प्रबळ ट्रबल
प्रचंड लांबीचा असा अवाढव्य डोंगर .. बाजूलाच कलावंतीण सुळका !!
२.
पायथ्याशी एका वडाखाली बायका लावल्या आणि हुंदडत वर निघालो ..
३.
४.
अर्धा एक तास चालल्यावर एका वळणावर न्याहारी उरकली .. बाजूनेच एक कातकरी चाललेला त्याला विचारल प्रबळ गड किती वेळ ? म्हणाला ३ तास .. आमची हवा टाईट.. आम्ही खूपच आरामात होतो ... मग वेग पकडला आणि झपाझप वर आलो
५.
मारुतीराया आणि गणपती
६.
इथे जरा श्रम परिहार केला :)
७.
.. साधारण एक तासात "प्रबळ माची " गाठली ..
८.
चायला समोर पाहिल्यावर हैराण झालो .. जेवढ वर चढून आलेलो त्याच्या इतकाच अजून कडा चढायचा होता. रस्ता माहित नाही ..
एका बाजूला कलावंतीण आणि त्या बाजूला प्रबळ
९.
असंच विचारात विचारात शेताडीतून निघालो. पण एक तास झाला तरी प्रबळ जवळ यायची चिन्ह नाहीत .. आम्ही बरोबर समांतर चालतोय .. तेवढ्यात एक माणूस दिसला त्याला विचारलं. तर म्हणाला रस्ता चुकलात .. परत मागे माचीत जा... आयला . .सगळे हबकलेच . एवढ १ तास चुकीच चाललो म्हणजे .. आता मागे जाण्यात परत तेवढाच वेळ .. काय करायचं ? त्याला विचारलं असाच पुढे रस्ता नाही का? तर म्हणाला नाही.. तसा एक आहे खिंडीतून .. पण त्याबाबतीत तो आग्रही दिसला नाही .. तरी आम्ही मागे ण फिरता पुढे रस्ता दिसतोय का ते पाहायला निघालो .. परत १५ मिनिट चाललो .. शेवटी प्रबळ गडाच दुसर टोक दिसायला लागल .. पण आम्ही अजूनही समांतर .. भिडायचं कस ;) तिथे दोन तीन शाकारलेली घर होती .. तिथे जरा एक ब्रेक घेतला .. थोडी खादाडी केली .. काय करायचं ? आता मागे जायलाच हव होतं. घड्याळाचा काटा १०.३० दाखवत होता. शेवटी सर्वांचा निर्णय झाला .. आज काहीही झालं तरी प्रबळ सर करायचाच .. मग काय " हर हर महादेव"!!! झपाझप उड्या मारत मागे सुटलो .. प्रबळ माची पहिलं टार्गेट ठेवलं. येताना अर्ध्या तासात मागे आलो .. तिथल्या एका शेतकऱ्याला रस्ता विचारला .. तर नशीब तो यायला तयार झाला .. त्याने एक वाट दाखवली .. पण हि वाट आहे? असा प्रश्न जवळ जवळ सर्वांना पडला.. भयंकर जंगल .. सर्व बाजूने किर्र रान आणि भयानक चढ .. मधेच एक धबधबा होता.. त्यात पाणी नव्हत .. त्याच्यातून वाट काढत वर जायचं होत ... आता मात्र सिद्धूने धीर सोडला .. त्याच्या बिचार्याचा पहिलाच ट्रेक होता .. आणि हे अस प्रचंड काहीतरी समोर होतं. कसे बसे मान खाली घालून चढायला लागलो .. किती वेळ चढतोय काही कळत नव्हत.. किस्नू आणि अल्पेश पुढे होते सौरभ मध्ये .. मी आणि हर्शल सिद्धुला हात देत वर घेत . हळू हळू येत होतो .. अजून एक चेक पोइंत आला.. इथे बसायला थोडी जागा होती .. आता बाजूला उंच कडा ..
१०.
११.
१२.
१३.
आणि समोरून येणार प्रचंड धुकं.. पाहता पाहता आम्ही त्या धुक्यात हरवून गेलो... अवर्णनीय अनुभव होता.. पाऊस नसल्याने आलेला थकवा त्या गार धुक्याने घालवून टाकला .. परत चढाइला सुरुवात केली . सिद्धूची हालत अतिशय वाईट झालेली होती.. आता तो परत मागे फिरतो का काय अस वाटत होत . पण नाही पट्ट्या चढला वरती .. कधीतरी १२.३० च्या सुमारास वर आलो ...
