नुकताच एक ब्लॉग वाचण्यात आला. ह्या ब्लॉग मध्ये अतिशय वैचारिक , पुरोगामी व बहुजनहिताय लेखन केलेले आहे. अनेक तथाकथित मान्यवरांची धोतरे , तुमानी टराटरा फाडण्यात आलेली आहेत. त्यामध्ये कुसुमाग्रज - ज्यांना साहित्य चोरी करता ज्ञानपीठ देण्यात आले त्यांचा समावेश आहे. आता कुसुमाग्रजांवर / त्यांच्या नाटकावर शेक्पिअरचा प्रभाव होता हे स्वतः तात्यासाहेब म्हणायचे ! पण हया ब्लॉग च्या विदुषींनी वि.वा. शिरवाडकरांनी आपल्या “नटसम्राट” हया नाटकात कशी शेक्पिअरची वाक्ये उचलली आहेत ? त्याचा अती सखोल अभ्यास केला आहे. सर्व सामान्य वाचकास हे संशोधन झेपणारे नाही. म्हणून वाचण्या पासून मी परावृत्त त्यांना करत आहे व ब्लॉग चा संदर्भ जाहीर पणे देत नाही आहे. कुसुमाग्रज ह्यांचे असे वस्त्र हरण व्हायलाच हवे होते आणि ते झाले ह्याचा अतीव आनंद समग्र नाशिक नगरी प्रमाणे मलाही होतो आहे.
अती आनंदाची गोष्ट म्हणजे ह्याच विदुषींनी केलेले पु.ल. देशपांडे ह्यांच्या लेखनाची समिक्षा ! जवळ जवळ त्यांची हजामत !! “महाराष्ट्रचे लाडके व्यक्तिमत्व” असे ज्यांना त्यांचे पगारी भाट म्हणतात तेंव्हा आम्हाला अती दु:ख होते. हया विदूषकाला महाराष्ट्राने उगाचच चढवून ठेवला होता. अहो ह्यानी कधी आपले हात माती मध्ये काळे केले नाहीत , एकाही साखर कारखान्याचे जे मतदारही नाहीत व ज्यांनी कधीही शाहू महाराजांना मानले नाही (उलट एक धिप्पाड माणूस अशी त्यांची अवहेलनाच केली ) त्याला का म्हणून “महाराष्ट्रचे लाडके व्यक्तिमत्व” म्हणायचे ? हा सगळा सुनिता बाईंच्या (ह्याच त्या ज्यांनी मुक्तांगणला देणगी देवून विशिष्ठ लोकांना व्यसनांच्या गर्तेत फेकले ) “गोबेल्स नीतीचा” भाग होता.
आज हा ब्लॉग वाचल्यावर माझे डोळे ज्यांनी उघडले त्या ब्लॉग कर्तीचे कसे आभार मानावेत हेच सुचत नाही आहे !
मी ही एके काळी पापी होतो. पु.ल. चे ( ह्याची गुंडगिरी व दडपशाही इतकी होती की लोक त्याला खाजगीत भाई म्हणत असत ) लेखन मी अधाश्या सारखे वाचत असे. त्याच्या लेखनाने माझी अभिरुची इतकी बिघडवली की विचारून सोय नाही. हया बिघडलेल्या अभिरुची ची ३ उदाहरणे देवून मी माझ्या संशोधनाचा पहिला सर्ग संपवणार आहे.
१. हया पी.एल. च्या अतीसामान्य लेखना मुळे मला इतर विनोदी लेखकांचे विनोद आवडेनासे झाले होते. माझ्या आयुष्यतील आनंदच ह्याने काढून घेतला होता. शक्ती कपूर , कदर खान सारखे विनोदी नट जेंव्हा हसवून हसवून प्रेक्षकांच्या पोटात दुखावत असत तेंव्हा मी कसनुसा होत असे . शक्ती कपूर , कादरखान , ह्यांचे उच्च , दर्जेदार विनोद न समजण्याची माझी सुमार बुद्धी ! आज आठवून हसू येते . हा दोष हया साल्या पिल्याचाच !
