मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझं हे सारं सामान गं सखू...

धन्या · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
बाजाराला निघालो मी घाई घाई, पिशवीची आठवण राहीलीच नाही सामान माझं सारं आहे थोडं खाली, तू जराशी वाकशील का? माझं हे सारं सामान गं सखू, तुझ्या पिशवीत टाकशील का? तालुक्याच्या बाजाराला लागलाय सेल, केली खरेदी मी बराच वेळ माझं सामान झालंय बरंच मोठं, पिशवी जराशी फाकशील का? माझं हे सारं सामान गं सखू, तुझ्या पिशवीत टाकशील का? वाण सामान आणि ताजा भाजीपाला, मासोळीचाही मी बाजारहाट केला ताजा, कडक बोंबील माझा, तुझ्या पापलेटनी झाकशील का? माझं हे सारं सामान गं सखू, तुझ्या पिशवीत टाकशील का? सांगत असतो धन्या तो मला, पिशवी नेत जा रे नेहमी बाजाराला वापरू नये कधी हात सामानाला, आतापुरतं तू झाकशील का? माझं हे सारं सामान गं सखू, तुझ्या पिशवीत टाकशील का?

वाचन 52888 प्रतिक्रिया 91

In reply to by अन्या दातार

धन्या Tue, 09/20/2011 - 15:48
कविता प्रवासानंतर सुचली की प्रवासादरम्यान??
प्रवासामध्ये झालेली सामानावरची चर्चा, कालचा आयटमला काय म्हणता वाला धागा, आणि मी ऐकत असलेली शिंदे बंधूंची अजरामर गीते अशा सार्‍यांचा एकत्रित परीणाम होऊन ही कविता सुचली.

In reply to by धन्या

मालोजीराव गुरुवार, 09/22/2011 - 23:08
_/\_ कमाल केलीत धनाजीराव 'कामावर जायला ....रिक्षावाला' आणि 'तुझा झगा ग' याच्या मुस्कटात मारणारं गीत आहे......चाल बिल लावली कि नाइ अजून ?

मी-सौरभ Tue, 09/20/2011 - 17:37
फक्कड काव्य जमलयं..... ;) कधी? कुठे?? या परीस काय सुचलं हे म्हत्वाच...

राजेश घासकडवी Tue, 09/20/2011 - 17:53
फक्कड कविता. बाजूच्या ज्ञानेश्वर तुकारामांना काढून टाकावं या सूचनेवर विचार करतोय. (पळा आता, नाहीतर ओव्यांची फोडणी मिळतेय...)

:-D मेलो मेलो मेलो .... वाचवा वाचवा वाचवा... कामाक्षीप्रीय काममय कामोत्तम कामोत्सुक कामेश्वर मि.धनाजी राव वाकडे...यांस :bigsmile: हसुन हसुन अडव तिडव पडून गडबडा लोळून ...नंतर प्रत्येक कडव्यातल्या दुसय्रा ओळी साठी ;-) शिर सा-ष्टांग नमस्कार.... आज आंम्ही हसुन हसुन मरणार,आणी वरती गेल्यावर तिथुन धनाजी रावांवर पुष्पाचा वर्षाव करणार... ''पुष्पाचा''--आरं तिच्यायला अनुस्वार ह्रायला की राव ;-) स्वारी हो.. पुष्पांचा ...अता अनेकवचन..बोंबल्लं...आज काही कुठल्याही वाक्याचा सरळ अर्थ लागायचा योग दिसत नाहीये .... धनाजी राव,तुमचा रोग आमाला झाला हो... @-आजपासून तुमचं नाव 'धनाजी शिंदे' ... :-D ध मु शी +१०००००००००००००००००००००००००००००० टक्के सहमत अवांतर- या कवितेसाठी,,,पुनर्भेटीत आमच्या कडुन तुंम्हाला येक ''खटाक'' लव्हें-डर अत्तर भेट देण्याचे याच धाग्यावर ठरवीत आहे... कुठं भेटायचं?त्ये तुंम्ही सांगा... :-)

In reply to by Nile

@---दोन तीन दिवसांपासून पाहतोय! तुंम्ही मला फारच निरखुन पहाताय.... ;-) आरश्यात पाहिल्या सारखं वाटत असेल नाइ....(ल्या) ....... :-p अवांतर-या खेळांचा कंटाळा आल्यावर लोक करतात पूजापाठ आमी बी तिकड कंटाळलो,की फोडतो कदीकदी इश्काचा माठ :-D

Nile Wed, 09/21/2011 - 01:13
हे काव्य चांगलं हाताळलंय! लै भारी हो धनाजीराव.. तुकारामाचे अभंग पाठ करायला सांगितले होते त्याचा फायदा झालेला दिसतो! ;-) चालूंदे चालूंदे, आराधना चालूंदे!

चित्रगुप्त Wed, 09/21/2011 - 11:57
श्री श्री श्री १०८ धनाजीस्वामी चाळेकुन्द्रीकर महाराज यांस शिरसाष्टांग दंडवत. स्वित्झर्लंड मधील अतिरम्य दरीत एक नवीन वात्स्यायनपुरी नामक नगरी उभारण्यात येत आहे. जगभरातील अगदी खास व्यक्तींनाच हिचे नागरिकत्व देण्यात येत आहे. या नगरीत आपला आश्रम उभारून अन्य नागरिकांना प्रेरणाप्रद मार्गदर्शन द्यावे, म्हणून विशेष आमंत्रण पत्र आपणास लवकरच पाठवण्यात येत आहे. आपण स्वीकार कराल अशी आशा आहे.

In reply to by चित्रगुप्त

अहो त्यांना कसले आमंत्रण देताय... त्यांचेच आहे ते प्रोजेक्ट म्हणे! ;) चाळेकुंद्रीकर : =))

In reply to by बिपिन कार्यकर्ते

धन्या Wed, 09/21/2011 - 12:52
स्वित्झर्लंड मधील अतिरम्य दरीत एक नवीन वात्स्यायनपुरी नामक नगरी उभारण्यात येत आहे. जगभरातील अगदी खास व्यक्तींनाच हिचे नागरिकत्व देण्यात येत आहे.
बिपिनरावांनी वस्तूस्थितीवर प्रकाश टाकलाच आहे. आमच्या स्वप्नातल्या त्या प्रोजेक्टचं काम चालू असतानाच आम्हाला अचानक भारतात यावं लागलं. लोकांना आसनं शिकवण्याचं महान कार्य सोडून देऊन आमच्या कामदेवबाबांना देशाला भ्रष्टाचामुक्त सरकार दयायचे डोहाळे लागले. त्यामुळे यावं लागलं. असो. आता मेनका सावंत त्यांच्याकडे जातीने लक्ष देत असल्यामुळे ल्वकरच आम्ही स्वितझरलंडात येत आहोत "रुद्र्पुजा" करण्यासाठी. तेव्हा भेटूच. आपलाच, श्री श्री श्री १०८ धनाजीस्वामी चाळेकुन्द्रीकर महाराज कामकोटी पीठ

नगरीनिरंजन Wed, 09/21/2011 - 15:00
वाकडे, वाकडे, वाकडे, कमाल केलीत तुम्ही! आज ह.भ.प. दादामहाराज कोंडके असते तर त्यांनी तुमच्यासाठी 'माझं सामान तुझी पिशवी' नावाचा चित्रपट काढून तुमच्या सामानाला ग्लॅमरस पिशवी देऊन तुमच्या मेहनतीचं 'चीज' केलं असतं! असो. गाणं अप्रतिम उतरलं असलं तरी सामानातून सांडलवंड होऊन पिशवी ओली होण्याबद्दल एकही अवाक्षर न काढल्याबद्दल निषेध! कविमनाच्या माणसाने असं दुसर्‍याच्या पिशवीबद्दल बेफिकीर असणं शोभत नाही!

In reply to by नगरीनिरंजन

शैलेन्द्र Wed, 09/21/2011 - 15:59
"गाणं अप्रतिम उतरलं असलं तरी सामानातून सांडलवंड होऊन पिशवी ओली होण्याबद्दल एकही अवाक्षर न काढल्याबद्दल निषेध! कविमनाच्या माणसाने असं दुसर्‍याच्या पिशवीबद्दल बेफिकीर असणं शोभत नाही!" तेल नी तुप, दुध नी दही, मावामिठाई घेतली काहीबाही, मधीच सांडायची धास्तीच ग, तु पिशवी धुवुन मागशिल का? माझं हे सारं सामान गं सखू, तुझ्या पिशवीत टाकशील का? बघा जमतय तरं

In reply to by शैलेन्द्र

धन्या Wed, 09/21/2011 - 17:15
मस्त जमवलंय... आमचा वारसा चालवणारं कुणीतरी आहे. जसा शिंदे बंधूंचा वारसा आम्ही चालवत आहोत तसा आमचा वारसा तुम्ही चालवाल याची आम्हाला खात्री आहे. ;)

मी-सौरभ Sat, 10/01/2011 - 17:47
ह्या धाग्याने पन्नाशी पार न करताच हा जुना झाला????? हे बरं नाय हां.... धन्या: या कवितेवर गाणं काढणार आहेस त्याचं काय पुढे??? त्यात हीरो म्हणून वप्याला घे असं सुचवतो...

In reply to by मी-सौरभ

धन्या Sat, 10/01/2011 - 19:32
धन्या: या कवितेवर गाणं काढणार आहेस त्याचं काय पुढे??? त्यात हीरो म्हणून वप्याला घे असं सुचवतो...
उत्तम सल्ला दिला आहे तुम्ही. सध्या चित्रीकरण सुरेख व्हावे यासाठी युटयुबवरील "वाट माझी बघतोय रीक्षावाला" या गीताच्या चित्रफीतीचा अभ्यास सुरु आहे. तो झाला की लगेच सखूच्या शोधाला लागू. हीरोच्या भुमिकेत तुम्ही म्हणताय तसा वप्या आहेच. :)

In reply to by धन्या

हीरोच्या भुमिकेत तुम्ही म्हणताय तसा वप्या आहेच. ---आईईई....गं !काय हे ...?म्हणजे तुमचं काम काय नक्की यात? सखू अणी वप्याचं मनोमिलन? की त्या दोघांच्या मधे येणारा व्हिलन....? ;-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

धन्या Sun, 10/02/2011 - 01:01
म्हणजे तुमचं काम काय नक्की यात?
आम्ही दिग्ददर्शक. आणि वप्या पडदयावर दिसणार आहे. आणि पडद्यावर दिसतं ते खरं नसतं. पडद्यामागे जे घडतं ते मात्र खरं असतं. तुम्ही सुज्ञ आहातच. बाकी सांगणे न लगे. ;)

In reply to by धन्या

@-आणि पडद्यावर दिसतं ते खरं नसतं. पडद्यामागे जे घडतं ते मात्र खरं असतं.... म्हंणजे तुम्ही अभिषेक बच्चन आणी वप्या विवेक ओबेरॉय असच ना? ;-)

In reply to by वपाडाव

धन्या Tue, 03/06/2012 - 23:22
खुप दिवसांनी वर आला हा धागा. हे महान काव्य मीच लिहिलेलं असूनही वाचून बेक्कार हसतोय राव.. तेव्हा नेमकं असं काय झालं होतं ज्यामुळे मी हे काव्य प्रसवलो याचा विचार करतोय. :)

In reply to by धन्या

@तेव्हा नेमकं असं काय झालं होतं ज्यामुळे मी हे काव्य प्रसवलो याचा विचार करतोय. >>> ते अत्ता नै कळनार...! पुन्हा तसं झाल्यावरच कळेल...! ;-)

In reply to by मी-सौरभ

धन्या Wed, 03/07/2012 - 12:30
धन्या: बिग ब आणि वप्या: अभिषेक ब
बाकी काहीही म्हणा, ब नका म्हणू राव. ब म्हटलं की लोक अनिवाशी, आम्रिकावाले, तिकडचे असा उद्धार करतात. ;)

In reply to by धन्या

शैलेन्द्र Wed, 03/07/2012 - 18:30
हहहहाआआ हा धागा बघुन मला माझा धागा आठवला आणी तिथे ब वर्गातल्या लोकांशी झालेला वाद आठवला.. मजेदार..

मोदक Sat, 01/19/2013 - 09:57
मा. धनाजीराव वाकडे, तुमच्या सखूने आम्हास (कवीतेची) प्रेरणा देवून मिपाच्या काव्यविभागाची सेवा करण्याची संधी दिली याबद्दल आम्ही आपले आणि आपल्या सखूचे तहेदिलसे आभारी आहोत. :-)) बरोब्बर आपल्या चरणकमलावरून चालणारा. मोदक.

In reply to by मोदक

धन्या Sat, 01/19/2013 - 11:32
बरोब्बर आपल्या चरणकमलावरून चालणारा.
कसचं कसं. एक मात्र नक्की की हे काव्य आम्ही बहुतेक आमच्या मेंदूत काहीतरी "हार्मोनल इम्बॅलन्स" वगैरे होऊन आम्ही ट्रान्समध्ये गेल्यावर जन्माला आलेलं आहे. कारण त्यानंतर अशा पद्धतीच्या कविता लिहिण्याचा गेले वर्षभ प्रयत्न करत आहोत, त्यासाठी अखंड ज्ञानसाधनाही* करत आहोत. परंतू शब्द साथ दयायला तयार नाहीत. असो. * या क्षेत्रातील दोन नामवंतांची "तशी" अठरा वीस गाणी आहेत. त्या गाण्यांचं खुप वेळा पारायण करणे.

In reply to by धन्या

प्रचेतस Sat, 01/19/2013 - 11:33
>>>या क्षेत्रातील दोन नामवंतांची "तशी" अठरा वीस गाणी आहेत. त्या गाण्यांचं खुप वेळा पारायण करणे. आपल्या एका सभ्य मित्राला मात्र तशी गाणी असभ्य वाटतात म्हणे.

In reply to by प्रचेतस

मोदक Sun, 01/20/2013 - 17:11
आपले (म्हणजे तुमचे आणि आमचे) सभ्य मित्र अस्तित्वात आहेत, ही नवीनच माहिती कळाली. :-D लोककलांचा वारसा चालवणार्‍या शिंदेंना असभ्य म्हणणार्‍या आपल्या मित्राचे नाव कळवता का?

In reply to by मोदक

धन्या Mon, 01/21/2013 - 00:31
आपले (म्हणजे तुमचे आणि आमचे) सभ्य मित्र अस्तित्वात आहेत, ही नवीनच माहिती कळाली.
असं म्हणणं हे आपल्या (म्हणजे तुमच्या आणि आमच्या) त्या सभ्य मित्राचा अपमान आहे. कर्मधर्मसंयोगाने आपले (म्हणजे तुमचे आणि आमचे) ते मित्रही शिंदेच आहेत. ;)

In reply to by धन्या

नाखु Mon, 01/21/2013 - 09:05
जरा सभ्यतेची (?) व्याख्या/परिमाण ठोकताळे सांगितले तर बरे होईल म्हणजे आम्ही सभ्य (च) आहोत का/सभ्य (च)लोकांच्या कट्ट्याला जातो का हे कळेल्..तुमच्याकडे अचूक माहिती नसली तर तसे जरूर कळवा म्हणजे मोदकांना सा़कडे घालू ( तुम्हाला चालेल ना) निरागस (नाद खुळा)

In reply to by नाखु

धन्या Mon, 01/21/2013 - 21:55
तुम्ही मोदकरावांनाच विचारा कसें. हल्ली ते खुपच फॉर्मात आहेत. आमच्या टुकार कवितेचे अतिटुकार विडंबन पाडूनही ते खोर्‍याने प्रतिसाद ओढत आहेत. आमच्या या प्रतिसादात कुणाला ज़ळजळ दिसली तर तो आमचा दोष नाही.

In reply to by जेनी...

धन्या Mon, 01/21/2013 - 21:49
काका लोकांच्या लेखनाला फाटयावर मारण्याच्या दिवसांमध्ये चक्क तू माझ्या कवितेला चान चान म्हटलंस. खुप बरं वाटलं बाळा. मी ही तुझ्या कवितेला असंच चान चान म्हणेन हां. ते कुणीतरी म्हटलंच आहे ना, एकमेकां साहाय्य करु, अवघे भरु अकाऊंट !

In reply to by धन्या

जेनी... Mon, 01/21/2013 - 22:15
अय्या काका पण मी कविता लिवितच नै ! तुमी लिवलेली एकदम चान हं काका :) तुमी मला बा़ळा म्हणलात ... केवडं भरुन आलं म्हनुन सांगु ... काका तुमी कुप चान आहात :) :D

In reply to by पैसा

जेनी... Mon, 01/21/2013 - 23:39
=)) आयडीया भारीये :) पण मला झेपेल का वजन तुमचं सासुबै ?? :( आणि तरी झेपलच न तुमी पडलाच तर शेवा मलाच करावी लागेल :-/ आमचे हे पण रागवतिल बै माझ्याव :-/ कायबी चालेल पण ह्यांचा रुसवा नको बै :-/ सो पाडायचा इचार केंसल :P

टवाळ कार्टा Sat, 01/17/2015 - 23:07
भन्नाट मिपावरच्या "अश्या" खजिन्याची रत्ने कोणी एकत्र करुन लिंका ठेवल्या आहेत का कुठे? ;)

मदनबाण Mon, 01/19/2015 - 14:05
हा धगा वरती आला... आणि काही दिवसांपूर्वीच ऐकलेल गाणं आठवलं बघा ! शिटी वाजली... गाडी सुटली... अन पदर गेला वर... पोरी जपुन दांडा धर ! बाकी हल्लीच कानावर पडलेलं गाणं सहीत देत आहे ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- पप्पी दे पारुला... ;)

In reply to by मदनबाण

बॅटमॅन Mon, 01/19/2015 - 14:21
या विषयाचा तुमचा व्यासंग दांडगा असावा. तरी 'वाट तुझी बघतोय रिक्षावाला' या मुग्ध कवितेची पूर्ण संहिता कुठे मिळाल्यास हवी आहे. आगाऊच धन्यवाद.

In reply to by बॅटमॅन

मदनबाण Mon, 01/19/2015 - 14:29
कसला व्यासंग ? आम्हाला फकस्त "रस ग्रहण" करण्याचच सुचतं बघा ! ;) तरी 'वाट तुझी बघतोय रिक्षावाला' या मुग्ध कवितेची पूर्ण संहिता कुठे मिळाल्यास हवी आहे. ही घ्या :- http://marathisongs.netbhet.com/2014/02/rikhawala.html

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- पप्पी दे पारुला... ;)

कर्नलतपस्वी Tue, 08/30/2022 - 22:01
काय सांगू काका...... सामानानं पिशवी माह्यी अदुगरच भरलेली हाय तुह्या सामाना करता जागा उरलेली नाय आसलं तुहं सामान भारी पण जागा तुही चुकली लई उशीर केलासा काका....तुही संधी हुकली..... मस्त काव्य.... लईच,