भ्रमणगाथा-१ म्युनस्टर वारी
सहलीचा सविस्तर व सचित्र वृतांत
मिसळपाव जर्मनी कट्ट्याच्या निमित्ताने आम्ही एकत्र जमायचे ठरवले.आम्ही दोघं फ्रांकफुर्ट, केसु डार्मस्टाट, लिखाळ व त्यांची सौ. म्युनस्टर आणि विपिन डॉर्टमुंडला राहणारे.. ही मोट बांधायची कशी?आणि कुठे? शेवटी भूगोलतज्ज्ञांनी डॉर्टमुंड सोयीचे पडेल असा निर्णय दिला. त्याप्रमाणे शुक्रवारीच आम्ही दोघं आणि केसु विपिनकडे डॉर्टमुंडला डेरेदाखल झालो.डॉर्टमुंड ते म्युनस्टर अवघा तासाभराचा तर गाडीचा प्रवास, त्यामुळे शनिवारी सकाळी लिखाळकडे जायचा बेत आखला. त्यात आणखी आमच्या जर्मन आजीने म्युनस्टर पाहूनच या असा प्रेमाचा सल्ला दिला होता.
छोटेसे टुमदार गाव आणि तिथले विद्यापीठ म्हणून म्युनस्टर प्रसिध्द आहेच. सायकलींचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्या म्युनस्टरच्या मुख्य स्टेशनात ३०००च्या वर सायकली पार्क करायची व्यवस्था आहे. हॉलंडची सीमा इथून जवळ असल्याचा बहुदा हा परिणाम असावा. साडेनऊच्या सुमाराला आमची टोळी लिखाळच्या दारात हजर! आमच्या पैकी काही जण प्रत्यक्ष प्रथमच भेटत असले तरी औपचारिकपणाची झूल पहिल्या पाचेक मिनिटातच गळून पडली आणि वाफाळत्या चहाबरोबर खिदळणं सुरू झालं , जोडीला बुटरमिल्शकुकन होतंच आणि 'मिसळपावची ताजी तेज तर्रीही'! एवढ्या घाऊक प्रमाणात मराठी भाषक आणि तेही मिपाकर एकत्र आल्यावर मनसोक्त गप्पा रंगल्या आणि त्यातूनच भ्रमणमंडळाची सुपीक कल्पना निघाली. सौ.लिखाळांनी केलेल्या मटकीची उसळ,पोळ्या,भात,टोमॅटोचं अप्रतिम सार आणि गुलाबजामना (पाकासकट) न्याय देत पुढचे बेत सुरू झाले.
लिखाळच्या घराच्या मागे मोठ्ठाली शेतं आहेत,दोबाजूला हिरवीगार सावली असलेली पायवाट आणि मध्येच दिसणारे एखादे 'खेड्यामधले घर कौलारू'! त्या पायवाटेने बसच्या थांब्यावर जायला निघालो. तिथल्या शांततेला छेद देत आमचं खिदळणं चालूच होतं पण एका क्षणी मात्र सगळ्यांनाच ती शांत हिरवाई हवीशी वाटली. वार्याच्या एखाद्या मंद झुळूकेने होणारी पानांची सळसळ सोडली तर कसलाच आवाज नव्हता.ती शांतता वाचत असतानाच बस आली.
आ-से म्हणजे आ सरोवरापाशी पोहोचलो. समोर हंसे कलकलाट केला.. असे दॄश्य! अनेक काळ्याकरड्या पाणकोंबड्या,बदकांच्या घोळक्यात तो काळाभोर,लालबुंद चोचीचा,गुंजेच्या डोळ्यांचा राजहंस शोभून दिसत होता. (आधी राजहंस त्याच्या नावाप्रमाणेच रुबाबदार! त्यात काळा राजहंस पांढर्यापेक्षाही जास्त रुबाबदार दिसतो असं टोकिओत जेव्हा अगदी पहिल्यांदा काळा राजहंस पाहिला तेव्हाच मला वाटलं होतं त्याला आता इतरांकडूनही रुकार मिळाला.)त्या तळ्यात दूरवर एक प्लास्टीकचा भलामोठा हंस डोलताना दिसला. लिखाळने त्याची कहाणी सांगितली. ह्या खर्या राजहंसाची ती प्रेमिका आहे. जेव्हा तो प्लास्टिकचा हंस सरोवरातून काढून टाकला तेव्हा या प्रेमवीराने खाणेपिणे सोडले आणि तो झुरू लागला. ते पाहून परत तो प्लास्टीकचा हंस त्या तळ्यात सोडण्यात आला आणि एका शुभ्र हंसिनीलाही आणले.तीच आता त्याची प्रेमिका झाली आहे. त्या सार्या करड्या बदकांच्या कळपात ही राजबिंडी जोडी उठून दिसत होती. लगेचच 'कोचरेकरमास्तरांना' प्राणीमात्रांमध्ये वर्णभेद नसल्याची जाणीव झाली आणि त्यांनी तशी आपल्या डायरीत नोंद केली. सरोवराभोवतालच्या हिरवळीत बसून रहावं असा मोह फार होत होता पण ..त्या हिरवळीवरच्या भल्या थोरल्या गोलकांखाली आमची छबी काढली आणि पुढे निघालो.
