बुद्ध
लेखनप्रकार
परवा मित्राकडे गेलो होतो तर बुद्धाची ही प्रतिमा दिसली... बघत रहावं अशी. इतकी विलोभनीय की मूर्तीकाराच कौतुक वाटलं. पद्मासनात बसलेला आणि विरक्त दिसणारा अश्या अनेक प्रतिमा आहेत पण ही मूर्ती अत्यंत साधीये. कुठलाही अभिनिवेश नाही तरीही बुद्धाची चित्तदशा सहीसही प्रकट होतेय. इतकी की तिच्याकडे पहात राहिलं तरी आपण बुद्धाच्या चित्तदशेशी संलग्न होतो.
मग दोन दिवसासाठी त्याच्याकडून मागून आणली. मुलाला म्हटलं तू या प्रतिमेचं एक सुरेख कॉंपोझिशन कर. त्याचा मित्र आला होता त्यानं रेफरन्ससाठी हा फोटो घेतला... वाटलं आज बुद्धाविषयी लिहावं
बुद्धाला समजावून घ्यायच असेल तर प्रथम लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे बुद्ध ही व्यक्ती नाही, स्थिती आहे.
बुद्धाला आपण व्यक्ती समजलो तर नजरीया बदलतो. आपण त्याच्या जीवनाचा शोध घ्यायला लागतो. वी सर्च इंटू हीज बायोग्राफी. तो कोण होता, त्याचा जन्मानंतर राजजोतिष्यानं काय सांगीतलं, त्यानं संसारत्याग कसा केला, त्यानं किती साधना केली, त्याला ज्ञान कुठे झालं, असे एकनाअनेक प्रश्न निर्माण होतात.
बुद्ध ही स्थिती आहे हे लक्षात आलं की फक्त तीनच प्रश्न उरतात:
एक, त्यानं सत्याचा शोध का घेतला, दोन, त्याला ज्ञान नक्की कशामुळे झालं आणि तीन, आपल्याला ज्ञान व्हावं म्हणून त्यानं कोणती प्रक्रिया सांगीतलीये.
_______________________________
तर पहिला प्रश्न : त्यानं सत्याचा शोध का घेतला?
बुद्ध राज्यातल्या एका उत्सवासाठी निघाला होता. अचानक एक अत्यंयात्रा रथाला सामोरी आली. वडिलांनी आतापर्यंत बुद्धाला मृत्यू कळू नये अशी दक्षता घेतली होती. बुद्धाच्या आयुष्यात ही पहिलीच घटना होती. त्यानं सारथ्याला विचारलं आणि नाईलाजानं सारथी मृत्यूविषयी बोलला.
त्यावर बुद्धानं सारथ्याला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला, ‘मला देखील मृत्यू आहे?’
सारथी प्रश्न टाळू शकला नाही, म्हणाला ‘हो राजन प्रत्येकाला मृत्यू आहे’.
बुद्ध म्हणाला `रथ माघारी घे'.
बुद्धाला तत्क्षणी लक्षात आलं सारे भोग, सारी संपन्नता, सर्व सत्ता मृत्यू व्यर्थ करत असेल तर या राजस्वितेचा काहीही उपयोग नाही. अर्जुनाला युद्धभूमीवर झाला तसा बुद्धाला सारी सुखं समोर असतांना विषाद झाला. आणि बुद्ध सत्याच्या शोधात, जे मृत्यू हिरावून घेऊ शकत नाही अश्या शाश्वताच्या शोधात निघाला.
तो केंव्हा निघाला, रात्री की दिवसा, त्या वेळी यशोधरा काय करत होती आणि त्याचा मुलगा किती वर्षाचा होता हे ऐतिहासिक तपशील आहेत त्यांचा साधकाला काहीएक उपयोग नाही.
_______________________________
दुसरा प्रश्न : त्याला ज्ञान नक्की कशामुळे झालं?
बुद्धानं किती वर्ष साधना केली आणि तो कुठेकुठे फिरला याचा उपयोग नाही. त्यानं अनेकानेक साधना केल्या पण त्याला सत्य गवसलं नाही आणि तो अत्यंत निराश झाला. त्याला वाटलं आपण भोग सोडला आणि त्यागही आपल्याला सत्याप्रत नेऊ शकला नाही. आपलं जीवन दोन्ही बाजूनं व्यर्थ झालं. दीर्घ साधनेनं त्याचा देह देखील अत्यंत कृश झाला होता.
