एकहार्ट
लेखनप्रकार
सत्य किती सोपंय, किती सहज आहे पाहायचं असेल तर जगात आज एकमेव व्यक्ती आहे, एकहार्ट!
कोणताही चमत्कार नाही, सिद्धाच्या लक्षणांचं कोणतंही अवडंबर नाही. तुम्ही दखल घेतली नाही तर लक्षातही येणार नाही इतका साधा एकहार्ट.
त्याचं पॉवर ऑफ नाऊ प्रकाशित होऊन अनेक वर्ष झाली. तो भारतात येऊन गेला. इथली आध्यात्मिक बजबजपुरी त्यानं पाहिली, त्याबद्दल अवाक्षर काढलं नाही. अनेक वर्ष त्याच्याकडे कुणाचं लक्षही गेलं नाही. एकदा ओप्रा विनफ्रेनं त्याला टॉक शोला बोलावलं आणि तो प्रकाशात आला.
आजही तो इतक्या सादगीनं जगतो की तुम्ही रिसेप्टीव असाल तरच त्याला समजू शकाल. लक्षात आलं नाही तर तुमच्या जीवनातली एक सुरेख संधी हुकेल म्हणून हा लेख.
एकहार्ट : सौजन्य विकीपिडीया
___________________
पॉवर ऑफ नाऊ च्या प्रस्तावनेत त्यानं लिहिलंय, तिसाव्या वर्षापर्यंत तो कमालीची अस्वस्थता आणि आत्महत्येप्रत नेणार्या विमनस्कतेतून जगत होता. एक दिवस ते सगळं पराकोटीला गेलं, त्याला वाटलं `आता मला स्वत: बरोबर जगणं अशक्य आहे.'
तो विचार त्याच्या मनात सतत रुंजी घालू लागला आणि अचानक त्याला त्या विचाराचं आश्चर्य वाटलं, `मी एक आहे की दोन? कोण कुणाबरोबर जगू शकत नाही?'
त्या विचारावर तो इतका केंद्रित झाला की इतर सगळे विचार थांबले. सगळं एकदम शांत झालं.
ती शांतता क्षणोक्षणी इतकी सघन होत गेली की तिच्यात तो असाहाय्यपणे खेचला जाऊ लागला. मग त्याला जाणवलं की ती सर्वव्यापी वैश्विक शांतता बाहेर नाही, त्याच्या आत आहे. बाहेरची आणि आतली शांतता अचानक एक झाली, त्याचं सारं भय संपलं, तो सिद्ध झाला!
पुढे त्यानं लिहिलंय, आज सर्वोच्च काय असेल तर माझा अविभाज्य भाग झालेली ती शांतता.
लोक मला विचारतात, `तुला मिळालंय ते आम्हाला कसं मिळेल? तर मी त्यांना सांगतो, `तुमच्याकडे ते आहेच. तुमचं तिकडे लक्ष जात नाहीये कारण मनाची अविरत बडबड तुमचं लक्ष सतत वेधून घेतेय' ( पॉवर ऑफ नाऊ (१९९७): पाने १ ते ३)
_____________________________
एकहार्ट म्हणतो, "मी बहुदा उद्विग्नतेच्या परमावस्थेला पोहोचलो होतो आणि तिचा परिपाक म्हणजे एका क्षणी माझी जाणीव मन आणि शरीरापासनं वेगळी झाली."
अध्यात्मात याला `सडन एन्लायटन्मेंट' म्हटलंय, तिच्या प्रक्रियेचं विश्लेषण होत नाही.
पाणी इतकं बेहद्द उकळलं की एका क्षणी, अचानक त्याची वाफ झाली. ते निराकार झालं.
अध्यात्मिक जगात हे अपवादात्मक मानलं गेलंय.
स्वतःच्या निराकारत्वाचा बोध क्रमशः देखील होऊ शकतो. ते सर्वात निर्धोक आणि सुनिश्चित आहे.
आपल्या एकेक धारणा, आपल्यावरची मनाची पकड, प्रत्येक आकलनासरशी ढिली होत जाते. दोन विचारांच्यामधे समोरचं स्पष्ट दिसायला लागतं आणि आजूबाजूचं नीट ऐकू यायला लागतं.
एखाद्या अत्यंत निवांत क्षणी समोर कायम उभा असलेला निराकार दिसतो आणि अचानक उलगडा होतो: `तो आणि आपण वेगळे नाही! '
एकहार्टचं सर्व लेखन अशा क्रमशः सिद्धत्वाकडे नेण्याचा प्रयत्न आहे.
__________________________
आजमितीला त्याची फक्त चार पुस्तकं आहेत, पॉवर ऑफ नाऊ, प्रॅक्टीसिंग द पॉवर ऑफ नाऊ, स्टीलनेस स्पीक्स आणि अ न्यू अर्थ.