कथीड्रलमधल्या काचांवरची रंगीत चित्रनक्षी प्रकाशात आणखीच उजळून निघाली होती. ती मनसोक्त पाहून आणि फोटो काढून मुख्य चौकात गेलो. पूर्वीच्या काळी जेव्हा दळणवळणाची फारशी साधने नव्हती तेव्हा पाठीवर सामान लादून गावोगाव मालाची विक्री करत हिंडणारे वस्तूविक्ये असत.अशाच एका वस्तूविक्याचा प्रातिनिधिक पुतळा पाहून राटहाऊसकडे निघालो.
राट हाऊस (टाउन हॉल) अर्थात आपल्या मामलेदार कचेरीसारखा कारभार जिथून चालतो ती इमारत इथे प्रत्येक गावातच असते आणि जुन्या, प्राचीन,ऐतिहासिक संदर्भ असलेल्या इमारतीत राट हाऊस वसलेले असते. फ्रांकफुर्ट मधले 'बोलोंगारो पलास्ट' म्हणजेच 'बोलोंगारो पॅलेस' मध्ये असलेले राट हाउस तिथे नेपोलियन एक रात्र राहिला होता हे मिरवत असते. इथल्या राट हाऊसलाही ऐतिहासिक संदर्भ आहेच.१४ व्या शतकातला हा भक्कम 'पीस ऑफ वेस्टफालिया' लक्ष वेधून घेतो तिथे असलेल्या पोलादी हातामुळे आणि त्या हातातली तलवार सांगत असते , कायद्याविरुध्द वागलात तर गाठ माझ्याशी आहे..
सेंट लांबार्ट चर्च च्या कळसाजवळचे तीन भलेमोठे पिंजरे कुतुहल तर वाढवतातच पण त्या पिंजर्यांमागचे कारण समजले की थरकाप होतो.लायडनच्या जॉन ह्या डच व्यक्तीने आणि त्याच्या सहकार्यांनी १६व्या शतकात तत्कालीन धर्मसत्तेविरूध्द बंड केले त्याची शिक्षा म्हणून त्याला आणि सहकार्यांना मारून पिंजर्यात ठेवले आणि ते पिंजरे लांबार्ट चर्चच्या वर बांधले.त्यांच्या मृत शरीरांचीही विटंबना झाली. ती तिथेच तशीच सडली,कुजली. पन्नासेक वर्षांनी त्या पिंजर्यातल्या अस्थी बाहेर काढल्या परंतु ते पिंजरे मात्र आजही तिथेच लटकलेले आहेत. धर्म आणि सत्तेचा हा खेळ फार जुना आणि सगळ्या जगभरच आहे हे पाहून मन सुन्न झाले. अजूनही त्यांच्या पुण्यतिथीला तेथे मेणबत्त्या लावून अभिवादन केले जाते. कदाचित जर्मनीत प्रोटेस्टंट पंथी जास्त असल्याचा हा परिणाम असावा.
