मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

साय

लीलाधर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
साय ताजी ताजी हाय दूधावरची साय, ताजी ताजी हाय दूधावरची साय ! दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ? गोर्‍या गोर्‍या वाहिनीची साईसारखी काया, साईसारखी काया तीची वडरुपी छाया, वडरुपी छायेत करील मातृरुपी माया ! सांग कधी आणतोस अशी वहिनी भाऊराया !! गोर्‍या गोर्‍या वहिनीची वाजत गाजत काढेन वरात, कधी घेउन येशील सांग वहिनीला घरात! वहिनी येता घरी मिळेल ताजी ताजी साय, दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ? ताजी ताजी हाय दूधावरची साय, ताजी ताजी हाय दूधावरची साय ! दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ?

वाचने 54510 वाचनखूण प्रतिक्रिया 151

गवि Wed, 09/12/2012 - 14:57
छान छान.. सायीसारखी काया चांगली पण "वड"रुपी छाया? आँ? अंमळ मोठ्ठाड झाली का उपमा? ..अरेंज्ड करत असल्यास जरा हलके बघून घेणे.. ( हे तुम्हाला नाही, दादाला उद्देशून..)

In reply to by स्पा

गवि Wed, 09/12/2012 - 15:06
भावाचं लक्ष सायीखेरीज अन्यत्र गुंतलेलं राहिल्याने फ्रीजमधली सर्व साय हा एकटा खाऊ शकेल.. असं असेल काहीतरी.. तुला रे मेल्या कशाला नसत्या शंका.. वशाड मेलो..

५० फक्त Wed, 09/12/2012 - 15:07
अच्छा तर तुमच्याकडे हायरारकी चा वांधा आहे का ? दादाचं झाल्याशिवाय तुमचं नाही असं आहे तर, आम्हाला वाटलं की काही वेगळीच अडचण आहे की काय, असो शुभेच्छा.

......................................... गोर्‍या गोर्‍या वाहिनीची साईसारखी काया, साईसारखी काया तीची वडरुपी छाया,>>> ह्हा ह्हा ह्हा ....! च.चा.ली..ला-धरा..! बर्‍याच महिन्यांनी आलास आणी काय खमंग जिल्बी टाकलीस रे...! अंतर्मन विडंबन विडंबन ओरडतय... काय करू रे.... ???????????????????????????

पैसा Wed, 09/12/2012 - 17:35
लहान मुलाच्या भावना छान व्यक्त झाल्यात हो, अर्थातच काही प्रश्ण आणि कमेंटा आहेतच. १. आता तुमच्याकडे दूध आणले जात नाही का? तापवायला गॅस नाही का? २. वहिनी आल्यानंतर ती सायीचे विरजण करून दही आणि लोणी करेल. तुम्हाला साय मिळायचे चान्सेस फार कमी. ३. वहिनी माया करेलच हे कशावरून? बघून ठेवली आहे का? ४. स्पा, सूड, गवि, ५० फक्त यांच्याशी अर्थातच बाडिस. ५. वल्लीने विचारलेला प्रश्न पडला होता पण मला पण दुष्ट ही पदवी मिळायच्या भीतीने गप्प बसायचे ठरवले आहे. ६. "दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ?" हा प्रश्न का पडला? दादाने तिला आधीच गायब केली आहे का? आणखी प्रश्ण यांची उत्तरे मिळाल्यानंतर.

इरसाल Wed, 09/12/2012 - 17:39
प्रश्न विचारता ब्वॉ तुम्ही ? पैसीण प्रश्नकर्ते

ज्ञानराम गुरुवार, 09/13/2012 - 10:33
गोर्‍या गोर्‍या वहिनीची वाजत गाजत काढेन वरात, ( गोर्‍या गोर्‍या रंगाची गाय आणू घरात !!) कधी घेउन येशील सांग वहिनीला घरात! (कधी घेऊन येशील रे हम्माला घरात? ) वहिनी येता घरी मिळेल ताजी ताजी साय, (गाय येता घरी मिळेल ताजी ताजी साय ....) दादा माझी होणारी वहिनी रे कुठाय ? ( दादा ,दु दु देणारी हम्मा कुठाय?? ) अस लिहा हव तर..... विडंबन येऊद्यात आत्मा अत्रुप्त आहे वाचायला...

