मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

किरकिरे लोक

सांजसंध्या · · काथ्याकूट
आपल्या आजूबाजूला अनेक त-हेचे लोक असतात. यामधे काही लोक असे पाहण्यात आलेत ज्यांना आपल्याविरुद्ध कट शिजतोय असं सारखं वाटत राहतं. दोन व्यक्ती एकमेकांशी बोलताना हासताना पाहील्या कि यांना वाटतं कि आपल्यालाच हसताहेत. सूचक असं ग्रुपमधे कुणी काही बोललं कि यांना वाटतं आपल्यालाच टोमणा मारलाय.. त्यांच्यातही अनेक उप त-हा असतात असं वाटतंय. म्हणजे असं काही वाटू लागलं कि अस्वस्थ होणारे पण बोलून न दाखवणारे, काही मात्र थेटच भांडायला उठणारे तर काही ति-हाइताकडे तक्रारी करणारे. यांच्याशी कसं वागावं हे समजत नाही. इग्नोर केला तरी प्रॉब्लेम, समजावून सांगावं तरी प्रॉब्लेम ! हीही असो पण त्यांच्या संशयकल्लोळामुळे वातावरण प्रदूषित होतं हे मात्र खरं आहे. तुमच्या पाहण्यात आहेत का असे लोक ? त्यांचे सांगण्यासारखे किस्से वगैरे ?

वाचने 7611 वाचनखूण प्रतिक्रिया 39

In reply to by नाना चेंगट

इनिगोय गुरुवार, 08/16/2012 - 13:49
हो ना, मी पण त्यावर काही उपाय लिहिला असेल म्हणून आशेने धागा उघडला. काही किरकिरे, काही पिरपिरे, आणि काही लई शहाणे ;)

प्रचेतस गुरुवार, 08/16/2012 - 12:54
लेख वाचून सतत छळ, छळ, कट, कट म्हणणार्‍या आमच्या एका जवळच्या मित्राची आठवण आली. पण त्यांच्या सततच्या संशयकल्लोळामुळे वातावरण प्रदुषित न होता उलट प्रफुल्लित होत असते आणि हास्यकल्लोळ उमटत असतो.

तिमा गुरुवार, 08/16/2012 - 13:00
आपल्या देशातले 'बहुसंख्य' किरकिरेच आहेत. त्यांना सुद्धा, कोणी आपल्याविरुद्ध कट शिजवताहेत, असा कायम संशय असतो. आपले सगळे नेते भ्रष्ट आहेत आणि ते सगळे कायम पैसेच ओरपत असतात असाही त्यांना भास होतो. महागाई वाढली आहे, नीतिमत्ता ढासळली आहे, तरूण पिढी स्वार्थी झाली आहे, कोण्णाचा कुण्णाला पायपोस उरला नाहीये, असले भास त्यांना होतच रहातात. असे लोक म्हणजे सगळ्यांना प्रॉब्लेमच किनई ?

चिरोटा गुरुवार, 08/16/2012 - 14:27
तुमच्या पाहण्यात आहेत का असे लोक ? त्यांचे सांगण्यासारखे किस्से वगैरे ?
असे लोक म्हणजे दुसरे कोणी नसून स्त्रिया असतात.

पुष्करिणी गुरुवार, 08/16/2012 - 14:30
सोप्पं आहे, त्यांनी काही रिअ‍ॅक्शन द्यायच्या आधी आपण स्वतःच 'कट कट छळ छ्ळ ' असं म्हणायला सुरूवात करावी. अशा लोकांना डायरेक्ट जाउन विचारावं 'तुम्ही माझ्या नेहमी विरोधात कट / छळ का मांडता', मग ते ' असं काही नाही हो, तुमचा गैरसमज झालाय ' इ. टाइप ची उत्तरं देतील . हिच उत्तरं नंतर वापरावीत आणि परत स्वतःचं उदाहरण पण द्यावं ' की कसा तुम्ही त्यांच्यावर लग्गेच विश्वास ठेवला'...