पॉवर ऑफ नाऊ अध्यात्मातला "निराकार" हा फंडा अफलातून मांडतं. एकहार्टनं त्याला "बिइंग" म्हटलय.
प्रॅक्टीसिंग द पॉवर ऑफ नाऊ रोजच्या जगण्यात निराकाराची उपयोगिता विशद करतं.
स्टीलनेस स्पीक्स तर त्यानं इतकं सूत्रबद्ध आणि बेहद्द लिहिलंय की उपनिषदांची आठवण होते.
आणि `अ न्यू अर्थ' लोक समजू शकले तर एकहार्टला जागतिक शांततेचं नोबेल मिळेल.
__________________________
पॉवर ऑफ नाऊ मधला मला आवडलेला क्लायमॅक्स, जो त्याच्या एनलायटन्मेंटची उकल करतो, तो असाय:
`एनलायटन्ड रिलेशनशिप्स' या प्रकरणात शेवटी त्यानं लिहिलंय:
`तुम्हाला स्वत:शी नातं कशाला हवंय? तुम्ही फक्त `असू' शकत नाही का? ज्या वेळी तुम्ही स्वत:शी नातं जोडता तेव्हा तुम्ही दोन होता, एक तुम्ही स्वत: आणि दोन, ज्याच्याशी नातं जोडलंय तो.
मनाचं हे विभाजन सर्व कलह आणि द्वंद्वाच कारण आहे.
साक्षात्कार म्हणजे स्वत:शी एकरूपता. तुम्ही स्वत:ला जोखत नाही, तुम्हाला स्वत:बद्दल करुणा, अभिमान, प्रेम, तिरस्कार काहीही वाटत नाही. जाणीवेतून होणारं हे स्वविभाजन संपतं.
जाणीव एकसंध होते, पूर्णत्वाला येते, शापातनं मुक्त होते.
ज्याला वाचवायचंय, सजवायचंय, आणि सतत काही तरी हवंय असा कुणी राहत नाही.
तुम्ही सिद्ध होता तेव्हा एकच नातं संपतं, ते म्हणजे तुमचं स्वत:शी असलेलं नातं. एकदा तुमचं ते नातं संपलं की तुमची इतर सर्व नाती प्रेमाची होतात. (पान १४५)
_______________________
स्टीलनेस स्पिक्समध्ये अहंकाराबद्दल (दि इगोइक सेल्फ) एकहार्टनं लिहिलंय:
जेव्हा विचार तुमचं सर्व लक्ष वेधून घेतात तेव्हा तुम्ही मनाच्या बोलण्याशी एकरूप होता, ते बोलणं मग तुम्हाला तुमचं बोलणं वाटायला लागतं.
या मनानं निर्माण केलेल्या `मी'ला सतत अपूर्णता आणि भय वाटत राहतं आणि त्या भयातून आणि अपूर्णतेतून तुम्ही कार्यरत होता.
असं जगणं मग इतरांसाठी आणि तुमच्यासाठी क्लेशदायी होतं. ( स्टीलनेस स्पिक्स, २००३, पान २९)
_____________________
`अ न्यू अर्थ' मध्ये शेवटच्या प्रकरणात एकहार्टनं अभिव्यक्तीबद्दल (अवेकन्ड डूइंग) अफलातून लिहिलंय. मनाच्या सृजनात्मक उपयोगाविषयी तो म्हणतो:
सत्य गवसल्यावर तुम्ही जे करता त्याची सुरुवात आणि शेवट, तुमच्या मानसिक आणि भावनिक स्तरावर आधीच झालेला असतो. त्यामुळे कृत्यातून तुम्हाला काही मिळवायचं नसतं.
तुमचं कृत्य तुम्ही जे आहात त्याची अभिव्यक्ती असते. असं कृत्य कोणतीही अपूर्णता पूर्ण करण्यासाठी नसल्यानं ते कृत्यच आनंद असतो.
प्रत्येक अभिव्यक्तीतून तुम्ही अव्यक्ताला व्यक्त होण्याचा अवसर देता आणि त्यामुळे ज्यांच्यापर्यंत ती अभिव्यक्ती पोहोचते त्यांना ती आनंदित करते.