In reply to by ज्ञानराम

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 09/13/2012 - 10:52
@विडंबन येऊद्यात आत्मा अत्रुप्त आहे वाचायला...>>> आणी आत्मा अत्रुप्त आहे,तुंम्ही खोचक प्रतिसाद दिलात,तर तुंम्हाला भसकन टोचायला आत्मा मेरा नाम

ज्ञानराम गुरुवार, 09/13/2012 - 11:03
@विडंबन येऊद्यात आत्मा अत्रुप्त आहे वाचायला...>>> आणी आत्मा अत्रुप्त आहे,तुंम्ही खोचक प्रतिसाद दिलात,तर तुंम्हाला भसकन टोचायला :) हे आवडले ! छान यम - क जुळवले आहे. ;)

In reply to by बॅटमॅन

५० फक्त गुरुवार, 09/13/2012 - 12:08
अहो खफवरच्या कविता वाचुन पुजातैच्या प्रतिभेविषयी फार अपेक्षा वाढल्या होत्या, इथं त्यांनी तुका(राम्)दास, असलं ब्रॅकेट मधलं कॉमन लिहायचा प्रयत्न केलेला पाहुन म्हणलं की प्रतिभावेस्टन होतंय असं...

In reply to by ५० फक्त

लीलाधर गुरुवार, 09/13/2012 - 12:14
>>>>>> अहो खफवरच्या कविता वाचुन पुजातैच्या प्रतिभेविषयी फार अपेक्षा वाढल्या होत्या, इथं त्यांनी तुका(राम्)दास, असलं ब्रॅकेट मधलं कॉमन लिहायचा प्रयत्न केलेला पाहुन आधीच हौस आणि त्यात पडतोय प्रतिभेचा पौस ओ ;) त्याला काय करणार ? मोठ्या मोठ्या खफवर छोट्या छोट्या गोष्टी घडणारच ५० राव ;)

In reply to by ५० फक्त

जेनी... गुरुवार, 09/13/2012 - 18:09
ओ पन्नास , तुमाला काय म्हैत नै तर उगा जादा बोलु नका \( आपल्याला आधी हिस्टोरी म्हैत असावी मग बोलावं कसं ????? :)

In reply to by जेनी...

५० फक्त गुरुवार, 09/13/2012 - 19:23
व्हय व्हय आमाला नाय माहित बाई हिस्टोरी, मुलांनो आणि मुलींनो चला हाताची घडी तोंडावर बोट, गपगुमान बसा बरं एक लाईन धरुन, पुजाबै सायेच्या मायेची गोट्ष पाट म्हनुन्श्यान दावनार आहेत, चला सुरु कराओ पुजाबै तुमी...

स्पा गुरुवार, 09/13/2012 - 12:26
"दादा मला एक वहीणी आण" या गाण्याच कॉलेजात असताना केलेले खंग्री विडंबण आठवलं.. हो आम्ही बी पिकनिक गाण्यांसाठी याच एक खास विडंबन केल्याचे स्मरते

In reply to by अन्या दातार

५० फक्त गुरुवार, 09/13/2012 - 15:44
सोलापुरात - मी कशाला आरशात पाहु ग $$$$$$$$$$ मीच माझ्या रुपाची राणी ग$$$$$$$ या गाण्यावर गणपती विसर्जनाच्या मिरवणुकी ढोल वाजवतात, आहात कुठं अन्याजी दातार.

