मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपा jargon

राजो · · काथ्याकूट
मिपावर आल्यापासून इथल्या साहित्य चर्चा इ. चा आस्वाद घेत आलो आहे. पण प्रतिक्रियांमध्ये अनेक shortforms वापरले जातात. काहींचा अर्थ लागतो. काहींचा आजिबात नाही. उदा. प्रकाटाआ - प्रतिसाद काढून टाकला आहे बाडिस - ??? मचाक - ??? आणि इतर अनेक.. नवीन सदस्यांना माहिती होण्यासाठी वाविप्र (हे अजुन एक.. :) ) मधे अशा मिपा स्पेशल शब्दांची माहिती द्यावी का?

वाचने 15972 वाचनखूण प्रतिक्रिया 26

काही: १. पुलेशु: पुढील लेखनास शुभेच्छा २. पुभाशु: पुढील भागास शुभेच्छा ३. विचारजंतः प्रस्थापित विचारांच्या विरोधात आपली मते मांडणारे सदस्य. अशा सदस्यांनी काहीही लिहिले तरी ते जे काही भारतीय/हिंदू आहे त्याच्या ते विरोधात आहेत असे जोरदार ठोकून दिले जाते असे खूप वेळा बघायला मिळाले आहे. ४. चुचुवाणी: अच्र्त (म्हणजे अचरट) अशा पध्दतीने मराठी शुध्दलेखनाला भोसकून लिहिणे. शुध्द मराठी लिहिण्यापेक्षा असे लिहिता येणे अधिक कठिण आहे. आणि हो. धाग्याचे काश्मीर होणे: धाग्यावर मूळ विषयाला धरून असलेल्या आणि नसलेल्याही असंख्य प्रतिक्रियांचा पाऊस पडणे.

बाळ सप्रे Fri, 08/31/2012 - 15:47
आणखी काही शब्द लिहिण्याच्या खास पद्धती.. कै - काही नै - नाही भौ - भाउ चोप्य पस्ते - copy paste आवडल्या गेले आहे > आवडले गेले आहे (माझ्याकडून) > मला आवडले आहे आवडेश - आवडले.. णिषेध - निषेध

In reply to by स्पा

@'मराठी चाकरमान्यांचा प्रेषक स्पा Fri, 31/08/2012 - 19:56. 'मराठी चाकरमान्यांचा कट्टा' खिक्क >>> :-D महा डँबिस माणुस... जस काहि कळतच नै...! ;)

In reply to by आशु जोग

इनिगोय Fri, 08/31/2012 - 20:18
काय मणोरञ्जक धागा दिलात हो! अवांतराच्या लडी सुटून धाग्याचा लई भारी गुंता होतो कसा याचा वस्तुपाठच अाहे. न.ज.वा. (नवसदस्यांनी जरूर वाचावे.)

कंजूस Mon, 04/29/2013 - 10:27
काही नवीन म्हणीपण येऊ घातल्यात १. मिपांत राहून "@@"शी वैर २.फुटकळ लेखांना प्रतिक्रियांचा आधार .३सांपलशिवाय पिकनिक आणि ठसक्याशिवाय मिसळपाव अळणी