त्या रात्री एका साध्याश्या पाण्याच्या प्रवाहातून पलिकडे जातांना त्याचा तोल गेला आणि तो प्रवाहाबरोबर वाहून जायला लागला. मोठ्या मुश्किलीनं त्यानं तिरावरचं गवत पकडून ठेवलं आणि त्या विमनस्क स्थितीत त्याचं लक्ष आकाशाकडे गेलं. त्या वेळी तिथे एक तारा चमकत होता. आता जाणीवेच्या क्षेत्रात फक्त दोनच गोष्टी उरल्या, एक बुद्ध आणि दुसरी, तो तारा.
पुढल्या क्षणी तो तारा विझला आणि बुद्धाची तार्यावर रोखलेली जाणीव सरळ त्याच्याकडे परतली. त्याच्या जाणीवेच्या क्षेत्रात काहीही उरलं नाही... त्याक्षणी त्याच्या लक्षात आलं सारं जग शून्य आहे! आपण निराकार आहोत... कुणाच्याही आत कुणीही नाही.
____________________________
तिसरा प्रश्न : ज्ञान होण्यासाठी त्यानं कोणती प्रक्रिया सांगीतलीये?
बुद्धाला सत्य गवसलं याचा अर्थ आपण व्यक्ती नसून स्थिती आहोत हा उलगडा झाला. ही स्थिती निर्वैयक्तिक आहे, निरंतर आहे. आत्ता या क्षणी आणि सदैव आहे. त्यामुळे ती मृत्यूनं अनाबाधित आहे.
सत्य समजल्यावर बुद्ध म्हणला ‘जग शून्य आहे’. लोकांनी त्याचा अर्थ काढला जग व्यर्थ आहे. जग शून्य आहे याचा अर्थ व्यक्तीत्वामुळे आपण आहोत असा भास होतो पण वास्तविकात कुणाच्याही आत कुणीही नाही. जर देहात कुणी नसेल तर मृत्यू कुणाला येणार?
जगात प्रक्रिया आहेत आणि जाणीव देखील आहे पण जाणीव व्यक्तीगत नाही, ती निराकार आहे.
आपलं चित्त जे सदैव दैहिक आणि मानसिक प्रक्रियांनी वेधून घेतलंय ते स्वतःकडे वळण्याचा अवकाश की बुद्धाला काय म्हणायचय ते लक्षात येईल. कसं वळेल ते चित्त?
तर बुद्धानं एक अत्यंत सोपी साधना सांगीतलीये : तो म्हणतो `जाणीवेचा रोख श्वासाकडे वळवा' (विपश्यना). काय होईल त्यानं?
तुम्ही समग्रतेनं फक्त चालू असलेल्या श्वासाची दखल घेतली आणि तिथे स्थिर राहिलात तर तुमच्या लक्षात येईल. श्वास आपोआप चालू आहे. आपल्याला तो कळतोय नक्की पण करणारा कुणीही नाही.
श्वासाच्या या रहस्यमय प्रक्रियेनं तुम्ही कृतज्ञ झालात तर सार्या जगाचा, सार्या व्यवधानांचा तुम्हाला विसर पडेल. जाणीवेच्या क्षेत्रात फक्त दोनच गोष्टी उरतील, चालू असलेला श्वास आणि तुम्ही.
असेच संपूर्ण शांत राहिलात तर एका क्षणी श्वासावर रोखलेली जाणीव, सर्व अंतर्बाह्य व्यापून असलेल्या व्यापक आणि निराकार जाणीवेशी एकरूप होईल. तीचं व्यक्तीगत स्वरूप विलीन होईल. कारण मुळात जाणीव एकच आहे.
ते शांतता शांततेत मिसळून जाण्यासारखं आहे. मग तुमच्याही लक्षात येईल की शांतता हेच आपलं मुळ स्वरूप आहे. आपण ती शांतताच आहोत. शांतता अविभाज्य आहे, सर्वत्र एकसंध शांतताच आहे. कुणाच्याही आत कुणीही नाही. बुद्ध म्हणतो तसं जग शून्य आहे.
_________________________________
एखाद्या निवांत वेळी, सुट्टीच्या दिवशी, सहलीच्या ठिकाणी, निर्वेध चित्तदशा असतांना ही साधना करून पाहा. लगबगीनं प्रतिसाद देण्याची घाई करू नका. विषय वादाचा नाही, अनुभवाचा आहे. कदाचित तुमची चित्तदशा बुद्धाच्या चित्तदशेशी संलंग्न होईल. आणि तुम्ही म्हणाल, ‘क्या बात है’!

वाचने
27209
वाचनखूण
प्रतिक्रिया
71
वाह मस्तच लिहिलंय आवडलं
बुध्दप्रतिमा भारी आहे.
In reply to बुध्दप्रतिमा भारी आहे. by मोदक
+१ बाकी तेच.
In reply to बुध्दप्रतिमा भारी आहे. by मोदक
+१

तुम्ही समग्रतेनं फक्त चालू
In reply to तुम्ही समग्रतेनं फक्त चालू by स्पा
अगदी हेच...
In reply to तुम्ही समग्रतेनं फक्त चालू by स्पा
यात इंटरेस्ट कसा निर्माण
In reply to यात इंटरेस्ट कसा निर्माण by सस्नेह
म्हणजे करून करून भागली अन
In reply to म्हणजे करून करून भागली अन by बॅटमॅन
माझ्या वाचण्यात ही म्हण 'करून
In reply to माझ्या वाचण्यात ही म्हण 'करून by सस्नेह
छे, मला तर हे के.के. भागले
In reply to माझ्या वाचण्यात ही म्हण 'करून by सस्नेह
दोन्ही पाठभेद ऐकलेले आहेत.
In reply to दोन्ही पाठभेद ऐकलेले आहेत. by बॅटमॅन
हम्म..
In reply to हम्म.. by सस्नेह
म्हणीबद्दल म्हणाल तर मग मला
In reply to म्हणीबद्दल म्हणाल तर मग मला by बॅटमॅन
..सगळे भोग यथेच्छ भोगा. आता
In reply to ..सगळे भोग यथेच्छ भोगा. आता by मालोजीराव
हांगाश्शी!!!!!!!! आत्ता आठवलं
जबरदस्त..........!
आवडले!
खूप छान लिहिलंय.
थोड अवांतर होइल पण बुद्धाच्या
In reply to थोड अवांतर होइल पण बुद्धाच्या by स्पंदना
जरुर स्वतः करा आनी ठरवा.
In reply to जरुर स्वतः करा आनी ठरवा. by विलासराव
मला तुमची भिती वाटते.
In reply to मला तुमची भिती वाटते. by स्पंदना
?

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र.
In reply to थोड अवांतर होइल पण बुद्धाच्या by स्पंदना
थोड अवांतर होइल पण बुद्धाच्या
In reply to थोड अवांतर होइल पण बुद्धाच्या by गणपा
एगझॅक्टली हेच म्हणायचं होतं.
In reply to थोड अवांतर होइल पण बुद्धाच्या by स्पंदना
अपर्णा, बुद्धाचं जीवन अपवादात्मक नाही,
In reply to अपर्णा, बुद्धाचं जीवन अपवादात्मक नाही, by संजय क्षीरसागर
तुम्हाला समजल नाही संजय साहेब
In reply to तुम्हाला समजल नाही संजय साहेब by स्पंदना
अपर्णा, अँगल वेगळा आहे, समजतोय का पाहा
छे छे !
In reply to छे छे ! by परिकथेतील राजकुमार
परा? टास्मानिया जळतय बाबा. तू
In reply to छे छे ! by परिकथेतील राजकुमार
simple and superb
In reply to छे छे ! by परिकथेतील राजकुमार
म्हणजे आपण संकेतस्थळांवर पडिक
... "क्या बात है"
रोचक लिखाण. लेखात सांगितलेली
विपश्यना दीर्घकालीन आणि कष्टप्रद साधना नाही
गोजीरं
अपर्णा, गणपाभौ,
In reply to अपर्णा, गणपाभौ, by अर्धवटराव
भेट
In reply to भेट by दादा कोंडके
थँक यु :)
सत्य : न बदलणारा वर्तमान. भूतकाळ : संपलेला विषय
स्थिती आणि प्रक्रिया
बुद्धाचा फटु तेवढा आवडला..
In reply to बुद्धाचा फटु तेवढा आवडला.. by ऋषिकेश
अंतिम सत्य
In reply to बुद्धाचा फटु तेवढा आवडला.. by ऋषिकेश
+१
In reply to +१ by विटेकर
0/0
In reply to 0/0 by गवि
ॐ शून्यमदः शून्यमिदं शून्यात्
In reply to ॐ शून्यमदः शून्यमिदं शून्यात् by बॅटमॅन
हेहे. त्यामुळेच शून्याऐवजी
In reply to हेहे. त्यामुळेच शून्याऐवजी by गवि
इंडीड......
In reply to हेहे. त्यामुळेच शून्याऐवजी by गवि
गवि : डू यू डिनाय द स्पेस?
In reply to गवि : डू यू डिनाय द स्पेस? by संजय क्षीरसागर
विचार करतो आहे.
In reply to गवि : डू यू डिनाय द स्पेस? by संजय क्षीरसागर
परफेक्ट
In reply to गवि : डू यू डिनाय द स्पेस? by संजय क्षीरसागर
या स्पेसला बुद्ध सत्य म्हणतो.
In reply to या स्पेसला बुद्ध सत्य म्हणतो. by सस्नेह
रोचक

स्पेस म्हणजे सत्य किंवा शून्य? हो.
In reply to स्पेस म्हणजे सत्य किंवा शून्य? हो. by संजय क्षीरसागर
>>जाणीवेचा अनंत विस्तार
In reply to >>जाणीवेचा अनंत विस्तार by सस्नेह
येस!
In reply to स्पेस म्हणजे सत्य किंवा शून्य? हो. by संजय क्षीरसागर
_/\_
In reply to हेहे. त्यामुळेच शून्याऐवजी by गवि
अच्छा आता कळालं पोलिस
संजय क्षीरसागर साहेब लेख आवडला.
In reply to संजय क्षीरसागर साहेब लेख आवडला. by निश
आवडला फोटो तर लय आवडला..
लेख आवडला व फोटो अतिशय सुरेख.
छान
@क्षीरसागर साहेब्,बुद्धांना
In reply to @क्षीरसागर साहेब्,बुद्धांना by श्री गावसेना प्रमुख
पूजा केली जाते हे महत्वाच.
In reply to पूजा केली जाते हे महत्वाच. by स्पंदना
अगदी साधं सोपं सांगणय
नमस्कार संजय साहेब
In reply to नमस्कार संजय साहेब by रणजित चितळे
रणजितश्री, तुमच्या एका प्रतिसादानं लेख सार्थक झाला!
मुक्तक आवडले.
चांगला लेख
बुद्ध ही स्थिती आहे हे लक्षात
बुद्ध ही स्थिती आहे हे लक्षात आलं की फक्त तीनच प्रश्न उरतात: एक, त्यानं सत्याचा शोध का घेतला, दोन, त्याला ज्ञान नक्की कशामुळे झालं आणि तीन, आपल्याला ज्ञान व्हावं म्हणून त्यानं कोणती प्रक्रिया सांगीतलीये.धादांत दिशाभूल करणारे विचार. कारण वरील तीन प्रश्न व त्याची उत्तरे आत्मिक मार्गात असणाऱ्या आणी त्याहीपेक्षा किमान बुद्धाचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहीत असतात पण ते बुद्ध बनतातच असे नाही. अगदी उद्याही अंबानीच्या बालकाचे बुद्धासारखे संगोपन केले व अचानक त्याच्या समोर वृद्धत्व आणी मृत्यू आला तरीही तो बुद्ध बनेल न्हवे याची खात्री तर नाहीच तर तो कदाचित त्या फँदातहि पडणार नाही कदाचित व्यसनी होईल कदाचित त्याला कसलाच फरक पाडणार नाही जीवनाचे एक वास्तव म्हणून तो सामान्यमाणसा स्तव जगेल व वृद्ध होऊन मारून जाईल... म्हणूनच संतांची, शिकवण, मार्ग वा आयुष्यातील घटना अनुसरणे ही बाब कुठल्याही आत्मिक यशाची शाश्वती आजिबात नाही... हा अध्यात्माचा पहिला नियम होय. मग असे काय शास्त्र / मार्ग आहे जे बुद्धाला बुद्ध, ओशोंला ओशो, अथवा संतांना संत बनवते ?