Skip to main content

<बद्ध लेखक>

लेखक लंबूटांग यांनी शनिवार, 25/08/2012 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा इवलं -इवलं ठावं रोज पाडी लेख उत्तरं सोपी कुणा देईचिना आपली ती तंगडी दरवेळी वरती किती पडलो तेही आठवेना टाकतो त्या जिलब्या, ज्ञानाचा देखावा रेग्युलरली जिणे काही झेपेचिना वेळेची ती त्यक्ती कामाचा कंटाळा डेडलाईनी काही केल्या चुकेचिना एकहार्ट पैसा काल रोब मरून सांगतोय काय नक्की कळेचिना अचाट अध्यात्म, पुचाट विचार जगतो ते लिहितो कोणा पटेचिना उपप्रतिसादी ओशट या जिलब्या लेख झाला जुना तरी संपेचिना वाचकाचा खात्मा, बद्ध हा लेखक आपटली डोकी, तरी थांबेचिना
लेखनविषय:

वाचने 4366
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

प्रतिसाद आणि मूक वाचक दोघांनाही धन्यवाद. **डिस्क्लेमरः ह्या विडंबनाचा, प्रतिसादाचा आणि मूकवाचक ह्या आयडीचा काहीही संबंध नाही. प्रेरणा गायबलेली दिसत आहे. येथे बघता येईल. https://lh3.googleusercontent.com/-6xAc_UpdkOk/UDy4lyj3TiI/AAAAAAAAC_0/…

+१

जब-या कविता.. आता ह्यावर एखादा जबरदस्त आध्यात्मिक उतारा येईल लवकरच मिपावर..;-)

च्यायला, कोणावर लिहिलंय आणि काय लिहिलंय काही कळेना. पण लिहिलंय काव्य एक लंबर. :) -दिलीप बिरुटे (भोळा माणूस)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>और भी आने दो नको. त्यासाठी आधी अजीर्ण होण्याइतके काहीतरी यावे लागते. (विवेकी माणूस) अन्या दातार

In reply to by अन्या दातार

बरोबर :D. त्याशिवाय स्फुरण नाही चढत विडंबन पाडायला ;)

In reply to by लंबूटांग

नक्की का? नाही, शेवटी 'पाडायला' हा शब्द वापरलात म्हणून विचारतोय हं. ;)