✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मिपा ट्रेंड्स

म
मराठमोळा यांनी
Tue, 06/26/2012 - 10:40  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी, डिस्क्लेमरः यात कुणाचीही थट्टा किंवा टर उडवण्याचा मानस नाही. केवळ गम्मत किंवा विनोदी अर्थाने हा लेख समजुन घ्यावा अशी अपेक्षा. (आजकाल डिस्क्लेमर टाकल्याशिवाय मिपावर काहीही लिहायंच म्हणजे पंचाईत होऊन बसते ;) ) माझा वेळ जात नाही म्हणून मी आजकाल काहीबाही लिहित असतो असा कुणाचा समज झालेला असेल तर तो समज निव्वळ खरा आहे. ;) हा धागा काथ्याकुटात लिहावा की साहित्यात असा पेच उभा होता, जनातल्या आणि मनातल्या विचारांचा आणि नव्या ट्रेंड्स चा आढावा घेण्याचा हा प्रयत्न म्हणून जनातलं मनातलं मधे लिहिला. मिपा किंवा एकुण मराठी आंतरजालावर म्हणा, (तसे माझे ईतर विहिरी, डबके, महासागर, तलाव यांवर फारसं किंवा जाणंच मुळात नाही) काही ट्रेंड्स बघावयास मिळतात. हे ट्रेंड्स थोडक्यात खालीलप्रमाणे. ;) कंपूबाजी वैदीक काळापासून "कलयुग आला आहे" याप्रमाणे "कंपूबाजी केली जाते" असे गळे काढण्याचा ट्रेंड आहे. हे बर्‍यापैकी खरंही आहे. अहो माणूस हा समाजशील प्राणी आहे, तो एकटा कसा राहणार? मोठमोठाल्या कंपनीत सुद्धा गटबाजीनेच प्रमोशन होतात. म्हणून कम्पूबाजीला तुम्ही टाळू शकत नाही हे खरे आहे. त्यामुळे नवख्या लोकांची गोची होते हे कबूल. काही पळून जातात तर काही टिकतात, टिकणारे आंतरजालाबरोबर आयुष्यातही बरंच काही शिकतात. काही कंपू हे नवख्या लोकांवर हल्ला करतात कारण ते बर्‍यापैकी सेफ असतं. काही कंपू सभासद हे त्यांच्या कंपू सभासदांचेच लेख वाचतात किंवा त्यावर प्रतिक्रिया देतात. कोणत्याही कंपूत नसलात (हे अवघड आहे) तर मात्र कधी कधी चांगले लेख मागे राहुन जातात. नवख्या लोकांचा आणि नवकवींचा एक अघोषित कंपू असतो, त्यांचे लेख/कविता वाचणारे/प्रतिसाद देणारे तेच असतात आणि काही अंशी प्रामाणिक प्रतिसादक. नवखे/न्युबीज् हे सभासद फारच गोंधळलेले किंवा संभ्रमात असतात. ईतिहास माहिती नसल्याने काय प्रतिसाद द्यावा/लिहावे हे यांना समजतच नाही. कानात वारं घुसलेल्या वासरासारखं हे एकावर एक धागे काढत बसतात. सुरुवातीला काही मिपाकर प्रोत्साहन देतात पण त्याचा अर्थ चुकीचा काढून हे प्रत्येक बॉल सिक्सर मारायसाठीच आहे असे समजून बर्‍याचदा शुन्यावर ऑट होतात आणि मग टीममधून बाहेर फेकले जातात, चिडतात, कंपूबाजीच्या नावने किंवा संपादकांची कंप्लेंट करत फिरतात तर काही नविन कपडे घालून पुन्हा येतात. नवख्या लोकांसाठी आधी अभ्यास करुन डिफेंसीव कसे खळता येईल आनि चातकासारखी प्रतिसादांची वाट न पहाणे याचा विचार करणे फायदेशीर ठरु शकते. खरडवही, व्यनी यातून ओळखी वाढवाव्यात. जुनी खोडे यांना मराठी आंतरजालाचा पुर्वेपारपासून चालत आलेला ईतिहास माहित