४८ तास भाग २

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
19 Jan 2013 - 1:18 pm

प्रिय मित्रहो,
वरिल घटना १०० % सत्य आहे.
एखादा सैनिक जर युद्धात व तत्सम परिस्थितीत जर हरवला गायब झाला तर त्याचे प्रेत सापडेपर्यंत त्याला (missing इन action ) जाहीर करतात. यानंतर
पुढील ७ वर्षे त्याची वाट बघण्यात त्याच्या कुटुंबाची अवस्था गंभीर होते. ज्यावेळी विमान दुर्घटनाग्रस्त होते आणि कोसळते किंवा आग लागते अथवा पाणबुडी जर बुडाली आणि त्यात एखादा सैनिक वाचण्याची शक्यता नसेलच तर तेंव्हा त्याची न्यायालयीन चौकशी करून (missing in action, presumed dead)(आघाडीवर गहाळ बहुधा मृत) हे जाहीर करतात. त्यावर त्याच्या कुटुंबाची मान्यता स्वाक्षरी घेतात आणि मग त्या कुटुंबाला सर्व भरपाई विमा निवृत्तीवेतन इ. दिले जाते.या परिस्थितीत प्रेत मिळाले नाही तरी कुटुंबाला सर्व आर्थिक फायदे त्वरित मिळू शकतात. पण जर कोणताच ठावठिकाणा नसेल तर सात वर्षे थांबण्याशिवाय पर्याय नाही. युद्धकैदी समजून कुटुंबाला ७ वर्षे पर्यंत अर्धा पगार दिला जातो आणि त्यानंतर वरीलप्रमाणे पूर्ण आर्थिक फायदे दिले जातात
परत विषयाकडे
सर्वच सैनिक अत्यंत चिंताग्रस्त अवस्थेत बसलेले होते.प्रत्येकाला आपल्या कुटुंबाची चिंता होती. कुणाचे नुकतेच लग्न झाले होते त्याला आपल्या नव्या बायकोची चिंता होती कुणाची मुले अर्धवट वयाची होती.तर कुणाचे लग्नच झालेले नव्हते त्याला एव्ढ्या लवकर काहीच जग न बघता वर जायचे नव्हते
कोणीच फारसे बोलत नव्हते.एखादा उत्तेजित होऊन जास्त बोलत होता.भावनांचा कल्लोळ म्हणावा तसा प्रकार चालू होता. केवळ बेंटरीवर कमीत कमी उपकरणे चालवीत असल्यामुळे इंजिनिअर लोकांना काही काम नव्हते. शिवा नायर लोकांना शांत ठेवण्याच्या नादात उपदेश करीत होता. त्याच्याच भाषेत(गावरान) सर्वांची इतकी फाटली होती कि तोंडापर्यंत आल्यामुळे लोक हसत असावेत असा भास होत होता.(अर्थात त्याच्या शब्दात -- हे सर्व आत्ता बोलणे सोपे आहे तेंव्हा सर्वांच्यातोंदाचे पाणी पाळले होते. सर्वाना आपले पूर्वायुष्य आठवत होते आणि आपण जगलो तर काय लय करता येईल अशी प्रत्येकाने
उजळणी चालू ठेवली होती.
पाणबुडीत दिवस आणि रात्र याला कोणताच अर्थ नसतो. पूर्ण वेळ अंधार आणि आतले दिवे चालू. बैटर्या वाचवण्यासाठी कमीत कमी दिवे चालू होते.ए सी पण अगदी कमी होता त्यामुळे लोक घामाघूम झालेले.असे २४ तास गेले.आजूबाजूला फिरणारी जहाजांची वर्दळ कमी झालेली होती. काही लोकांनी कॅप्टनला आता आपण निघूया म्हणून भुणभुण करण्यास सुरुवात केली. दोन तीन वेळा असे झाले कि कॅप्टन आता निघावे अशा विचारात होता तेवढ्यात पाकिस्त्नानी जहाजाची चाहूल लागली आणि हा बेत रहित करावा लागला.
मुळात प्रत्येक जहाजाचा आपला एक विशिष्ट आवाज तयार होतो.त्याच्या जनरेटर, मोटार, पंखे इ मुळे. हा प्रत्येक आवाज आणि त्यात्या जहाजाची चुंबकीय स्वाक्षरी (magnetic signature) हि गुपचूप रित्या गोल केलेली असते. त्या आवाजाच्या विशिष्ट प्रकारामुळे आणि त्या चुंबकीय स्वाक्षरी मुळे जहाज कोणते हे तुम्हाला ओळखता येते.हा अभ्यास नौदलाला शांततेच्या काळात करावा लागतो.
तसेच आपल्या जहाजाची चुंबकीय आणि ध्वनी स्वाक्षरी (magnetic and sound signature) सुद्धा आपल्या पाणबुडीच्या संगणकात साठवायला लागते अन्यथा शत्रूची समजून आपलीच बोट बुडविली जाईल.आपल्या पाणबुडीची किंवा जहाजाची चुंबकीय स्वाक्षरी कशी कमी होईल या साठी त्याचे चुंबकीय क्षेत्र जाणून घेऊन त्याच्या १८०अंश उलट क्षेत्र त्यावर टाकले कि हि स्वाक्षरी कमी होते.
