मिपा ट्रेंड्स - २
भाग १
नमस्कार मंडळी,
मला ही लेखमला बनवायची नाहीये.. (कारण अभ्यास दांडगा नाही, मी अधुन मधुन रजा घेत असतो)
उर्वरीत अध्याय लिहिण्याचा प्रयत्न करतोय. चु.भु.दे.घे. मागील भागातील डिस्क्लेमर इथेही लागू आहे. :)
वाचक/प्रतिसादक अध्याय टंकाळा आल्याने अर्धाच राहिला होता.. त्याचा विस्तार
वाचक/प्रतिसादक विस्तार
मागील अध्यायात आपण काडीसारक, प्रामाणिक आणि फ्रस्टेटेड प्रतिसादक पाहिले. अधुन मधुन फेक प्रतिसादांचा देखील ट्रेंड येत असतो. म्हणजे व्यनीतुन प्लॅन ठरवून मग परस्पराविरुद्ध प्रतिसाद दिले जातात, बर्याचदा आपल्याच कंपूतील व्यक्तीच्या धाग्यावर हे केलं जातं. याने धाग्याची टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न केला जातो किंवा मुद्दाम वादविवाद वाढवले जातात. हाच प्रकार बर्याचदा दुसर्या कंपुतल्या सदस्याच्या धाग्याचा खरडफळा करण्यासाठीही वापरला जातो, इथे संपादकांची मर्जी संभाळून प्रतिसाद दिले जातात, म्हणजे संपादकाला हे प्रतिसाद ना निगलते बनते है ना उगलते. म्हणजे हे प्रतिसाद उडवताही येत नाहीत कारण ते धोरणात बसतात आणि ते ठेवायची ईच्छाही नसते.
काही लोकांना "मीच माझे करतो कौतुक" असे म्हणायची सवय असते.. म्हणजे उगाचच स्वतःचा धागा वर आणणे (काही लोकं स्वतःचा डु आयडी काढुन त्याने स्वतःच्या धाग्यावर प्रतिसाद देताना दिसतील), किंवा प्रत्येक प्रतिसादाला धन्यवादाचा प्रतिसाद देऊन संस्थळाचा "रिकामा" (असे समजून) असलेला डेटाबेस भरणे. एखाद्या धाग्यावर खळबळ माजवायची असेल तर काही झोपलेल्या आक्रमक आयडींच्या पोस्ट बॉक्सात लिंका चिकटवल्या जातात.
काही प्रतिसादक हे अतिशय विचारी/बुद्धीजीवी असतात. काथ्याकुटावर हे भरपुर संख्येने आढळतात. विषयाचा पुर्ण विचार करुन त्यावर संयत भाषेत प्रतिसाद मांडणे यांचा सर्वात मोठा गुण असतो. बर्याचदा मूळ लेखापेक्षा यांचे प्रतिसाद जास्त प्रगल्भ असतात आणि प्रसिद्ध होतात.
काही प्रतिसादक लॅकोनिक (मराठी शब्द?) असतात. एखाद्या दुसर्या ओळीतच हे सर्व काही सांगून जातात किंवा अपमान देखील करतात. यांचा प्रेझेंस ऑफ माईंड चांगला असतो पण कधी कधी ओवर काँफीडेंस मधे पंख लागून आणि तम्बी मिळून वायादेखील जातो.
काही प्रतिसादक हे कायमच तुच्छता मनात ठेवून गोड प्रतिसाद देतात.. म्हणजे यांचे "छान" हे कारल्याची भाजी आवडत नसताना कुणी जबरदस्ती तोंडात कोंबली तर तोंड जसे होईल तसे करुन दिलेला असतो. किंवा आधी "भट्टी मस्त जमली आहे", "सु..रे..ख..", "भाषाशैली उत्तम आहे" असे शब्द/वाक्य वापरण्याचा ट्रेंड होता तेव्हा मनात "कसली डोंबलाची भट्टी? याक थु" , "कसलं सुरेख? छ्या", "कसली भाषाशैली? ओकारी येतेय" असे मनात काहीसे चालु असते.