असतो, खरं तर ईतिहास घडवणारे हेच. पण कधी कधी आंतरजाल आपल्याच मालकीचे आहे असा गैरसमज करुन बसतात किंवा वेळेप्रमाणे/ नव्या प्रशासनाप्रमाणे बदलायला यांना उशीर होतो. मग कधी धाग्यांना पंख लागतात तर कधी प्रतिसादांना. भारताच्या पॉलिटीक्स प्रमाणे हे पण कधी कधी पार्टी बदलतात तर काही स्वतःची नविन पार्टी सुरु करतात, दुसर्‍या पार्टीच्या सदस्यांना त्यांच्यात सामील करुन घेण्यासाठी आमिषही कदाचित दाखवले जात असावे. सर्व साधारण सदस्य मग सगळ्याच पार्टीचे मेंबरं होतात.. जस्ट टु प्ले सेफ. यात बरेचसे असेही असतात की एकाच पार्टीशी एकनिष्ठ रहातात कारण ते तटस्थ रहाण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांना खर्‍या अर्थाने पॉलिटीक्समधे रस नसतो. काही सदस्यांचे मराठी आंतरजालाशी निगडीत राहण्याचे कारण हे कायमच खर्‍या अर्थाने तेच रहाते - मायमराठीशी नाते जोडुन रहाणे, वाचनातून आनंद मिळवणे. विचारजंत विचारजंत कधीही कुणालाही होऊ शकतात. वेळोवेळी गोळी घेणे गरजेचे असते आनी ती गोळी वेळ आली की बरोब्बर मिळते देखील. मानवी स्वभाव आहे तो. कधी खेळकर, खोडकर, कधी एकदम सिरिअस. त्यामुळे एखाद्यास विचारजंत झाले असतील आणि तो तत्वज्ञान प्रसवत असेल तर खुशाल ते करु द्यावं. एक फेज असतो तो.. सरतो. पण काही लोकांचा आजार गोळी घेऊन देखील जात नाही. मग ते प्रत्येक लेख/प्रतिसाद यांचा नीट अभ्यास करुन त्यावर लेखातल्या/प्रतिसादतल्या विचारांशी विरुद्ध मते मांडायचा प्रयत्न करु लागतो. म्हणजे तुम्ही म्हणालात की मिरची तिखट असते तर त्यावर हे लोक्स मिरची तिखट नसुन सापेक्षरित्या तुलना केल्याने ती तुम्हाला तिखट वाटते, अन्यथा ती गोड असते असे काहीसे म्हणतीत. यांच्या मागे फॅन्स किंवा सहमतीची मेंढरं अपेक्षित असतात कारण त्यांना लेखांवर प्रतिसाद नोंदवायचे असतात (परतफेड होईल म्हनून) म्हणून विचार न करता बाडीस होतात. वाचक/प्रतिसादक हा वर्ग फार मोठा आहे. वाचनमात्र असलेल्या लोकांना एखादी मेस लावलेली असेल तर आज जे बनवलय तेच खाण्यावाचून जसा पर्याय नसतो तसा जे लिहिलय ते वाचण्याशिवाय गत्यंतर नसते. प्रतिसादक मात्र बर्‍याच प्रकारचे असतात. काही लोकं अतिशय प्रामाणिक असतात. ते कधीही तिरकस प्रतिसाद देत नाहीत, केवळ प्रोत्साहनपर "छान", "आवडले" असे प्रतिसाद देऊन मोकळे होतात तर काही केवळ टाईमपास करणारे अस्तात, काड्या टाकून पॉपकॉर्न घेऊन बसतात. बर्‍याचदा आयुष्यातील टेंशन किंवा फ्रस्टेशन काढण्यासाठीदेखील प्रतिसाद दिलेले असतात. म्हणजे कितीही प्रामाणिकपणे लेख किंवा एखादी प्रतिक्रिया असेल तर त्यावर आगपाखड कशी करता येईल असे हे प्रतिसाद असतात, काड्या टाकणार्‍यांसाठी हे फार मोठे गिर्‍हाईक असते. असो... टंकाळा आल्याने उरलेले अध्याय जमल्यास पुढील भागात.. :) आपला, मराठमोळा
  • मिपा ट्रेंड्स - २