शिशुमार , शंकुश शल्कि या HDW कंपनीच्या जर्मन पाणबुड्या अत्यंत शांत (silent )आणि अगदी कमी चुंबकीय स्वाक्षरी असणाऱ्या असल्यामुळे त्या SSK (submarine to submarine killer) म्हणून ओळखल्या जातात.या पाणबुड्या अतिशय कमी आवाज करीत पाण्याच्या खालून जातात आणि शत्रूच्या पाणबुडीतून केलेल्या आवाजाच्या वासावर जाऊन त्याचं नायनाट करण्यासाठी
प्रसिद्ध आहेत.शेवटि ४४ तास झाल्यानंतर कोणताही आवाज आला नाही. पाकिस्तानच्या नौदलाच्या अपेक्षेत हि पाणबुडी एवढ्या काळात पळून गेली असेल असे असल्यामुळे ते आवाज क्षीण होत गेले. शेवटी ४४ तासानंतर पहाटे २ वाजता कॅप्टनने पाणबुडी च्या ballast tanks मध्ये हवा भरायला परवानगी दिली या tank च्या आत मध्ये पाणी भरून घेतले कि पाणबुडी जड होऊन पाण्याखाली जाते. जेंव्हा तुम्हाला वर यायचे असते तेंव्हा त्या टंक मध्ये दबावाखाली असलेली(compressed ) हवा भरून पाणी
बाहेर टाकले जाते आणि पाणबुडी हळूहळू वर येते. जशी शंकुश पाण्याच्या पृष्ठभागाच्या जवळ आली तेंव्हा पेरीस्कॉप बाहेर काढून परत एकदा बघितले कि आजूबाजूला कोणी नाही. त्यानंतर कॅप्टनने पाणबुडीला पृष्ठभागावरस्नोर्केल पातळीवर म्हणजे फक्त एक नळी बाहेर दिसते ज्यातून हवा घेतली जाते आणि धूर बाहेर सोडला जातो. पाणबुडी पाण्याच्या खालीच राहते आणण्याचे आदेश दिले आणि पूर्ण वेगात तिला भारताकडे कूच देण्याचे आदेश दिले.पुढील चार तास कोणीही काहीही बोलत नव्हते कारण एखादे पाकिस्तानी जहाज वाटेत भेटले तर काय घ्या? ४ तासात त्यांनी जवळ जवळ १००-१२० कि मी अंतर कापले आणि ते आन्तरराष्ट्रीय सागरी सीमेत पोहोचले.
यानंतर उजळ माथ्याने सर्व जण एक एक करून पाण्याच्या पृष्ठभागावर आला आणि मोकळ्या हवेत श्वास घेतला. शिवा नायर म्हणाला कि कोणाला रडावेसे वाटत होते कोणाला ओरडावेसे वाटत होते. लोकांच्या प्रतिक्रिया अत्यंत विभिन्न होत्या. डॉक्टर म्हणून मला आणि कॅप्टन ला सभ्यतेने वागावे लागत होते.माल तेथेच दारू प्यावीशी वाटत होती.(पण समुद्रावर गेल्यावर दारू पिण्याची परवानगी नाही.)कॅप्टनने GPS खराब झालयामुळे कमांडकडे मदत मागितली. मुळात ४८ तास कोणाशीच संपर्क नसल्यामुळे HQ हेड क्वार्टर चे लोक जरा काळजीत होते पण प्रत्यक्षात काय झाले होते ते त्यांना हि माहित नव्हते. कमांड ने त्यांना परत येण्यास सांगितलेअसा तर्हेने ४८ तास जीवाला लागलेला घोर शेवटी संपला.
नंतर युध्द सराव संपल्यावर च्या विश्लेषणात पाकिस्तान नौदलाचे विचित्र वर्तन या वर चर्चा सुद्धा झाली. त्यांच्या बोटी एका विशिष्ट तऱ्हेने वर्तन का करीत होत्या ते नौदलाच्या इतर लोकांना कळले नाही. पाणबुडीच्या कॅप्टनने वरील गोष्ट FOSM ) flag officer submarines पाणबुड्यांचा सर्वोच्च अधिकारी च्या कानावर हि गोष्ट घातली तेंव्हा त्याने तोंड बंद ठेवण्याचा सल्ला दिला काही वर्षांनी हि गोष्ट इतरांना सांगितली गेली कारण त्या वेळेला राजनैतिक प्रतिक्रिया काय होतील हे सांगणे कठीण होते.(नौदल युद्धखोरी करीत आहे.शांततेच्या दूतांच्या हातात कोलीत मिळाले असते
शिवा नायर च्या म्हणण्याप्रमाणे collective behaviour in crisis (संकटकाळातील माणसांची प्रतिक्रिया) हि इतर काळापेक्षा एकदम वेगळी असते.
माणसे अतिशय मित्रत्वाने वागतात किंवा एकदम तिरसट पाने वागू लागतात.
धन्यवाद

