शार्दूलविक्रीडित
लेखनविषय:
(शार्दूल म्हणजे सिंह. शार्दूलविक्रीडित म्हणजे सिंहाचा खेळ. हे मराठीतील एक सुंदर अक्षरगणवृत्त आहे. प्रत्येक ओळीत १९ अक्षरे आणी म स ज त त ग हे गण येतात. अक्षरगणव्रुत्तात एका ओळीत किती अक्षरे येतात आणी त्यांचा र्हस्व दीर्घ अक्षरांचा क्रम लघु गुरू ठरलेला असतो. उदा म म्हणजे तिन्ही गुरू अक्षरे.
त्यामुळे व्रुत्ताची चाल ठरलेली असते. शार्दूलविक्रीडित वृत्ताचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे -आम्ही कोण म्हणून काय पुसता ? ही कविता होय. ही चाल लग्नातल्या मंगलाष्टकालाही चालते.)
कवितेचे नाव : शार्दूलविक्रीडित
वृत्त : शार्दूलविक्रीडित
कवितेचा विषय :शार्दूलविक्रीडित. ..सिंहाचा खेळ.
धाडसाचे वारे वाहत होते. वृद्ध झाडे जोर जोरात हलत होती. ठिणग्या उडत होत्या ... वणवा पेटणार होता.. अशाच एका ठिणगीकडे सिंहाच्या एका छाव्याची नजर गेली. आणी मग ......
वारे वाहत धाडसी धडधडे ; कल्लोळ ज्वालाग्रही
झाडे घासत ही परस्पर उडे ; तो जाळ भूमीवरी
सिंहाचा सुकुमार पुत्र अवघा ; झेपावला त्यावरी
खेळाया गवसे पहाच भलते ; शार्दूल क्रीडा करी. ॥
छावा त्या विस्तवास खेळ समजी ; जाळात घेई उडी
दाहाची न मला क्षिती उब हवी ; गर्जोन ऐसे कथी
छातीशी कवटाळुनी हृदय ते ; उन्माद ज्वाला पिते
आगीचे अवघे शरीर बनते ; खेळे नसातून ती ॥
अंगारा सम नेत्र जाळच नखे ; हा पोत पंजा बने
जीभेची जणू हो मशाल जळती ; भाषाच ज्वालामुखे
वाटे तो नर स्वाभिमान जळता ; आगीस वाटे जनी
ज्वाला चित्त बने शरीर जळते ; आत्माच यज्ञाहुती ॥
पेटोनी हर चंदनी वृक्ष उठे ; त्यांचा सुवासी हवी
त्या रानात घुमे पवित्र बनले ; युद्धात गेले बळी
ऐसा हा वणवा जळे धडधडा ; ज्वालाहुती पेटल्या
ज्वाला सिंह पळे धडाड वनी हो ; शार्दूल क्रीडा पहा ॥
ही शार्दूल मशाल जाळ जळती ; धावे वनी वाटण्या
आत्म्यातील जहाल तेज दिधण्या ; रानातल्या बांधवा
साक्षात्कार ज्वलंततेच मधला ; सर्वांस दर्शावण्या
आत्मा ना बनतो ज्वलंत कधिही ; दाहास घेण्याविना ॥
चीं चित्कार उठे नभात - गगनी ; ती माकडे भ्याडशी
सैरावैर पळा पळाच जनहो ; शार्दूल ज्वाला वनी
भ्यालेली हरणी पळेच घुबडे ; डोळे मिटोनी खरी
धावोनी वटवाघुळांसह वनी ; ती शोधती बोळकी ॥
सिंहाचे हृदयी स्वगर्व वसतो ; शार्दूल ज्वाला जशी
शार्दूलासम पाहिजे हृदयही स्वीकारण्या आग ती
ज्वालासिंह विचार आग जळती; भ्यांडास भीती तिची
जाळोनि स्वशरीर काय घुबडे ; घालीत अत्माहुती ?
शार्दूला सम धैर्य ना वसतसे : प्राण्यांतही जाणत्या
दोषी का म्हणता गरीब घुबडा ? मूर्खास बुद्धी किती ?
