मध्यपुर्वेत असताना (तेव्हाच्या)आम्हा बॅचलर लोकांच मधल्या वेळेतलं खाणं म्हणजे शवर्मा(शोरमा). स्वस्त आणि मस्त. तेव्हा व्हेज शवर्माच्या वाटेला जरी फारसा जात नसलो तरी मला फलाफील फार आवडायचे. नुसते फलाफील आणि सोबतीला डीप म्हनुन हमुस बस, एका बैठकीत ७-८ रिचवले की पोटभरू काम व्हायचं.
साहित्य :
ताहिनी सॉससाठी.
अर्धी वाटी ताहिनी.(तिळाची पेस्ट)
लिंबाचा रस.
३-४ लसणाच्या पाकळ्या.
थोडीशी पार्सली.
मीठ चवी नुसार.
फलाफीलसाठी.
१ वाडगा काबुली चणे (रात्रभर भिजवलेले.)
१ मोठा कांदा.
२ हिरव्या मिरच्या.
बचकाभर पार्सली.
२ मोठे चमचे मैदा.
१ मोठा चमचा भाजलेल्या जीर्याची पुड.
१ मोठा चमचा काळीमिरी पुड.
मीठ चवी नुसार.
तळण्यासाठी तेल.
कृती :
एका भांड्यात ताहिनी आणि लिंबाचा रस फेटुन घ्यावा. प्रवाहीपणासाठी गरजे नुसार पाणी घालावे.
लसुण आणि पार्सली बारीक चिरुन टाकावे. चवी प्रमाणे मीठ घालावं
हा झाला सॉस तयार.
आता फलाफील.
काबुली चणे, कांदा, मिरच्या, पार्सली सगळं फुडप्रोसेसरमध्ये घालुन भरड वाटावं. (फुडप्रोसेसर नसल्यास मिक्सर ही चालेल पण अगदिच पीठ होणार नाही याची काळजी घ्यावी.)
नंतर त्यात मैदा, जीरे-काळिमीरी पुड आणि मीठ टाकुन एकत्र करावं.
तयार मिश्रणाचे लहान लहान गोळे करावे. मंद आचेवर तेलात सोनेरी रंगावर तळुन घ्यावे.
हे फलाफील नुसतेच हमूस सोबत चापता येतील.
जर घरात खूबूस/पीटा ब्रेड असेल तर व्हेज शवर्मा बनवायला वेळ नाही लागायचा.
शवर्मा :
खूबूस / पीटा ब्रेड.
फलाफील.
लेट्युस, टॉमेटो चिरलेले.
ताहिनी सॉस.
फ्रेंच फ्राईज.
खूबूस / पीटा ब्रेड अर्धवट उघडुन घ्यावा. २-३ फलाफील कुस्करुन घ्यावे. टॉमेटो, लेट्युस फ्रेंच फ्राईजचे तुकडे करुन ते घालावे. वरुन ताहिनी सॉस घालावा आणि त्याचा रोल करुन सर्व्ह करावा.
हे गरम गरम असताना खाण्यातच मजा.
१ वाडगा काबुली चणे (रात्रभर भिजवलेले.)
१ मोठा कांदा.
२ हिरव्या मिरच्या.
बचकाभर पार्सली.
२ मोठे चमचे मैदा.
१ मोठा चमचा भाजलेल्या जीर्याची पुड.
१ मोठा चमचा काळीमिरी पुड.
मीठ चवी नुसार.
तळण्यासाठी तेल.
कृती :
काबुली चणे, कांदा, मिरच्या, पार्सली सगळं फुडप्रोसेसरमध्ये घालुन भरड वाटावं. (फुडप्रोसेसर नसल्यास मिक्सर ही चालेल पण अगदिच पीठ होणार नाही याची काळजी घ्यावी.)
नंतर त्यात मैदा, जीरे-काळिमीरी पुड आणि मीठ टाकुन एकत्र करावं.
तयार मिश्रणाचे लहान लहान गोळे करावे. मंद आचेवर तेलात सोनेरी रंगावर तळुन घ्यावे.
वाचने
27688
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त !
वा... खुपच छान.. मला फलाफल हा
मस्त
वाचले
आयला गणपाभौ तुम्ही पट्टीचे
खूपच छान !
ताहिनी सॉस पांढरा असल्याने
जबरी.
कल्याणीनगर येथे मरकेश नामक
In reply to जबरी. by प्रचेतस
जाउयात खायला राव.
In reply to कल्याणीनगर येथे मरकेश नामक by बॅटमॅन
जरूर, पण फालाफेल सोडले तर
In reply to जाउयात खायला राव. by प्रचेतस
अरे रे रे रे..
In reply to जरूर, पण फालाफेल सोडले तर by बॅटमॅन
ही ही हा हा हा हा......खोदकाम
In reply to अरे रे रे रे.. by मोदक
तो स्थितप्रज्ञ होय?
In reply to ही ही हा हा हा हा......खोदकाम by बॅटमॅन
कुलकर्ण्यांचा होय, मला तर
In reply to तो स्थितप्रज्ञ होय? by Nile
आहाहाहा
बोंबला....
मस्त रे! फलाफल आणि हमस हे एका
शवार्मा आणि फिलाफिल.
गोव्याला कोळवा बीचवर
In reply to शवार्मा आणि फिलाफिल. by प्रभाकर पेठकर
'शवार्मा' हा मांसाहारी पदार्थ
In reply to शवार्मा आणि फिलाफिल. by प्रभाकर पेठकर
बार्बिक्यू...
In reply to 'शवार्मा' हा मांसाहारी पदार्थ by गणपा
त्या मधल्या शाफ्टच्या प्रचंड
In reply to बार्बिक्यू... by प्रभाकर पेठकर
गवि मी
In reply to त्या मधल्या शाफ्टच्या प्रचंड by गवि
त्याचा स्पीड मधेच हळू आणि
In reply to गवि मी by इरसाल
गवि
In reply to त्याचा स्पीड मधेच हळू आणि by गवि
मॅन्यूअल...
In reply to त्या मधल्या शाफ्टच्या प्रचंड by गवि
+१
In reply to मॅन्यूअल... by प्रभाकर पेठकर
अहो या फलाफलवर तर आम्ही दिवस
हुच्च !
नेहमीप्रमाणेच झकास!
अरे...... ये तो हमारे
तोंपासु पाकृ
पुढच्या जन्माच्या बाबतीत
In reply to तोंपासु पाकृ by सोत्रि
छान!
सर्व एकच.
In reply to छान! by स्वाती दिनेश
ड्योनर केबाप
In reply to सर्व एकच. by प्रभाकर पेठकर
नेहमीप्रमाणेच छान.
उसात फलफल राईस खाऊन अनेक दिवस
धागा वाचला. फोटो पाहिले.
आज माझ्या नवर्याच्या हापिसात
सध्या रोजच खायचा योग आहे.
वाह!
नेहमीप्रमाणेच एक रंगतदार
चान चान
अहाहा!!मस्त फोटू!