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

आपले नौसैनिक सुखरूप आलेत हे देशाचे भाग्यच.
लेखन अतिशय आवडले.

jaydip.kulkarni's picture

19 Jan 2013 - 1:36 pm | jaydip.kulkarni

दुसरया भागाची आतुरतेने वाट बघत होतो, लवकर टंकल्याबद्दल धन्यवाद .पहिला भाग अप्रतिम जमला होता .. आणि हो सध्या तुमचे लेख मिपा वर शोधून शोधून वाचतोय ... अत्यंत वेगळे आणि माहितीपूर्ण आहेत तुमचे लेख

उगा काहितरीच's picture

22 Jan 2013 - 12:42 am | उगा काहितरीच
कवितानागेश's picture

19 Jan 2013 - 1:36 pm | कवितानागेश

पाणबुड्यांचा सर्वोच्च अधिकारी च्या कानावर हि गोष्ट घातली तेंव्हा त्याने तोंड बंद ठेवण्याचा सल्ला दिला काही वर्षांनी हि गोष्ट इतरांना सांगितली गेली कारण त्या वेळेला राजनैतिक प्रतिक्रिया काय होतील हे सांगणे कठीण होते.(नौदल युद्धखोरी करीत आहे.शांततेच्या दूतांच्या हातात कोलीत मिळाले असते>
हाच विचार करत होते.....
आणि अगदी विचारणार होते, की या गोष्टी अश्या ठिकाणी लिहायची परवानगी असते का?
कारण कधीकधी काही ऑपरेशन्स 'कायमचीच' गुप्त ठेवावी लागतात. :(

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Jan 2013 - 2:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

फारच थरारक घटना आणि रोचक निवेदन. धन्यवाद !

त्यांच्या बोटी एका विशिष्ट तऱ्हेने वर्तन का करीत होत्या ते नौदलाच्या इतर लोकांना कळले नाही. पाणबुडीच्या कॅप्टनने वरील गोष्ट FOSM ) flag officer submarines पाणबुड्यांचा सर्वोच्च अधिकारी च्या कानावर हि गोष्ट घातली तेंव्हा त्याने तोंड बंद ठेवण्याचा सल्ला दिला काही वर्षांनी हि गोष्ट इतरांना सांगितली गेली

म्हणजे नक्की कसे वर्तन पाकिस्तानी बोटींनी केले ते जर शक्य असेल तर सांगावे.

पाकिस्तानी बोटींनी केलेले वर्तन ऐकायला आवडेल....

आपली पाणबुडी डिटेक्ट झाल्याने ज्या पद्धतीने पाकिस्तानी बोटी वागत होत्या त्या वर्तनाबद्दल बोलताहेत खरे साहेब. आता आपली पाणबुडी चुकुन पाकिस्तानच्या हद्दीत गेलेली बाकी कोणालाही माहित नव्हते. अन त्या कोणालाही मध्ये आपल्या नौदलालाही माहित नव्हते असे म्हणायचे आहे.
कहाणी टांगुन न ठेवता पुर्ण केल्याबद्द्दल धन्यवाद.

पैसा's picture

19 Jan 2013 - 2:41 pm | पैसा

आणि खूप माहितीपूर्ण आहे. अशा प्रकारच्या बर्‍याच गोष्टी घडत असतील की ज्या कधीच लोकांसमोर येत नाहीत!

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Jan 2013 - 2:44 pm | बिपिन कार्यकर्ते

थ रा र ! ! !

नुकतेच ब्रिटिश नौदलातील पाणबुड्यांवर काही वाचले. त्यात, पाणबुड्यांमधील नौसैनिकांच्या मन:स्थितीबद्दल खूप काही कळले.

शिलेदार's picture

19 Jan 2013 - 3:11 pm | शिलेदार

खुप थरारक अनुभव सान्गितला विशेश अवडलेल म्हजे तुमी सगळ्या टर्म सकट सान्गितला त्यामुळे प्रसन्ग खुप भावला
तुमी खुप माहितीपूर्ण लिहिता खुप खुप आवडल.
मला अस वाटत की आजकालच जीवन खुप चौकटीतल झालय त्यामुळेच कदाचित आपल्याला साहस कथा खुप भावतात.
एकन्दरीत खुप मस्त वाचायला मिळाल
खुप खुप शुभेछा !!!