धागाकर्ते
अरे बापरे.. ईमिडिएट रिकर्सीव फंक्शन ;) (असो.. ममो.. खरं लिही.. प्रामाणिकपणे लिही ;) )
हा देखील एक फार मोठा अध्याय आहे. कुठुन सुरुवात करावी हेच कळत नाही. :)
बेचैन धागाकर्ते: : हा ट्रेंड झुरळांप्रमाणे जगात कितीही उलथापालथ झाली तरी स्वतःचे अस्तित्व कायम ठेवुन आहे. हे लोक्स सर्वांना वीट आणतात. हे एकावर एक - अनेक असे रोज स्वतःच्याच कपड्यांचे इतके धागे उसवतात की शेवटी नग्नावस्थेपर्यंत पोहोचतात. मिपाकरांकडे शाबासकी देणार्या हाताखेरीज पोकळ बांबूदेखील आहेत हे त्याना पार्श्वभागावर वळ उठले की मग कळते.
एकोळी टाईपः : घरात येताजाता कधी बडीशोप तोंडात टाकावी तसे वृत्तपत्रातील एखाद्या बातमीची लिंक किंवा एखादा क्लिष्ट विषय स्वतःचे विचार न मांडता धाग्यात चिटकवून तुम्हाला काय वाटते? असे विचारुन निघुन जाणारे. स्वतःचा धागा हे स्वतःदेखील परत कधी उघडतात की नाही माहित नाही.
खळबळ माजवणारे: : मराठी आंतरजाल, स्त्रि-पुरुष भेद करणारे, पुणे-मुंबई वाद, अनिवासी यांच्याशी निगडीत असेल तर उत्तमच. हे धागे टाकणारे आणि त्यावर प्रतिसाद देणारे आयडी ईतर वेळी कुठे असतात असा तुम्हाला प्रश्न पडेल. इथे भरपुर करमणुकीची संधी असते. हो पण मग हसता हसता कधी अचानक सिरिअस होऊन यात सामील झालात तर मग धरलं तर चावतय आणि सोडलं तर पळतयं अशा परीस्थित तुम्ही सापडु शकता.
स्वांतसुखाय : हे धागे वाचले की आंतरजालावर आल्याचे सार्थक होते, आंतरजालावर सगळे धागे असेच का नाहीत असा प्रश्न पडतो. पण हे म्हणजे अजिबात भर्ष्टाचार न कराणारे सरकार मिळावे अशी अपेक्षा ठेवल्यासारखे आहे. या लेखांना प्रतिसाद नेहमी कमी मिळतात, पण वाचकांचं समाधान फार मोठं असतं.
शतकी धागे : शतकी, द्विशतकी किंवा त्रिशतकी धागे हे नेहमीच दंगा घालणारे धागे असतात. अधुन मधुन असे धागे येतात आणि जबरदस्त हिट होतात. मिसळीला फोडणी हवीच ना. या धाग्यातुन धागाकर्त्याला किंवा प्रतिसादकाला केवळ एकच हेतु साधायचा असतो तो म्हणजे दंगा, असे धागे मिळाले की दंगेखोर एखाद्या लहान मुलाला खेळण्याच्या दुकानात नेउन सोडलं तर ते जसं उधळेल तसे उधळतात कारण इथे बरीच मोकळीक असते. संस्थळाची ट्यार्पी मेंटेन करायला हे धागे मदत करतात.
मी लै शाना धागे : मला फार कळतं आणि मी फार ज्ञानी आहे, बाकीचे अकलेचे कांदे आहेत अशी समजूत असणार्या लोकांचे हे धागे असतात. पुर्वी विकिपेडीया वगैरे वरुन माहिती ट्रांसलेट करुन बर्याचदा अनेक बुद्धीजीवी धागे निघत आणि लोकं "वा काय ज्ञानी आयडी आहे" असे म्हणत. काही धागे कुठल्यातरी स्टॅटीस्टीक्स उचलुन आणून काहीतरी गंभीर चालु आहे हे दाखवुन मी समाजासाठी किती मोलाचं कार्य करतो/ते आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. खरं तर या सगळ्यात काहीच तथ्य नसतं पण हे चालु ठेवायचं असतं ईतकच. तत्त्वज्ञानी लोकांबदल आपण मागील भागात विचारजंत या अध्यायात पाहिलेच आहे.
