बने बने ...भाग २
लेखनप्रकार
भाग १ : येथे पहा : http://www.misalpav.com/node/2920
हुश्श ! टेकूया थोडे इकडे . अगो असे काय विचारतेस ? अमेरिकेतली देशांतरितांची पंढरी ही : न्यू जर्सी ! ओक ट्री भागात काय मिळणार नाही इथे ! शोधला तर नवरा सुद्धा मिळेल तुझ्याकरता इथे (शेंबूड पूस तो आधी !) या ट्रायस्टेट भागात भेळपुरीवरच्या "तीन देवियां" वास करतात हो ! हे न्यूजर्सीवासिनी सुखदाईचे स्थान. काय म्हणालीस ? "देवळात काम नाही तर मी काय करू ?" असे भेळपुरीवर येऊन विचारतेय देवी ? भलभलते नको बोलूस ! कोप झाला तर देवळात मिळणार्या मिसळीच्या प्रसादातल्या तर्रीचा झटका देईल हो देवी !
आणि कनेटीकटवरच्या या सख्या-पार्वत्या : आई शेवंताभवानी नि पितळादेवी ! काय म्हणालीस ? यांच्याकडे शिजणार्या "कटा"वरून या भागाला "कनेटीकट " म्हणतात ? हा हा , बने , पितळादेवी आपल्या चोप-राज नावाच्या अस्त्राला तुझ्यावर सोडेल असले काही बोललीस तर ! काही झाले तरी पाणी पंचगंगेचे आहे ! मुळामुठेमधले किंवा अमेरिकेतल्या पाईप्स मधले पाणी येऊन काही पातळ नाही झालेले ! बने , शेवंताभवानीने अलिकडेच तुझ्या नावाने पुन्हा या कलियुगी अवतार घेतला आहे हो ! विठू जसा भक्ताच्या रूपाने जनीमनी वसतो , तशी ही "बनी" वेगवेगळ्या नावाने भेळापुरीकरांना दर्शन देते ! (बाकी बने , तू बिनडोक आहेस, हे शेवंताईला कसे कळले हे ती जाणे नि तू जाणे !) बाकी या तीन्ही देवता आपापसात कितीही बडबडोत , पण "तर्री तर्री आता मरणाते वारी" अशी यांची कृपा. पूर्व किनार्यावरच्या भेळपुरीवर आलीस नि यांचे दर्शन चुकवलेस तर यांच्या कृपाप्रसादास मुकणार हो तू !
काय म्हणतेस ? एकूण न्यूजर्सी भाग शांत वाटतो ? बरोबर आहे ! पूर्वी अटकेपार पोचलेले झेंडे इथे अटलांटिकपार पोचवणारे शनिवारवाडेकर नुकतेच आपल्या छावणीत परतले आहेत. काय म्हणालीस ? मस्तानी ला घेऊन ? छे ग ! ते आपले पुण्यातल्या तुळशीबागेतल्या मस्तान्यांच्या मागे ! अमेरिकेतल्या मस्तान्या मिळवण्याच्या बाबतीत त्यांचे बाकी पानपत झाले हो !
चल जाऊ आणखी थोडे उत्तरेला. आपण आलोत बॉस्टन भागात. इरले नीट कानावरून घे ! जीवघेणी माणसे नि बुलंद थंडी ! (अर्रर्रर्र चुकलो ! मला म्हणायचे होते, बुलंद माणसे नि जीवघेणी थंडी ! ) प्रदेश कितीहि थंड असो, माणसे ऊब देणारी हो ! ( गरम डोक्याची ? थांब हो कार्टे ! मफलर लावून तोंड बंद करतो आधी !) तर हा आहे .. भेळपुरीवरच्या सन्माननीय "बॉस्टन ब्रॅम्हिन्स" चा भाग ! काय म्हणालीस ? असे जातीयवादी विधान कसे करतो मी ? काय करणार , कुणी तर्कट बोलतो , आपण ऐकून घेतो झाले ! हे आले भेळपुरीवरील बोरीसकुमार रंगास्कीचे ठिकाण. नाव इतके भरभक्कम असले तरी माणूस साधा आहे. काय म्हणालीस ? वेड्यासारखा स्वतःशी बडबडतोय ? अगो ! त्याला स्वगत म्हणतात हो ! वेडी कुठली ! फार बोलू नकोस, टाकून देतील एखादे विडंबन ! बुदबळांतल्या "रूक" सारखे सरळ हो ! (काय म्हणालीस ? रुक-श !? चल, चहाटळ मेली !)