शुचि's picture

19 Jan 2013 - 3:29 pm | शुचि

थरारक!!!

रोहन अजय संसारे's picture

19 Jan 2013 - 4:10 pm | रोहन अजय संसारे

क्रमश नसल्यामुळे खूप चं छान वाटले. खूप साहसी प्रसंग होता. प्रत्येक सैनिकाला माझा सलाम. खूप प्रसंग सावधान पने सगळे वागले. खूप सहाशी आणि शूर आहेत ते सैनिक.खूप माहितीपूर्ण आहे

५० फक्त's picture

19 Jan 2013 - 4:40 pm | ५० फक्त

लई भारी, धन्यवाद लगेच लिहिल्याबद्दल.

थरारक.....

वायुदल आणि पायदला बरोबर नौदल सुध्दा सामिल झाले तर.
सुबोधजी या पुर्वीच्या लेखां इतकाच हा लेखपण आवडला आहे.
लगे रहो. पुढिल लिखाणास शुभेच्छा

वर्णन चांगले झाले आहे. लेखन आवडले.

तिमा's picture

19 Jan 2013 - 8:15 pm | तिमा

लेख आवडला. पाकिस्तानी जहाजांनी पाणबुडीचा शोध घेण्याचा प्रयत्न का नाही केला ? हेच ते विचित्र वर्तन का ?

अमोल खरे's picture

19 Jan 2013 - 8:27 pm | अमोल खरे

काही वर्षांपुर्वी एका जर्मन अणु पाणबुडीवर जायचा योग आला होता. एका मित्राचा भाऊ नौदलात होता. त्याच्या ओळखीने एका पाणबुडीत गेलो होतो. त्यावेळी नौदल सप्ताह का काहीतरी होता, त्यामुळे ते पाणबुडीवर लोकांना येऊन देत होते. पाणबुडीवर शिरताना धक्क्यापासुन पाणबुडीपर्यंत एक छोटा ब्रिज होता. मी आणि आमच्या ऑफिसचे ६-७ जण आणि आमची महिला बॉस असे सर्व होतो. त्या वेळी पाणबुडीच्या टपावर एक नौसैनिक होता. त्याने आम्हाला पाहिल्यावर थांबायचा इशारा केला आणि फक्त "मॅडम आप पहिले आईये" असं म्हणाला. आम्ही आश्चर्याने पाहत होतो. आमची बॉस तो ब्रिज पार करेपर्यंत तो सॅल्युट करुन उभा होता. कारण काय की म्हणे जहाज म्हणजे स्त्री समजली जाते आणि त्यामुळे जहाजावर स्त्री आली की तिला भयंकर मान दिला जातो. आम्ही बाकी लगेच टपावर आलो. आता आत जाणे म्हणजे भयंकर कठीण काम. सुबोध खरे कन्फर्म करतीलच. दोन झाकणे असतात, त्यामधुन सरळ खाली १० फुट शिडीने उतरायचं. आणि हाईट म्हणजे ती शिडी उतरताना दिसत नाही, त्यामुळे उतरताना पहिले पाऊल अंदाजाने टाकायला लागते. माझी इतकी वाट लागली होती. मी पहिला उतरणार होतो, तो सगळ्यात शेवटी उतरलो. एक जण तर आलाच नाही. टपावरच राहिला बिचारा. आणि बाकी नौसैनिक सटासत चढत उतरत होते. मला म्हणत होते, की अरे आ जाओ, बहुत आसान है. बाकी कलिग खालुन अरे ये, अरे ये म्हणुन सांगत होते. शेवटी कसाबसा उतरलो. त्या नंतर आम्हाला पाणबुडीची पुर्ण माहिती दिली गेली. पाणबुडीत अतिशय कमी जागा असते, त्यात कसे राहतात ते बघुन जाम कौतुक वाटतं. त्या अधिका-याने पण असाच किस्सा सांगितला होतं. फक्त त्या वेळेस म्हणे एक पाकिस्तानी, ही पाणबुडी आणि एक आणखीन पाणबुडी अशा तीन पाणबुड्या समोरासमोर दोन दिवस उभ्या होत्या. काही न बोलता. नंतर दोन दिवसांनी परत आले सगळे. वरील लेख तर मस्तच. असेच अनुभव आणखी येउन देत.

रेवती's picture

19 Jan 2013 - 8:48 pm | रेवती

चांगला अनुभव. एकंदरीतच पाण्याच्या खाली किंवा वर राहू शकणारे अजस्त्र धूड सिनेमात पाहूनही नकोसे होते.

किसन शिंदे's picture

19 Jan 2013 - 8:38 pm | किसन शिंदे

थरारक प्रसंगाचं वर्णन जबरदस्त केलंय.

