मिपा म्हणी

श्रीरंग_जोशी काथ्याकूट
या मागची प्रेरणा मित्रांनो आपल्याला वाटत नाही का की रोजच्या बोलण्यात पारंपरिक म्हणींचा वापर कमी होत चाललाय. चला तर मग, आपण या म्हणी आठवणींच्या कप्प्यातून बाहेर काढूया. हो पण, जश्या च्या तशा नाहीत, तर त्यांना मिपा म्हणींचे स्वरूप देऊन उदा :
  • धाग्यापेक्षा प्रतिसाद जड
  • उथळ लेखनाला प्रतिसाद फार
  • अडला कवी संपादकांचे पाय धरी
  • धागा नको पण प्रतिसाद आवर
  • आपलेच धागे अन आपलेच प्रतिसाद
  • सदस्याची धाव प्रतिसादापर्यंतच
  • व्याकरण नको पण भाषाशुद्धी आवर
  • टंकेल ते डकवेल काय
कृपया हलकेच घ्या.

78 टिप्पण्या 18,613 दृश्ये

Comments

श्रीरंग_जोशी नवीन

In reply to by दिपक

हे काय? पेटतेल एवढे महाग झालेले असताना असा वापर?

संजय क्षीरसागर नवीन

In reply to by श्रीरंग_जोशी

सालं मीपाचं वैशिष्ठ्य हेच की पोस्ट ओपन केल्याशिवाय सदस्याच नांव कळत नाही आणि एकदा पोस्ट बघितली की मग राहवत नाही! (आहो, कि-बोर्ड आणि पेट्रोल दोन्ही तुमचंच आहे)... आता निदान मला धन्यवाद तरी म्हणू नका.

अरुण मनोहर नवीन

कंपूत एकोळी शेर शहाणा धागा तेथे दंगा ऑफीसच्या वेळेवर मिपापत्र दोन शब्दांचा आव त्याला धागा ऐसा ताव

मोहनराव नवीन

रोज जिलब्या टाके त्याला कोण आवरे! (रोज मरे त्याला कोण रडे) ;)

श्रीरंग_जोशी नवीन

  1. चार दिवस संपादकांचे
  2. धाग्यात नाही तर विडंबनात कुठून येणार
  3. प्रतिसादांत दंगल धाग्यात चंगळ
  4. (वाङमय) चोरीचा मामला हळू हळू बोंबला

गवि नवीन

-पोरींच्या आयडीने पोरगेच फार.. -भरवशाची आयडी पण निघाला टोणगा.. -ज्या गावचा आयडी..त्याच गावचा आयपी.. (अर्थात गावाची थाप मारताना आयपी सांभाळा..) - आयडीच्या जिवावर बायडी उदार.. -अगं अगं डू आयडी, मशीन तरी बदल..

चिंतामणी नवीन

(सक्रीय) सभासद कमी कंपू फार.

अजातशत्रु नवीन

  • मिपावरुन जात नाही ती जात
  • नाकात बोलणार्‍यास अशुद्ध लेखनाचा त्रास
  • शब्दांचे किस पाडता प्रतिसादांचाही पाऊस पडे
  • कारवायी नंतर
  • धागा गेला प्रतिसाद गेले ,हाती आले रडगाणे

  • खडीसाखर नवीन

    १. उचलला कळ्फलक बडवला खरडायला (उचलली जीभ लावली टाळ्याला) २. डू आयडी ची खोड 'निलंबना' शिवाय जात नाही (जित्याची खोड मेल्यावाचून जात नाही) ३. प्रतिसादापुरते लेखन (ताकापुरते रामायण) ४. धागाकर्ता हिंडतो आन्तरजालाशी चित्त त्याचे प्रतिसादाशी (घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी)

    गणेशा नवीन

    १. डायरी घेवून मागे लागणे.. २. अतिधागे त्याचा शर्ट फाटका.. ३. लिहायला गेलो कविता, झाला काथ्याकुट ४. अर्धे लिहायचे आणि सगळीकडे जायचे ५. यकु आला रे आला ६. धाग्यात सुटली खाज, तर प्रतिसादात कशाला लाज ?

