काकध्वनी
लेखनविषय:
![]() |
वाचने
9961
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
यकुशेठ, कविता छानच केलीत.
'निष्पर्ण तरू' हे थोडे अवघड शब्द. तरीही ते गुंफण्याचा प्रयत्न उत्तम. विशेषतः ते प्रास्ताविक लेखन वाचून मग या रचनेकडे वाचक जातो, ते थोडे बधीर करणारेच आहे. दुपार ते रात्र आणि मग तिथून पहाट असे काही तरी दिसते. आरंभाला दुपार, कावळा, निष्पर्ण तरू... एकूण भयानकच. मध्येच शीतल; पण पुन्हा 'दिगंत दिशाहीन' - कल्लोळ आहे सगळा. रचना आवडली.
आता माझे वाचन कमी असल्याने विचारतो, रचना तुझीच आहे का? असल्यास, तुला दंडवत. नसल्यास ती इथं दिल्याबद्दल आभार.
In reply to ! by श्रावण मोडक
प्रास्ताविक लेखनाचा आणि कवितेचा संबंध ( तुम्ही पुढे प्रतिसादात उलगडून दाखवला असला तरी यूजीं चे लेखन वाचलेले नसल्याने) काही कळाला नाही... ते असो ...
कविता भन्नाट झाली आहे... त्यातल्या कल्पना, दृश्ये हॉन्टिंग ... ...
एक सूचना :
काही ओळी र्हस्व दीर्घ सांभाळत ' अॅडजस्ट करत वाचाव्या लागतात...
उदा. भय व्याकूळ झळा पांघरती.............अलक्ष काकध्वनी तो... काळोख्या नभांच्या मागे.....ती शुभ्र कोर उगवते
मीटरमध्ये अजून बसवण्यासाठी थोडे कष्ट घेतल्यास ही कविता छान म्हणता ये ईल...
>>रचना तुझीच आहे का? असल्यास, तुला दंडवत. नसल्यास ती इथं दिल्याबद्दल आभार.
-- होय, श्रामो.. काल रात्रीच झालीय. :)
युजी नावाचा कावळा पिंडावर येऊन बसला वगैरे.
शब्दांच्या आतून, शब्दांच्या बाजूने आणि त्याच्या मागे असलेलं असं सगळं मिळून काहीतरी वाटलेलं लिहिलंय..
युजींनी रुढ संज्ञाच मुळातून उपटून फेकल्या म्हणून ते पिंडाला शिवणारा कावळा.
जमली आहे. ताकद जाणवली. अगदीच नाही पण किंचित ग्रेसची आठवण झाली. कवितेतला भाव, शब्दांची लय इ. मुळे.
नेहमी होत राहो! ताकद वाया घालवू नकोस. :)
In reply to जमली आहे. ताकद जाणवली. अगदीच by बिपिन कार्यकर्ते
अगदीच नाही पण किंचित ग्रेसची आठवण झाली >> अगदी हेच वाटले मलाहि.
कविता छान झाली आहे हे वे.सां.न.ला.
In reply to जमली आहे. ताकद जाणवली. अगदीच by बिपिन कार्यकर्ते
असेच म्हणतो. जे म्हणायचे आहे ते पोचविण्यात बर्याच अंशी यकु यशस्वी झाला आहे :)
In reply to जमली आहे. ताकद जाणवली. अगदीच by बिपिन कार्यकर्ते
ताकद वाया घालवू नकोस.ब्रह्मचारी रहा. *स्पावड्या अविवाहित राहण्याला ब्रह्मचर्य समजत. तू मात्र तशी चुक करु नकोस.*
यकु साहेब, निब्बळ लाजवाब कविता
निष्पर्ण तरू तस बघायला गेल तर जीव सोडुन गेलल्या अचेतन प्रेताची आठवण करुन देत.
व
एकाक्ष कावळा कधीचा
ध्यानस्थ उसासे भरतो
ह्या ओळी पिंडाला शिवायला वाट बघणार्या कावळ्याची आठवण करुन देते.
कविता अप्रतिम
वर कुणीतरी म्हटल्या प्रमाणे, ग्रेस ची आठवण होते. (ग्रेस ची तुलना केली की,दुर्बोधता याच्याशी नाते जोडले जाणारच) असो.
कवीता फक्कड जमली आहे. शब्दांची मांडणी करताना कष्ट घेतलेले दिसून येतात.