Book traversal links for मिपा ट्रेंड्स

  • मिपा ट्रेंड्स - २ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
वावर
विनोद
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
11360 वाचन

💬 प्रतिसाद (58)

प्रतिक्रिया

एकदम अचूक निरीक्षण. हहपुवा

प्रचेतस
Tue, 06/26/2012 - 10:47 नवीन
एकदम अचूक निरीक्षण. हहपुवा झाली. पुढचे अध्याय येऊ द्यात लवकर.
  • Log in or register to post comments

लगे रहो ममोभाय!!

श्रीरंग_जोशी
Tue, 06/26/2012 - 10:49 नवीन
तुमच्या फटकेबाजीने मैदानाचा कुठलाही कोपरा सोडलेला नाहीये. फारच मार्मिक शब्दात तुम्ही सत्यपरिस्थिती मांडून उच्च प्रतीची विनोदनिर्मिती केलेली आहे. नाहीतर आजकाल विनोदाच्या नावाखाली काय काय चालतं. तूर्तास एवढेच. याचे जबरी विडंबन केले जाईल हे नक्की. पण वरिजनल ते वरिजनल ;-).
  • Log in or register to post comments

लेख वाचुन मी तर एकदम ऑट बाबा

जेनी...
Tue, 06/26/2012 - 10:51 नवीन
लेख वाचुन मी तर एकदम ऑट बाबा :P
  • Log in or register to post comments

हाहाहा. तरीही बरेच ट्रेंड्स

मृत्युन्जय
Tue, 06/26/2012 - 11:04 नवीन
हाहाहा. तरीही बरेच ट्रेंड्स राहुन गेलेत हो ममो. पुभाप्र
  • Log in or register to post comments

छान. आवडले.

शिल्पा ब
Tue, 06/26/2012 - 11:05 नवीन
छान. आवडले.
  • Log in or register to post comments

संपादक महोदय, मराठमोळा

जोयबोय
Tue, 06/26/2012 - 11:06 नवीन
संपादक महोदय, मराठमोळा यांच्या वरिल लेखावरुन आपणास विनंती करतो की तुम्ही यात लक्ष घालुन 'कंपू' नावचा नवीन दालन उघडावे किजेणेकरुन सर्वांना कम्पुबाजी करता येयील. साभार
  • Log in or register to post comments

नविन दालनाची

jaypal
Tue, 06/26/2012 - 12:40 नवीन
अजिबात गरज नाही. बघता काय सामील व्हा.( तुम्ही ईथे येत रहा आपोआपच कंपुचा भाग व्हाल.) टॉमबॉय जय सितामाँ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जोयबोय

उरलेल्या अध्यायांच्या प्रतिक्षेत.

चित्रगुप्त
Tue, 06/26/2012 - 11:55 नवीन
उरलेल्या अध्यायांच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

सुप्रसिद्ध अध्याय फेम आणि

स्पा
Tue, 06/26/2012 - 12:25 नवीन
सुप्रसिद्ध अध्याय फेम आणि नवीन ट्रेंड सेटर माननीय सूड यांच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत
  • Log in or register to post comments

अध्याय पहिला परंपरांचा,लिहू

अत्रुप्त आत्मा
Tue, 06/26/2012 - 12:36 नवीन
अध्याय पहिला परंपरांचा,लिहू पाहतो मराठमोळा...। सुरु जाहली अता लढाई,उडला पहिला तोफगोळा॥ कपूबाजांचा कापला गळा,रक्त वाहे भळाभळा...। कंपु-बाजहो सांभाळोनी,या धाग्यावर सावध खेळा॥ नवख्यांचाही नवखा कंपू,पाणी पाहे बाहेर पंपू...। संधी मिळताच एखाद्या तटी,नवखा पाहे आत जंपू॥ ;-) जुन्या खोडांची पाळेमुळे,शोधिली जणु घुशिची बिळे...। काय ते प्रेम भळभळे,अंतरीची मजा पहाता॥ विचारजंती योग्य निरिक्षण,नुसतेच ओझे सव्वा मणं..। आत वाजती घणघणा घणं, फुसके बार तैश्यापरी॥ वाचकू/प्रतिसादकू लोकं,हॅपी बड्डे'चा सजवला केकं। सुरी लागो या भितीने,कटावयाचा राहिलेला...॥ अध्याय पहिला बहुज्ञात,वाचला जणू बुभुक्षित...। पुढच्याची बीजे त्यात,साष-टांग नमन हो मराठमोळा॥ बोला....तुंड-लिकाला वरून हा..ण्ली विटकर.... श्रीहास्यदेव लोळा...राम म.मो.महाराज...की....जय॥
  • Log in or register to post comments

