बुद्ध
बुद्धाला समजावून घ्यायच असेल तर प्रथम लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे बुद्ध ही व्यक्ती नाही, स्थिती आहे.
बुद्धाला आपण व्यक्ती समजलो तर नजरीया बदलतो. आपण त्याच्या जीवनाचा शोध घ्यायला लागतो. वी सर्च इंटू हीज बायोग्राफी. तो कोण होता, त्याचा जन्मानंतर राजजोतिष्यानं काय सांगीतलं, त्यानं संसारत्याग कसा केला, त्यानं किती साधना केली, त्याला ज्ञान कुठे झालं, असे एकनाअनेक प्रश्न निर्माण होतात.
बुद्ध ही स्थिती आहे हे लक्षात आलं की फक्त तीनच प्रश्न उरतात:
एक, त्यानं सत्याचा शोध का घेतला, दोन, त्याला ज्ञान नक्की कशामुळे झालं आणि तीन, आपल्याला ज्ञान व्हावं म्हणून त्यानं कोणती प्रक्रिया सांगीतलीये.
_______________________________
तर पहिला प्रश्न : त्यानं सत्याचा शोध का घेतला?
बुद्ध राज्यातल्या एका उत्सवासाठी निघाला होता. अचानक एक अत्यंयात्रा रथाला सामोरी आली. वडिलांनी आतापर्यंत बुद्धाला मृत्यू कळू नये अशी दक्षता घेतली होती. बुद्धाच्या आयुष्यात ही पहिलीच घटना होती. त्यानं सारथ्याला विचारलं आणि नाईलाजानं सारथी मृत्यूविषयी बोलला.
त्यावर बुद्धानं सारथ्याला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला, ‘मला देखील मृत्यू आहे?’
सारथी प्रश्न टाळू शकला नाही, म्हणाला ‘हो राजन प्रत्येकाला मृत्यू आहे’.
बुद्ध म्हणाला `रथ माघारी घे'.
बुद्धाला तत्क्षणी लक्षात आलं सारे भोग, सारी संपन्नता, सर्व सत्ता मृत्यू व्यर्थ करत असेल तर या राजस्वितेचा काहीही उपयोग नाही. अर्जुनाला युद्धभूमीवर झाला तसा बुद्धाला सारी सुखं समोर असतांना विषाद झाला. आणि बुद्ध सत्याच्या शोधात, जे मृत्यू हिरावून घेऊ शकत नाही अश्या शाश्वताच्या शोधात निघाला.
तो केंव्हा निघाला, रात्री की दिवसा, त्या वेळी यशोधरा काय करत होती आणि त्याचा मुलगा किती वर्षाचा होता हे ऐतिहासिक तपशील आहेत त्यांचा साधकाला काहीएक उपयोग नाही.
_______________________________
दुसरा प्रश्न : त्याला ज्ञान नक्की कशामुळे झालं?
बुद्धानं किती वर्ष साधना केली आणि तो कुठेकुठे फिरला याचा उपयोग नाही. त्यानं अनेकानेक साधना केल्या पण त्याला सत्य गवसलं नाही आणि तो अत्यंत निराश झाला. त्याला वाटलं आपण भोग सोडला आणि त्यागही आपल्याला सत्याप्रत नेऊ शकला नाही. आपलं जीवन दोन्ही बाजूनं व्यर्थ झालं. दीर्घ साधनेनं त्याचा देह देखील अत्यंत कृश झाला होता.
त्या रात्री एका साध्याश्या पाण्याच्या प्रवाहातून पलिकडे जातांना त्याचा तोल गेला आणि तो प्रवाहाबरोबर वाहून जायला लागला. मोठ्या मुश्किलीनं त्यानं तिरावरचं गवत पकडून ठेवलं आणि त्या विमनस्क स्थितीत त्याचं लक्ष आकाशाकडे गेलं. त्या वेळी तिथे एक तारा चमकत होता. आता जाणीवेच्या क्षेत्रात फक्त दोनच गोष्टी उरल्या, एक बुद्ध आणि दुसरी, तो तारा.
पुढल्या क्षणी तो तारा विझला आणि बुद्धाची तार्यावर रोखलेली जाणीव सरळ त्याच्याकडे परतली. त्याच्या जाणीवेच्या क्षेत्रात काहीही उरलं नाही... त्याक्षणी त्याच्या लक्षात आलं सारं जग शून्य आहे! आपण निराकार आहोत... कुणाच्याही आत कुणीही नाही.
____________________________
तिसरा प्रश्न : ज्ञान होण्यासाठी त्यानं कोणती प्रक्रिया सांगीतलीये?