मदनबाण गुरुवार, 08/16/2012 - 14:44
किरकिरे लोक,दिड शहाणे,काड्या सारणारे,माज करणारे,ज्ञानेश्वर महाराजां नंतर आपणच असा मोठा गैर समज बाळगुन लेखन करणारे, आपण प्रतिसाद दिला नाही तर संकेतस्थळ ओस पडेल असा न्यूनगंड असणारे,"सतत" सहमत + सहमत, असे प्रतिसाद देउन लोचटपणा करणारे...सर्वांत महत्वाचे संकुचित विचार सरणी असणारे वाय झेड कंपू इं लोक माझ्या पाहण्यात आहेत ! ;) मी शक्यतो अशा नमुन्यांकडे दुर्लक्ष करतो,ही मंडळी मानसिक दॄष्ट्या जराशी एकलकोंडी असावी असा माझा एक अंदाज आहे, तर काही मंडळीची केस ही वाया गेलेली आहे याची मला खात्री आहे. ;) आता समाजात सर्व प्रकारचे लोक असतात,तर या मंडळींचे स्थान कुठेतरी असणारच ना ! ;) इग्नोर केला तरी प्रॉब्लेम, समजावून सांगावं तरी प्रॉब्लेम ! हीही असो पण त्यांच्या संशयकल्लोळामुळे वातावरण प्रदूषित होतं हे मात्र खरं आहे. आता माझी पद्धत सांगतो, शक्यतो ह्यांच्याकडे लक्ष देण्यापेक्षा मिपावरचे चांगले लेख वाचण्यात वेळ घालवतो,ज्यांना समजुन घ्यायचे असेल आणि ज्यांना समजेल असे वाटत त्यांनाच सांगण्याचा प्रयत्न करतो,आणि जे समजवुन घेण्या पलिकडे आहेत असे जे नमुने असतात त्यांची फक्त मजा आणि त्रागा पाहतो... कधी कधी चुकुन चांगली करमणुक देखील होते. ;) काही कंपूबाज आणि वायझेड मंडळी यांच्या धाग्यांना कटाक्षाने प्रतिसाद देत नाही. बर्‍याच वेळी कंपू सदस्य हे त्यांच्या विद्वत्ततेच्या प्रमाणपत्रामुळे बराच माज करताना दिसतात्,मी म्हणतो काय उपयोग त्याचा ? करा त्याची सुरनळी आणि घ्या... ! ;) असो... तुम्हाला जर अशा लोकांकडुन आणि कंपूकडुन त्रास होत असेल तर एक सोपा आणि जालिम उपाय सांगतो, तो म्हणजे संपूर्ण बहिष्कार ! त्यांच्याशी बोलु नका,त्यांच्या लेखांना प्रतिसाद देउ नका,त्यांच्या खरड वहीत डोकावु नका,( तिथे चांगल असं काही वाचायला मिळण्या पेक्षा काड्या-लावण्याच्या चर्चा जास्त दिसण्याची शक्यता अधिक) आणि अशा मंडळीची मानसिक अवस्था खालावली आहे असे समजा आणि तुमचे मानसिक स्वास्थ न-बिघडुन देण्यासाठी यांचा संग टाळा. यावर देखील जर तुम्हाला अगदीच सहन झाले नाही आणि वैताग आला तर, योग्य शब्दात त्यांची चांगली "पाचर" मारावी, योग्य तो परिणाम साधला जातो.

पैसा गुरुवार, 08/16/2012 - 19:31
१. दुर्लक्ष करा. २. आजारी मूल किरकिर करतं, तसा किरकिर करणारा माणूस आजारी आहे आणि लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करत आहे हे समजून थोडं सहनशील व्हा. ३. किरकिर हा शेजार्‍याच्या घरात आपल्यासाठी लावलेला रेडिओ आहे असं समजून वेन्जॉय करा. ४. आपणही आधीच किरकिर सुरू करा. ५. वाद घाला. ६. भाई लोगकडे तक्रार करा. ७. पुन्हा दुर्लक्ष करा. :D

कवितानागेश गुरुवार, 08/16/2012 - 19:44
त्यापेक्षा त्यांना खरे काय ते सांगून टाकावे. त्यांना बुडवण्यासाठी केलेले आपले सगळे प्लॅन्स त्यांनाच सांगून टाकावेत. सरळ समोरुन पोटात मारावे, पाठीत मारु नये! :P

