Munich Massacre...
बनावट किल्लीच्या सहाय्याने दहशतवाद्यांनी इमारतीत प्रवेश मिळवला. प्रवेश मिळाल्यानंतर काही मिनीटातच अत्यंत चपळाईने हालचाली करत सगळेजण ग्रेनेड, पिस्टल्स आणि राईफल ने शस्त्रसज्ज झाले. हा सगळा साठा स्पोर्ट्स बॅगांमध्ये लपवला होता. दहशतवाद्यांनी आता मोर्चा खेळाडूंच्या खोल्यांकडे वळवला व हाती असलेल्या किल्ल्यांच्या सहाय्याने दरवाजे उघडण्याची खटपट करू लागले. या आवाजाने एक रेफ्री - Yossef Gutfreund जागा झाला. दारापाशी होणारा आवाज व गडबड कशाची आहे हे पहायला गेल्यावर त्याला दारातून आत येण्याचा प्रयत्न करणारा व चेहरा झाकलेला एक दहशतवादी दिसला व त्या दहशतवाद्याच्या हातातील AKM (AK-47 चे एक भावंड) राईफल ही डोकावत होती. Yossef ने ओरडून आपल्या सहकार्यांना जागे केले, एक जड वजन दरवाज्याच्या आतील बाजूने लावले व हाताने दरवाजा घट्ट बंद करून मदतीसाठी आरडाओरड करू लागला.
हे आवाज ऐकून वेटलिफ्टींग कोच Tuvia Sokolovsky एक काचेची खिडकी तोडून पळून गेला.
८ दहशतवाद्यांच्या ताकतीपुढे एकट्या Yossef चे प्रयत्न अपुरे पडले व दहशतवाद्यांनी खोलीत प्रवेश मिळवला. Yossef ला बंदी बनवून ते बाकीच्या खेळाडूंचा शोध घेवू लागले. पुढचा नंबर होता Yossef एक सहकारी Moshe Weinberg . या कुस्तीच्या कोच ने प्रतिकार करायचा प्रयत्न केला, एका दहशतवाद्याने Moshe च्या गालात गोळी मारून त्याला जखमी केले व त्याला सोबत घेवून आणखी खेळाडूंचा शोध सुरू केला. यादरम्यान काही इस्रायली खेळाडू काय घडते आहे याचा अंदाज आल्याने मिळेल त्या मार्गाने पळून गेले.
Moshe ने प्रसंगावधान राखत या दहशतवाद्यांना दुसर्या खोलीकडे न नेता सरळ तिसर्या खोलीमध्ये नेले जिथे सहा रेसलर्स आणि वेटलिफ्टर्स होते. कदाचित् Moshe ला त्या सशक्त खेळाडूंकडून प्रतिकाराची अपेक्षा असावी पण ते सर्वजण झोपेतून नुकतेच जागे झाल्याने गोंधळून गेले व कोणताही प्रतिकार न करता दहशतवाद्यांच्या स्वाधीन झाले.
Moshe व सर्व ओलीस घेवून दहशतवादी पुन्हा पहिल्या खोलीकडे येताना Moshe ने पुन्हा हल्ला करून एका दहशतवाद्याला बेशुध्द केले व दुसर्यावर तिथल्याच एका सुर्याने वार केले. दहशतवाद्यांनी बंदूकीच्या सहाय्याने Moshe ला शांत केले - कायमचे.
आणखी एक वेटलिफ्टर Yossef Romano ने ही प्रतिकार करून एका दहशतवाद्याला जखमी केले पण लगेचच Yossef वर गोळ्या झाडून त्याचाही कायमचा बंदोबस्त केला गेला.
या गडबडीचा फायदा घेवून दहशतवाद्यांच्या ताब्यात असलेला Gad Tsobari हा रेसलर सुटका करून घेवून पळून जाण्यात यशस्वी झाला.
दोन खेळाडू ठार व नऊ जण ओलीस.
रक्ताळलेली सकाळ उजाडली.
हळूहळू एक एक गोष्टी उजेडात येवू लागल्या. "ब्लॅक सप्टेंबर" या पॅलेस्टाईन गटाच्या दहशतवाद्यांनी हे सगळे घडवून आणले होते. अपुरी व ढिली संरक्षण व्यवस्था आणि एका बाजूला असलेले इस्रायली खेळाडूंचे अपार्टमेंट याचा पुरेपूर फायदा घेत दहशतवाद्यांनी हा रक्तपात घडवून आणला होता व इस्राईल पॅलेस्टाईन संबंध बघता हा रक्तपात इथेच थांबणार नाही याचीही सर्वांना खात्री पटली होती.