    श्रीरंग_जोशी नवीन

    In reply to by गणेशा

    मित्रा, फारच सडेतोड म्हणी मांडल्यात रे. शेवटची तर खासच...!! आणखी एक... विडंबनात नाही भाव अन म्हणा त्यास वॉव!!

    गणेशा नवीन

    ७. कठीण समय येता ग्रुप कामास येतो ८. विचारांविना काथ्याकुट व्यर्थ आहे. ९. लिहिणार्‍याला पळ म्हणायचे, आणि पळणार्‍या ला लिही म्हणायचे १०. कामाचा ना धामाचा, धागा टाकतो नेमाचा ११. समुद्रावर हजर अन विहिरीवर नजर १२. कामापुरता गणा अन ताकापुरती पैसा १३. सोत्रीस पावशेर १४. कुठे गविंचे लेख आणि कुठे आयडीच फेक

    ५० फक्त नवीन

    In reply to by गणेशा

    मा. कविवर्य श्री. गणेशा, तुम्हास मिपाम्हणीरत्न असा पुरस्कार आणि एक चुरचुर नान आमचेकडुन सादर भेट.

    निनाद मुक्काम … नवीन

    कर काथ्याकुट ,हो विचार जंत ( पी हळद...) कंपू बाहेरच्याचा लेख अळणी दोन कंपुंमध्ये राडा , मूकवाचकांचा फायदा ( दोघांचे भांडण ..) मिपात राहून कंपूशी वैर घेऊ नये.

    अर्धवटराव नवीन

    १) काळे गेले, गुगळे गेले, आता मलाही वीट आलाय २) मिपाचे धर्म तीनच ( आपापल्या मगदुराप्रमाणे ठरवावे) ३) थत्ते मियां तो थत्ते मियां, 'क्ष' मियां ...अरे देवा ४) मी नाहि कंपुतली, खरड बघा आतली ५) टंकना न जाने संपादक तेढा अर्धवटराव

    गणेशा नवीन

    In reply to by अर्धवटराव

    काळे गेले, गुगळे गेले, आता मलाही वीट आलाय
    आवडली एकदम. ती ४ थी वाली मला जमतच नव्हती .. बरी झाली लिहिली ती म्हण

    सूड नवीन

    डुआयडी खाई नी आयडी बोंबलत जाई. अंगात नाही बळ डुआयडी काढून पळ खर्‍याचं खोटं नि डुआयडीचं नाव मोठं.. डुआयडी करी बाता नि आयडी खाई लाथा..

    लीलाधर नवीन

    In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

    तोंड दाबून बुक्क्यांचा मार अजून १ म्हण ही घ्या :-D :-D प्रतिसाद सोडून स्मायल्याच फार :-D

    अरुण मनोहर नवीन

    गावंढ्या गावात एकोळी सवाशिण टंकून टंकून दमले आणि संपादकपदी लागले उधळले कंपूवीर, खरडवह्या फुंकते उथळ धाग्याला प्रतिसाद फार शंभर उंडग्यांचे तर एक विचारजंताचे (सौ सुनार की तो एक लोहार की) तुझ्या धाग्याला लागलं ***

    श्रीरंग_जोशी नवीन

    कोणाचे हे लेख, धागा हा कोणाचा, डुप्लिकेट आयडी त्याचा तोची जाणे.... (संत ज्ञानेश्वरांची क्षमा मागून)

    पैसा नवीन

    धागा आणि बर्‍याच प्रतिक्रिया फारच आवडल्या आहेत! आणखी भर घालू शकले असते पण.....

    श्रीरंग_जोशी नवीन

    In reply to by पैसा

    पण काय?

    बिपिन कार्यकर्ते नवीन

    नवीन सदस्याला धागे फार... नवीन सदस्याला उचापत्या फार... (उथळ पाण्याला खळखळाट फार).