बुद्धाला सत्य गवसलं याचा अर्थ आपण व्यक्ती नसून स्थिती आहोत हा उलगडा झाला. ही स्थिती निर्वैयक्तिक आहे, निरंतर आहे. आत्ता या क्षणी आणि सदैव आहे. त्यामुळे ती मृत्यूनं अनाबाधित आहे.
सत्य समजल्यावर बुद्ध म्हणला ‘जग शून्य आहे’. लोकांनी त्याचा अर्थ काढला जग व्यर्थ आहे. जग शून्य आहे याचा अर्थ व्यक्तीत्वामुळे आपण आहोत असा भास होतो पण वास्तविकात कुणाच्याही आत कुणीही नाही. जर देहात कुणी नसेल तर मृत्यू कुणाला येणार?
जगात प्रक्रिया आहेत आणि जाणीव देखील आहे पण जाणीव व्यक्तीगत नाही, ती निराकार आहे.
आपलं चित्त जे सदैव दैहिक आणि मानसिक प्रक्रियांनी वेधून घेतलंय ते स्वतःकडे वळण्याचा अवकाश की बुद्धाला काय म्हणायचय ते लक्षात येईल. कसं वळेल ते चित्त?
तर बुद्धानं एक अत्यंत सोपी साधना सांगीतलीये : तो म्हणतो `जाणीवेचा रोख श्वासाकडे वळवा' (विपश्यना). काय होईल त्यानं?
तुम्ही समग्रतेनं फक्त चालू असलेल्या श्वासाची दखल घेतली आणि तिथे स्थिर राहिलात तर तुमच्या लक्षात येईल. श्वास आपोआप चालू आहे. आपल्याला तो कळतोय नक्की पण करणारा कुणीही नाही.
श्वासाच्या या रहस्यमय प्रक्रियेनं तुम्ही कृतज्ञ झालात तर सार्या जगाचा, सार्या व्यवधानांचा तुम्हाला विसर पडेल. जाणीवेच्या क्षेत्रात फक्त दोनच गोष्टी उरतील, चालू असलेला श्वास आणि तुम्ही.
असेच संपूर्ण शांत राहिलात तर एका क्षणी श्वासावर रोखलेली जाणीव, सर्व अंतर्बाह्य व्यापून असलेल्या व्यापक आणि निराकार जाणीवेशी एकरूप होईल. तीचं व्यक्तीगत स्वरूप विलीन होईल. कारण मुळात जाणीव एकच आहे.
ते शांतता शांततेत मिसळून जाण्यासारखं आहे. मग तुमच्याही लक्षात येईल की शांतता हेच आपलं मुळ स्वरूप आहे. आपण ती शांतताच आहोत. शांतता अविभाज्य आहे, सर्वत्र एकसंध शांतताच आहे. कुणाच्याही आत कुणीही नाही. बुद्ध म्हणतो तसं जग शून्य आहे.
_________________________________
एखाद्या निवांत वेळी, सुट्टीच्या दिवशी, सहलीच्या ठिकाणी, निर्वेध चित्तदशा असतांना ही साधना करून पाहा. लगबगीनं प्रतिसाद देण्याची घाई करू नका. विषय वादाचा नाही, अनुभवाचा आहे. कदाचित तुमची चित्तदशा बुद्धाच्या चित्तदशेशी संलंग्न होईल. आणि तुम्ही म्हणाल, ‘क्या बात है’!
In reply to बुध्दप्रतिमा भारी आहे. by मोदक
In reply to बुध्दप्रतिमा भारी आहे. by मोदक
In reply to बुध्दप्रतिमा भारी आहे. by मोदक
In reply to तुम्ही समग्रतेनं फक्त चालू by स्पा
In reply to तुम्ही समग्रतेनं फक्त चालू by स्पा
यात इंटरेस्ट कसा निर्माण करावा?...सगळे भोग यथेच्छ भोगा. आता जी विरक्ती येते तोच हा इंटरेस्ट ! समर्थांच्या शब्दात सांगायचे तर जो संसारतापे पोळला तोच अध्यात्मसुखा अधिकारी झाला..
In reply to यात इंटरेस्ट कसा निर्माण by सस्नेह
In reply to म्हणजे करून करून भागली अन by बॅटमॅन
In reply to माझ्या वाचण्यात ही म्हण 'करून by सस्नेह
In reply to माझ्या वाचण्यात ही म्हण 'करून by सस्नेह
In reply to दोन्ही पाठभेद ऐकलेले आहेत. by बॅटमॅन
In reply to हम्म.. by सस्नेह
In reply to म्हणीबद्दल म्हणाल तर मग मला by बॅटमॅन
..सगळे भोग यथेच्छ भोगा. आता जी विरक्ती येते तोच हा इंटरेस्ट !पन लफडा काय हाये म्हायतिये काय...ती विरक्ती एकदम शोर्ट टायमासाठी येते....आनी परत ती विरक्ती आनायला परत "सगळे भोग यथेच्छ भोगा" कडे वळावा लागतं !
