मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बादशाही ऑम्लेट

चाफा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
बादशाही ऑम्लेट : साहित्य अंडी - २ कांदे - १ मध्यम आकाराचा आलंलसूण पेस्ट - १ चमचा मिरच्या - ५-६ बारीक चिरलेल्या सोया सॉस - १ चमचा चिलीसॉस ( ग्रीन ) - १ चमचा तेल - गरजेनुसार जिरं - चिमूटभर मोहरी - चिमुटभर मीठ - चवीपुरते कॄती : प्रथम अंडी एका भांड्यात फोडून घ्यावीत, त्यानंतर त्यात सोया सॉस व चिलीसॉस मिसळून ती व्यवस्थित फेटून घ्यावीत त्यानंतर एका लहान भांड्यात चमचाभर तेल टाकून त्यात बारीक चिरलेल्या मिरच्या, आलं लसूण पेस्ट व्यवस्थीत परतून घ्यावी ( मिश्रण जास्त घट्ट होता कामा नये ) मिरच्या व आलं लसूण पेस्ट व्यवस्थित परतल्यागेल्यावर त्यात जिरं व मोहरी टाकून गॅस बंद करावा जिरं मोहरी फुलून आल्या बरोबर ती फोडणी मघाशी फेटून घेतलेल्या अंड्यांच्या मिश्रणात टाकावी थोडावेळ ते मिश्रण थंड होऊन द्यावे. यात चवीनूसार मिठ टाकावे. नंतर पॅनवर चमचाभर तेल टाकून त्यावर हे मिश्रण ओतावे. . . यानंतर जे तयार होईल त्याला तुमचं काळीज खरंच सहन करू शकत असेल तर त्याला ऑम्लेट म्हणायला हरकत नाही. तटी. : ही पाककृती वाचून जर तुम्ही ऑम्लेट तयार करणारच असाल तर तुमची स्वयंपाकघरातली हुकूमशाही बाद होंण्याची पुर्ण खात्री असल्यानं याला `बाद' शाही ऑम्लेट म्हणता येईल. :D

वाचने 3063 वाचनखूण प्रतिक्रिया 7

कवितानागेश Sun, 12/23/2012 - 00:23
चायनीज पंजाबी कॉन्टीनेण्टल महाराष्ट्रियन ... सब मिलाके एक फटाफट नाश्ता लाव !! :D

पैसा Sun, 12/23/2012 - 08:30
मिपावर फटु ऑप्शनल नाही तर कम्पल्सरी आहे हे तुझ्यासारख्या जुन्या मिपाकराला माहिती नाही काय रे? सबब तुला बाद का करू नये याची कारणे दाखवा नोटीस बजावत आहे! :D सगळ्या प्रकारांची मिसळ करून केलेली पाकृ आवडली आहे. करून नक्की बघण्यात येईल. रिझल्ट आणि (असल्यास शिव्या) व्यनिद्वारे कळवू की इथेच?

निवांत पोपट Sun, 12/23/2012 - 12:50
जबरदस्त ! चकित करणारी पाककृती !गणपाभाउंची यांची नुसती आठवणच व्हावी, इतकेच नव्हे तर तुलना करण्याचा मोह व्हावा इतकी सकस आणि सरस पाककृती आहे ही . पार शेवटपर्यंत गुंगवून टाकलं .. फ़क्त शेवट अनपेक्षीत नसला तरी "चुकून" लिहील्या सारखा वाटला. पाककृती केल्यावर केली नसती तर फ़ार बरं झालं असतं असं वाटलं. पण जे झालं आहे ते चविष्ट नसलं तरी फ़ार पोष्टीक आहे हे नक्की.. मजा आली.. अरर्र.... प्रयोग ला लिहायचा प्रतिसाद इथे पडला वाटतं..:/ असू दे.. हा ही प्रयोगच आहे.. ;)

चाफा, पाकृ योग्य मोसमात मिळाली कारण आत्ता मेसापोटेमीयातील आमच्या कोंबडीच्या खुराड्यात आम्ही पाळलेला शहामृगाने नुकतेच कल अंडे दिले आहे. आता रोज त्या अंड्याची आणि शहामृगाची काळजी घ्या, ते अंडे शहामृगाकडून निट उबवले जाते आहे का नाही ह्याची चिंता करा ही खटपट वाचली. मी तुमच्या पाकृ आवडीने वाचत असतो. धन्यवाद.