
परत विषयाकडे
सर्वच सैनिक अत्यंत चिंताग्रस्त अवस्थेत बसलेले होते.प्रत्येकाला आपल्या कुटुंबाची चिंता होती. कुणाचे नुकतेच लग्न झाले होते त्याला आपल्या नव्या बायकोची चिंता होती कुणाची मुले अर्धवट वयाची होती.तर कुणाचे लग्नच झालेले नव्हते त्याला एव्ढ्या लवकर काहीच जग न बघता वर जायचे नव्हते
कोणीच फारसे बोलत नव्हते.एखादा उत्तेजित होऊन जास्त बोलत होता.भावनांचा कल्लोळ म्हणावा तसा प्रकार चालू होता. केवळ बेंटरीवर कमीत कमी उपकरणे चालवीत असल्यामुळे इंजिनिअर लोकांना काही काम नव्हते. शिवा नायर लोकांना शांत ठेवण्याच्या नादात उपदेश करीत होता. त्याच्याच भाषेत(गावरान) सर्वांची इतकी फाटली होती कि तोंडापर्यंत आल्यामुळे लोक हसत असावेत असा भास होत होता.(अर्थात त्याच्या शब्दात -- हे सर्व आत्ता बोलणे सोपे आहे तेंव्हा सर्वांच्यातोंदाचे पाणी पाळले होते. सर्वाना आपले पूर्वायुष्य आठवत होते आणि आपण जगलो तर काय लय करता येईल अशी प्रत्येकाने
उजळणी चालू ठेवली होती.
पाणबुडीत दिवस आणि रात्र याला कोणताच अर्थ नसतो. पूर्ण वेळ अंधार आणि आतले दिवे चालू. बैटर्या वाचवण्यासाठी कमीत कमी दिवे चालू होते.ए सी पण अगदी कमी होता त्यामुळे लोक घामाघूम झालेले.असे २४ तास गेले.आजूबाजूला फिरणारी जहाजांची वर्दळ कमी झालेली होती. काही लोकांनी कॅप्टनला आता आपण निघूया म्हणून भुणभुण करण्यास सुरुवात केली. दोन तीन वेळा असे झाले कि कॅप्टन आता निघावे अशा विचारात होता तेवढ्यात पाकिस्त्नानी जहाजाची चाहूल लागली आणि हा बेत रहित करावा लागला.
मुळात प्रत्येक जहाजाचा आपला एक विशिष्ट आवाज तयार होतो.त्याच्या जनरेटर, मोटार, पंखे इ मुळे. हा प्रत्येक आवाज आणि त्यात्या जहाजाची चुंबकीय स्वाक्षरी (magnetic signature) हि गुपचूप रित्या गोल केलेली असते. त्या आवाजाच्या विशिष्ट प्रकारामुळे आणि त्या चुंबकीय स्वाक्षरी मुळे जहाज कोणते हे तुम्हाला ओळखता येते.हा अभ्यास नौदलाला शांततेच्या काळात करावा लागतो.
तसेच आपल्या जहाजाची चुंबकीय आणि ध्वनी स्वाक्षरी (magnetic and sound signature) सुद्धा आपल्या पाणबुडीच्या संगणकात साठवायला लागते अन्यथा शत्रूची समजून आपलीच बोट बुडविली जाईल.आपल्या पाणबुडीची किंवा जहाजाची चुंबकीय स्वाक्षरी कशी कमी होईल या साठी त्याचे चुंबकीय क्षेत्र जाणून घेऊन त्याच्या १८०अंश उलट क्षेत्र त्यावर टाकले कि हि स्वाक्षरी कमी होते.