२. पिल्या स्वतःला मोठा संगीतकार समजायचा. नुसते पेटी वाजवून काय कोणी संगीतकार होते. पण हा ही त्या पुणेकरांचा कंपूबाजपणा ! ज्या पुणेकरांनी कधी रेड्याचे रेकणे ऐकलेले नाही , त्यांचा हा संगीतकार ! माझी संगीताची जाण ह्याच्या लेखना मुळे बिघडली. बांगो , बांगो , बांगो सारख्या गाण्यावर कुले वाकडे करायचे सोडून कानावर हात ठेवण्याचा माझ्या करंटेपणाला “हाच” xxx जबाबदार. ( पु.ल. इतक्या घाण शिव्या देत असे वर xxx छापत असे – ते परत केंव्हातरी ) संगीत भूषण भप्पी लाहिरी , संगीतमार्तंड अन्नू मलिक ह्यांचे संगीत मला कधी झेपलेच नाही. आता मी संस्कृती वस्त्र सोडले आहे म्हणून मी खूप नागडा आहे. सुखी आहे. “दिल गार्डन गार्डन हो गया” सारख्या गाण्याचा परम आनंद घेता येतो.
३. हयाच्या हलक्या व प्रतिभाशून्य लेखनाने माझी वाचनाची आवड बिघडवून टाकली. नव साहित्य व नव कविता हयाला कधीही जमली नाही. हया प्रतीगाम्याला कायम पुण्याचे जोशीच दिसले. रामोशी नाही दिसले ! इतके टोकदार नव साहित्य मराठी मध्ये येत होते आणि मी मात्र नस्ती उठाठेव करत होतो. ह्याचाच लेखनाने माझ्या मनात नवसाहित्याची घृणा निर्माण झाली . त्याची भरपाई म्हणून ताबडतोप त्या पुणेकराची मक्का असलेल्या नारायणपेठेचे नामकरण तातडीने “नानू सरंजामे “ पेठ असे करण्यात यावे ही मागणी मी हया संशोधनखंडाच्या अखेरीस करीत आहे. पु.ल. च्या लेखनाने बहकलेले त्याला भरघोस पाठिंबा देतीलच.
मला माहित आहे की माझ्या सारखेच अनेक पु.ल.ग्रस्त आज समाजात लाजिरवाणे जीणे जगत आहेत. पण मित्रानो घाबरू नका. संघटीत व्हा.
वेळ परिवर्तनाची आहे , प्रबोधनाची आहे , प्रवार्तानाची आहे , प्रतिक्रियेची आहे ,प्रसावायची आहे आणि प्रातर्विधीची आहे . आपला हुंकार जोरात भरा. बाहेर येवू द्या सगळी घाण तरच समाज ठेवेल तुमची जाण !
जय रेडे-स्वर !
वाचने
28964
प्रतिक्रिया
72
मिसळपाव
प्रतिक्रिया
वेळ परिवर्तनाची आहे ,
कोणीतरी yz काहीतरी ब्लॉग
शब्दा शब्दा गणिक उपरोध ठासुन
गणपा शेट..
बिडंबन करताना दुसर्यावर चिखल
In reply to गणपा शेट.. by तर्री
नाही हो ! चिखल नाही उडवायचा !
In reply to बिडंबन करताना दुसर्यावर चिखल by गणपा
सदर धागा वाचून
संदर्भ द्या
+१
In reply to संदर्भ द्या by आदिजोशी
आदिजी !
In reply to संदर्भ द्या by आदिजोशी
कृपया हा धागा उडवता येईल का?
सहमत.
In reply to कृपया हा धागा उडवता येईल का? by उदय के'सागर
हे घ्या दुवा!
लोकांकडे खरच खूखूखूखूखूखूखूपच
In reply to हे घ्या दुवा! by पांथस्थ
हाहाहाहाहा
In reply to हे घ्या दुवा! by पांथस्थ
हा हा हा!!! पहिल्या वाचनाच्या
In reply to हाहाहाहाहा by आदिजोशी
केवळ अनुल्लेखाने मारण्याचा विषय नाही
In reply to हे घ्या दुवा! by पांथस्थ
दुर्लक्ष करा...
