'आम्ही ऑलिम्पिक बघितले' : लंडन २०१२ तिकीट - फ्रॉड (झोल) वेब साईट
लंडन २०१२ ची तिकिटे resale ला ठेवली आहेत असे समजले. दीड वर्षापूर्वी लंडन २०१२ official वेब साईट वर रजिस्टर करूनही (कोणत्याही खेळाचे) तिकीट मिळाले नाही, म्हणून खूप वाईट वाटत होते...आणि रागही येत होता (विशेषतः टीवी वर ऑलिम्पिक खेळ होताना 'रिकाम्या सीट्स' बघून मनात नुसता राग खवळत होता). लंडन मध्ये असूनही एकही ऑलिम्पिक खेळ बघायला न मिळणे म्हणजे काय? (घोर अपमानच तो ;p)....त्यात भरीस भर म्हणून भारतामधील सगळे मित्र मंडळी येवून जाऊन तेच विचारात होते, अरे तुम्ही तिकडे असून ऑलिम्पिक बघायला नाही गेलात.....(शी.....अजूनच अपमान...)
शेवटी ठरवले कि काही झाले तरी एक तरी olympic event बघायचाच! मग काय आपल्या 'गूगल' रावांची मदत घेवून शोधले, कि तिकिट्स कुठे मिळतील (लंडन २०१२ ची official वेब साईट सोडून कारण हि म्हणजे एकदम फालतू वेब साईट असा 'त्या क्षणाचा' समज!)...
'गूगल' रावांनी नंबर १ ला जी वेबसाईट दाखवली त्यावर (google analytics / key words वर भरवसा ठेवून) 'मोठ्या' विश्वासाने 'क्लिक' केले, तर तिथे बर्याच खेळाची तिकिटे 'उपलब्ध' म्हणून दाखवत होता...मग काय नवरोबा online होत्तेच, त्याला विचारले कुठल्या खेळाला जायचे सांग? विशेष म्हणजे माझ्या समोर 'उपलब्ध' तिकिटे पटापट कमी होताना दिसत होती, नवर्याला म्हटले पटकन ठराव तिकिटे कमी होत आहेत...म्हणून लगेच (हावरता सारखे) 'Women Fencing' ची २ तिकिटे बुक केली, किंमत 45£ - 'क्रेडीट कार्ड' ने पेमेंट केले....
लगेच माझ्या इमेल वर त्या कंपनी कडून मेल आला... Booking Confirmation and xxxx this is your Userid and Password to login & check status... मी खुश....लगेच नवर्याला forward केला...तो महा खुश!! त्यात भरीस भर 10 मिनिटात दुसरा इमेल आला... Your order is processed and tickets have been put in Post.... wow... मग काय स्वप्न बघायला सुरुवात... किती वाजता घरून निघायचे, कोण कोणाला सांगायचे (नाचत नाचत), कोणता ड्रेस घालायचा (मुलींना पडणारा नेहमी चा प्रश्न) आणि मग शेवटी बरोबर काय काय नेवू शकतो? हे नेट वर शोधायला सुरुवात केली.... आणि शोधता शोधता इथे पोचले --> http://www.london2012.com/spectators/tickets/ticket-checker/
अरे बाप रे.... मी जिथून तिकिटे बुक केली ती वेबसाईट -- Known unauthorised websites claiming to offer London 2012 tickets --> च्या यादीत!....मग काय नजरे समोर माझे बँक डीटेल्स आले, सगळे पैसे 'त्या' फ्रॉड कंपनी कडून वापरले गेले तर! झाले.... छातीत धड धड वाढली, आयुष्यात पहिल्यांदा Online fraud मध्ये फसले होते. :(
मग पहिले माझ्या क्रेडीट कार्ड कंपनी ला फोन लावला....बराच वेळ Call Waiting वर.. अजूनच धड धड वाढली. शेवटी एकदाचा तिने फोन उचलला, सर्व account security चेक केल्यावर समोरून विचारले कि, फोन लावण्याचे कारण काय ? (खर्र.. सांगू खूप लाज वाटत होती हे सांगायला कि, मी फसले गेलेय आणि ते हि माझ्याच मूर्ख पणामुळे !) आणि तिला सर्व जसे झाले तसे सांगितले..सर्व खरे खरे! नशिबाने माझ्या क्रेडीट कार्ड मधून पैसे 'त्या झोल' कंपनी ला गेले नव्हते. त्या Call attendent ने माझ्ये कार्ड cancel करायचे सुचवले आणि ते मी केले. नवीन कार्ड २ दिवसात घरी येईल असे बोलली.
थोडी धड धड कमी झाली... पण परत एकदा फोन लावला आणि परत Call Waiting वर.. पण या वेळेस धड धड ओके होती. फोन अटेंड झाला, मी परत सर्व सांगितले आणि विचारले कि, नंतर 'त्या झोल' कंपनीला payment गेले तर? समोरून बोलली कि, सध्या तरी payment झाले नाहीये, नंतर झाले तर Call us back and we will sort it out, Dont Worry! मग एवढी हमी मिळाल्यावर फोन कट केला.