दहशतवाद्यांच्या हातात नऊ निष्पाप खेळाडू सापडले होते आणि केवळ त्यांचे "ज्यू" व "इस्रायली " असणे दहशतवाद्यांना पुरेसे होते.
Ze'ev Friedman (वेटलिफ्टर)
David Berger (वेटलिफ्टर)
Yakov Springer (वेटलिफ्टींग जज)
Eliezer Halfin (रेसलर - कुस्तीपटू)
Yossef Gutfreund (रेसलींग रेफ्री)
Kehat Shorr (शूटींग कोच)
Mark Slavin (रेसलर)
Andre Spitzer (फेन्सींग कोच)
Amitzur Shapira (ट्रॅक कोच)
या नऊ खेळाडूंच्या हातापायांना व नंतर एकमेकांना बांधून त्यांचा संपूर्णपणे ताबा घेवून दहशतवादी पुढच्या कामाला लागले. सर्व खेळाडूंनी आपले भवितव्य हताशपणे नियतीकडे सोपवले होते.
प्रतिकार करणार्या Moshe Weinberg च्या गालावर गोळी मारून त्याला जायबंदी करणार्या व नंतर त्याला निर्दयीपणे ठार मारणार्या दहशतवाद्यांचा कृरपणा खेळाडूंना बंदी बनवल्यानंतरही सुरूच राहिला. बंदूकीच्या धाकाने काही खेळाडूंना अत्यंतीक मारहाण केली गेली, घृणास्पद प्रकार म्हणजे आधीच मरण पावलेल्या Yossef Romano चे गोळ्यांनी चाळण झालेले व रक्ताने माखलेले शव बंदी खेळाडूंच्या पायाशी आणून टाकून दिले गेले, या सर्व खेळाडूंना जरब बसावी म्हणून.
दहशतवाद्यांनी मागण्या जाहीर केल्या. इस्रायलच्या ताब्यात असलेल्या २३४ पॅलेस्टीनीयन कैद्यांची सुटका करून त्यांना इजिप्तला पोहोचवणे व जर्मनीच्या ताब्यात असलेल्या दोन कैद्यांची सुटका.
इस्रायलने त्यांच्या त्या वेळच्या धोरणाप्रमाणे लगेचच नि:संदिग्ध शब्दात उत्तर दिले..
"कोणत्याही वाटाघाटी केल्या जाणार नाहीत"
(एकदा वाटाघाटी करण्याचे धोरण अवलंबले की भविष्यातली परिस्थीती आणखी गुंतागुंतीची होते हा या धोरणामागचा विचार!)
आपल्या मागण्यांमागचा गंभीरपणा अधोरेखीत करण्यासाठी दहशतवाद्यांनी Moshe चे मृत कृरपणे अपार्टमेंट बाहेर टाकून दिले.
सर्व ओलीस ज्यू असल्याने जर्मनी ची अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली. जर्मनी ने ज्यू खेळाडूंच्या बदल्यात अमर्यादीत पैसा देवू केला, उच्चपदस्थ जर्मन ऑफिसर्स ओलीसांच्या बदल्यात ओलीस म्हणून देवू केले पण दहशतवाद्यांनी आपला निर्णय बदलला नाही.
वाटाघाटी करण्यास नकार देणारा इस्राईल..
निर्णय न बदलणारे दहशतवादी..
जर्मनीचे त्यावेळचे नेतृत्व..
संपूर्ण ऑलंपीक..
आख्खे जग..
काहीतरी चमत्कार घडून हे कोडे सुटावे, ही परिस्थिती बदलावी अशी इच्छा करत होते.. आपआपल्या देवांना प्रार्थना करत होते...
(क्रमश:)In reply to सुंदर लेख by अमोल खरे
In reply to Steven Spielberg... by मोदक
In reply to Steven Spielberg... by मोदक
In reply to सुंदर लेख by अमोल खरे
In reply to सुंदर लेख by अमोल खरे
In reply to सुंदर लेख by अमोल खरे
In reply to इस्त्राईलने पॅलेस्टाइन by शिल्पा ब
In reply to वादाचा मुद्दा आहे तो... by मोदक
In reply to अॅज युज्वल मस्त by प्यारे१
In reply to +१ मलापण इस्त्रायलबद्दल by कवितानागेश
मलापण इस्त्रायलबद्दल अभिमान वाटतो!आता यातून भारतानेही इस्त्राएलसारखेच करावे इत्यादी तुणतुणे वाजायला लागले नाही म्हणजे मिळवलं.