ब्लोग वाचला....
खुप वाईट वाट्ल............
पहिलीच ओळ "कोणाही जीवाचा न
अश्क्य मुर्ख बै आहे हि अनिता
अल्झाईमरचा विकार ?
@पांथस्थ@,
ब्लॉग काही क्षण पाहिला
कीव आली या बाईच्या अकलेवर!!
पांथस्थ, क्लिकली ओ ती लिंक
तो ब्लॉग
बिग्रेडी लोकांमध्ये चार बुक
ह्या लोकांना फक्त अकलेचे तारे
बाई विचारवंत असाव्यात की काय
धागाकर्त्याने छान लिहिले
धागाकर्त्याने छान लिहिले
अरेरे
तसा उद्देश नसला तरी....
In reply to अरेरे by हुप्प्या
पेठकर काका त्यांनी फक्त
In reply to तसा उद्देश नसला तरी.... by प्रभाकर पेठकर
व्यक्तिगत निरोप.
In reply to पेठकर काका त्यांनी फक्त by गणामास्तर
कोण ती बाई अन कितीक जण तिच्या
ब्ळॉग वाचुन मला मराठी
ज्याना अन्नुलेखन्नी मारायला
-
In reply to ज्याना अन्नुलेखन्नी मारायला by माझीही शॅम्पेन
संपादक मंडळानी झोपा
In reply to ज्याना अन्नुलेखन्नी मारायला by माझीही शॅम्पेन
व्यक्ती तितक्या प्रकृती
In reply to संपादक मंडळानी झोपा by गणपा
संपादक मंडळानी झोपा
In reply to ज्याना अन्नुलेखन्नी मारायला by माझीही शॅम्पेन
कै च्या कै .. इथे हा लेख
In reply to संपादक मंडळानी झोपा by रेवती
या ब्लॉगचे ठाऊक नाही. मात्र
नावं अन लेखन सांगा. आम्ही
In reply to या ब्लॉगचे ठाऊक नाही. मात्र by ग्रेटथिन्कर
शिल्पा ब ,आपण
मी व्यक्तीमहात्म्यवादी आहे का
In reply to शिल्पा ब ,आपण by ग्रेटथिन्कर
ग्रेट थिंकर
In reply to शिल्पा ब ,आपण by ग्रेटथिन्कर
निनाद, मराठी लेखक आंग्ल
In reply to ग्रेट थिंकर by निनाद मुक्काम …
थिंकर साहेब
In reply to निनाद, मराठी लेखक आंग्ल by ग्रेटथिन्कर
Propaganda
कमॉन
हे कथित विडंबन आणि
काय राव काहीही वाचून जिवाला
अरे पण गीतकार तर 'गदिमा' आहेत
हा हा हा
In reply to अरे पण गीतकार तर 'गदिमा' आहेत by मनीम्याऊ
ते सुद्धा .... ! असो .
In reply to अरे पण गीतकार तर 'गदिमा' आहेत by मनीम्याऊ
उप्प्प्प्स्स्स्स्स्स
In reply to ते सुद्धा .... ! असो . by sagarpdy
माझ्या संग्रही पु.लं.ची अनेक
मिपा आणि अपाविम
ही बघा ब्रिगेडजंती मुक्ताफळे.
असहमत !
In reply to ही बघा ब्रिगेडजंती मुक्ताफळे. by बॅटमॅन
आरक्षन
In reply to असहमत ! by परिकथेतील राजकुमार
संपादक : सहज आठवलेले : शिंदे,
In reply to असहमत ! by परिकथेतील राजकुमार
लक्ष देऊ नका म्हणणाऱ्यांसाठी...
काही वादळ वगैरे नाहीये.. उगाच
In reply to लक्ष देऊ नका म्हणणाऱ्यांसाठी... by ॐकार केळकर
अगदी बरोबर बाळ-राव.
अलिकडेच या बाइने(?) वाचकांचा
असली मंडळी जगाचा निरोप घेतील
In reply to अलिकडेच या बाइने(?) वाचकांचा by आशु जोग
महाविनोदी ब्लॉग आहे तो. मी