कस्सा राव थांबू...

अत्रुप्त आत्मा जे न देखे रवी...
प्रेरणा >>> कुणाची...ती काय सांगायला हवी...? ;) http://www.misalpav.com/node/22626 कस्सा राव थांबू,कित्ती मी थांबू आतून प्रेशर येतय आज ताडी कच्ची मारुन आलोय आज...! मधेच घुसुनी दांडी गुल बाहेर माला प्रेशर फुल्ल टुरटुरण्याचा अन् डबड्याचा मंजुळ आतुन येइ अवाज ताडी कच्ची मारुन आलोय आज...! जरी थांबलो 'दाबुन' नीट आतल्या आत,तरी पडते पीठ पिळ-वटलेली अतडी अशी ही लवकर ये रे...कित्ती हा माज ताडी कच्ची मारुन आलोय आज...! ''जाऊ दिलं...'', नी फसलो मी तू आत मेल्या शिगरेटी पी...! पेपर वाचायची एकच जागा कशी विसरू मी शिकलो आज ताडी कच्ची मारुन आलोय आज...!
वर्गीकरण

130 टिप्पण्या 39,721 दृश्ये

Comments

प्रचेतस नवीन

वाह ! सहज ... सुंदर विडंबन ... ह्या विषयावर असंही काही लिहीता येऊ शकेल हे आम्हा पामरांच्या स्वप्नीही नव्हतं.. पण अत्रुप्तजी आत्मा ... ह्यांनी काय किमया साधली आहे बघा ना .. खरं तर ताडी आपल्या नेहमीच्या माहितीतली .. बरेचदा आपण तिच्या दुकानाच्या आजुबाजुनं जातो , ताडी तिथे असुनही ती आपल्यासाठी नसतेच मुळी ..कारण आपण ताडी पीत नसतो. तसं पाहिलं तर ताडी ही एवढी इंपॉर्टंट गोष्ट नाही.. पण तुम्ही ज्या पद्धतीने जिवंत देखावा सादर केलाय , काय सांगावं .. आम्ही तर कर्जदार झालो तुमचे. ताडी पिणं, प्रेशर येणे, प्रसंगी कळ येणं, त्याच बरोबर लोकांचंही बेवडा म्हणून हिणवणं, .. काय वाटत असेल त्या ताडीला ..आणि ती पीत असलेल्या माणसांना... पण एक सांगूका ? हे विडंबनरसा ऐवजी करुणरसात असायला हवं .. कारण कवीची आतडी पिळवटवलेली बघत बघत वाचून खाली येता येता माझ्या मनालाही ज्या असह्य वेदना होऊ घातल्यात .. त्याने श्वास घेणं ही मुश्किल होऊन बसलंय .. किती बरं समरस झालात तुम्ही विडंबन लिहीताना .. मी आज पासुन तुमच्या विडंबनांचा चाहता आहे . एका आगळ्यावेगळ्या विषयावर इतके टची विडंबन कसे लिहीतात हे आत्मा गुरुजीच जाणो. मला तुमच्या चाहत्यांच्या यादीत एक स्थाण द्या प्लिज . खरंच .. मनापासुन आवडले विडंबन .. खुप खुप आतडीस्पर्शी. कृपया पु.वि.शु

अत्रुप्त आत्मा नवीन

In reply to by प्रचेतस

@आम्हाला तर कविता खूप आवडली, तसा प्रतिसाद पण दिलाय की वर.>>> दु.दु.अगोबा... ;) माझ्या ''बोर्डं'' या कवितेवरचं येथिल १ तडिपार>> मिश्टर-टारझन, यांच्या खवट/कुजकट प्रतिसादाचं,,ते दु.दु.दु.पणे केलेलं विडंबन आहे.... तेंव्हा ते कित्ती चानचान आहे, हे सगळ्यांना माहितिच हाय :-p

अन्या दातार नवीन

In reply to by अत्रुप्त आत्मा

अच्छा! http://www.misalpav.com/node/18100#comment-314679 याचे विडंबन आहे होय वल्लीचा प्रतिसाद म्हणजे. सांगितल्याबद्दल धन्यवाद हो बुवा. (निरागस व सुष्ट) अन्या

अत्रुप्त आत्मा नवीन

In reply to by अन्या दातार

अवांतर विशेष----मी हे विडंबन कुणाच्याही बाजुनी,विरोधात इत्यादी...वगैरे कसल्याही उद्देशानी केलेलं नाही,,ही निव्वळ करमणुक/हसवणुक आहे... त्याच पद्धतीने/अपेक्षेने तिकडे पहावे,ही णम्र इणंती :-p @सांगितल्याबद्दल धन्यवाद हो भटजी. >>>धन्यवाद हो सूडजी....