In reply to लेख आवडला by पुण्याचे वटवाघूळ
भारतानेही इस्त्राएलसारखेच करावेकरावेच. पण भारत आपलीच राज्यघटना भारतात घडलेल्या गुन्ह्यांसाठी गुडांळुन ठेवायची किंमत देऊच शकत नाही, नाहीतर देशात राष्ट्रपती राजवट लागु करायची वेळ त्वरीत येइल. आणी भारतीयांसोबत फक्त भारता बाहेरच नृशंस गुन्हे घडवेत अशी अजुन तरी परीस्थीती नाही. तरीही सर्वबाजुने शत्रुनी वेढलेले असताना इस्त्रायलचे खरोखर कौतुक वाटते. विषेशतः जेव्हा अरबांनी ६ दिवसांच्या युध्दात चक्क अत्याधुनीक शस्त्रांचा वापर करु शकतो हे दाखवुन जगाला चकीत केलेच पण इस्त्रायलचे अस्तित्वही जवळपास(?) धोक्यात आलेले होते त्यातुन शिकलेला धडा ते आजही विसरले नाहीत ते बघता व भारतीय लोक इतिहासापासुन जे शिकतात ते बघता भारतानेही इस्त्राएलसारखेच करावे वाटले तर फार काही गैर वाटत नाही.
In reply to भारतानेही इस्त्राएलसारखेच by आत्मशून्य
In reply to भारत-इस्त्राएल तुलना नको by पुण्याचे वटवाघूळ
In reply to थत्तेचाचांचे विचार ऎकण्यास by अन्या दातार
In reply to +१ by गणामास्तर
In reply to एण्टेबी by नितिन थत्ते
In reply to अवांतर... by मन१
In reply to +१ अन इस्त्राईलला by शिल्पा ब
In reply to +११ by मैत्र
In reply to +११ by मैत्र
भारतीयांना अरब विरोधी / मुस्लिम विरोधी म्हणून आणि आपल्या बोटचेप्या परराष्ट्र धोरणापेक्षा कणखर इस्राईल हा खूप महान वाटतो. पण इस्राईल ने केलेले अत्याचार कुठे पोचत नाहीत.इस्त्राएलने पॅलेस्टिनींची जमिन कशी हडपली याचे एक साधे उदाहरण देतो. मी हिरव्या देशात एका विद्यापीठात होतो. ते विद्यापीठ सोडून दोनेक वर्षे झाल्यानंतर आम्ही सगळे मित्र फोनवर कॉन्फरन्समध्ये बोलत होतो. परत एकदा जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्या विद्यापीठाच्या ठिकाणी सगळ्यांनी जावे असा विषय निघाला. मग राहायचे कुठे हा पण प्रश्न आला. आमच्यातलाच एक इस्त्राएलचा कट्टर समर्थक होता. त्याला इस्त्राएलने नक्की काय केले हे समजावून द्यायला त्याला आमच्यातल्याच एका मित्राने म्हटले होते (अर्थातच sarcastic): "आपण राहत होतो त्या अपार्टमेन्टमध्ये जायचे. तिथे जे कोणी राहत असतील त्यांना हुसकावून लावायचे आणि म्हणायचे: दोन वर्षांपूर्वी आम्ही इथे राहत होतो आणि देवाने हे अपार्टमेन्ट आम्हाला दिले आहे म्हणून हे अपार्टमेन्ट आमचे. आणि तिथेच राहायचे". इस्त्राएलने पॅलेस्टिनी लोकांबरोबर नेमके हेच केले. इथे फरक एवढाच की २ वर्षांपूर्वी आम्ही राहत होतो ऐवजी २००० वर्षांपूर्वी आमचे पूर्वज इथे राहत होते आणि देवाने ती जमिन आम्हाला दिली आहे म्हणून ती जमिन आमची असे म्हणत तिथे पिढ्यानपिढ्या राहत असलेल्यांना हुसकावून लावले गेले. आपल्यापैकी अनेक लोक हा इतिहास लक्षात घेत नाहीत किंवा घेतला तरी जे लोक हुसकावले गेले त्यापैकी बहुसंख्यांचा धर्म एक विशिष्ट होता म्हणून त्याकडे काणाडोळा करतात (एकेकाळी मी पण त्यातलाच होतो हे खेदाने नमूद करावेसे वाटते.)
In reply to इस्त्राएलने नक्की काय केले? by क्लिंटन
In reply to इस्त्राएलने नक्की काय केले? by क्लिंटन
In reply to हुश्श... by मन१
In reply to इस्राइल जे काही करतोय ते by गणामास्तर
In reply to >>पॅलेस्टींनीं चा प्रश्न धसास by नितिन थत्ते
In reply to सुरेख by सुनील
In reply to http://www.youtube.com/watch? by शिल्पा ब
In reply to नोप्स... by मोदक
या वाईट प्रसंगाची माहिती