शेवटी नौदलाचे सैनिक वाचतात हे वाचून मनाला शांती मिळाली.

लीलाधर's picture

19 Jan 2013 - 8:41 pm | लीलाधर

जय हिंद सर ! आवडेश अजुनही येउदेत. पुलेशु.

सुबोध खरे's picture

19 Jan 2013 - 11:31 pm | सुबोध खरे

@ लीमाऊजेट
आता २५ वर्षांनी फार फरक पडणार नाही. हि हकीकत तेवढी काळजी घेउनच लिहिली आहे

पाकिस्तानी बोटींनी बहुधा एक sos संदेश पाठवला असावा त्यामुळे त्या क्षेत्रात असणारया सर्व पाकिस्तानी जहाजांना दक्षतेचा इशारा मिळाला असावा.पाकिस्तानी नौदलाचे पाणबुडी विरोधी हेलीकॉप्टर सी किंग, अटलांटिक विमान आणि बाकी जहाजे यांनी वेगवेगळ्या तर्हेच्या सोनार चा वापर सुरु केला. यात हे सोनार यंत्र जहाजाच्या बुडाला लावलेले असते. हेलीकॉपटर एका तारेला बांधलेला सोनार पाण्यात बुडवून त्यतून पाणबुडीचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करतात. ते सोनार हेलीकॉपटर बरोबर इकडे तिकडे वेगाने नेता येते. जिथे जिथे पाणबुडी असण्याची शक्यता असते तिथे ते सोनार घेऊन पाण्यात बुडवून पाणबुडीचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला जातो.
अटलांटिक विमान हे खूप मोठया क्षेत्रात वापरता येते. त्यासाठी पाण्यात तरंगणारे सोनो बोयेस टाकले जातात त्यांचे सोनार पाण्यात बुडलेले असतात आणि वरचा हिस्सा रेडीओ लहरी प्रक्षेपित करतात. त्या लहरीवरून पाणबुडीचा ठावठिकाणा समजू शकतो.तुम्ही कल्पना करा कि तुम्ही जंगलात एकटे एका जाळीत लपलेले आहात आणि लांडगे तुम्हाला तुमच्या वास आवाज यावर शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांची गुरगुर ऐकू येते आहे. ते जवळून जाताना दिसतात. त्यांचा उग्र वास येतो आहे अशा परिस्थितीत जेंव्हा जेंव्हा ते तुमच्या जवळून जातात तेंव्हा तुमच्या काळजाचा थरकाप होतो. अशीच परिस्थिती शंकुश मधील नौ सैनिकांची होती.
आता पाकिस्तानी नौदलाची परिस्थिती बघा त्यांचे नौदल मुळात तोळामासा आहे त्यातून भारत तिन्ही दलाना घेऊन एवढा प्रचंड युद्ध सराव करतो आहे. त्यात तुमच्या परसदारी एक बलाढ्य पाणबुडी तुम्हाला सुगावाही न लागता पोहोचली कि जेथून कराची बंदरावर क्षेपणास्त्रे डागता येतील. तसे झाले तर त्यंची अब्रूच गेली असती.समज त्यांनी पाणबुडीवर हल्ला केला असता आणि पाणबुडीने जाता जाता २-४ जहाजांवर हल्ला करून बुडवले असते तर?एक चूक आणि पूर्ण युद्धाला तोंड लागले असते. मुळात भारत पूर्णपणे युद्धास तयारच होता.पण पाकिस्तानची उरली सुरली अब्रू धुळीला मिळाली असती.मी म्हटल्या प्रमाणे मला कल्पना विलास करता येत नाही. जे आहे ते "जसे आहे जेथे आहे"तत्वावर लिहित आहे.शिवाय हे सर्व मी माझ्या स्मरणशक्तीप्रमाणे लिहित आहे. काही तपशिलात फेरफार किंवा चूक होण्याची शक्यता आहे क्षमा असावी.वाचकांनी भारतीय वायुदलाने कारगिल युद्धाच्या काही दिवसात पाकिस्तानचे अटलांटिक विमान कसे पाडले हा किस्सा खालील दुव्यावर जरूर वाचावा म्हणजे दुसर्याच्या हद्दीत गेल्याची शिक्षा काय मिळते ते समजून येईल
http://en.wikipedia.org/wiki/Atlantique_Incident

रामदास's picture

22 Jan 2013 - 10:57 am | रामदास

आपली एक शिशुमार पाणबुडी मार्मागोवा ते मुंबई या दरम्यान प्रवास करताना (आपल्या सागरी हद्दीतून) एका अमेरीकन पाणबुडीवर आदळली होती. अमेरीकन पाणबुडी आपल्या सागरी सिमेचे उल्लंघन करून काय करत होती हे गुढच आहे. अमेरीकन पाणबुडी या अपघातात दुरुस्तीपलीकडे गेली. अपघाताची चौकशी चालू असताना कप्तानाने असे सांगीतले की आम्ही आमच्या हद्दीत असल्याने रडरवरची प्रतीमा एखाद्या मोठ्या माशाची असेल असे समजून आम्ही (सुरुवातीला) बेसावध राहीलो.आमच्या सागरी हद्दीत प्रवेश केल्यावर योग्य तो संदेश पाठवण्याची जबाबदारी अमेरीकन कप्तानाची होती. अर्थात हे सगळे अजूनतरी पेपरात कुठेही प्रसिध्दीस आलेले नाही. चौकशीचा शेवट असा की पाणबुडीच्या कप्तानासकट सहा जणांना कोर्ट मार्शलला सामोरे जावे लागले .
या अपघाताची काही माहीती देऊ शकाल का ?

अतिशय सुरेख घटनाक्रम... व इतर मौलिक तपशिलाबद्दलही अनेक धन्यवाद.

जेनी...'s picture

20 Jan 2013 - 1:41 am | जेनी...

:)

आनखी वाचायचय ...

कौशी's picture

20 Jan 2013 - 10:06 am | कौशी

पाणबुडीबद्द्ल आणि वाचायला आवडेल.

थ रा र क.

आणखी घटना येवूद्यात तुमच्या पोतडीतून.

सुबोध खरे's picture

21 Jan 2013 - 10:43 am | सुबोध खरे

@ अमोल खरे
साहेब
कोणतीही स्त्री नौदलाच्या कोणत्याही जहाजावर आली तर जहाजाच्या प्रवेशाजवळ असणारा द्वारपालाने तिला सलाम करणे हा त्या स्त्रीच्या आदरसत्काराचा एक आवश्यक भाग आहे,
या संबंधीचा एक किस्सा मी आपणास नावे न घेता लिहित आहे.
माझा मित्र डॉक्टर असलेल्या जहाजावर एकदा एक अभियान्त्रिकी अधिकारी एका सभ्य म्हणता न येण्यासारख्या स्त्रीला(गणिका) घेऊन आला. जेंव्हा तो जहाजाच्या शिडीवरून आत आला तेंव्हा द्वारपालाने त्याला सलाम केला. पण त्याने त्या स्त्री ला सलाम केला नाही. त्या अधिकार्याने त्या द्वारपालाला जाब विचारला तेंव्हा त्याने सलाम करण्यास नकार दिला. त्या अधिकाऱ्याने याबद्दल लेखी तक्रार केली.त्या तक्रारीची चौकशी करताना प्रशासकीय(executive) अधिकारयाने त्याला विचारले असता तो द्वारपाल म्हणाला सर त्या स्त्रीला मी गणवेशात सलाम करणे हे गणवेशाचा अपमान करण्यासारखे होते.टोपीवर आणि कंबर पट्ट्यावर अशोक चिन्ह लावून अशा बाईला सलाम करणे मला न पटणारे आहे त्या स्त्री चे "चारित्र्य" सर्वाना माहित आहे.
अशा श्रुन्गापत्तीत सापडल्यावर त्या प्रशासकीय(executive) अधिकारयाने आपल्या जहाजाच्या कॅप्टनला(commanding officer) सल्ला मागितला.
त्या द्वारपालाला मामुली शिक्षा(ताकीद) देऊन सोडले
कारण असे--द्वारपालाचे म्हणणे खरे असले तरी शिस्तीत बसणारे नव्हते. तशा सरळ सैनिकाला शिक्षा देणे हे इतर सैनिकांच्या मनोबलावर अनिष्ट परिणाम करणारे होऊ शकते. अधिकार्याने काहीही केले तरी चालते सैनिकाने मात्र चांगलेच वागले पाहिजे असा अनर्थ निघू शकतो.
द्वारपालाला हे सांगितले गेले कि त्या स्त्री चे चारित्र्य हे केवळ ऐकीव माहितीवरून मलिन करण्याचा तुला कोणताही अधिकार नाही.जोवर ती स्त्री कुलीन(lady) नाही हे सिद्ध होत नाही तोवर ती कुलीन आहे हे समजून चालणे आवश्यक आहे तेंव्हा हि कामात कुचराई केल्याबद्दल तुला आत्ता फक्त ताकीद देउन सोडण्यात येत आहे.
अभियान्त्रिकी अधिकाऱ्यास सुद्धा ताकीद देण्यात आली कि अशा संशयास्पद चालीच्या स्त्रीयांना जर जहाजावर परत आणले किंवा सर्वांच्या समोर असे वर्तन केल्यास तर आपल्यावर सक्त कारवाई करण्यात येईल.
हा किस्सा मी मिसळ पाव वर किस्सा म्हणून टाकावा काय या विचारात होतो.
असो

आदूबाळ's picture

21 Jan 2013 - 12:17 pm | आदूबाळ

हा किस्सा मी मिसळ पाव वर किस्सा म्हणून टाकावा काय या विचारात होतो.