_/|\_ भारी

टवाळ कार्टा
Tue, 06/26/2012 - 12:43 नवीन
_/|\_ भारी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

झाक जमलय...

अमितसांगली
Tue, 06/26/2012 - 12:47 नवीन
भारी....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

म्हणवितात अत्रुप्त आत्मा पण

बॅटमॅन
Tue, 06/26/2012 - 12:50 नवीन
म्हणवितात अत्रुप्त आत्मा पण अध्यायाने त्रुप्त केले सर्वांना :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Wed, 06/27/2012 - 06:51 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मानलं तुम्हाला गुरूजी

अमृत
Tue, 06/26/2012 - 13:24 नवीन
खरच एक्दम झकास अमृत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

बहूत मस्त

रणजित चितळे
Tue, 06/26/2012 - 14:03 नवीन
वा काय छान मस्त. ----------------------------- मी कोणत्या गटात मोडतो बरें.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

बोला....तुंड-लिकाला वरून

स्पंदना
Tue, 06/26/2012 - 15:33 नवीन
बोला....तुंड-लिकाला वरून हा..ण्ली विटकर.... श्रीहास्यदेव लोळा...राम म.मो.महाराज...की....जय॥ आमचाबी जय!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

जबहर्‍या............

नाखु
Wed, 06/27/2012 - 08:47 नवीन
पहिले नमन गुरुदेवा... दुसरे ते म.मो. ना कारण मात्र लिखाणाशी... आता आम्हा वाचकांना मेजवानी "जुगल बंदीची...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

ममो फटके बाजी आवडली

jaypal
Tue, 06/26/2012 - 12:43 नवीन
भाग वाचता वाचता संपला. आता अध्यायांची संख्या वाढवुन नुकसान भरपाई करावी. ;-)
  • Log in or register to post comments

"वाचनमात्र असलेल्या लोकांना

टवाळ कार्टा
Tue, 06/26/2012 - 12:44 नवीन
"वाचनमात्र असलेल्या लोकांना एखादी मेस लावलेली असेल तर आज जे बनवलय तेच खाण्यावाचून जसा पर्याय नसतो तसा जे लिहिलय ते वाचण्याशिवाय गत्यंतर नसते." अगदी खरे आहे :(
  • Log in or register to post comments

टंकाळा करु नका, पुढचा अध्याय

मोहनराव
Tue, 06/26/2012 - 13:12 नवीन
टंकाळा करु नका, पुढचा अध्याय येउदे लवकर!
  • Log in or register to post comments

+१

अमृत
Tue, 06/26/2012 - 13:25 नवीन
असंच म्हणतो. अमृत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

हेच म्हणतो मी टंकाळा हा शब्द

निनाद मुक्काम …
Wed, 06/27/2012 - 03:22 नवीन
हेच म्हणतो मी टंकाळा हा शब्द जाम आवडला. कधीतरी कुठेतरी हा शब्द नक्की वापरला जाईल. पुढच्या अध्यायाच्या प्रतीक्षेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

छे सगळा धागा वाचला, विनोदी

५० फक्त
Tue, 06/26/2012 - 13:31 नवीन
छे सगळा धागा वाचला, विनोदी असं काही जाणवलंच नाही, सगळं कसं मानसरोवराच्या पाण्यासारखं स्वच्छ, अगदी नितळ थेट खालच्या तळाचे दगड दाखवणारं, पण तेवढंच फसवं. आपण जवळ जाउन फोटो काढावा म्हणलं तर कॅमेराच आत जाउन पडायचा.
  • Log in or register to post comments

छान लेख. (मिपाचा मेसकरी

llपुण्याचे पेशवेll
Tue, 06/26/2012 - 13:35 नवीन
छान लेख. (मिपाचा मेसकरी मेंबर) पुपे
  • Log in or register to post comments

सगळ्या .....