अन्या दातार नवीन

In reply to by अत्रुप्त आत्मा

णिषेध? का? उगाच? या प्रतिसादात आपण सांगितलेत ते असे:
माझ्या ''बोर्डं'' या कवितेवरचं येथिल १ तडिपार>> मिश्टर-टारझन, यांच्या खवट/कुजकट प्रतिसादाचं,,ते दु.दु.दु.पणे केलेलं विडंबन आहे.... तेंव्हा ते कित्ती चानचान आहे, हे सगळ्यांना माहितिच हाय
मी फक्त लोकांच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी लिंक शोधून दिली. काही चुकले का माझे? नसेल तर णिषेध परत घ्या बघू. शिवाय तो काडिकर असा रिमार्कही मागे घेत असल्याचेही जाहिर करा. उगाच माझ्यासारख्या निष्पाप मुलाच्या मनास यातना होतात बघा.

अत्रुप्त आत्मा नवीन

In reply to by अन्या दातार

@नसेल तर णिषेध परत घ्या बघू. >>> आजेबात घेनार नाय...ज्जा...! @शिवाय तो काडिकर असा रिमार्कही मागे घेत असल्याचेही जाहिर करा.>>> कौतुक केल्याचा राग अला का..? घेतला हां मागे रिमार्क.... काडीकर @उगाच माझ्यासारख्या निष्पाप मुलाच्या मनास यातना होतात बघा. >>> आणी आंम्हाला प्रचंड आनंद ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सूड नवीन

In reply to by अन्या दातार

माताय अस्संय होय. सांगितल्याबद्दल धन्यवाद हो भटजी. अन्या, वरील दुवा दिल्याबद्दल तुला दुवा दिल्या जात आहे.

पक पक पक नवीन

In reply to by प्रचेतस

कवीची आतडी पिळवटवलेली बघत बघत वाचून खाली येता येता माझ्या मनालाही ज्या असह्य वेदना होऊ घातल्यात .. होत असं...ते एकाला लागली **** अन उठ्ले बारा*** अशी काहीतरी म्हण आहे ना तसच..

अत्रुप्त आत्मा नवीन

In reply to by मनीषा

@श्रावण संपलेला आहे हे कळलं आहे>>> अस्स होय,मला वाटलं अधिकच चालू आहे, ;-) आणी तो ही भाद्रपद! :-p

लीलाधर नवीन

In reply to by जेनी...

कसा बै बसु कीती वेळ बसु, बसुन बसुन की हो आलीय गाठ, गुर्जींच्या ताडीचा फुटलाय माठ ! ख्या ख्या ख्या ;)

सोत्रि नवीन

ताडी कच्ची मारुन आलोय आज...!
हा अज्ञानाचा कहर आहे. ताडी कच्ची म्हणजे काय? कच्ची ताडी म्हणजे नीरा होउ शकेल कदाचित. सूर्योदयाच्या आधी झाडावरून उतरवलेली ताडी म्हणजे नीरा. सूर्याची किरणे नीरेत पडली की रासायनिक प्रक्रिया होऊन त्यात अल्कोहोल कंटेंट वाढते आणि नीरेची ताडी होते. पण नीरा ही आरोग्याला लाभदायक असते (तसेच ताडीही). तिच्याने विडंबकाला जी भावना झाली आहे आहे ती होऊ शकत नाही. सबब अतिशय गंडलेले विडंबन. - (कलाल) सोकाजी

अत्रुप्त आत्मा नवीन

In reply to by सोत्रि

कच्ची ताडी याचा अर्थ निरा हाच होतो,तुंम्हा सारख्या जाणकाराला ते ठाऊकही आहेसे दिसते, तरिही उगाच्या उगा पाडू प्रतिसाद देण्याचा प्रयत्नात तूमचाच प्रतिसाद पडेल झालाय...! (हलाल) आत्मा :-p

गणपा नवीन

In reply to by सोत्रि

कच्ची ताडी म्हणजे नीरा होउ शकेल कदाचित
बरोबर सोत्रि, कच्ची ताडी म्हणजे नीराच जो अतिशय गोड असतो. त्यामुळे अधाश्या सारखी ग्लासावर ग्लास रिचवेले की परिणाम दिसुन येतात. ;) खाजरीच्या झाडापासुन निघणार्‍या ताडी पेक्षा, ताडाच्या (ज्याला ताडगोळे लागतात ते) झाडातुन निघणारी ताडी ही लवकर बाधते त्या मुळे ही ताडी तापवताना त्यात एखादी हिरवी मिरची ठेचुन मगच गरम गरम पितात. - गणा

निश नवीन

काय आत्मा साहेब, विडंबन उत्तम नाही म्हणणार . परत तेच टमरेल व त्याच प्रकारे केलेल विडंबन. ताडी निरा दारु ह्या गोष्टिंचा मिपा वर अतिरेक झाला आहे. पुण्यात आताच ८०० मुलांच्या बाबतीत घडलेली घटनेवरुन बोध घ्यावा लागेल आपल्याला. आता तरी मिपावरुन ह्या गोष्टी बंद होउ द्यात.

चौकटराजा नवीन

In reply to by निश

निशा लेका जाउन दे ना ! लई सिरेस घेउन नको ! अ आ नि स्माईल्याना जरा तरी निरोप दिलाय व लेखणी जवळ केलीय यावर ताडी पिऊन सेलेब्रेट कर ना राव !

निश नवीन

In reply to by चौकटराजा

चौकटराजा साहेब, तुमच मी नक्कीच ऐकीन पण मी ताडि , दारु ,सिगारेट ह्यापैकी काहीच पित नसल्यामुळे एक कप मस्त वाफाळता चहा पिउन अ आच लेखणी जवळ करण सेलेब्रेट करीन. तुमच्या सारख्या अधिकारि व्यक्तिनी मला सांगण म्हणजे मला ऐकायलाच हव. नक्की ऐकीन मी तुमच चौकटराजा साहेब.

पक पक पक नवीन

In reply to by जेनी...

नीश तु नी र्र्र्र व्यसनी आहेस तर .... सोचना पड्डेंगा . किस बारेमे सोचना पडेगा आत्त्याबाई... ;)

पक पक पक नवीन

In reply to by अत्रुप्त आत्मा

, जी व्यक्ति कळण्याच्या अवस्थेत नाही,तिला कशाला समजवायला जाताय. सोडून द्या हो! भट्जी बुवा , कविच्या भावना सगळ्यांना समजतात पण विड्म्बन्काराच्या भावना समजण्या साठी जालिम उपाय , वै.पाट्णकर काढा पाजा .म्हण्जे तुम्च्या भावना समजतील त्यांना... :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile:

लीलाधर नवीन

In reply to by निश

कशाला ऊगाच खाजवुन खरुज काढतो आहेस रे? याउपर काहीच बोलणार नाही, तेवढा समजुतदार नक्कीच आहेस नै का?

तर्री नवीन

विडंबन एकदम "प्रासादिक " . आवडले. मिपावरील कवितेला सांडपाण्याची उपमा दिल्याचे उगीचच आठवले !

अत्रुप्त आत्मा नवीन

In reply to by ५० फक्त

@ह्या विडंबनाच्या लेखकाला/ कविला प्रत्यक्ष भेटण्याचा योग कधी येईल कोण जाणे. >>> :-D दुष्ट... मिपावर दुष्ट लोकांच्या संख्येत वाढ होऊ लागलीये,आजकाल ;-)

५० फक्त नवीन

In reply to by अत्रुप्त आत्मा

अरे, मिपावर तसेच आंतरजालावर ख्यातिप्राप्त एक लेखक ज्यांच्या इथे गवि असा आयडी आहे ते तर किती छान छान लिहित आहेत मिपाबद्दल आणि तुम्ही दुष्ट दुष्ट असे म्हणता आहात, आता मी गोंधळात पडलो आहे काय करावे याच्या. बरं अजुन काही दुष्ट आयडींची उदाहरणं देउ शकाल काय, म्हणजे मी पण थोडासा दुरच राहीन त्यापासुन.

सूड नवीन

In reply to by ५० फक्त

गोंधळात पडलात ? पूर्वी येथे कौल नामक प्रकार होता असे जुने-जाणकार सांगतात. आता कौल नाही पण काथ्याकूट नक्कीच टाकू शकता. आमच्यासारख्या नवीन लोकांच्या ज्ञानातही त्यायोगे भर पडेल.

अत्रुप्त आत्मा नवीन

In reply to by सूड

@आता कौल नाही पण काथ्याकूट नक्कीच टाकू शकता.>>> माताय... नक्की कित्ती लोक आज ठरवुन या गोंधळात पडणार आहेत,,,कोण जाणे...? ;)

स्पा नवीन

In reply to by अत्रुप्त आत्मा

आत्मा' जी मी तुमच्या * गरी कवितेंचा फ्याण आहे तुम्हाला भेटायचा योग येईल तो करिदिन ... हे आपलं. .सु दीन :D

गणामास्तर नवीन

लै भारी हो अत्रुप्त आत्मा साहेब..असा विषय हाताला लागला की तुमची डबडी दुथडी भरुन वाहायला लागतातं हे अगोदर सुद्धा पाहीले आहेचं. आम्ही सुद्धा ५० रावां प्रमाणे तुम्हाला प्रत्यक्ष भेटण्याचा योग कधी येईल याची उत्सुकतेने वाट पाहत आहोत.