आता मी तिकीट बुक केले, पैसे पे केले आणि नंतर माझे क्रेडीट कार्ड cancel केले आणि भविष्यात 'त्या झोल' कंपनी ला पैसे जाणार नाहीत याची खात्री पण केलेली....त्यामुळे ऑलिम्पिक खेळ पहायची स्वप्ने धुळीला मिळाली होती आणि त्या बरोबरच एक 'धडा' घेतला होता कि, 'Official' website कशाला म्हणतात.
दिवस दुसरा:
मी office वरून घरी आले, पोस्ट वाल्याने माझे पोस्ट शेजारच्या घरात ठेवल्याची पावती दारावर लावलेली. शेजारी जाऊन मी माझे पोस्ट घेतले आणि खोलून पहिले....तर काय...?? त्यात मी बुक केलेली Olympic Women Fencing ची तिकिटे 'त्या झोल(?)' कंपनीने पाठवलेली....!!
शेवट :
आम्ही त्या खेळासाठी गेलो नाही कारण
- आम्ही त्या तिकिटाचे पैसे भरले नव्हते...(हो आम्ही प्रामाणिक आहोत)
- स्टेडियम वर गेलो आणि तिकिटे खोटी आहेत असे कळले तर... (शी किती लाज निघेल चार चौघात....;p )
- पोलिसांची भीती (जी कोणालाही असतेच.. हो आम्ही घाबरे आहोत !)
तात्पर्य:
आता सध्या official website वरून तिकिटे बुक केली (Paralympic games) साठी....हो आता आमच्या (फुटकळ) नशिबात तेच आहे, त्याला काय करणार...पण 'आम्ही ऑलिम्पिक बघितले' असे सांगून मिरवणार....!!!
वाचने
6399
वाचनखूण
प्रतिक्रिया
35
तात्पर्य बदल...
In reply to तात्पर्य बदल... by स्वरालि
बदल केल्यबद्दल धन्यवाद...
In reply to तात्पर्य बदल... by स्वरालि
पोस्टाने आलेले तिकीट...
:)
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिसाद बद्दल धन्यवाद....
In reply to प्रतिसाद बद्दल धन्यवाद.... by स्वरालि
स्वराली- प्रयत्न छान आहे.
अरेच्या ! आम्हाला वाटत होते
In reply to अरेच्या ! आम्हाला वाटत होते by नाना चेंगट
अवांतर एकदाच हं.
In reply to अवांतर एकदाच हं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझा प्रतिसाद तुम्हाला कळला
In reply to माझा प्रतिसाद तुम्हाला कळला by नाना चेंगट
कळ्ळं कळ्ळं
In reply to कळ्ळं कळ्ळं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे रे !
In reply to अरे रे ! by परिकथेतील राजकुमार
प्रा डॉ सांभाळुन हो
In reply to प्रा डॉ सांभाळुन हो by कुंदन
हा हा ..
In reply to कळ्ळं कळ्ळं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इथे मागच्या काही वर्ष पासून 'गणपती विसर्जनाची'..
In reply to इथे मागच्या काही वर्ष पासून 'गणपती विसर्जनाची'.. by स्वरालि
अरेरे ! वाचून वाईट वाटले.
In reply to माझा प्रतिसाद तुम्हाला कळला by नाना चेंगट
तिथे पाय बुडवू देतात की नाही ते माहित नाही
In reply to तिथे पाय बुडवू देतात की नाही ते माहित नाही by कुंदन
त्यापरीस तुच इकडे ये...
In reply to अवांतर एकदाच हं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
थेम्सचे अंतरंग...
In reply to थेम्सचे अंतरंग... by प्रभाकर पेठकर
अहो तेलच ना? मग काही फरक पडत
In reply to अवांतर एकदाच हं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to प्रा.डॉ.दिलीप बिरुटे by चिंतामणी
+१
In reply to अरेच्या ! आम्हाला वाटत होते by नाना चेंगट
झोल होण्यासाठी
अरे रे...ऑलिंपिक प्रशासनाने
In reply to अरे रे...ऑलिंपिक प्रशासनाने by Dhananjay Borgaonkar
हीच काय ती दखल घेतली...
ऑफिशियल वेबसाईट
In reply to ऑफिशियल वेबसाईट by सानिकास्वप्निल
रीसेल
अरेरे ब्याड लक! पण तिथे पैसे
छान सुंदर अनुभव कथन.
In reply to छान सुंदर अनुभव कथन. by ५० फक्त
तात्पर्य बदल...
छान खुसखुशित शैलीत लिहिलं
In reply to छान खुसखुशित शैलीत लिहिलं by बिपिन कार्यकर्ते
धन्यवाद.....!
छान!
In reply to छान! by पैसा
धन्यवाद.....!
ठीक ए! पण ही तिकीटं खोटी आहेत
In reply to ठीक ए! पण ही तिकीटं खोटी आहेत by शिल्पा ब
तर खेळ बघायचा नाही....