चौकटराजा
Tue, 06/26/2012 - 13:53 नवीन
सगळ्या मुद्द्यात कंपूबाजी हाच मुद्दा पहिला डोसक्यातून का आला असावा ? ऑं ?
  • Log in or register to post comments

हात फारच आखडता घेतला आहे असे

गणपा
Tue, 06/26/2012 - 14:42 नवीन
हात फारच आखडता घेतला आहे असे वाटते. एकट्या 'प्रतिसादक' कॅटेगरीवरच संपुर्ण लेख* पाडला जाउ शकतो तिथे त्याचा वाटेला फक्त चार ओळीच? ;) अधिक वेळ न दवडता उरलेला वेळ सत्कारणी लाव पाहु. :) *अभ्यास दांडगा असला तर लेखमाला सुद्धा.
  • Log in or register to post comments

हाहा. छान चाललंय. माझ्याच या

अन्या दातार
Tue, 06/26/2012 - 15:12 नवीन
हाहा. छान चाललंय. माझ्याच या धाग्याची आठवण आली ;)
  • Log in or register to post comments

झैरात झैरात

प्रास
Tue, 06/26/2012 - 19:14 नवीन
झैरात झैरात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

=))

सोत्रि
Tue, 06/26/2012 - 20:48 नवीन
नुकतेच विजुभौना भेटला होतात काय हो प्रास? ;) - (६५वी कला जमणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

कुठली वर्गवारी...

प्रभाकर पेठकर
Tue, 06/26/2012 - 15:30 नवीन
आपण कुठल्या वर्गवारीत बसतो ह्या विचारांमध्ये गुरफटलो आहे. कदाचित, पुढील भागात येईल एखादी वर्गवारी.....
  • Log in or register to post comments

बर !

स्पंदना
Tue, 06/26/2012 - 15:32 नवीन
बर !
  • Log in or register to post comments

हाहाहा!

पैसा
Tue, 06/26/2012 - 17:11 नवीन
ममो, राहिलेला वेळ लवकर सत्कारणी लावा बघू! आणि अ. आ. ची कल्पनाशक्ती पण चौखूर धावते आहे, बुवा, तुमच्या मिपावार्ता का बंद पडल्या हो?
  • Log in or register to post comments

@बुवा, तुमच्या मिपावार्ता का

अत्रुप्त आत्मा
Tue, 06/26/2012 - 17:20 नवीन
@बुवा, तुमच्या मिपावार्ता का बंद पडल्या हो? >>> त्ये लै कष्टाचं,आणी डोकं झिजवणारं काम आहे... आणी आम्चाही आळशी पणा नडलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

सच्चा मिपाकर

तिमा
Tue, 06/26/2012 - 17:30 नवीन
जालावरी मिपाच्या का रोज पाय नेती मी कोणत्या गटाचा, हे कोण काय पुसती नसे मात्र वाचक, नसे खोड, हस्ती नसे कंपूबाज, हवी फक्त मस्ती अधाशी मनाला ती गोड पाककृती विचारी मना,का मला जंत होती
  • Log in or register to post comments

आमच्या कंपूत प्रवेश घेताना घ्यायची शपथ...

श्रीरंग_जोशी
Tue, 06/26/2012 - 17:48 नवीन
मला कंपूत प्रवेश मिळाल्यास कंपूच्या आत कंपूबाजी अजिबात करणार नाही...
  • Log in or register to post comments

कंपुच्या आत कंपुबाजी केली

५० फक्त
Tue, 06/26/2012 - 18:55 नवीन
कंपुच्या आत कंपुबाजी केली नाही तर बाहेर कशी करणार ओ, आधी नेट प्रॅक्टिस नको का करायला ? रच्याकने वेलकम टु वेटिंग लिस्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

रच्याकने ?