ज्वालासिंह परंतु व्यर्थ जळला ; शार्दूल क्रीडा वृथा
राखेच्या सम ते शरीर बनले ; शार्दूल राखे जसा ॥
येता एक झुळुक चंदनमयी; मंत्रावली राख ही
राखेतून पुनः उठेल उडण्या ; शार्दूल पेटोनिया
निद्रेचा लखलाभ होत घुबडा ; शार्दूल जागा खडा
रजेही घुबडे असोत वनिची शार्दूल नेता खरा
.
.
.
.
.
.
.
.
झेपावेल सदा अवध्य नर तो ; शार्दूल क्रीडा पहा ॥
अभिराम दीक्षित. श्रीलंका २००५
वाचने
18279
वाचनखूण
प्रतिक्रिया
54
राजघराण साहेब, अप्रतिम व निव्वळ लाजवाब.
कविता वगैरे नंतर... पहिला
कवी अभिराम दीक्षित . श्रीलंका
काव्य सुंदर!
In reply to काव्य सुंदर! by पैसा
गद्य लेखन टोपणनावाने .....
In reply to काव्य सुंदर! by पैसा
झाल.
भन्नाट.
जाणे तो अभिराम दीक्षित करू सारे असे नेटके
स्तब्ध !
आप्रतिम! फारच छान जमून आले
सुरेख !!!!!!!!
आहे वृत्त विशाल त्यास म्हणती
In reply to आहे वृत्त विशाल त्यास म्हणती by बॅटमॅन
रात्रीच्या वटवाघळा हलकटा ; द्वाडा धरू का तुला ?
In reply to रात्रीच्या वटवाघळा हलकटा ; द्वाडा धरू का तुला ? by राजघराणं
दुसर्या ओळीत एक सुधारणा: ओढू
In reply to दुसर्या ओळीत एक सुधारणा: ओढू by बॅटमॅन
दोघांचीही जुगलबंदी लै भारी.
In reply to दुसर्या ओळीत एक सुधारणा: ओढू by बॅटमॅन
अहो बॅटमॅन यालाच तर '
In reply to दुसर्या ओळीत एक सुधारणा: ओढू by बॅटमॅन
दुष्टारी पुरता भारी | अवतरला
In reply to दुष्टारी पुरता भारी | अवतरला by राजघराणं
@ वल्ली: मुद्दा नोंदविला
मालक
In reply to मालक by रमताराम
शार्दूल हाच योग्य
जबरद्स्तच, लहानपणापासुन या
मस्त !
सुपर्ब डॉक्टर ..... डोळ्यांच
मस्तच!
सुपर डुपर हिट
सुरेख!
लाजवाब
अभिराम, सुरेख!
मासाजातताग येती गण हे शार्दुलविक्रिडितं
मस्त लिहीले आहे. एक शंका:
In reply to मस्त लिहीले आहे. एक शंका: by स्वानन्द
नाहि
छान माहिती..
खूप मस्त फटु नी कविता देखील
मस्त
कविता छान , मला २ न. चित्र
चित्र आणि शब्दांचा अद्भुत
पायाचाही फोटो टाका!
In reply to पायाचाही फोटो टाका! by ऋषिकेश
+१
In reply to पायाचाही फोटो टाका! by ऋषिकेश
सहमत
अप्रतिम__/\__
वा क्या बात है
पेटोनी हर चंदनी वृक्ष उठे ;
चीं चित्कार उठे नभात - गगनी ;
भन्नाट..
सुंदर...
मस्त जमुन आलय... छान..
ते राहू द्या हो सगळा.....खूप
कसं काय जमतं
चित्र-काव्य आवडले. अप्रतिम
In reply to चित्र-काव्य आवडले. अप्रतिम by विदेश
रैट्ट यू आर सार! वृत्ताच्या
In reply to रैट्ट यू आर सार! वृत्ताच्या by बॅटमॅन
ह्याला माणसाला परत आणा राव.
In reply to ह्याला माणसाला परत आणा राव. by अभ्या..
सहमत.
वा!
पुन्हा