तो शांत , स्थिर प्रकाश पाहिलास ? भेळपुरीला बोज आणून देणारे निवास हेच ते. शंकराच्या डोक्यातून गंगा वाहते तसे यांच्यातून ज्ञानाचा, विवेकाचा प्रकाश बाहेर पडतो. काय म्हणालीस ? प्रकाशाचा रंग एरवी स्वच्छ , संयत असला तरी भगवी छटा जास्त येते ? कायतरीच काय ?काय माणूस आहेस का सोशालिस्ट आहेस ?? अगं , अगं अशी चिडू नकोस. अमेरिकेत राहून भारतातल्या परिस्थितीबद्दल ताशेरे ओढण्याचा हक्क याना कुणी दिला नसला , तरी माणूस लाख हो ! याच भागात रहातो , भेळपुरीचा बच्चन ! च्, च् , बोलबच्चन नव्हे गं ! ते वेगळे ! हा म्हणजे फक्त उंचीला बच्चन ! एरवी तोंडातून एक शब्द फुटेल तर शपथ ! मात्र गातो बाकी चांगला हां ! एक ट्रीप ठाण्याला मारून येईल तर गानगंधर्व होऊन जाईल !
चला, पुरे झाली अमेरिका ! ठेवले काय आहे इथे माती नि दगड ! चल पकडू विमान लवकरच आपल्या देशाकडे. वाटेत लागतील एखाद-दोन भेळपुरीवाले त्यांचीही खबर घेऊच. चला, गुंडाळू आपला गाशा नि काय !
वाचने
16796
वाचनखूण
प्रतिक्रिया
43
* * * * * (५
खो खो खो !!!
In reply to खो खो खो !!! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
काका!
हा हा हा
माताय!
बॉस्टनमध्ये
In reply to बॉस्टनमध्ये by धनंजय
"सन्मित्र"
In reply to बॉस्टनमध्ये by धनंजय
घराचा रंग
In reply to घराचा रंग by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
मार खाणार
हा हा हा!!
In reply to हा हा हा!! by केशवसुमार
+++१
In reply to हा हा हा!! by केशवसुमार
सहमत आहे
In reply to हा हा हा!! by केशवसुमार
काय माणूस
व्वा!!
मुक्तराव..
सुनीतराव, ज
हा हा हा
झक्कास!
In reply to झक्कास! by विसोबा खेचर
तात्या !
In reply to तात्या ! by मुक्तसुनीत
ह्म्म
In reply to ह्म्म by केशवसुमार
अशी भानगड
मुक्तसाहेब...
In reply to मुक्तसाहेब... by प्राजु
बने बने किती बोलशील :)
हाहाहा!
In reply to हाहाहा! by प्रमोद देव
क्या बात है !
खीखी खी
रेटींगः (*****)
In reply to रेटींगः (*****) by धमाल मुलगा
बांधला
सोश्यालिस्ट किंवा स्पेश्यालिस्ट
व्वा सुनीतराव!
In reply to व्वा सुनीतराव! by स्वाती दिनेश
हॉल्ट
In reply to हॉल्ट by सहज
व्हाया..
In reply to व्हाया.. by स्वाती दिनेश
दोन्ही ठीकाणी जाऊन येणार
In reply to दोन्ही ठीकाणी जाऊन येणार by सहज
मी..
In reply to मी.. by स्वाती दिनेश
ओ..
In reply to ओ.. by केशवसुमार
बनी..
In reply to ओ.. by केशवसुमार
केसुशेठ,
जबरा
हा हा हा!
In reply to हा हा हा! by ब्रिटिश टिंग्या
हास हास टिंग्या, हासून घे!
हा हा हा!
In reply to हा हा हा! by विकास
विकास राव!
जबरा!!!