श्रीरंग_जोशी
Tue, 06/26/2012 - 19:07 नवीन
बरोबर आहे आपले म्हणणे, शपथेत नाही करणार असे म्हंटले की ती गोष्ट लोक आवर्जून करतात. हे रच्याकने म्हणजे काय हो? मला येथे विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

रच्याकने

सुनील
Tue, 06/26/2012 - 19:26 नवीन
हे रच्याकने म्हणजे काय हो? तो तत्सम शब्द आहे. सर्व मराठी संस्थळांच्या आजीकडून उचलेला ;) रच्याकने = रस्त्याच्या कडेने. = by the way ह्याला देश्य पर्याय आहे बादवे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

धन्यवाद!

मोहनराव
Wed, 06/27/2012 - 13:31 नवीन
असे संस्थळावरचे तत्सम शब्द व अर्थ असा कोणीतरी धागा काढावा, मार्गदर्शक ठरेल. अगोदरच असेल तर लिंक द्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

बाय डेफिनिशन कंपूबाजी ही

बॅटमॅन
Tue, 06/26/2012 - 20:46 नवीन
बाय डेफिनिशन कंपूबाजी ही आपापल्या कंपूत करायचीच नसते :) ती कुणा बाहेरच्या माणसासमोरच करायची असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

कंपूबाजीची शिकवणी??

श्रीरंग_जोशी
Tue, 06/26/2012 - 21:19 नवीन
मला असं वाटू लागलंय की शिकवणी लावल्याखेरीज हे प्रकरण मला झेपणार नाहीये अन परीक्षेत नापासाचा शिक्का बसणार आहे. वेळ च्या वेळी शिकवणी लावलेली बरी. याबाबत आपणांस ठाऊक असल्यास कृपया मार्गदर्शन करावे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

रच्याक, बाडीस वगैरे,..

खेडूत
Wed, 06/27/2012 - 00:39 नवीन
अजून अनेक शब्द आणि बराच अभ्यास बाकी आहे. आता २०१३ च्या सी ई टी ची तयारी करा..कंपू च्या प्रवेशासाठी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

अहो पाण्यात पडला की पोहणे येऊ

बॅटमॅन
Wed, 06/27/2012 - 00:42 नवीन
अहो पाण्यात पडला की पोहणे येऊ लागते तसेच आहे हे....अजून वेगळे काही सांगण्याची गरज नै :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

तेच करतोय सध्या...

श्रीरंग_जोशी
Wed, 06/27/2012 - 06:09 नवीन
नव्या गोष्टी शिकताना धडपडतोय, अडखळतोय पण मनापासून आस्वाद घेतोय... मिपा माझ्यासाठी ज्ञानाचा, मनोरंजनाचा खळाळता झरा आहे, जमेल तेवढे प्राशन करावे, झेपत नसेल तर दुरून गंमत बघावी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मिपा झरा वगैरे नाही वाटला कधी

५० फक्त
Wed, 06/27/2012 - 07:43 नवीन
मिपा झरा वगैरे नाही वाटला कधी हे एक व्हाईट वॉटर राफ्टिंग आहे लेव्हल ४ चं, कधी पाणी कुठुन कसं येईल आणि कुठं नेउन आदळेल याची काही खात्री नाही इथं,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

भापो... :-)

श्रीरंग_जोशी
Wed, 06/27/2012 - 08:05 नवीन
प्रतिक्रिया आवडली!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

सहीच!!

खडीसाखर
Tue, 06/26/2012 - 18:14 नवीन
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत :)
  • Log in or register to post comments

हम्म.... आज मिपाच्या मेसमध्ये

रेवती
Tue, 06/26/2012 - 20:00 नवीन
हम्म.... आज मिपाच्या मेसमध्ये हा लेख आलाय का? छान. मस्त. ;)
  • Log in or register to post comments

हो आता आज्या सैंपाक करीनात,

सूड
Tue, 06/26/2012 - 20:52 नवीन
म्हटल्यावर मेसमध्ये यील ते आपलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा