मिपा jargon
मिपावर आल्यापासून इथल्या साहित्य चर्चा इ. चा आस्वाद घेत आलो आहे. पण प्रतिक्रियांमध्ये अनेक shortforms वापरले जातात. काहींचा अर्थ लागतो. काहींचा आजिबात नाही.
उदा.
प्रकाटाआ - प्रतिसाद काढून टाकला आहे
बाडिस - ???
मचाक - ???
आणि इतर अनेक.. नवीन सदस्यांना माहिती होण्यासाठी वाविप्र (हे अजुन एक.. :) ) मधे अशा मिपा स्पेशल शब्दांची माहिती द्यावी का?
वाचने
15973
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
पु ले शु - पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
हा का ना का - हाय काय नि नाय काय ..
ह ह पु वा - हसून हसून पुरेवाट..
काही:
१. पुलेशु: पुढील लेखनास शुभेच्छा
२. पुभाशु: पुढील भागास शुभेच्छा
३. विचारजंतः प्रस्थापित विचारांच्या विरोधात आपली मते मांडणारे सदस्य. अशा सदस्यांनी काहीही लिहिले तरी ते जे काही भारतीय/हिंदू आहे त्याच्या ते विरोधात आहेत असे जोरदार ठोकून दिले जाते असे खूप वेळा बघायला मिळाले आहे.
४. चुचुवाणी: अच्र्त (म्हणजे अचरट) अशा पध्दतीने मराठी शुध्दलेखनाला भोसकून लिहिणे. शुध्द मराठी लिहिण्यापेक्षा असे लिहिता येणे अधिक कठिण आहे.
आणि हो.
धाग्याचे काश्मीर होणे: धाग्यावर मूळ विषयाला धरून असलेल्या आणि नसलेल्याही असंख्य प्रतिक्रियांचा पाऊस पडणे.
आणखी काही शब्द लिहिण्याच्या खास पद्धती..
कै - काही
नै - नाही
भौ - भाउ
चोप्य पस्ते - copy paste
आवडल्या गेले आहे > आवडले गेले आहे (माझ्याकडून) > मला आवडले आहे
आवडेश - आवडले..
णिषेध - निषेध
बाडिस = सहमत
In reply to बाडिस = सहमत by डावखुरा
बाय डिफॉल्ट सहमत=बाडिस. बाकी मचाक च्या लाँगफॉर्मसाठी जाणकारांना पाचारण ;)
रच्याकने = रस्ताच्या कडे कडेने = by the way
प्रा का टा आ म्हणजे नक्की काय हा गोंधळ माझ्याही मनात होताच...
http://www.misalpav.com/node/16970
हा धागा मदत करेल!
In reply to हे घ्या! by मोहनराव
धन्यवाद मोहनराव.. खूप शब्दांचे अर्थ समजले.. :)
In reply to हे घ्या! by मोहनराव
गणपा डिटेक्टिव्ह म्हणतो ते उगाच नाय !!
मचाक म्हणजे काय?
In reply to मचाक म्हणजे काय? by रेवती
'मराठी चाकरमान्यांचा कट्टा' असावं कदाचित !!
In reply to 'मराठी चाकरमान्यांचा कट्टा' by सूड
धन्यवाद.
In reply to 'मराठी चाकरमान्यांचा कट्टा' by सूड
'मराठी चाकरमान्यांचा कट्टा'
खिक्क
In reply to 'मराठी चाकरमान्यांचा by स्पा
@'मराठी चाकरमान्यांचा
प्रेषक स्पा Fri, 31/08/2012 - 19:56.
'मराठी चाकरमान्यांचा कट्टा'
खिक्क >>> :-D महा डँबिस माणुस... जस काहि कळतच नै...! ;)
In reply to 'मराठी चाकरमान्यांचा by स्पा
मचाक म्हणजे 'मराठी चाकरमान्यांचा कट्टा'आणि मचाकन म्हणजे... मराठी चाकरमान्यांचा कट्टा नवीन!
In reply to 'मराठी चाकरमान्यांचा कट्टा' by सूड
ठ्ठो....
- ( 'मचाक'प्रेमी ) सोकाजी
मचाक्=मराठी चावट कथा
In reply to मचाक by विनायक प्रभू
अरे देवा! समजलं .
धन्यवाद.
In reply to मचाक by विनायक प्रभू
हि मिपावर कुठे मिळेल ;)
त्या मंदाकीनीने आशा लावलेली :P
हे झालय पूर्वी मिसळपाववर
In reply to हे झालय पूर्वी मिसळपाववर by आशु जोग
काय मणोरञ्जक धागा दिलात हो! अवांतराच्या लडी सुटून धाग्याचा लई भारी गुंता होतो कसा याचा वस्तुपाठच अाहे.
न.ज.वा. (नवसदस्यांनी जरूर वाचावे.)
मा. त. कंपनी = ??
In reply to मा. त. कंपनी = ?? by बाळ सप्रे
माहिती तंत्रज्ञान कंपनी.
चेपु = चेहरा पुस्तक
काही नवीन म्हणीपण येऊ घातल्यात १. मिपांत राहून "@@"शी वैर २.फुटकळ लेखांना प्रतिक्रियांचा आधार .३सांपलशिवाय पिकनिक आणि ठसक्याशिवाय मिसळपाव अळणी
पु ले शु - पुढील लेखनासाठी