भय व्याकूळ झळा पांघरती निष्पर्ण तरूची छाया
एकाक्ष कावळा कधीचा ध्यानस्थ उसासे भरतोम्हणजे तर खास ग्रेस टच. आणि निष्पर्ण तरूची छाया हे तर खासच. शब्दातल्या जागा आणि विरोधाभास छान जमला आहे, अर्थात कुणाला यात दुसरा अर्थ पण दिसेल, तसे असेल तर कवितेची तो युएस पी होतो (पुन्हा ग्रेस) पण ...एक गोष्ट मात्र खटकली-युजी वाचावा लागला! ह.घ्या.
वल्ली, श्रामो, भडकमकर मास्तर, मेवे, चित्रा, बिका, अधाशी उदय, नीश, बॅटमॅन आणि कापूसकोंड्या, सर्वांचाच आभारी आहे.
भडकमकर मास्तर,
पुढच्यावेळी असली काही कविता झाली तर तर तुमच्या सूचनांचा वापर करायला विसरणार नाही.
कित्ती हो गुणाचा यक्कू.... सध्या कुणा उर्जी का गुर्जी च्या मागे लागला आहे.. पण येईल हो ताळ्यावर लवकरच.
सुंदर लिहिलंय..
कविता आवडली.. खास करून शब्दांची सहजता..
यु जी वाचायचा बऱ्याचदा प्रयत्न केलाय पण नेहेमी काही तरी राहून गेल्यासारख वाटत राहिलंय.. आणि कधी दोन तीन पानांच्या पुढे नाही गेलोय.. :)
आपली कविता वाचून आणि आपल्या वरचा यु जी यांचा प्रभाव पाहून परत उत्सुकता चालवलीय...
हमो मराठ्यांचे "निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी"
वाचून बघा....... सेम फिलींग येईल
In reply to हमो मराठ्यांचे "निष्पर्ण by विजुभाऊ
हॅहॅहॅ
इजाभौ ते पुस्तक एका एम. फील. वाल्याला इंग्रजीत अनुवादीत करुन दिलेलंय पार्शल सबमीशनसाठी.
तो म्हणे ह.मो. ची कधी भेट झाली तर सांगू नकोस तुम्ही ट्रान्सलेट केलंत ते. त्याला आत्तापर्यंत डिग्री मिळून गेली असेल ;-) म्हणून आता सांगतोय ;-)
चांगलं जमलय.
म्हणजे कविता कळली का? असं कुणीही विचारलं तर "इतर कवितांप्रमाणेच हीदेखील नीटशी समजली नाही" असं म्हणेन. पण तरीही प्रचंड आवडली. म्हणजे एक अंधुक अंधुक , धोसर असं कुथलसं चित्र पाहताना वाटतं तसं काहीतरी वाटलं.
वरती पब्लिकनं ग्रेस ह्यांचा उल्लेख केलाय. अगदि ह्याच आशयाची वाटणारी, आणि वृत्तातही ह्याच बसणारी कविता ही बघा:-
...मन कशात लागत नाही
अदमास कशाचा घ्यावा
अज्ञात झऱ्यावर रात्री
मज ऐकू येतो पावा...
.
...तरि हळूहळू येते ही
संध्येची चाहुल देवा
लांबती उदासीन क्षितिजे
पाण्यात थांबल्या नावा...
.
...मृत्यूही सूज्ञपणे
स्वप्नांचा धरतो फेर
कुठलाही क्षण कवळावा
सर्पासम असतो गार...
.
किम्वा गूगलून पाहिल्यावर काही अजून मिळालेल्या ओळी..........
.
मन कशात लागत नाही
अदमास कशाचा घ्यावा ?
अज्ञात झर्यावर रात्री
मज ऐकू येतो पावा
श्वासांचे तोडून बंधन
हे हृदय फुलांचे होई
शिशिरात कसे झाडांचे
मग वैभव निघून जाई
सळसळते पिंपळपान
वार्यात भुताची गाणी
भिंतीवर नक्षत्रांचे
आभाळ खचविले कोणी ?
मन बहर गुणांचे लोभी
समईवर पदर कशाला ?
हे गीत तडकले जेथे
तो एकच दगड उशाला
चल जाऊ दूर कुठेही
हातात जरा दे हात
भर रस्त्यामध्ये माझा
होणार कधीतरी घात
मन कशात लागत नाही !
मी ऐसा क्यु हुं ? ही दुनीया अशीच क्यो है?
शांतपणे जगणे छोडके, ये गडबड गोंधळ क्यो है...
हा हा हा.. अप्पुन को भी आती है कविता करना.
अर्धवटराव

सुरेख.