म्युनस्टरच्या त्या दगडी रस्त्यांवरून हिंडताना वारंवार म्युनशनची (इंग्रज साहेबाच्या भाषेत म्युनिक) आठवण येत होती.वास्तविक म्युनशन दक्षिणेला,आल्प्सच्या कुशीत तर म्युनस्टर उत्तरेला! दक्षिण आणि उत्तर जर्मनीतल्या गावांमधल्या घरांची,रस्त्यांची रचना, भौगिलिक परिस्थितीही खूपच वेगळी असताना हे 'साम्य' वेगळे वाटले.तिथल्या गल्लीबोळातून थोडा वेळ निरुद्देश भटकलो तरी कुतुहल काही नवे दाखवत होतेच. घड्याळाचा काटा पुढे सरकताना डॉर्टमुंडला जाणार्या गाडीची आठवण करून देत होता. त्यामुळे नाइलाजाने स्टेशनच्या दिशेने चालू लागलो.
गाडीत बसतानाच केसुंनी "रात्री पावभाजी मी करणार.." असे जाहीर केले आणि विपिनच्या घरी पोहोचल्यावर आम्हाला दोघींना किचन मध्ये फिरकूही न देता त्यांनी ए वन पावभाजी केली.
अशा मस्त पावभाजीनंतर चॉकलेट आईसक्रीम खात उद्या सकाळी सहाची बस आहे,लवकर उठायला हवं असं म्हणत म्हणत एक वाजेपर्यंत गप्पा चालूच होत्या..
(ब्रुसेल्स वृतांत- पुढील भागात.)



( डावीकडून : स्वाती,सौ. लिखाळ, दिनेश, केशवसुमार, विपिन आणि लिखाळ )
जसं आपल्या गोव्यातल्या कोणत्याही देवळापुढे तळं आणि दीपमाळ असतेच असते तसं युरोपमधल्या कोणत्याही गावात चर्च,कथीड्रलच्या प्राचीन इमारती,त्यात कोरलेली प्रस्तरचित्रे आणि काचांवरचे नक्षीकाम असतेच असते.पण तरीही प्रत्येक ठिकाणचा वेगळेपणा,तिथल्या चर्चमधली शांतता अनुभवावीशी वाटते.दुसर्या महायुध्दात संपूर्ण उद्ध्वस्थ झाल्यावर कोणाला त्या पडझडीची शंकाही येऊ नये इतकं बेमालूम जोडकाम जवळजवळ सर्वच ठिकाणी केलं आहे, कलोनच्या कथीड्रलमध्ये,म्युनशनच्या चर्चमध्ये आणि इथल्या सेंट पॉल कथीड्रलमध्येही ! ह्या कथीड्रलचे अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे इस. १४०८ पासूनचे आजही चालू असणारे 'ऍस्ट्रॉनॉमिकल क्लॉक'( खगोलशास्त्रीय घड्याळ?).प्राचीन काळापासून जर्मन तंत्रज्ञान किती प्रगत होते ह्याची साक्ष म्हणजे हे घड्याळ आहे.



वाचने
20459
वाचनखूण
प्रतिक्रिया
43
आयला मजा आहे राव
गाथा आवडली.
In reply to गाथा आवडली. by बेसनलाडू
+१
भ्रमणगाथा छान!
धर्म आणि सत्तेचा हा खेळ
In reply to धर्म आणि सत्तेचा हा खेळ by प्रियाली
परंतु ते
In reply to धर्म आणि सत्तेचा हा खेळ by प्रियाली
कळवतो !!
आवडला
आवडला
स्वातीताई..
In reply to स्वातीताई.. by प्राजु
ह्म्म!!
In reply to ह्म्म!! by केशवसुमार
केशव की विनय?
खूप वाट
In reply to खूप वाट by ऋषिकेश
सांगतो.
उत्तम वृत्तांत !
In reply to उत्तम वृत्तांत ! by मुक्तसुनीत
एकदम बरोब्बर
सर्व
मस्त च
वृत्तांत
सचित्र
मस्त
मस्त....
भ्रमणगाथा
व्वा !!!
मिपाच्या
In reply to मिपाच्या by विसोबा खेचर
अरे..ऑफकोर्स..
स्वाती
है शाब्बास!
अर्रे वा !
In reply to अर्रे वा ! by लिखाळ
जबरा...
In reply to अर्रे वा ! by लिखाळ
मस्त
जर्मन मिपा कंपनी.
In reply to जर्मन मिपा कंपनी. by रामदास
ह्म्म!!
छान
In reply to छान by वैद्य (verified= न पडताळणी केलेला)
ह्म्म!!
सुं द र
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
लेख आणि फोटो
लै भारी!
वा!!
स्वातीताई,
ताई..
आभार