आखिर कार.... WE HAVE DONE IT . प्रबळ सर झाला "याच साठी केला होता अट्टाहास " अशा भावना होत्या ...वर तर अक्षरश: नंदनवन फुललं होतं ... लुसलुशीत गवताची मलमली चादर अक्ख्या कड्यावर पसरली होती... प्राचीन वाटणारं जंगल .. त्यातूनच उफाळलेला गूढ धुक्याचा लोट ... मग तब्येतीत बसलो .. जेवणाची वेळ झालेली होती .. मेनू फर्मास होता . पुलाव, पोळी भाजी , थालीपीठ , सोन पापडी, किसान फेम "शंकर पाळे" ..
१४.
१५.
१६.
तडस लागेपर्यंत बकाबका जेवलो .. मस्त झर्याचं पाणी प्यायलो . आणि गड भटकायला निघालो ..
धुंद रान
१७.
१८.
१९.
२०.
आमच्याशिवाय वर बाकी कोणीही नव्हतं .. नुसत रान माजलेलं होतं .. वाट फुटेल तसं चालत होतो .. आणि एका क्षणाला त्या रानातून बाहेर मोकळ्यावर आलो ......
समोरच दृश्य भान हरपून टाकणार होतं.. समोर प्रचंड पसरलेली दरी .. आणि बाजूलाच दिसणारा कलावंतीण.. धुक्यामुळे अगदी क्षण दोन क्षण दर्शन होत होतं .. पण .. शब्दात सांगता येणार नाही असा आनंद झाला होता..
२१.
२२.
त्या पठारावरच आडवे झालो .. तेवढ्यात एक काका आले.. एकटेच आले होते .. गावातल्या एका छोट्या गाईड ला घेऊन . त्यांच्याबरोबर गप्पा टप्पा सुरु झाल्या . तेही ठाण्याचेच होते . १०० व्या वर गड फिरले होते .. आणि मजा म्हणजे ते नेहमी एकटेच फिरायला जातात .. :) त्यांनी आम्हाला गडावरील अजून एक दोन ठिकाण दाखवली . एक म्हणजे गणरायाचं प्राचीन मंदिर आणि दुसर म्हणजे गोड्या पाण्याचं कुंड.
२३.
२४.
हे सगळ बघून झाल्यावर खाली उतरायला लागलो .. बाप्परे .. आता धमाल येत होती .. पायांनी साथ सोडून दिलेली होती.. कसे तरी रेटत खाली उतरत होतो .. माची गाठल्यावर परत चहा वेग्रे प्यायलो .. आणि काकांचा निरोप घेतला . हा अवलिया आज मुक्काम करणार होता आणि उद्या कलावंतीण करणार होता . पाऊस नसल्याने भिजणं झालेलं नव्हत. मग येताना दिसलेल्या एका ओढ्यात डुंबून घेतलं. परत उतारावरून कसबस सावरत खाली येणं.. पण एकमेकांची हालत बघून हसायला धमाल येत होती . येताना कृष्णाच्या देवळात जाऊन आलो . सुरेख देऊळ बांधलंय.
२५.
बाहेर आल्यावर सुसाट डोंबिवलीला सुटलो .
एकूण प्रबळ ने आमची चांगलीच परीक्षा घेतली , पण सर्वजण चांगल्या मार्कांनी पास झालो :)
*प्रकाश चित्र श्रेय : सौरभ उपासनी
In reply to पायथ्याशी एका वडाखाली बायका by ज्ञानोबाचे पैजार
In reply to पायथ्याशी एका वडाखाली बायका by ज्ञानोबाचे पैजार
In reply to स्पांडुरंगबुवा अप्रतिम केलात by अत्रुप्त आत्मा
विक्रांत कुलकर्णी .
त्यांना मिपाच आमंत्रण दिलेलं आहे :)In reply to कुंडाचा फोटो हरवला आणि हे by स्पा
In reply to हायला...काय माणुस हाय राव...! by अत्रुप्त आत्मा
पायथ्याशी एका वडाखाली बायका लावल्या आणि हुंदडत वर निघालो ..हे वाक्य पहिल्यांदा बाचून चुकल्यासारखं वाटलं आणि २-३ वेळा वाचून खात्री करून घेतली की बायका नंतर भेटल्या, दिसल्या इ. क्रियापद तर नाही ना. हुच्च विनोद साधला आहेस.
