<बद्ध लेखक>
लेखनविषय:
प्रेरणा
इवलं -इवलं ठावं रोज पाडी लेख
उत्तरं सोपी कुणा देईचिना
आपली ती तंगडी दरवेळी वरती
किती पडलो तेही आठवेना
टाकतो त्या जिलब्या, ज्ञानाचा देखावा
रेग्युलरली जिणे काही झेपेचिना
वेळेची ती त्यक्ती कामाचा कंटाळा
डेडलाईनी काही केल्या चुकेचिना
एकहार्ट पैसा काल रोब मरून
सांगतोय काय नक्की कळेचिना
अचाट अध्यात्म, पुचाट विचार
जगतो ते लिहितो कोणा पटेचिना
उपप्रतिसादी ओशट या जिलब्या
लेख झाला जुना तरी संपेचिना
वाचकाचा खात्मा, बद्ध हा लेखक
आपटली डोकी, तरी थांबेचिना
वाचने
4366
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
हि हि हि : : :
मस्तच!! शीर्षकात अजून दोन अक्षरं असती तर अधिकच अर्थपूर्ण झालं असतं.
लंब्या बरेच दिवसानी लिहीता झाला. :)

:)
प्रतिसाद आणि मूक वाचक दोघांनाही धन्यवाद.
**डिस्क्लेमरः
ह्या विडंबनाचा, प्रतिसादाचा आणि मूकवाचक ह्या आयडीचा काहीही संबंध नाही. प्रेरणा गायबलेली दिसत आहे. येथे बघता येईल. https://lh3.googleusercontent.com/-6xAc_UpdkOk/UDy4lyj3TiI/AAAAAAAAC_0/sAzksvciOzQ/s912/mipa.png
+१
:)
जब-या कविता.. आता ह्यावर एखादा जबरदस्त आध्यात्मिक उतारा येईल लवकरच मिपावर..;-)
च्यायला, कोणावर लिहिलंय आणि काय लिहिलंय काही कळेना.
पण लिहिलंय काव्य एक लंबर. :)
-दिलीप बिरुटे
(भोळा माणूस)
In reply to और भी आने दो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>और भी आने दो
नको. त्यासाठी आधी अजीर्ण होण्याइतके काहीतरी यावे लागते.
(विवेकी माणूस) अन्या दातार
एक नंबर!
नुसता टारगटपणा करायला सांगा. ;)
हि हि हि : : :