मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

झटपट सांजोरी.

ज्योति प्रकाश · · पाककृती
साहित्य:-उरलेला शिरा. भिजवलेली कणिक (थोडी सैल भिजवलेली असावी). थोडे दुध. पिठीसाखर. तूप. कृती :- उरलेल्या शिर्यात थोड्या दुधाचा हबका मारावा व थोडी पिठीसाखर घालून चांगले मिक्स करावे. पुरणपोळीप्रमाणे कणकेच्या पिठात शिर्याचे सारण भरावे.व तव्यावर तूप सोडून सांजोरी चांगली खरपूस भाजावी. साजुक तुपाबरोबर खाण्यास तयार झटपट सांजोरी.

वाचने 8070 वाचनखूण प्रतिक्रिया 16

तर्री Sat, 09/08/2012 - 20:45
गेल्या काहे दिवसात एकदम रापचिक पा.कृ. येथे येत होत्या. त्यानंतर ही साधीशी पाकृ. केटरीना , करीना नंतर जानकी काकू याव्या तशी. काकू बाई प्रेमळ दिसत आहेत.

पैसा Sat, 09/08/2012 - 21:59
सोपी पाकृ. आणि शिर्‍याचा उपयोग करण्याची आयडिया आवडली.

कच्ची कैरी Sun, 09/09/2012 - 07:14
अच्छा तुम्ही याला सांजोरी म्हणतात का ?? आमच्याकडे करंजीच्या गोल प्रकाराला सांजोरी म्हणतात .

In reply to by डावखुरा

इरसाल Mon, 09/10/2012 - 11:44
त्या मोहनचा जीव गुदमरत नाही का हो सांजोरीमधे. बादवे : आमच्याकडे करंजीला सांजरी म्हणतात. (अहिराणी मधे) बाकी ही बनवलेली वस्तु पुरणपोळी सदृश्य दिसत आहे. छान लागावी.

In reply to by इरसाल

डावखुरा Tue, 09/11/2012 - 11:10
रवा तुपात थोडासा भाजुन घ्या..[१ चमचा तुप =४ वाटी रवा] थोडा तांबडा करुन घ्या.. ३वाटी पिठी साखर+ थोडेसे दुध टाकुन [जास्त गोळा नको फक्त ओलसर] + हवी असल्यास थोडी वेलदोडे पुड+खोबर्याचा बारीक कीस पण टाकु शकतात.. **ह्या मोहनचा जीव गुदमरत नाही उलट त्याला आनंद होतो फराळाच्या डीश मध्ये जायला मिळाल्याने.. ;) अवांतर : आणि मैद्याच्या सारणात हे मोहन भरुन[पुरण्पोळीसारखे] पुरीएवढ्या लाटुन तुपात्/तेलात तळुन काढा आणि खातांना परत गावराणी तुपासोबत चापा..सांजोरी अति अवांतर : तुमाच्या फोटोत दिसत असलेली वस्तु करंजी सदृश्य दिसत आहे त्यात ओले किंवा कोरड्या खोबर्याची खिरापत करुन भरली की त्याला करंजी म्हणतात.. दोन्ही अतिशय फेव्हरेट पदार्थ आहेत.. :)

bhaktipargaonkar Mon, 09/10/2012 - 14:27
सुरेखच...माझही आज्जी करायची हे असं ...कधी घट्ट वरण उरलं कि मग ते पुराणा सारखं शिजवून त्याच्या पोळ्या करून द्यायची...आधीच गोडघाशे आम्ही ..चटक मटक करून गट्टम करून टाकायचो