तेच म्हणणार होतो.

वायुदलातही स्त्रियांना काही विशेष मान दिला जातो असं ऐकून आहे. खरं आहे का?

दादा कोंडके's picture

21 Jan 2013 - 3:28 pm | दादा कोंडके

कोणतीही स्त्री नौदलाच्या कोणत्याही जहाजावर आली तर जहाजाच्या प्रवेशाजवळ असणारा द्वारपालाने तिला सलाम करणे हा त्या स्त्रीच्या आदरसत्काराचा एक आवश्यक भाग आहे,

नौदलासारखं अगदी सलाम वगैरे करणं नको, पण सैन्यातल्या पायदळात स्त्रियांचा मान राखण्यासाठी संस्कार शिबीरे सुरू करण्याची गरज आहे असं वाटतं.

-(रेल्वेप्रवासात सैनिकांचे अनेक चाळे बघितलेला आणि पोलिस व सैनिक यांना बिचकून असलेला) दादा

सुबोध खरे's picture

21 Jan 2013 - 8:41 pm | सुबोध खरे

दादासाहेब,
शिकवणे आपल्या हाती असते शिकणे नाही, उत्तर हिंदुस्तानात १८ वर्षे वाढलेल्या पुरुषाला स्त्रियांबद्दल आदर निर्माण करणे हे वाटते तितके सोपे काम नाही. जेंव्हा कोणी बघत नसताना माणूस कसा वागतो त्यावरून त्याचे चारित्र्य ठरते.जेंव्हा ते लष्करी विभागात असता तेंव्हा तुम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवू शकता. जेंव्हा आपले कोणी वाकडे करू शकत नाही तेंव्हा माणूस कसा वागतो त्यावर ताबा ठेवणे अजूनच कठीण आहे. शिस्तीमुळे त्याच्याकडून सलाम करून घेणे सोपे आहे पण मुळात स्त्रियांबद्दल आदर निर्माण करणे हे बालपणापासून शिकवले जाणे आवश्यक आहे.

दादा कोंडके's picture

21 Jan 2013 - 8:54 pm | दादा कोंडके

पटलं.

आणखी एक असाच किस्सा आठवला..

२००१ साली अनिल यशवंत टिपणीस एअर चिफ मार्शल असताना मुशर्रफ यांची (फेल गेलेली) बहुचर्चित आग्रा भेट झाली होती. त्यावेळी मुशर्रफ समोर आल्यावर एअर चिफ मार्शल टिपणीस यांनी गणवेशात असताना मुशर्रफ ना सॅल्यूट न करता फक्त शेक हँड केला होता आणि यावर बरेचसे वादंग निर्माण झाले होते.

मुशर्रफ यांच्या केडरमध्ये आणि टिपणीस यांच्या केडरमध्ये असलेल्या फरकामुळे मुशर्रफ ना सॅल्यूट केला नाही असे काहीतरी स्पष्टीकरण टिपणीसांनी दिले होते.

(याबाबत कुणाला आणखी काही माहिती आहे का?)

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Jan 2013 - 12:51 pm | बिपिन कार्यकर्ते

काहीच भयंकर न घडताही खूप काही पॉसिबिलिटीज् असलेल्या परिस्थितीचं वास्तवदर्शी वर्णन!
अमोल खरे यांनी लिहिलेली आणि उत्तरादाखल तुम्ही लिहिलेली घटना.. दोन्ही भारीच!

collective behaviour in crisis (संकटकाळातील माणसांची प्रतिक्रिया) हि इतर काळापेक्षा एकदम वेगळी असते.
माणसे अतिशय मित्रत्वाने वागतात किंवा एकदम तिरसट पाने वागू लागतात.

हे वाचून आपल्या दिवाळीअंकातल्या या लेखाची आठवण झाली.

नाखु's picture

21 Jan 2013 - 12:37 pm | नाखु

धीरोदत्त नौदलाचे सैनिकांना.

सस्नेह's picture

21 Jan 2013 - 1:13 pm | सस्नेह

दोन्ही लेख आवडले.

मनराव's picture

21 Jan 2013 - 7:29 pm | मनराव

सलाम...... आवडले.....

सानिकास्वप्निल's picture

22 Jan 2013 - 1:57 pm | सानिकास्वप्निल

लेखन आवडले
थरारक!!

धन्यवाद

इतक्या वर्षांपूवीच भारतीय पाणबुडी पाकिस्तानच्या हद्दीत कोणालाही न कळता घुसु शकत होतीच शिवाय त्यांच्या नकळत बाहेरही येऊ शकली या माहितीने आनंद झाला आणि नौदलाच्या 'तयारी'चा अभिमान वाटला!