शिशुमार , शंकुश शल्कि या HDW कंपनीच्या जर्मन पाणबुड्या अत्यंत शांत (silent )आणि अगदी कमी चुंबकीय स्वाक्षरी असणाऱ्या असल्यामुळे त्या SSK (submarine to submarine killer) म्हणून ओळखल्या जातात.या पाणबुड्या अतिशय कमी आवाज करीत पाण्याच्या खालून जातात आणि शत्रूच्या पाणबुडीतून केलेल्या आवाजाच्या वासावर जाऊन त्याचं नायनाट करण्यासाठी
प्रसिद्ध आहेत.शेवटि ४४ तास झाल्यानंतर कोणताही आवाज आला नाही. पाकिस्तानच्या नौदलाच्या अपेक्षेत हि पाणबुडी एवढ्या काळात पळून गेली असेल असे असल्यामुळे ते आवाज क्षीण होत गेले. शेवटी ४४ तासानंतर पहाटे २ वाजता कॅप्टनने पाणबुडी च्या ballast tanks मध्ये हवा भरायला परवानगी दिली या tank च्या आत मध्ये पाणी भरून घेतले कि पाणबुडी जड होऊन पाण्याखाली जाते. जेंव्हा तुम्हाला वर यायचे असते तेंव्हा त्या टंक मध्ये दबावाखाली असलेली(compressed ) हवा भरून पाणी
बाहेर टाकले जाते आणि पाणबुडी हळूहळू वर येते. जशी शंकुश पाण्याच्या पृष्ठभागाच्या जवळ आली तेंव्हा पेरीस्कॉप बाहेर काढून परत एकदा बघितले कि आजूबाजूला कोणी नाही. त्यानंतर कॅप्टनने पाणबुडीला पृष्ठभागावरस्नोर्केल पातळीवर म्हणजे फक्त एक नळी बाहेर दिसते ज्यातून हवा घेतली जाते आणि धूर बाहेर सोडला जातो. पाणबुडी पाण्याच्या खालीच राहते आणण्याचे आदेश दिले आणि पूर्ण वेगात तिला भारताकडे कूच देण्याचे आदेश दिले.पुढील चार तास कोणीही काहीही बोलत नव्हते कारण एखादे पाकिस्तानी जहाज वाटेत भेटले तर काय घ्या? ४ तासात त्यांनी जवळ जवळ १००-१२० कि मी अंतर कापले आणि ते आन्तरराष्ट्रीय सागरी सीमेत पोहोचले.
यानंतर उजळ माथ्याने सर्व जण एक एक करून पाण्याच्या पृष्ठभागावर आला आणि मोकळ्या हवेत श्वास घेतला. शिवा नायर म्हणाला कि कोणाला रडावेसे वाटत होते कोणाला ओरडावेसे वाटत होते. लोकांच्या प्रतिक्रिया अत्यंत विभिन्न होत्या. डॉक्टर म्हणून मला आणि कॅप्टन ला सभ्यतेने वागावे लागत होते.माल तेथेच दारू प्यावीशी वाटत होती.(पण समुद्रावर गेल्यावर दारू पिण्याची परवानगी नाही.)कॅप्टनने GPS खराब झालयामुळे कमांडकडे मदत मागितली. मुळात ४८ तास कोणाशीच संपर्क नसल्यामुळे HQ हेड क्वार्टर चे लोक जरा काळजीत होते पण प्रत्यक्षात काय झाले होते ते त्यांना हि माहित नव्हते. कमांड ने त्यांना परत येण्यास सांगितलेअसा तर्हेने ४८ तास जीवाला लागलेला घोर शेवटी संपला.
नंतर युध्द सराव संपल्यावर च्या विश्लेषणात पाकिस्तान नौदलाचे विचित्र वर्तन या वर चर्चा सुद्धा झाली. त्यांच्या बोटी एका विशिष्ट तऱ्हेने वर्तन का करीत होत्या ते नौदलाच्या इतर लोकांना कळले नाही. पाणबुडीच्या कॅप्टनने वरील गोष्ट FOSM ) flag officer submarines पाणबुड्यांचा सर्वोच्च अधिकारी च्या कानावर हि गोष्ट घातली तेंव्हा त्याने तोंड बंद ठेवण्याचा सल्ला दिला काही वर्षांनी हि गोष्ट इतरांना सांगितली गेली कारण त्या वेळेला राजनैतिक प्रतिक्रिया काय होतील हे सांगणे कठीण होते.(नौदल युद्धखोरी करीत आहे.शांततेच्या दूतांच्या हातात कोलीत मिळाले असते
शिवा नायर च्या म्हणण्याप्रमाणे collective behaviour in crisis (संकटकाळातील माणसांची प्रतिक्रिया) हि इतर काळापेक्षा एकदम वेगळी असते.