In reply to ..सगळे भोग यथेच्छ भोगा. आता by मालोजीराव
In reply to थोड अवांतर होइल पण बुद्धाच्या by स्पंदना
In reply to जरुर स्वतः करा आनी ठरवा. by विलासराव
In reply to मला तुमची भिती वाटते. by स्पंदना
In reply to मला तुमची भिती वाटते. by स्पंदना
In reply to थोड अवांतर होइल पण बुद्धाच्या by स्पंदना
थोड अवांतर होइल पण बुद्धाच्या वडीलांनी जर गौतमाला लहाणपणापासुन जरा-मरण-दु:खाची ओळख करुन दिली असती तर एकदम समोर आलेल्या त्या अनोख्या सत्याने तो असा भांबावला नसता. वेगळ्या परिस्थीतीत वाढवल्याचा वेगळा परिणाम म्हणजे बुद्ध!प्रतिसादातल्या ह्या भागाशी सहमत.
In reply to थोड अवांतर होइल पण बुद्धाच्या by गणपा
In reply to थोड अवांतर होइल पण बुद्धाच्या by स्पंदना
In reply to अपर्णा, बुद्धाचं जीवन अपवादात्मक नाही, by संजय क्षीरसागर
बुद्धाकडे साधक यायचे त्यांना तो चितेवर ध्यान करायला सांगायचा. जस्ट वॉचींग द बर्निंग पायर. आपल्याला वाटतं कसली अभद्र साधना! पण जस्ट सी, ही इज टेकींग यू टू द लास्ट पेज ऑफ द नॉव्हेल.
याचा अर्थ अध्यात्म वैराग्यातून येतं असा नाही तर तुम्ही अमृताचा शोध घ्या.
हे अमृत म्हणजे देखील काही विषेश गोष्ट नाही, ती अस्तित्वाची कायम स्थिती आहे.
एकदा त्या स्थितीचा उलगडा झाला की तुम्ही देखील निश्चींत होता, तुमचं आयुष्यच बदलून जातं आणि जगणं मजेचं होतं.
या बद्दल खरतर नो कमेंटस. चघळायचीच म्हंटल तर अमाप चघळता येइल अशी चर्चा.
In reply to तुम्हाला समजल नाही संजय साहेब by स्पंदना
जे वैश्विक सत्य, की जन्माला आलेला मरणारच याचीच जाणिव त्याला नव्हतीबुद्धाच्या आणि इतरांच्या जीवनशैलीत कमालीचा फरक असणार कारण तो राजपुत्र होता. इतकंच काय कोणत्याही दोन व्यक्तींच्या जीवनशैलीत संपूर्ण साधर्म्य सापडणार नाही. अर्जुन आणि बुद्ध दोघं राजपुत्र आहेत पण त्यांचे जीवनाकडे पाहण्याचे दृष्टीकोन भिन्न आहेत. युद्ध आप्तजनात नसतं तर अर्जुनाला संहार करतांना विषाद झाला नसता. बुद्धाला अनोळखी व्यक्तीच्या मृत्यूनं विषाद झाला. मृत्यूच्या गांभिर्याकडे विषय नेण्याचा किंवा कुणाला विषाद व्हावा असा हेतू नाही. कारण विषादातून कुणी सत्याच्या शोधात निघेल तर कुणी मानसिक गर्तेत जाईल. सो दॅट कांट बी द डिरेक्शन. आणि लेखन वाचताना याच सदैव स्मरण असू द्या. अध्यात्मकडे छंद म्हणून पाहा. आतापर्यंत ते विषादातून निर्माण होतं असा समज आहे तो सोडून द्या. इट इज अ फन. इट इज अॅन ऑप्शन ऑफ अ पर्सन ऑफ मॅच्युरिटी. आणि आता हे वाचून पाहा :
याचा अर्थ अध्यात्म वैराग्यातून येतं असा नाही तर तुम्ही अमृताचा शोध घ्या. हे अमृत म्हणजे देखील काही विषेश गोष्ट नाही, ती अस्तित्वाची कायम स्थिती आहे. एकदा त्या स्थितीचा उलगडा झाला की तुम्ही देखील निश्चींत होता, तुमचं आयुष्यच बदलून जातं आणि जगणं मजेचं होतं.बुद्धाची प्रतिमा `फोटो चांगला आहे' इतकंच दर्शवत नाही. ती जी निवांत चित्तदशा दर्शवते ती तुम्हाला लाभावी हा हेतू आहे.
In reply to छे छे ! by परिकथेतील राजकुमार
In reply to छे छे ! by परिकथेतील राजकुमार
In reply to छे छे ! by परिकथेतील राजकुमार
In reply to अपर्णा, गणपाभौ, by अर्धवटराव
असं म्हणतात कि बुद्धाला अंतीम अवस्थेत मूलकणांचं अवीरत प्रकटन आणि विघटन अशी विश्वाची प्रक्रीया दिसली. अश्वत्थाम्याचा संदेश याच वळणावर संपूर्ण मॅच्युअर होतो.सत्य ही प्रक्रिया नाही, स्थिती आहे. इट इज नॉट अ प्रोसेस, इट इज अ काँस्टंट स्टेट. आणि स्थिती इतकी मूलभूत आहे की असून नसल्यासारखी आहे. म्हणून उपनिषदं तिला पूर्ण म्हणतात तर बुद्ध शून्य. ती इतकी उघड आहे की आता डोळ्यासमोर आहे आणि सत्य शोधण्यात लोकांनी आयुष्य घालावून त्यांच्या हाती काही लागलेलं नाही. ती सर्व अस्तित्वाचा आधार आहे आणि तरी सुद्धा आपण तिची दखल न घेता संपूर्ण आयुष्य जगू शकतो. इट इज अॅन अन-इनवायटींग इनवीटेशन. आणि, द मोस्ट सर्प्रायजींग थींग इज, आपण त्या स्थितीशी कायम संलग्नच आहोत. मुळात आपण सत्यच आहोत पण ते लक्षात येत नाही.
बुद्धाला त्याच्या वडीलांनी जर अगोदरच दु:खाची कल्पना दिली असती, किंवा खरच त्याला असा अश्वत्थामा भेटला असता तर बुद्ध संन्यासी न होता कदाचीत श्रीकृष्णासारखा श्रीमानयोगी झाला असता.यावर चर्चा होऊ शकेल आणि अनेक शक्यता असू शकतील पण घडलेल्या घटनेविषयी काहीही करता येत नाही. आणि मुद्दा आपल्याला सत्य गवसायचा आहे.
In reply to बुद्धाचा फटु तेवढा आवडला.. by ऋषिकेश
In reply to बुद्धाचा फटु तेवढा आवडला.. by ऋषिकेश
In reply to +१ by विटेकर
In reply to 0/0 by गवि
In reply to ॐ शून्यमदः शून्यमिदं शून्यात् by बॅटमॅन
In reply to हेहे. त्यामुळेच शून्याऐवजी by गवि
In reply to हेहे. त्यामुळेच शून्याऐवजी by गवि
In reply to गवि : डू यू डिनाय द स्पेस? by संजय क्षीरसागर
In reply to गवि : डू यू डिनाय द स्पेस? by संजय क्षीरसागर
In reply to गवि : डू यू डिनाय द स्पेस? by संजय क्षीरसागर
या स्पेसला बुद्ध सत्य म्हणतो.....?? काहीतरी गडबड वाटतेय. स्पेस म्हणजे सत्य किंवा शून्य ? स्पेसचे ज्ञान होण्यासाठी जाणीव शाबूत असावी लागते. आणि शून्य म्हणजे जाणीवेचा सुद्धा अभाव !जेव्हा जाणीव नव्हती तेव्हाहि सत्य होतेच.