वाचने
15195
वाचनखूण
प्रतिक्रिया
84
साधे
In reply to साधे by मन१
+१. असेच म्हणतो. इतर
In reply to +१. असेच म्हणतो. इतर by बॅटमॅन
+१
In reply to +१. असेच म्हणतो. इतर by बॅटमॅन
+१००
In reply to +१०० by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरुटे सर
In reply to बिरुटे सर by संजय क्षीरसागर
>>>गीतेच्या सगळ्या अध्यायांवर
In reply to >>>गीतेच्या सगळ्या अध्यायांवर by प्यारे१
+१
In reply to +१ by मदनबाण
बाणा ! भिंत जरा हळू चालव बाबा
In reply to बाणा ! भिंत जरा हळू चालव बाबा by नाना चेंगट
सध्या पहिलाच गेयर टाकला
In reply to सध्या पहिलाच गेयर टाकला by मदनबाण
आयला, कसले चांगदेव आणि काय गेयर
In reply to आयला, कसले चांगदेव आणि काय गेयर by संजय क्षीरसागर
>>>>खरच लिहू शकतो त्यात काही
In reply to >>>>खरच लिहू शकतो त्यात काही by नाना चेंगट
तसेही गीता हा आमचा आवडीचा विषय आहे.
In reply to आयला, कसले चांगदेव आणि काय गेयर by संजय क्षीरसागर
खरच लिहू शकतो त्यात काही
In reply to खरच लिहू शकतो त्यात काही by मदनबाण
तुमचे प्रतिसाद पाहा :
In reply to तुमचे प्रतिसाद पाहा : by संजय क्षीरसागर
इंटरप्ट करु का ??
In reply to इंटरप्ट करु का ?? by अर्धवटराव
दॅटस द पॉइंट!
लेखन आवडले.पॉवर ऑफ नाऊ या
जगातील एकमेव व्यक्ती?
फार सुंदर ओळख करुन दिलीत !!
चित्रगुप्तजी, पोस्ट भरकटू नये म्हणून केवळ नाईलाजानं तुम्हाला
एकहार्टची भारत भेट
In reply to एकहार्टची भारत भेट by मूकवाचक
@ मूकवाचक : तुम्ही जे उधृत केलय ते लिंडा कोलनं स्वतः विषयी
In reply to @ मूकवाचक : तुम्ही जे उधृत केलय ते लिंडा कोलनं स्वतः विषयी by संजय क्षीरसागर
धन्यवाद
संजय साहेब
'पॉवर ऑफ नाऊ' वाचायला
In reply to 'पॉवर ऑफ नाऊ' वाचायला by सस्नेह
>>>भारतीय तत्वज्ञानाचा
In reply to >>>भारतीय तत्वज्ञानाचा by नाना चेंगट
अर्रर्रर्र.. शब्दरचनेत थोडा
In reply to अर्रर्रर्र.. शब्दरचनेत थोडा by सस्नेह
`भारतीय तत्वज्ञानाचा प्रामाणिक पाठपुरावा'
In reply to `भारतीय तत्वज्ञानाचा प्रामाणिक पाठपुरावा' by संजय क्षीरसागर
मी तर म्हणेन, भारतीय
In reply to मी तर म्हणेन, भारतीय by ५० फक्त
हो आणि एकहार्ट काय म्हणतोय ते प्रामाणिकपणे समजावून घेतलं की
In reply to 'पॉवर ऑफ नाऊ' वाचायला by सस्नेह
एक सुचवण
In reply to एक सुचवण by मूकवाचक
अरबिंदो...
In reply to एक सुचवण by मूकवाचक
अद्वैत, सांख्य, ज्ञानमार्ग
In reply to अद्वैत, सांख्य, ज्ञानमार्ग by नाना चेंगट
संस्कृतमधे काय विषेश आहे?
In reply to संस्कृतमधे काय विषेश आहे? by संजय क्षीरसागर
प्रचंड सहमत! फक्त इतकेच आहे
In reply to प्रचंड सहमत! फक्त इतकेच आहे by बॅटमॅन
ओरिजिनल संस्कृतमधेच आहे असं काही नाही
In reply to ओरिजिनल संस्कृतमधेच आहे असं काही नाही by संजय क्षीरसागर
गीतेच्या त्या श्लोकाचं हिंदी
In reply to गीतेच्या त्या श्लोकाचं हिंदी by नाना चेंगट
ते भाषांतर नाहीये ओ! तो अर्थ आहे.
In reply to ते भाषांतर नाहीये ओ! तो अर्थ आहे. by संजय क्षीरसागर
तो अर्थ आहे? वा !! पुन्हा
In reply to तो अर्थ आहे? वा !! पुन्हा by नाना चेंगट
हम्म
In reply to हम्म by मूकवाचक
अध्यात्मिक लेखन करणार्यांच्या आकलनानं थक्क झालो!
In reply to अध्यात्मिक लेखन करणार्यांच्या आकलनानं थक्क झालो! by संजय क्षीरसागर
>>मग पुन्हा संस्कृतचे दाखले.
In reply to >>मग पुन्हा संस्कृतचे दाखले. by नाना चेंगट
नानुडीशी सहमत !
In reply to नानुडीशी सहमत ! by मदनबाण
प्रतिसाद खाली दिलाय
-
श्रीराम जय राम जय जय राम
In reply to श्रीराम जय राम जय जय राम by Dhananjay Borgaonkar
स्वतःला देह समजणं हे तादात्म्य आहे आणि ते सर्व दु:खाचं मूळ आहे.
सरळ अनुवादाला काय अर्थ आहे?
In reply to सरळ अनुवादाला काय अर्थ आहे? by संजय क्षीरसागर
आता तुम्ही आत्मा म्हणजे काय
In reply to आता तुम्ही आत्मा म्हणजे काय by मदनबाण
दादा, एकतर प्रश्न तुम्हाला नव्हता,
In reply to दादा, एकतर प्रश्न तुम्हाला नव्हता, by संजय क्षीरसागर
ज्यांना विचारलाय त्यांनी श्लोक तर एकदम अंतिम निवडलाय
In reply to दादा, एकतर प्रश्न तुम्हाला नव्हता, by संजय क्षीरसागर
आत्मा सदैव अनावृत्त आहे. तो
In reply to आत्मा सदैव अनावृत्त आहे. तो by मदनबाण
कशाची कशाशी तुलना?
In reply to सरळ अनुवादाला काय अर्थ आहे? by संजय क्षीरसागर
हम्म. सरळ अनुवाद योग्य आहे.
In reply to हम्म. सरळ अनुवाद योग्य आहे. by नाना चेंगट
अनुवादापेक्षा अर्थ महत्त्वाचाय
In reply to अनुवादापेक्षा अर्थ महत्त्वाचाय by संजय क्षीरसागर
>>>आपण दोन वेळा `धन्य झालो'
In reply to >>>आपण दोन वेळा `धन्य झालो' by नाना चेंगट
नाना, तुमच्या प्रामाणिकपणाला दाद देतो
In reply to नाना, तुमच्या प्रामाणिकपणाला दाद देतो by संजय क्षीरसागर
तुम्ही आमच्या प्रामाणिकपणाला
गोंधळ नुसता
In reply to गोंधळ नुसता by गोंधळी
:-)
In reply to :-) by सहज
मस्तच
In reply to मस्तच by कुंदन
दिलदार शेखसाहीब!!
In reply to दिलदार शेखसाहीब!! by सहज
हम्म
In reply to हम्म by मूकवाचक
पण सगळ्यांचे आत्मे एक असतात
In reply to गोंधळ नुसता by गोंधळी
+१
In reply to +१ by मन१
:)
@ गोंधळी > आपल्या अल्प बुद्धिला जे पटत ते खर मानायच!
संजयजी यावर आपण टप्या टप्याने
In reply to संजयजी यावर आपण टप्या टप्याने by गोंधळी
पाप -पुण्य ही समजात नैतिकता रहावी म्हणून केलेली योजना आहे
In reply to पाप -पुण्य ही समजात नैतिकता रहावी म्हणून केलेली योजना आहे by संजय क्षीरसागर
पाप-पुण्या ऐवजी प्रामाणिक आणि
In reply to पाप-पुण्या ऐवजी प्रामाणिक आणि by गोंधळी
जे करताना तुम्ही स्वस्थ असता, मनाची चलबिचल होत नाही
In reply to जे करताना तुम्ही स्वस्थ असता, मनाची चलबिचल होत नाही by संजय क्षीरसागर
तुमच्या मुद्द्यांना प्रतिसाद
In reply to तुमच्या मुद्द्यांना प्रतिसाद by गोंधळी
@ गोंधळी : तुमचा प्रश्न सत्य म्हणजे? काय असा नव्हता
In reply to @ गोंधळी : तुमचा प्रश्न सत्य म्हणजे? काय असा नव्हता by संजय क्षीरसागर
काय करु तुमचे मुद्दे नाहि पटत
In reply to जे करताना तुम्ही स्वस्थ असता, मनाची चलबिचल होत नाही by संजय क्षीरसागर
जय हो!! सत्यनारायण!
In reply to जय हो!! सत्यनारायण! by सहज
तुम्ही कसाब नाही आणि मी कसाबला शिकवत नाही
मग त्याला जाणवलं की ती
In reply to मग त्याला जाणवलं की ती by llपुण्याचे पेशवेll
द काँप्लेक्स
In reply to द काँप्लेक्स by संजय क्षीरसागर
<<कुणी कितीही निरर्थक आणि
माझे मत
In reply to माझे मत by संपत
तर, असो!
In reply to तर, असो! by संजय क्षीरसागर
खरंच असो.
ही शक्यता म्हणून मान्य आहे पण
In reply to ही शक्यता म्हणून मान्य आहे पण by संपत
माणूस सत्याचा शोध अनंत कालापासून घेतोय.