मसाला मसूर डाळ
अख्खी मसूर डाळ ५-६ तास भिजवून ठेवा. त्याला मोड आणले तरी चालतील. नंतर ते कोरडे करून घ्या.एका काढीत तेल गरम करून त्यात मसूर तळून घ्या.दाणे दाबून पहा. क्रिस्पी झाले कि काढा.लगेच काळ मीठ आणि जिरेपूड लावून घ्या.प्रत्येक वेळी डाळ तळून काढली कि मीठ आणि जिरपूड लावून घ्या. तरच मीठ आणि जिरेपूड सगळीकडे लागते.आवडत असल्यास तिखट पण घालता येईल .मसाला मसूर डाळ तयार.झटपट अन खमंग.हि डाळ चिवडा,भेळ मध्ये छान लागते.
तळताना तेल उडते तेव्हा जरा जपूनच तळा.:)
वाचने
8529
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
अहो अशी डाळ जरा दुसर्याच बाबतीत छान लागते.
(विंगेमध्ये ओरडून) कोण आहे रे तिकडे? माझा प्याला रिकामा झालाय दिसत नाही का? ;)
ह्म्म ..छान लागते ही डाळ .आई बनवायची घरी .मला नाहि बनवता येत .
ती छान बनवते .
In reply to ह्म्म ..छान लागते ही डाळ .आई by जेनी...
मलाही असच वाटायचं.पण कीने मी ना दाल माखनी बनवताना जरा जास्त भिजवली डाळ आणि थोडीशी करून पहिली. मस्त झाली. चणा दाल पण अशीच करता येते.ती पण मस्त लागते. आमच्याकडे दिवाळीत हे दोन नमकीन ठरलेलेच असतात माझ्यासाठी.
उत्तर भारतात दालमोठ हा नमकीन पदार्थ सर्व हल्वायांकडे मिळतो. ह्याचे घटक काय आहेत आणि ह्यात व मसाला मसूर दाल यांच्यात काय फरक आहे याचा खुलासा केल्यास बरे होईल.
In reply to दालमोठ by रमेश आठवले
दालमोठ हा प्रकार माहित नाही पण गूगल वर पाहिल्यावर असं वाटतंय कि तेच हे आहे. त्यात चण्याच्या आणि मसूरच्या डाळीवर बारीक शेव,आमचूर टाकून देतात असावेत.
In reply to दालमोठ हा प्रकार माहित नाही by प्रियाकूल
गूगल वर शोध घेतल्यावर दालमोठ पाक कृतीचा हिंदी भाषेत खालील धागा सापडला.
http://nishamadhulika.com/snacks/chana-dal-namkeen-recipe.html
????????????????////
आमच्या आवडत्या " डाळ " या प्रकारात फोटो टाकायची सक्ती आहे हे माहीत नसावे , याबद्दल आमच्या स्वता बद्दल भयानक खेद वाटतो आहे ...
असो ..पुढल्या वेळी " बटाटा - मसुर दाल " बनवुन सुड घेण्यात येईल !
In reply to ????????????????//// by सुहास..
त्या म्हणतायत ती डिप फ्राय मसुर (डाळ) वायली आणि तु म्हणतोय ती दाल वायली असावी असा माझा होरा आहे.
In reply to ????????????????//// by सुहास..
करा करा..मी पण तुम्ही दिलेली रेसिपी करून पाहीन आणि रीसूड घेईन.हाहाहा.;)
बादवे,फोटो टाक लालाव..गूगल वरचा आहे. मी केलेली डाळ संपली.
![]() |
| From maze khadyache prayog |
In reply to करा करा..मी पण तुम्ही दिलेली by प्रियाकूल
हिहिहि !
असेच काहीसे हो शेफ !!
पण तरी ही एक प्रश्न ??
फोटु कुटाय
In reply to असेच काहीसे हो शेफ !! by सुहास..
ए ते आमाला काय विचारते?
प्रियाकुल याना विचार ने.

हि डाळ चिवडा,भेळ मध्ये छान लागते.??