In reply to मस्त रे. by परिकथेतील राजकुमार
In reply to गणेशाने आयत्यावेळी टूल्ली by ५० फक्त
अगदी अपेक्षित वाक्यंया बद्दल बोलतोच. आधी स्पा आणि टीम चे अभिनंदन .. फोटो घरी जाऊन नक्की बघेन, आता दिसले नाहित. -------- हा तर काय .. मी काही टुल्ली फिल्ली दिलेली नाही.. एक तर कलावंतीन १७ जनांना विचारुन कॅन्सल मीच करायला लावला.. एक तर नवखे लोक घेवुन जाता आणि वर ट्रेक हार्ड आहे की नाही ते पण पहात नाहीत. हे चुकीचे आहेच.. त्यात आमच्या कडे सँडल होता शूज नव्हते यावेळेस.. दूसरी खरी गोष्ट म्हणजे स्पा ला घरा जवळचाच गड हवा होता, सुधागड, विसापुर, कर्नाळा असे ऑप्शन पण नको होते, आणि मला पुण्यात यायचे होते नंतर, त्या मुळे प्रबळ गड ठरल्यामुळे वेळ लागणार हे माहित असल्याने मी आलो नाही, आणि ठरल्या ठरल्या मी नाहि सांगितले, त्यामुळे ऐनवेळी वगैरे सगळे खोटे आहे... आता प्रबळ करुन पुन्हा बाईक वर पुण्याला जायला वेळ लागला असता, उलट मला वाटले होते नवे लोक असताना सोपा सहज करण्यायोगा गड निवडला जाईन. असो थांबतो .. वरती टुल्ली दिली या वाक्यामुळे कीती लिहावे लागले बघ असो .. पुढील ट्रेक साठी शुभेच्छा
In reply to अगदी अपेक्षित वाक्यंया बद्दल by गणेशा
In reply to अगदी अपेक्षित वाक्यंया बद्दल by गणेशा
In reply to खुलासा पटला नाही. by मोदक
गणेशाने (नेहमीप्रमाणे!) टुल्ली दिली या मताशी सहमत.त्याने टुल्ली दिली हे ठिक रे. पण आता तु त्यात अजुन किल्ली का फिरवतो आहे.? ;)
In reply to गणेशाने (नेहमीप्रमाणे!) by किसन शिंदे
In reply to चचा(लिध्)मोड ऑन -- त्याने by ५० फक्त
चचा(लिध्)मोड ऑन -- त्याने दिली टुल्ली तु का फिरवतो किल्ली कुठे आहे स्पाची हिरव्या डोळ्याची बिल्ली चचा(लिध्)मोड ऑफ --:D हजरजबाबी ५०!
In reply to चचा(लिध्)मोड ऑन -- त्याने by ५० फक्त
In reply to गणेशाने (नेहमीप्रमाणे!) by किसन शिंदे
In reply to मस्त रे स्पा. by अर्धवटराव
In reply to हाहाहा! by पैसा
बायका परत आणल्या की नाही याबद्दल काही लिहिलं नाहीस ते?बायकांनी त्यांना परत आणलं! वृत्तांत आणि फोटो दोन्ही आवडले.
धुक्यात लपेटलेली कलावंतीणची मागची बाजू.
'फोटोसेशन' ;)
मुंग्यांच वारूळ.
काहितरी नाव दिसतंय. बहुतेक प्रबळगड असावं.
वरच्या फोटोत बाप्पा आणि मारूतीराया एकत्र दिसत नाहियेत ते इथे दिसतात.
प्रबळगडाच्या पायथ्याशी असणार्या माचीवरून कलावंतीण आणि प्रबळगडाच्या मध्ये असणारा हा 'V' दिसतो.
एके ठिकाणी दगडात कोरलेला हा मेंढाही आढळला.
In reply to किल्ले प्रबळगड!! by किसन शिंदे
In reply to किल्ले प्रबळगड!! by किसन शिंदे
In reply to किल्ले प्रबळगड!! by किसन शिंदे

In reply to किल्ले प्रबळगड!! by किसन शिंदे
In reply to माझा गणेशा झाला रे by प्यारे१
In reply to कलावंतीणीचा प्लॅन केलेलात ना by गवि
In reply to स्पावड्या... by मोदक
In reply to मुक्कामाची तयारी (पक्षी : by ५० फक्त
In reply to आज फोटो नीट पाहीले. सगळेच by कवितानागेश
मस्त रे ...