In reply to या स्पेसला बुद्ध सत्य म्हणतो. by सस्नेह
In reply to या स्पेसला बुद्ध सत्य म्हणतो. by सस्नेह
स्पेसचे ज्ञान होण्यासाठी जाणीव शाबूत असावी लागते. आणि शून्य म्हणजे जाणीवेचा सुद्धा अभाव !जेव्हा जाणीव नव्हती तेव्हाहि सत्य होतेच.असं पाहा, शांतता म्हणजे ध्वनीचा आभाव, ट्रू. पण शांतताच ध्वनीचा स्त्रोत आहे. शांतता अॅबसल्यूट आहे. ध्वनी नव्हता तेंव्हा शांतता होती, ध्वनी तिच्यातच प्रकट होतो आणि तिच्यातच विलीन होतो. ध्वनी शांततेचा भंग करतो असं वाटतं पण शांतता अभंग आहे. ध्वनी निर्माण झाल्यावर आपलं चित्त तिकडे वेधलं जातं आणि शांततेचं विस्मरण होतं इतकंच. वी कॅन गो टू द एक्स्ट्रीम... ध्वनीचा अनंत विस्तार म्हणजे शांतता आणि शांततेचं प्रकट स्वरूप म्हणजे ध्वनी. स्पेसच तसच आहे. इट इज अॅन अॅबसल्यूट पोटेंशीयालिटी. जाणीवेचा अनंत विस्तार म्हणजे अवकाश, (आकाश किंवा स्पेस). तो जाणीवेचा आभाव नाही. अस्तित्व एक आहे म्हणजे सर्व आकार निराकराचीच रूपं आहेत. आकार आणि निराकात द्वैत नाही. संसार आणि अध्यात्म दोन नाहीत. बुद्ध तेच सांगतोय, आपण आकार भासतोय पण मुळात शून्य आहोत. व्यक्ती म्हणून वावरतोय म्हणून स्थितीच विस्मरण झालय इतकंच. एकदा स्थिती कळली की शाश्वत समजलं. मृत्यू आकाराला आहे, स्थिती कायम आहे.
In reply to स्पेस म्हणजे सत्य किंवा शून्य? हो. by संजय क्षीरसागर
In reply to >>जाणीवेचा अनंत विस्तार by सस्नेह
In reply to स्पेस म्हणजे सत्य किंवा शून्य? हो. by संजय क्षीरसागर
ध्वनी शांततेचा भंग करतो असं वाटतं पण शांतता अभंग आहे. ध्वनी निर्माण झाल्यावर आपलं चित्त तिकडे वेधलं जातं आणि शांततेचं विस्मरण होतं इतकंच. वी कॅन गो टू द एक्स्ट्रीम... ध्वनीचा अनंत विस्तार म्हणजे शांतता आणि शांततेचं प्रकट स्वरूप म्हणजे ध्वनी. स्पेसच तसच आहे. इट इज अॅन अॅबसल्यूट पोटेंशीयालिटी. जाणीवेचा अनंत विस्तार म्हणजे अवकाश, (आकाश किंवा स्पेस). तो जाणीवेचा आभाव नाही.एकदम झक्कास! भारीच, पटेश!! - (शून्य) सोकाजी
In reply to हेहे. त्यामुळेच शून्याऐवजी by गवि
In reply to संजय क्षीरसागर साहेब लेख आवडला. by निश
In reply to @क्षीरसागर साहेब्,बुद्धांना by श्री गावसेना प्रमुख
In reply to पूजा केली जाते हे महत्वाच. by स्पंदना
In reply to नमस्कार संजय साहेब by रणजित चितळे
व्यक्ती नसून स्थिती आहे केवढे छान वाक्य. असे जर बघीतले तर आपल्या बघण्याचा दृष्टीकोन बदलून जातो.तुम्हाला अत्यंत नेमका मुद्दा कळला! आभार.
बुद्ध ही स्थिती आहे हे लक्षात आलं की फक्त तीनच प्रश्न उरतात: एक, त्यानं सत्याचा शोध का घेतला, दोन, त्याला ज्ञान नक्की कशामुळे झालं आणि तीन, आपल्याला ज्ञान व्हावं म्हणून त्यानं कोणती प्रक्रिया सांगीतलीये.
धादांत दिशाभूल करणारे विचार. कारण वरील तीन प्रश्न व त्याची उत्तरे आत्मिक मार्गात असणाऱ्या आणी त्याहीपेक्षा किमान बुद्धाचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहीत असतात पण ते बुद्ध बनतातच असे नाही.
अगदी उद्याही अंबानीच्या बालकाचे बुद्धासारखे संगोपन केले व अचानक त्याच्या समोर वृद्धत्व आणी मृत्यू आला तरीही तो बुद्ध बनेल न्हवे याची खात्री तर नाहीच तर तो कदाचित त्या फँदातहि पडणार नाही कदाचित व्यसनी होईल कदाचित त्याला कसलाच फरक पाडणार नाही जीवनाचे एक वास्तव म्हणून तो सामान्यमाणसा स्तव जगेल व वृद्ध होऊन मारून जाईल...
म्हणूनच संतांची, शिकवण, मार्ग वा आयुष्यातील घटना अनुसरणे ही बाब कुठल्याही आत्मिक यशाची शाश्वती आजिबात नाही... हा अध्यात्माचा पहिला नियम होय.
मग असे काय शास्त्र / मार्ग आहे जे बुद्धाला बुद्ध, ओशोंला ओशो, अथवा संतांना संत बनवते ?
वाह मस्तच लिहिलंय आवडलं