अत्रुप्त आत्मा नवीन

In reply to by ५० फक्त

@लई वाढलंय ओ हल्ली,बिल लाईटचं.>>> तुमच्या या एका परतिसादामुळं,एकुण प्रतिसादांची संख्या तुमच्या एवढी झाली. :-p

इरसाल नवीन

नाव वाचुन आधी गैरसमज झाला, पहिल्या २/३ ओळी वाचुन अधिकच बळावला. मग उमजले की बुवांनी ताडीचे लफडे करुन ठेवलेय म्हणुन.

अत्रुप्त आत्मा नवीन

In reply to by ज्ञानराम

@तर प्यायची कशाला ,>>> व्वा...! काय निरिक्षण आहे...! आपण या मार्गातले बरेच पोहोचलेले साधक दिसता... ;)

ज्ञानराम नवीन

तुम्हीच म्हणता ना >>> " व्वा...! काय निरिक्षण आहे...! नुसत्या निरिक्षणानेच समजलयं , त्यासाठी साधक होण गरजेच नसतं..

अत्रुप्त आत्मा नवीन

In reply to by ज्ञानराम

@त्यासाठी साधक होण गरजेच नसतं..>>> ओक्के... पण निरिक्षण करायला जाताच ना अश्या ठिकाणी??? म्हणजे साधक नसणं हा तुमचा नाइलाज आहे तर...! :-p

ज्ञानराम नवीन

"गिरो तो भी तंगडी उपर !!!" 8-) अस आहे तुमच बुवा ... असो .. साधक असण नसण मुद्दयाच नाही हो... जाऊ दे ... घ्या तुम्ही आम्ही काय बी बोलत न्हाय तुम्हासनी... ;)

अत्रुप्त आत्मा नवीन

In reply to by ज्ञानराम

छेडा आप ने है,तो तंगडी हमारिही उपर रहेगी,,, और आपकी नीचे... :-p पथ्थर आपने पेहेले फेका है, चुप आपकोही बैठना पडेगा... मुझे ऐसी सलाह देने की जरूरत नही है। @ घ्या तुम्ही आम्ही काय बी बोलत न्हाय तुम्हासनी... >>> बोला कि, कुणी अडवलय :cool: ? पण मग ऐकायचीही तयारी ठेवा.... ;)

बॅटमॅन नवीन

कस्सा राव थांबू आत लागले आंबू प्रतिक्रियांचे प्रेशर बास झालो मोकळा सोडुनी खा ऽऽऽस!!! इथे ठोकला तंबू घे गबाळ नि चंबू बूच लागले जरि प्रतिसादास त्यागापुढे ;) सकल झाले बाऽऽऽस!!! प्रेशरची गाथा टेकविला माथा वंदिले अत्रुप्त विडंबकास गोड माना ही बकवास!!!

स्पा नवीन

धन्यावद धनेश सर काय कविता उकरून काढलीत आता आरामात कवितेचा आणि प्रतिसादांचा आस्वाद घेतो

अत्रुप्त आत्मा नवीन

In reply to by आनन्दिता

@काय काय लिहायचा हा बूवामाणूस!!! >>>http://www.sherv.net/cm/emo/laughing/rolling-on-the-floor-laughing-smiley-emoticon.gif ह्या =)) ह्या =)) ह्या =)) ह्या =)) ह्या =)) ह्या =)) आली रे आली... दुत्त दुत्त आ..नंन्दिता आली! http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif

धन्या नवीन

In reply to by प्रचेतस

ज्या चातुर्याने आपण "हवाबाण" शब्द टाळलात, त्या कौशल्यास दाद दयावी लागेल. ;) (हसरे चेहरे चालत नाहीत. जाणून-बुजून बंद केले काय? :) )

मदनबाण नवीन

आज परत या धाग्यावर आलो आणि परेश रावल यांचा एक सीन आठवला ! काळजी करु नका इथे खाली देतोच आहे की... ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- खतरा...खतरा... खतरा... :-Beqabu

बॅटमॅन नवीन

हा धागा वर काढत आहे. आपल्या देशात प्रतिभेचे योग्य ते चीज़ होत नाही, त्यावरती अंमळ उतारा म्हणून एक छोटासा प्रयत्न इतकेच.

प्रसाद गोडबोले नवीन

In reply to by बॅटमॅन

आपल्या देशात प्रतिभेचे योग्य ते चीज़ होत नाही,
>>> आपल्या देशात प्रतिभेचे योग्य ते पीठ होत नाही असे म्हणायचे आहे का आपणाला =))

बॅटमॅन नवीन

In reply to by प्रसाद गोडबोले

नाही, चीज़च़ म्हणावयाचे आहे. चीज मेकिंग प्रोसेस पाहिल्यावर मथितार्थ कळून यावा. ;)

जडभरत नवीन

हीच का तांबिय संप्रदायाची मूळ कविता? प्रतिसाद देऊन वर आणतो म्हणजे नवीन मंडळांनी पण ही फटाका कविता वाचायला मिळेल. मस्तच बुवा...