कलादालन्/पाकृ : हा सर्वात प्रामाणिक आध्याय आहे. इथे प्रत्येकामधले मुल स्वतःचे कौतुक करुन घ्यायला येत असते. आणि प्रतिसादही बर्याच प्रमाणात प्रामाणिक मिळतात. पाठ थोपटली जाते. एकापेक्षा एक वरचढ कला असलेले लोकं पहायला मिळतात, कौतुकही वाटते. खल्लास, वारल्या/खपल्या गेले आहे, तोंपासु, बादलीभर लाळ गळाली आहे, जहबहर्या, ई.ई. प्रतिसादांचे टेम्प्लेट मिळाले तर प्रतिसादक नक्कीच खुश होतील. मध्यंतरी पाकृ विभागात प्रत्येक पाकृ ही अंडे घालुन किंवा न घालता कशी करता येईल असा एक ट्रेंड होता. ;)
तुर्तास इतकेच.
धन्यवाद.
आपला मराठमोळा.
वाचन
8618
प्रतिक्रिया
38
सलग दुसरे शतक...
च्यायला , भारी अन अभ्यासपुर्ण
In reply to च्यायला , भारी अन अभ्यासपुर्ण by पियुशा
मी (अन्या दातार) व मी-सौरभ
In reply to मी (अन्या दातार) व मी-सौरभ by अन्या दातार
ओ आमच्या येरियात उगा डोकं नाय
In reply to ओ आमच्या येरियात उगा डोकं नाय by ५० फक्त
आमच्याकडे आंतरजालीय हुतात्मा
In reply to आमच्याकडे आंतरजालीय हुतात्मा by अत्रुप्त आत्मा
आमचे येथे आंतरजालीय
In reply to आमचे येथे आंतरजालीय by सूड
सुड !!
In reply to ओ आमच्या येरियात उगा डोकं नाय by ५० फक्त
अवांतर - आमच्याकडे आंतरजालीय
In reply to अवांतर - आमच्याकडे आंतरजालीय by मृत्युन्जय
ती जबाबदारी पूर्णतः आंतरजालीय
In reply to ती जबाबदारी पूर्णतः आंतरजालीय by सूड
सती च्या जागी सता असेल तर ओटी
In reply to ती जबाबदारी पूर्णतः आंतरजालीय by सूड
सती च्या जागी सता असेल तर ओटी
In reply to अवांतर - आमच्याकडे आंतरजालीय by मृत्युन्जय
सोप्पे आहे. खरा आयडी सती आणि
च्यायला , भारी अन अभ्यासपुर्ण
In reply to च्यायला , भारी अन अभ्यासपुर्ण by पियुशा
धाग्यावर प्रतिसाद संख्या वाढवायचा क्षीण प्रयत्न... :-D
खल्लास, वारल्या/खपल्या गेले आहे
उत्तम निरिक्षण....
आपल्याला काय कळ्ळे नाय !
एकेका प्रकाराचे उदाहरण दिले
In reply to एकेका प्रकाराचे उदाहरण दिले by नाना चेंगट
आंजावरची
In reply to आंजावरची by sneharani
आम्ही बाळगत असलेली समजुत आणि
In reply to आम्ही बाळगत असलेली समजुत आणि by नाना चेंगट
ए असं पॉईंट आऊट नका करु बुवा
In reply to आम्ही बाळगत असलेली समजुत आणि by नाना चेंगट
नॅन्स, >>आम्ही बाळगत असलेली
In reply to नॅन्स, >>आम्ही बाळगत असलेली by मराठमोळा
हे पहा ममो, सता जाणार्यास
अभ्यासपूर्ण.
अतिशय अभ्यासू
ममो, मस्त!
एव्हढ्या भांडवलावर डॉक्टरेट
In reply to एव्हढ्या भांडवलावर डॉक्टरेट by स्पंदना
डॉक्टरेट? हाहाअहा. नको
हा पण धागा उत्तम. धाग्यांच्या
अतिसुन्दर असे धागे अलिकडे का
जियो ममो !!!
मस्त.
.
पुन्हा टकतो
दोन्ही भागाबद्दल एकत्रीत प्रतीसाद देत आहे.
>>ही निरीक्षणे (काही वगळली
(No subject)
हे पण वर आणतोय.