फलाफील - शवर्मा
१ वाडगा काबुली चणे (रात्रभर भिजवलेले.)
१ मोठा कांदा.
२ हिरव्या मिरच्या.
बचकाभर पार्सली.
२ मोठे चमचे मैदा.
१ मोठा चमचा भाजलेल्या जीर्याची पुड.
१ मोठा चमचा काळीमिरी पुड.
मीठ चवी नुसार.
तळण्यासाठी तेल.
कृती :
काबुली चणे, कांदा, मिरच्या, पार्सली सगळं फुडप्रोसेसरमध्ये घालुन भरड वाटावं. (फुडप्रोसेसर नसल्यास मिक्सर ही चालेल पण अगदिच पीठ होणार नाही याची काळजी घ्यावी.)
नंतर त्यात मैदा, जीरे-काळिमीरी पुड आणि मीठ टाकुन एकत्र करावं.
तयार मिश्रणाचे लहान लहान गोळे करावे. मंद आचेवर तेलात सोनेरी रंगावर तळुन घ्यावे.
In reply to जबरी. by प्रचेतस
In reply to कल्याणीनगर येथे मरकेश नामक by बॅटमॅन
In reply to जाउयात खायला राव. by प्रचेतस
In reply to जरूर, पण फालाफेल सोडले तर by बॅटमॅन
In reply to अरे रे रे रे.. by मोदक
In reply to ही ही हा हा हा हा......खोदकाम by बॅटमॅन
In reply to तो स्थितप्रज्ञ होय? by Nile
In reply to शवार्मा आणि फिलाफिल. by प्रभाकर पेठकर
फलाफिल ही पाककृती आवडली. धन्यवाद गणपाभाऊ..
In reply to शवार्मा आणि फिलाफिल. by प्रभाकर पेठकर
'शवार्मा' हा मांसाहारी पदार्थ असून त्यात चिकन किंवा मटण एका उभ्या सळईवर लावून भाजलं जातं आणि त्याचा सर्वात वरचा थर खरपूस भाजला गेला की मोठ्या सुर्याने तासला जातो आणि ते तासलेले मांस जरा बारीक करुन पीटा ब्रेड (खाबुस्)मध्ये इतर जिन्नसांबरोबर भरून त्याची गुंढाळी करून ते सँडविच म्हणून दिले जाते.अगदी बरोबर काका. खरतर मी आधी चीकन शवार्माचीच पाकृ टाकणार होतो पण म्हटलं अलीकडेच एका कोंबडीला सद्गती देउन झाली आहे, तेव्हा थोडं थांबावं. ;) खाली गविने दाखवल्या प्रमाणे शेगडी घरी घेणं शक्य नाही आणि माझ्या सारख्यांना शवार्मा आसपास उपलब्ध नाही. तेव्हा घरच्या घरी करायचा झाल्यास कसा करता येईल याचा प्रयोग केलाय. लुक्स नसले तरी चव उत्तम जमली होती. मिपाकरांच्या पसंतीला उतरतो का? ते कळेल लवकरच. :)
फिलाफिल किंवा शवार्माची खरी चव उपभोगायची असेल तर बटाटा चिप्स टाळाव्यात असे माझे व्यक्तिगत 'चव-मत' आहे.अस आहे होय. आजवर जितके वेळा खाल्लाय दर वेळी आत बटाटा होताच. (बहुतेक आपल्या कोंबडी/मटण रस्स्यामध्ये असतो तसा पुरवठा म्हणुन बटाटा टाकत असतील लेकाचे. ;)) मे बी नेक्स्ट टाईम असही करुन पाहीन.
In reply to 'शवार्मा' हा मांसाहारी पदार्थ by गणपा
गविने दाखवल्या प्रमाणे शेगडी घरी घेणं शक्य नाहीनो प्रॉब्लेम. अरे, ती उभी शेगडी म्हणजे 'स्ट्रिट फुड' चा 'शो' आहे. बाकी आपल्या बार्बिक्यूवरही अगदी तस्साच परिणाम साधता येईल. हाडे विरहीत चिकन मंद आंचेवर क्रिस्प शिजवणे महत्त्वाचे.
In reply to बार्बिक्यू... by प्रभाकर पेठकर
In reply to त्या मधल्या शाफ्टच्या प्रचंड by गवि
In reply to गवि मी by इरसाल
In reply to त्याचा स्पीड मधेच हळू आणि by गवि
In reply to त्या मधल्या शाफ्टच्या प्रचंड by गवि
मधल्या शाफ्टच्या प्रचंड वेगाने गरागरा फिरत राहण्याने ते चिकन करपत नाही असं माझं मत होतं.माझ्या बघण्यातली सर्व शवार्मा शाफ्ट हे हाताने हळूवारपणे, आपल्या मर्जीनुसार, चिकनचा वरचा थर शिजला की, फिरवायचे होते. पुण्यात मी सिम्बॉयसिस कॉलेजचे कँटीन चालवित असताना स्वत: विकत घेतलेले शवार्मा मशीनही हाताने फिरवायचे होते. असो. कदाचित, बाजारात दोन वेगवेगळी यंत्रे उपलब्ध असावित.
In reply to मॅन्यूअल... by प्रभाकर पेठकर
माझ्या बघण्यातली सर्व शवार्मा शाफ्ट हे हाताने हळूवारपणे, आपल्या मर्जीनुसार, चिकनचा वरचा थर शिजला की, फिरवायचे होते.असेच म्हणतो.
कदाचित, बाजारात दोन वेगवेगळी यंत्रे उपलब्ध असावित.शक्यता नाकारता येत नाही.
In reply to तोंपासु पाकृ by सोत्रि
In reply to छान! by स्वाती दिनेश
In reply to सर्व एकच. by प्रभाकर पेठकर
मस्त !