In reply to by सस्नेह

रेवती गुरुवार, 09/13/2012 - 19:32
अरे माझ्या देवा ऽऽऽ! या गाण्याच्या चालीवर पीटी चाललीये असं डोळ्यासमोर आलं आणि हसून मुरकुंडी वळली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 09/13/2012 - 16:13
:) आवडेश. वरुन दहाव्या नंबरच्या ओळीनं घोळ घातला पाहा. नै तर वहिनीची आतुरता जवळ जवळ कवितेतून पोहचली होती. [रसग्रहणाला घेऊ का काय ही कविता ] -दिलीप बिरुटे

गणामास्तर गुरुवार, 09/13/2012 - 19:18
आयला. हे कसं सुटलं ब्वॉ नजरेतून. पब्लीकला हैदोस घालायला चिक्कार वाव असून त्यातल्या त्यात कमीचं घातलाय की. ;) बाकी कवी आणि बुवांशी याविषयी सविस्तर चर्चा शनिवारी करण्यात येईल.

In reply to by गणामास्तर

बॅटमॅन Fri, 09/14/2012 - 11:17
पब्लीकला हैदोस घालायला चिक्कार वाव असून त्यातल्या त्यात कमीचं घातलाय की.
बाडीस. पीतग्रंथविद्याविभूषितांची मांदियाळी असूनदेखील असे कसे ;)

रेवती गुरुवार, 09/13/2012 - 19:28
वहिनीला मातृरुपी, वडाची का होईना छाया वगैरे म्हणणं ठीक आहे पण वहिनीच्या गोर्‍या, सायीसारख्या अंगाबद्दल कश्याला दिरानं बोलावं? हा प्रश्न पडला. ही कवीता दादाच्या नजरेस पडली तर काही खरे नाही. ;)

तिमा गुरुवार, 09/13/2012 - 19:47
या कवितेत गूढ अर्थ भरलेला आहे. यावर एखादा 'सायस्पर्श' निघू शकेल.

सूड Fri, 09/14/2012 - 17:38
कविने वापरलेलं साय हे रुपक आणि वहिनी घरात आल्यावर मिळणारी साय पाहता कवीची भावी वैनी चितळ्यांची, आरे डेरी वाल्यांची थोडक्यात कुठल्यातरी डेअरीवाल्यांची पुतणी किंवा मुलगी असावी. लग्नानंतर तिला एखादी दुग्धफॅक्टरी आंदण म्हणून मिळणार असावी, असं वाटतंय.

In reply to by सूड

गवि Fri, 09/14/2012 - 17:51
वा वा.. चितळेंपैकी का? म्हणजे ताजी बाकरवडीही घरबसल्या.. वेळेचं बंधन नाही.. सर्वच बोटं तुपात.. आरेपैकी नसावी वहिनी.. नाहीतर कवी वहिनी आली की एनर्जी मिळेल असं म्हणाला असता..

In reply to by सूड

@येवढी काही वैट्ट नाय हों कविता चचाची.>>> त्या प्रतिसादांबद्दल बोलताहेत,,, :-p होय ना गं बालिके...? :)

प्रसाद गोडबोले गुरुवार, 02/28/2013 - 19:42
गोर्‍या गोर्‍या वाहिनीची साईसारखी काया, साईसारखी काया तीची वडरुपी छाया,
लैच अचाट उडी आहे ही .... वडाच्या झाडाखाली दुध तापवतात काय तुमच्याकडे ? त्याशिवाय असली कल्पना सुचणे म्हणजे अशक्यच.... _/\_

In reply to by धन्या

@ म्हणजे या कवितेतले दादा तुम्हीच का?>>> तुंम्ही कित्तिही काहिही जरी म्हणलात,तरी..
तो मी नव्हेच!!!
http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif

भिकापाटील गुरुवार, 02/28/2013 - 22:30
स्पा काकाचे धन्यवाद. वर आणल्याबद्दल. नाहीतर आम्ही कविवर्य लीलाधराच्या ह्या वाडःमयीन कलाकृतीस मुकलो असतो. अवांतरः वहिनी बहूधा वडराची आहे नि तीचे नाव छाया आहे.

तिमा Sun, 03/03/2013 - 14:24
ह्या कवितेवर आधारित 'साय'को चित्रपट काढण्याच्या विचारात आहेत काही प्रोड्यूसर्स!