    कापूसकोन्ड्या नवीन

    १)प्रतिसादातुरांणां न भयं न लज्जा! २)प्रतिसाद येइना, म्हणे धागा जिलब्याचा ३)कसेही मिपावर ( कसेही ज्ञान प्रकाशात)

    गणपा नवीन

    हा हा हा.. चला धाग्याच्या निमित्ताने बरेच जणांच्या आत कोंडलेल्या वाफेला वाट मिळाली म्हणायची की बोळा निघाला म्हण्याचं? ;)

    चावटमेला नवीन

    ओरिजिनल आयडीला डु आयडीची साक्ष टंकता येईना की बोर्ड वाकडा झाकली मूठ शंभर प्रतिसादांची संपादकाच्या जीवावर सदस्य उदार..

    मराठे नवीन

    चार दिवस धाग्यांचे, चार दिवस नाड्यांचे. आले सरपंचाच्या मना, तेथे कोणाचे चालेना. धाग्यावरून संस्थळाची परिक्षा.

    श्रीरंग_जोशी नवीन

    In reply to by मराठे

    माझ्याकडून पुन्हा काही प्रतिसाद नको पण खरडी आवर... धाग्यापेक्षा विडंबन मऊ

    श्रीरंग_जोशी नवीन

    ज्या गावच्या कविता त्या गावची विडंबने

    श्रीरंग_जोशी नवीन

    १०० विडंबने करून आयडी निर्वाण पावला... पाहताच खरपूस धागा झेपावे विडंबनाकडे... (समर्थांची क्षमा मागून)

    शिल्पा ब नवीन

    दमडीचं नाही वाचन अन प्रतिसादाला नाही फुरसत राहतो त्या परदेशातल्या पंतप्रधानाचे वेडेचाळे गोड प्रतिसादांचा भुकेला ब्लॉग अन खरडी उचकी लेखापेक्षा प्रतिसादच जास्ती डोक्याले सुटली खाज अन कीबोर्डाला नाही लाज

    श्रीरंग_जोशी नवीन

    • चित्रपटापेक्षा परीक्षण भारी
    • तुम्ही कराल ते परीक्षण आम्ही करू ते विडंबन
    • प्रतिक्रिया लिहीन तेथे वाद घालीन

    मराठमोळा नवीन

    मजेदार धागा.. आमची भर.. १. नकटीच्या कवितेला सतराशे साठ रसग्रहणं २. प्रतिसाद नको पण टोमणे आवर ३. पंख लागून उडावे परी डु आयडी निशी उरावे. ४. संस्थळ हक्क मालकाचा, रुबाब कंपुचा ५. वेळ बघून धागे प्रसवावेत (अंथरुण पाहुन...) ६. सदस्य भांडत आणि वाचक मजा घेत. (आंधळ दळतं..) ७. आपला व्यनी ठेवायचा झाकुन आणि दुसर्‍याची खरड पहायची वाकून ८. आयत्या कच्च्या मालावर विडंबनोबा.. ९. धागा तरो आनी संपादक मरो. १०. कंपूवाचून धागा तरला. (औषधावाचून..) ११. प्रतिसादक सोडून धागाकर्त्याला सुळी (चोर सोडून संन्याशाला सुळी) :)

    आशु जोग नवीन

    एक धागा सुखाचा शंभर धागे दु:खाचे जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे -- कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकर्‍याचे कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात सरपंचाचे

    श्रीरंग_जोशी नवीन

    In reply to by आशु जोग

    अर्धवटरावांनी मिपा ट्रेंड्स धाग्यावर खालील ओळी लिहिल्या आहेत. एक धागा ममोचा | शंभर धागे मिपाचे || भयकारी हे सत्य वाचका, तुझीया अभिव्यक्तीचे ||

    श्रीरंग_जोशी नवीन

    धागा असेल दमदार तर विडंबन होईल जोमदार...