Skip to main content

.

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी रविवार, 09/11/2008 या दिवशी प्रकाशित केले.
.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 23361
प्रतिक्रिया 80

प्रतिक्रिया

जबरदस्त लिहिलं आहे , आज पर्यंत मिपावर आलेल्या धाग्यांपैकी बेष्ट ... एक णंबर .. मला पु.ल. अत्रे , वपु, शिरवाळकर समदे एकदम आठवले .. सुदलेकन पण झकास .. आवडलं बिपीन भाउ .. टिकल्या आवडल्या तुमच्या ... (कृ हलके घेणे ही फॉर्म्यालिटी जरूरी नाही) - आपलाच (टारझन)

चांगदेव-ज्ञानदेवांच्या कथेतल्या सारखा कोरा लेख पाहून आज वाचक म्हणून माझा सन्मान झाल्या सारखे वाट्त आहे. आपण कोरी पाटी असतो आणि जन्मानंतर त्यावर संस्कार होतात तसे या कोर्‍या लेखावर प्रतिसादाचे संस्कार. वाचा लेख कोरा प्रतिसाद द्यावा शब्दांचा खवा चला भरा ! --(देवद्वाराने भारलेला) लिखाळ.

१)मित्रा जिंकलस. २)आजवर इतके ठिपके पाहिले पण 'या सम हाच'! वा वा!! ३)हा ठिपका पाहून आमचं गावातील घर आठवलं. लहान असताना दिवाळीच्या सुट्टीत गावाला जायचो. तेव्हा एकदा देवघरातील भिंतीवर कोळशाने असाच एक ठिपका काढला होता मी. त्यानंतर आमच्या आजोबांनी कानफटात हाणल्याचा आवाज अजूनही कानात घुमतो आहे. ४)ठिपका पाहून अंमळ हळवा झालो. ५)आजकालचे लांबलचक,कंटाळवाणे क्रमशः लेखन पाहता, हा आटोपशीर लेखनाचा प्रकार जास्त आवडला. यातील हवी ती प्रतिक्रीया ठेऊन घ्या, बाकीच्या परत द्या. (पर्यायी) इन्यालाडू कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by इनोबा म्हणे

>>४)ठिपका पाहून अंमळ हळवा झालो. पर्याय निवडला ! -- (चोखंदळ) लिखाळलाडू ;)

In reply to by लिखाळ

>>>२)आजवर इतके ठिपके पाहिले पण 'या सम हाच'! वा वा!! असेच या आधी म्हंटले आहे ... बाकी हा धागा सर्वांत जास्त प्रतिसाद खेचेल यात नवल नाही ... अप्रतिम बिपीन रावांचे पुन्हा एकदा ब्लॉकबुष्टर लेख लिहिल्याबद्दल हाबिणंदण (रसिक) टारलाडू

In reply to by इनोबा म्हणे

माझा पर्याय... ५)आजकालचे लांबलचक,कंटाळवाणे क्रमशः लेखन पाहता, हा आटोपशीर लेखनाचा प्रकार जास्त आवडला. (सगळ्या क्रमशः मंडळींना काय हाणलाय ;) .... माझ्यासकट ;) ) (क्रमातीत) बिपलाडू

In reply to by बिपिन कार्यकर्ते

पुटीशु .. (पुढील टिकल्यांना शुभेच्छा !!!) (षुभेच्छुक)टिरीन कार्यकर्ते

.

भारतीय संस्कॄती, तत्वज्ञान, परंपरा यांचे इतके साधे सरळ समर्पक विवेचन करणारा लेख आमच्या वाचनात आला नव्हता. स्थिती, उत्पती, विलय सर्व विश्व एका बिंदुतुन येते आणि बिंदुत लुप्त होते याची माहिती देणारा लेख. रोज सर्वांनी या लेखाचे प्रातःदर्शन घ्यावे. योगाभ्यास करणार्‍यांना इंटरनेटवर ध्यानध्यारणा करण्याची सोय केल्याबद्दल बिपिनभाउंचे आभार मानतो. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)

अरे ओ छप्पनटिकली बिपिनभौ, अभी तो पचपन टिकली आनी बाकी है! आने दो और भी आने दो!! B) :B (खुद के साथ बातां : रंगा, ह्या बिपिनभौंनी टिळा लावला म्हणायचा शेवटी आम्हाला! ;) ) चतुरंग

In reply to by मुक्तसुनीत

, (हे विडंबन :) :) )

In reply to by ध्रुव

अल-खराब !

In reply to by ध्रुव

सुरेख प्रतिसाद

अतिशय सुरेख...! :) तात्या.

जिंकलन जिंकलं तुम्ही !! या नविन साहित्य प्रकाराबद्दल अभिनंदन !! हे घ्या विडंबनः ओरिजिनलः . विडंबनः (फ्रंट व्ह्यु आहे ;) )

In reply to by आनंदयात्री

हे घ्या आणखी एक विडंबन ----------------------------------------------------------------- हिचा साईड व्ह्यू म्हणजे बिका काकांचं टिंब. काका, तुम्हाला टिंब कोणी दिलं? ;-) अवांतरः पण का?

हा वाळुचा कण कुठला .... खोबारचा की दुबईचा रे?

बिपीनराव क्रमशः हा शब्द ईसरलात वाटत ? पुढ्चा भाग येउदे लवकर मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)

झाडाखाली चर्चा चालु होती. वृद्ध शिष्य शांतपणे बसले होते. तरूण गुरु मौन धारण करुन बसला होता. मौनाने प्रश्न मांडले जात होते मौनानेच उत्तरे मिळत होती. मौनासारखा संवाद नाही. मौनासारखे सुख नाही. (मौनी गुरु) नाना

In reply to by अवलिया

बेष्टं... बिपिन कार्यकर्ते

In reply to by अवलिया

टिकल्या ग बाई टीकल्या बिका बरोबर झाडाखाली बसल्या ग बाई बसल्या.

!@#$%^&*()_+/|}{:?>मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर

टिंबांचा महिमा कळे टिंबालाच वाटे पाहताच टिंबटिंब -(टिंब) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

टिंबची लेखन प्रतिसाद टिंब 'मिसळी' हा रंग टिंबाटिंबी (काहीच्या काही कवि) पुण्याचे पेशवे

मौनासारखा संवाद नाही ह्या वरुन आठवलेल एक भारी वाक्य - "आचार्य बाबा बर्वे जगातल्या कुठल्याही भाषेतून मौन पाळू शकतात". - बटाट्याची चाळ, पु.ल. देशपांडे

In reply to by दत्ता काळे

>"आचार्य बाबा बर्वे जगातल्या कुठल्याही भाषेतून मौन पाळू शकतात". हा हा हा.. हे मस्तच ! ''किती वेळा सांगीतलं की आज सकाळ पासून माझं मौन आहे. पण माझं मौन कुणी ऐकूनच घ्यायला तयार नाही.'' - वासूनाना (तुझं आहे तुजंपाशी) :) --(मौनाची भाषांतरे करणारा) लिखाळ. अवांतर : मौनाची भाषांतरे हा संदिप खरेचा (?) कविता संग्रह आहे असे ऐकून आहे.

In reply to by लिखाळ

(मौनाची भाषांतरे करणारा) लिखाळ. हाहाहा ... (मौनाच्या भाषांतरांची विडंबनकार) अदिती

बाकी "अण्णा हजारे स्टाईल" ले़खन मनापासुन आवडले.... मौनात खरोखर मोठी शक्ती असते हेच खरं...म्हणुन जास्तीत जास्त प्रतिक्रिया अपेक्षित. (आमचा महाराष्ट्र, आमचीच माती आणि आमचीच माणसं ) नाम्या झंगाट

ह्याआधी आम्हाला ती एक 'बिंदू' माहीत होती पण कार्यकर्ते साहेबांचा हा 'बिंदू' (पक्षी : प्वाइंट) आम्हाला जास्त घायाळ करुन गेला!! ;) (खुद के साथ बातां : रंगा, इतकं क्रिप्टिक लिहिणं साक्षात प्रभूंनाही जमलेलं नाही ना? :? ) चतुरंग

अरे बापरे...... हा "Porn" वर कोणी लेख लिहीला बॉ..??शिवाय फोटोसुद्धा टाकले ...आता आणखीन काय होणार , काही कळत नाही बॉ.. :)) मला तर स्वप्नातही झोप लागते....

बिंदू आवडली. आपला, (बिंदूप्रेमी) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

>>>>बिंदू आवडली. या वरून कधी काळी वाचलेला एक पीजे आठवला. रेखा बिंदूला म्हणते: "बिंदू" पेक्षा "रेखा" मोठी! बिंदू उत्तरते : बरोबर आहे, पण "बिंदू, बिंदूनेच रेखा होते" :-)

. . . . बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

धागा टिंबाचा टाकला चुकून घेतले हाणून सर्वानि हो मज पामराला क्षमा करा आता मारू नका लाथा आणिक हो लहान बालके केली जरी चूक तुम्ही थोर लोक सांभाळा हो आणि काय बोलू एवढीच विनंति मूढ माझी मति झाली की हो बिपिन कार्यकर्ते

चुके 'कार्यकर्ता' टिंब टाकोनिया चळ लावोनिया राही जनां अंती होऊनिया जरासा व्यथित सकळा कथित करा क्षमा धन्या म्हणे आता घेऊ नका मनी मौज जरा जनी केली असे पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

वाहव्वा!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! बिपिन कार्यकर्ते

आज अयोध्या निकल लागल्या पासून पुढील १५ दिवस PWG (personal wealth games ) चालू असताना समस्त भारतीयांनी असेच मौन व्रत धारण करावे, अशी सरकारची इच्छा आहे. SMS बंद, चर्चा बंद, हे दर्शवनारा हा लेख असेल नाही का ? तसेच, 'आजच्या काळात जनतेला मिळणारे महत्व' इतक्या कमी (पण अर्थपूर्ण) शब्दांत मांडणारा हा पहिला लेख मी पहिला. लेख आवडला. असेच लेख येउद्यात.

साठ वर्षाच्या नन्तर केसचा निक्काल लागावा म्हणून की काय जाणे वांधीगादी यानी हा जुना धागा उकरून काढलाय

In reply to by विजुभाऊ

नाही हो, आई शप्पथ मी नाही उकरला. मला माहित पण नाही हा धागा. तो इथे उकरला गेला आणि माझ्या दृष्टी क्षेपात पडला. http://www.misalpav.com/node/14654#comment-242708

धागा वर आलाच आहे तर मान्य करुन टाकतो. बिकाशेट दुबैवाले यांचे ह्या लेखातील सगळे मुद्दे संपुर्ण पटले. ह्याविषयावर लिहावे तर बिकांनीच.

In reply to by Nile

+१ नशिब त्यांना नुसते टिंब वापरावेसे वाटले,,, x x x अर्थात "फुल्या फुल्या फुल्या" हे शिर्षक आणि मजकूर नव्हता. ;)

अहो, म्हातारपणी हात थरथरतो, तुमच्या टिंबावर अचूक कर्सर आणून दाबायला कोण त्रास झाला मला! शिव शिव शिव, दमलो एवढ्या श्रमांनी सुद्धा, काय दिवस आलेत!

In reply to by तिमा

अग्दी हेच लिहिणार होतो! त्या टिंबावर नेम धरून टिचकी मारायला बरीच एकाग्रता खर्ची पडली! आणि राव, तुमचं बरं आहे; मी तर "बाळ"...:)

पूर्वी काय मस्त विचारप्रवर्तक धागे काढायचा बिकाकाका! पण कार्यकर्त्याचा पदाधिकारी झाल्यापासून सगळी प्रतिभाच आटली बघा!!!! ;)

In reply to by पिवळा डांबिस

ठिपका ते ठपका! ड्वाले पाणाव्ले :)

मला हे तुमचं असलं म्हणणं काही कधीच पटलं नाही आणि पटणारही नाही बिकाकाका. पण वाद घालणं बरोबर दिसत नाही म्हणून गप्प बसतेय!

In reply to by स्पंदना

अगं मी तात्त्विक चर्चा करतेय. कधीतरी इतका सुरेख पॉईंट दिलाय आपल्याला बिकानी, तर लगेच वैयक्तिक होउ नकोस. तूपण गंभीर चर्चेत सामिल हो. म्हणजे पुढेमागे इथला दुवा आपल्याला अजून कुठेतरी देता येइल, की योग्य पॉईंट घेउन चर्चा करणे या विषयावर मिसळपावावर पूर्वी फार उत्कृष्ट चर्चा झाली आहे! ;)

धन्य आहे. बिंदू आवडला/ली ची तर मात्र कमाल गं बाई!!!!!

आपला लेख आवडला. ह्याचं इंग्रजी, तमिळ, कन्नड आणि टिम्बक्टू भाषेमधे अनुवाद केलात तर ५०० एक तरी आव्रुत्त्या सहज खपतील. तरी अनुवादाचे मनावर घ्यावे हि नम्र ईनंती..!
भारतीय संस्कॄती, तत्वज्ञान, परंपरा यांचे इतके साधे सरळ समर्पक विवेचन करणारा लेख आमच्या वाचनात आला नव्हता. स्थिती, उत्पती, विलय सर्व विश्व एका बिंदुतुन येते आणि बिंदुत लुप्त होते याची माहिती देणारा लेख. रोज सर्वांनी या लेखाचे प्रातःदर्शन घ्यावे. योगाभ्यास करणार्‍यांना इंटरनेटवर ध्यानध्यारणा करण्याची सोय केल्याबद्दल बिपिनभाउंचे आभार मानतो.
गणा मास्तरांशी सहमत :)...!!

हि काय भानगड आहे माहित नाही पण मला लेख दिसतच नाहीये.... का कराच त्ये सान्गा..

In reply to by कौस्तुभ खैरनार

पुण्य कमवा थोडे. आमीबी कालधरनं सुरुवात केली आन लेख दिसला आमाला. ;)

music in the silence

गणादीं पूर्वमुच्चार्य वर्णादीं तदनंतरं॥ अनुस्वारः परतरः॥ अर्धेन्दुलसितं॥ तारेण ऋद्धम्‌॥ एतत्तव मनुस्वरूपं॥ गकारः पूर्वरूपं॥ अकारो मध्यमरूपं॥ अनुस्वारश्चान्त्यरूपं॥ बिन्दुरुत्तररूपं॥ नादः संधानं॥ संहितासंधिः॥ सैषा गणेशविद्या॥ गणकऋषिः॥ निचृद्गायत्रीच्छंदः॥ गणपतिर्देवता॥ ॐ गं गणपतये नमः॥ ७॥ यातील बिन्दूचे महत्व किती अगाध आहे हेच या प्रगाढ चिंतनातून निपजलेल्या लेखनातून जाणवते. श्री संत सद्गुरू श्री श्री श्री बिपिनराव महाराजांना आमचा विणम्र प्रनाम.