अशी उत्कृष्ट सेनादले आहेत तरी आपल्याकडे जनतेला पाकिस्तान म्हटले की असुरक्षित का वाटते देव जाणे!

सुबोध खरे's picture

12 Feb 2013 - 11:53 pm | सुबोध खरे

क्षमस्व

दोन चांगले लेख वाचायचे राहून गेले होते, ते वाचल्याचं समाधान मिळालं. आपले आणखी असेच लेख वाचायला मिळतील हीच अपेक्षा.

प्यारे१'s picture

13 Feb 2013 - 5:01 pm | प्यारे१

थरारक लेखमाला!

सुमीत भातखंडे's picture

25 Mar 2013 - 5:06 pm | सुमीत भातखंडे

अनुभव

परिंदा's picture

12 Aug 2014 - 12:41 am | परिंदा

ही आंतरराष्ट्रीय सागरी सीमा नक्की कशी ओळखतात? म्हणजे अरबी समुद्रातुन प्रवास करताना जहाजाला कसे कळते की ते भारताच्या हद्दीत आहे की पाकिस्तानच्या किंवा इतर कोणत्या देशाच्या?

भु सीमा तारेच्या कुंपणाने किंवा एकादा डोंगर, झाड इत्यादीच्या आधारे ठरवता येतत, पण समुद्राच्या अथांग पाण्यात हद्द कशी ओळखतात हे कोणी सांगेल काय?

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Aug 2014 - 1:55 am | डॉ सुहास म्हात्रे


(जालावरून साभार)

सुबोध खरे's picture

12 Aug 2014 - 12:36 pm | सुबोध खरे

१२ सागरी मैल हि प्रत्येक देशाची हद्द असते आणी २०० सागरी मैलापर्यंत समुद्रात किंवा तळाशी मिळणाऱ्या सागरी साधन संपत्ती( खनिजे, तेल प्रवाळ आणी मासे ई ई) वर त्या राष्ट्राचा अधिकार असतो
दुर्दैवाने समुद्रात अशी कोणतीही सीमा रेषा नाही. त्यामुळेच भारतीय मच्छीमार समुद्रात भरकटून श्रीलंका किंवा पाकिस्तानच्या हद्दीत जातात (आणी उलटे सुद्धा). जेंव्हा आपले शेजारी देशाशी संबंध चांगले असतात तेंव्हा त्या लोकाना सामोपचाराने परत पाठवले जाते नाही तर हे मच्छीमार तेथील तुरुंगात खितपत पडतात. शेवटी त्या देशाला यांना पोसायचा कंटाळा आला किंवा राजनैतिक दबाव टाकल्यावर ते लोक ६-८ महिन्यांनी परत येतात.

अनिल मोरे's picture

27 Aug 2014 - 9:41 pm | अनिल मोरे

याह्या पहिल्या भागीदारी दुवा कोणी देईल का??

अनिल मोरे's picture

27 Aug 2014 - 9:46 pm | अनिल मोरे

या लेखाच्या पहिल्या भागाचा दुवा कोणी देईल का??

सुबोध खरे's picture

27 Aug 2014 - 9:48 pm | सुबोध खरे
अनिल मोरे's picture

1 Sep 2014 - 7:45 pm | अनिल मोरे

धन्यवाद खरेकाका

रामदासकाका,

शिशुमार जातीच्या त्या पाणबुडीचं नाव काय होतं? हा किस्सा केंव्हा घडला? औत्सुक्य असं की काही दिवसांपूर्वी अमेरिकी जहाजांची २०१७ मधली तिसरी टक्कर झाली. नक्की प्रकार काय आहे?

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

21 Nov 2017 - 6:03 pm | गामा पैलवान

अमेरिकी नौदलात नक्की काय समस्या आहे? एव्हढ्या टकरी का होताहेत?

http://www.bbc.co.uk/news/world-asia-42041704

-गा.पै.

सुबोध खरे's picture

21 Nov 2017 - 8:25 pm | सुबोध खरे

According to the UK government, there were around 58,000 vessels in the world trading fleet at the end of 2016. The size of the fleet, if measured by weight, has doubled since 2004.According to the UK government, there were around 58,000 vessels in the world trading fleet at the end of 2016. The size of the fleet, if measured by weight, has doubled since 2004.
And on any large ship, a typical crew often comprises a mix of different languages, nationalities and safety cultures, he adds, making the job of keeping the vessel safe all the trickier.
One rising worry is modern sailors’ reliance on technology,
http://www.bbc.com/future/story/20170822-why-its-not-surprising-that-shi...

गामा पैलवान's picture

22 Nov 2017 - 2:24 am | गामा पैलवान

खरे डॉक्टर,

तो लेख वाचला होता. पण फक्त अमेरिकी नौदलाच्याच टकरी का होताहेत, हा प्रश्न उरतोच.

आ.न.,
-गा.पै.