रेवती गुरुवार, 08/16/2012 - 20:46
दया करा हो अशा लोकांन्वर! या समाजात मनाने चांगले , वाईट, माझ्यासारखे प्रेमळ तर कसाबासारखे दुष्ट, आनंदी, किरकिरे, अति लक्ष देणारे, दुर्लक्ष करणारे, गरीब, श्रीमंत, इ. प्रकारचे तसेच उपप्रकारचे लोक असतात. सगळ्यांन्ला इथे स्थान आहे (मिपावर नव्हे, समाजात म्हणायचय मला!). आपणही कोणत्यातरी गटात 'मोडतो'. तेही आपल्याला अशीच नावे ठेवत असतात. दुसर्‍याला नावे ठेवल्याने आपला दिवस किती चांगला जातो याची तुम्हाला कल्पना आली असेलच. दुसर्‍याने आपल्याला जमिनीवर आणेपर्यंत आपण स्वत:ला 'शहाणे' समजू शकतो हा मोठा आनंदच! ;)

In reply to by स्पंदना

रेवती Fri, 08/17/2012 - 07:48
जर्रा म्हणून जगू देऊ नका आम्हाला! ;) त्या तै नवीन आहेत म्हणून 'फक्त सदस्य' असल्याच्या तोर्‍यात गेले तर तुम्ही आमचे गुपित सांगून मोकळ्या झालात. हो हो सासंबै आम्ही आपले मदतनीस आहोत. ;) (घ्या राबवून!)

आबा गुरुवार, 08/16/2012 - 20:52
'किरकिर्‍या' लोकांबद्दल 'किरकिर करण्यासाठी' काढलेला हा धागा आवडला ! :)

मनीषा गुरुवार, 08/16/2012 - 22:05
अशा कुरकुरीत लोकांमुळे तर काही वेळा आपलं आयुष्य सुसह्य होतं. त्यांची कुरकुर ऐकता ऐकता आपल्या तक्रारी मनातच राहून जातात. माझी तरी अशा किरकिर्‍या लोकांबद्दल काहीच तक्रार नाही.

सांजसंध्या Fri, 08/17/2012 - 10:21
प्रत्यक्षातले किरकिरे लोक असं म्हणायचं होतं. अआ ( अतृप्त आत्मा) तुमचं बरोबर आहे. नेटवर आपण सहजच दुर्लक्ष करतो. पण ख-या आयुष्यात जमत नाही. उलट प्रॉब्लेम्स होतात. साबा किंवा साबु जर असे असतील तर काय करणार ? बॉस किंवा मग आणखी कुणी ज्यांना तोंड द्यावेच लागते. नेटवरचे लोक इथे वागतात तसे प्रत्यक्षात असतीलच असं काही सांगता येत नाही.

इरसाल Fri, 08/17/2012 - 11:10
१.सतत किर्किर केल्याने शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल संतुलित रहाते. २.ह्रूदय विकाराचा धोका कमी होतो. ३.लोक त्रास द्यायला येत नाहीत त्यामुळे मनःशांती ढळत नाही. ४. स्वतःचे उपद्रवमुल्य वाढते. ५.वाढीव उपद्रवमुल्यामुळे पत सुधारते छुट्पुट तर आजुबाजुला फिरकतही नाहीत. ६.प्रस्थापितही थोडेसे टरकुन असतात. ७. कातडी कमावण्यास मदत होते. ( फल स्वरुप गेंड्याची कातडी बनते) ८. "कोणी निंदा कोणी वंदा किरकिरणे हाच माझा धंदा " असा अध्यात्मिकभाव वाढीस लागतो. ९. जालावर ह्या समुहाची संख्या जास्त असल्याने "कंपु" बनविण्यास कमालीची मदत होते. १०. हा संसर्गजन्य रोग असल्याने बाकीचे वाटेला जाण्यास घाबरतात त्यामुळे "वन मॅन किर्किरा" ही पदवी आपसुक खिश्यात्/पदरात्/ ओढणीत्/जिन्सात्/लेंग्यात्/धोतरात (काय र्‍हायले काय?) पडते.

In reply to by अविनाशकुलकर्णी

बॅटमॅन Sun, 08/19/2012 - 01:06
"काटाकिर्र टांगापल्टी घोडी फरार मालक बेपत्ता" हे लघुवृत्ती एकश्लोकी महाकाव्य कुणा अज्ञात वाल्मिकीने आधीच रचलेले आहे.

अमावास्येची रात्र .कुट्ट काळोख ,कट झाला पत्ता शुभ्र वस्त्रा कोण हि?डोक्यात का कुट ,हाती बत्ता . म्हसणात जळते मढे ,कोण खपला असे गलबत्ता "काटाकिर्र टांगापल्टी घोडी फरार मालक बेपत्ता"