नाव शोधून शोधून जोडू नको!
मिसळपावावर सदस्यांची नावे अशी फिरताना बघून आमचे डोळे फिरले! 8|
एकामागून एक सदस्य अशी नावे फिरवून फिरताना पाहून ना.घ. देशपांड्यांच्या डाव मांडून भांडून मोडू नको ह्या अप्रतिम गाण्याचे शब्द आम्ही फिरवले! :O ;)
नाव शोधून शोधून जोडू नको
नाव शोधू नको
जाणले मी तुझे सर्व, मी जाणले,
खूप 'वेडे' तुझ्यासारखे पाहिले,
तूच सारी तुझी लाज सोडू नको
'जाल सर्वज्ञ' तू रे मला भासला
कौतुकाने तुला हार मी घातला,
हार घेऊन माजून तोडू नको
घेतलेले तुझे नाव, तू काढले,
आणि त्याचे पुढे ब्रीद तू राखिले,
त्याच नावास लाजून खोडू नको
ऐकले मी तुझ्या रे मुळे सर्व हे
लोक म्हणती मला घातले मी 'झगे'
भरजरी हा 'झगा' हाय ओढू नको
केसुरंगा
वाचने
3328
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
हा हा हा!!
अत्युच्च !!!
In reply to अत्युच्च !!! by धमाल सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
हा हा!!
In reply to हा हा!! by केशवसुमार
असर नाही हो
In reply to असर नाही हो by धमाल सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
हा हा !!
हा हा हा! जबराट!!
भन्नाट!
सह्ही..