माणसे अतिशय मित्रत्वाने वागतात किंवा एकदम तिरसट पाने वागू लागतात.
धन्यवाद
वाचने
23762
प्रतिक्रिया
55
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपले नौसैनिक सुखरूप आलेत हे
अप्रतिम
misalpav.com/user/21410/tracker
In reply to अप्रतिम by jaydip.kulkarni
पाणबुड्यांचा सर्वोच्च अधिकारी
फारच थरारक घटना आणि रोचक निवेदन. धन्यवाद !
त्यांच्या बोटी एका विशिष्ट तऱ्हेने वर्तन का करीत होत्या ते नौदलाच्या इतर लोकांना कळले नाही. पाणबुडीच्या कॅप्टनने वरील गोष्ट FOSM ) flag officer submarines पाणबुड्यांचा सर्वोच्च अधिकारी च्या कानावर हि गोष्ट घातली तेंव्हा त्याने तोंड बंद ठेवण्याचा सल्ला दिला काही वर्षांनी हि गोष्ट इतरांना सांगितली गेलीम्हणजे नक्की कसे वर्तन पाकिस्तानी बोटींनी केले ते जर शक्य असेल तर सांगावे.पाकिस्तानी बोटींनी केलेले
In reply to फारच थरारक घटना आणि रोचक निवेदन. धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
आपली पाणबुडी डिटेक्ट झाल्याने
In reply to फारच थरारक घटना आणि रोचक निवेदन. धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
मस्त लिहिलंय
थ रा र ! ! !
खुपच छान फार फार आवडल
थरारक!!!
खूप साहसी प्रसंग होता.
लई भारी, धन्यवाद लगेच
मलाच श्वास घेता येत नाही असे वाटले....
चला मिपाच्या ताफ्यात आता
वर्णन चांगले झाले आहे. लेखन
उत्सुकता
थोडंस अवांतर
चांगला अनुभव. एकंदरीतच
In reply to थोडंस अवांतर by अमोल खरे
थरारक प्रसंगाचं वर्णन जबरदस्त
अतिशय रोमांचक लेख
प्रतिसाद
काही वर्षांपूर्वी
In reply to प्रतिसाद by सुबोध खरे
अनुभव अक्षरशः जगलो म्हणता येइल. असे विवेचन.
आनखी वाचायचय ...
थरारक आणि रोचक!!
आणखी येवूद्यात तुमच्या पोतडीतून...
सलाम
हा किस्सा मी मिसळ पाव वर
In reply to सलाम by सुबोध खरे
हम्म...
In reply to सलाम by सुबोध खरे
स्त्रियांबद्दल आदर
In reply to हम्म... by दादा कोंडके
हम्म...
In reply to स्त्रियांबद्दल आदर by सुबोध खरे
आणखी एक असाच किस्सा आठवला..
In reply to सलाम by सुबोध खरे
http://zeenews.india.com/news
In reply to आणखी एक असाच किस्सा आठवला.. by मोदक
काहीच भयंकर न घडताही खूप काही
सलाम...
दोन्ही लेख आवडले.
सलाम...... आवडले.....
लेखन आवडले
नौदलाच्या 'तयारी'चा अभिमान वाटला!
धागा वर आणण्यासाठी
धागा वर आणल्याबद्दल आभार, खरे साहेब!
In reply to धागा वर आणण्यासाठी by सुबोध खरे
थरारक लेखमाला!
थरारक
एक भाबडा प्रश्न
(जालावरून साभार)
In reply to एक भाबडा प्रश्न by परिंदा
१२ सागरी मैल हि प्रत्येक
याह्या पहिल्या भागीदारी दुवा
या लेखाच्या पहिल्या भागाचा
http://www.misalpav.com/node
In reply to या लेखाच्या पहिल्या भागाचा by अनिल मोरे
धन्यवाद खरेकाका
शिशुमार जातीच्या पाणबुडीची टक्कर
च्यायला आजूनेक टक्कर
According to the UK
In reply to च्यायला आजूनेक टक्कर by गामा पैलवान
लेख वाचला पण ....
In reply to According to the UK by सुबोध खरे