कोंकणी माणूस असा का?
प्रतिक्रिया
In reply to कोंकण आणि अस्वच्छ..? विशेषतः by गवि
In reply to छ्या ! by परिकथेतील राजकुमार
In reply to परा शी सहमत आहे. लोक जेंव्हा by विजुभाऊ
In reply to कोंकणी माणूस असा का? by Madhavi_Bhave
परिस्थिती बदलू शकतेपण का ? परिस्थीती येवढी हालाखीची वा वाईट आहे का ? की ती बदलायलाच पाहिजे ?
In reply to ?? by परिकथेतील राजकुमार
In reply to कोंकणी माणूस असा का? by Madhavi_Bhave
In reply to कोकणातील माणूस हा अतिक्शय आळशी माणूस by कुंदन
काहीही काय. आमचा एक कोकणी मित्र आहे आणि तो प्रचंड उद्योगी आहे; इतका की आताशा जालावरही दिसत नाही तो.हम्म! कुंद्या, अजून तुझा मूळचा भिकारचोट स्वभाव गेला नाही म्हणायचा! :)
In reply to कोकणातील माणूस हा अतिक्शय आळशी माणूस by कुंदन
In reply to कुणीतरी विदा जमवा रे, by कवितानागेश
In reply to कुणीतरी विदा जमवा रे, by कवितानागेश
In reply to हा विदा काय प्रकार आहे?? by राजो
In reply to येथे एक उल्लेख करावासा वाटतो. by मृत्युन्जय
In reply to केसरी वाल्यानी by कुंदन
In reply to येथे एक उल्लेख करावासा वाटतो. by मृत्युन्जय
गुलमर्गला मोठ्या अपेक्षेने गेलो तर तिकडे एक फुल सुध्धा दिसले नाही आणि पहलगाम ला जो काही थोडासा बर्फ शिल्लक राहिला होता त्यात घोड्यांनी केलेल्या प्रातर्विधी शिवाय काही नव्हते.ऑफ सिझनला किंवा सिझन संपता संपता गेल्यावर काय हाती लागणार म्हणा. बहुतेक घोड्यांच आणि तुमच 'टायमिंग' जुळल असाव. :)
एक प्रकारचा भकासपणा म्हणा किंवा उदासपणा हा अगदी रक्तातच भिनलेला आहे.या वाक्याने तर एकदम भाईकाकांची आठवण झाली. ;) बाकी अलिकडेच कुणी तरी पुणेकरांवर धागा काढला होता. हा लेख त्या लेखाची 'उत्तर'पुजा म्हणुन बांधलाय का ? ;)
In reply to गुलमर्गला मोठ्या अपेक्षेने by गणपा
In reply to असहमत... by प्रभाकर पेठकर
कोकणी माणसे आळशीही नाहीत आणि अस्वच्छ तर अज्जिबात नाहीत. तिथले जीवन संथ आहे.अत्यंत अचूक शब्दात नेमका प्रतिसाद.. अनेक धन्यवाद.. आमचे पानभर टंकन खर्ची पडले असते. कोंकणी माणूस आहे त्यात सुखी असतो. बाहेरुन तिथे येऊन ईर्षा, स्पर्धा, उभी करणार्यांना ते आळशी वाटतात.. पण ती त्यांची मूळ सुशेगाद वृत्ती आहे. पोफळीच्या वाडीत बनियन वर करुन पोटाला गार वारा देत आरामखुर्चीत पडलेला कोंकणी मनुष्य पाहताना सुखी माणसाचा बनियन काय असतो तो असंख्य वेळा पाहिला आहे. आपल्या आवारात उगवणारे लाल भात आणि वरी / नाचणी ..शिवाय एखादी आंबी, फणस, पोफळी, माड यांच्या आधारे तेवढ्यात चरितार्थ बसवून कोणत्याही रॅटरेसमधे न पडता भरपूर मोकळा वेळ मिळवणारी कोंकणी माणसं माझी आदर्श आहेत. कोंकणात मी जन्मून मोठा झालो. कोंकण पुरेपूर अंतर्बाह्य पाहिलेलं आहे. कोंकणात मुळात गरीब (खाऊन पिऊन सुखी पण श्रीमंत नसलेले) बहुसंख्य आहेत.. पण.. त्याचवेळी मूलतः भिकारी नगण्य आहेत ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आपल्या नशिबी इतरांचे आर्थिक मिंधेपण येणे ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट मानली जाते. कोंकणातला मनुष्य रेज द बार तत्वाने उंच उड्या मारत आयुष्यात वरवर चढत जाईलच असं नाही.. पण तो याला स्वतःचा नाकर्तेपणा समजून कुरतडत कुरकुरत बसणार नाही.. तो "साफल्य" नावाचं छोटं घर बांधून कृतार्थ असेल. यातली मजा पैशात मोजता येणार नाही.. स्वच्छतेबाबत : मी अस्वच्छता हा प्रकार कोंकण सोडल्यावर पहिल्यांदा पाहिला एवढंच म्हणतो. "पालापाचोळा" याला अस्वच्छता म्हटले असावे बहुधा लेखिकेने. आमच्या कोंकणातल्या गावी बाहेरुन आलेल्या एका कुटुंबाने एकदा रस्त्यावर मूल शी करायला बसवलं तेव्हा आख्खी आळी एक होऊन त्यांच्याविरुद्ध गेली होती. पहिल्याच प्रसंगानंतर ही पद्धत हाणून पाडण्यात आली.. हे फक्त एक उदाहरण. मी कोंकण सोडून देशावर आलो तर हागणदारी हा नॉर्म होता.. आणि न हगलेले रस्ते ही दुर्मिळ गोष्ट. कोंकणात रस्त्याबाजूला वाहणार्या पावसाच्या पाण्यात ओंजळ बुडवून प्यायची इच्छा होईल इतकं स्वच्छ ते असायचं.. कसलाच कचरा, गाळही नाही..
In reply to कोकणी माणसे आळशीही नाहीत आणि by गवि
कोंकणात मी जन्मून मोठा झालो. कोंकण पुरेपूर अंतर्बाह्य पाहिलेलं आहे. कोंकणात मुळात गरीब (खाऊन पिऊन सुखी पण श्रीमंत नसलेले) बहुसंख्य आहेत.. पण.. त्याचवेळी मूलतः भिकारी नगण्य आहेत ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आपल्या नशिबी इतरांचे आर्थिक मिंधेपण येणे ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट मानली जाते.अगदी सोळा आणे सत्य!
कोकणी माणसे आळशीही नाहीत आणि अस्वच्छ तर अज्जिबात नाहीत. तिथले जीवन संथ आहे.१००% करेक्ट!!!
In reply to +१ by अस्मी
In reply to कोकणी माणसे आळशीही नाहीत आणि by गवि
In reply to कोकणी माणसे आळशीही नाहीत आणि by गवि
In reply to लेखाबद्दल प्रचंड असहमत आमचे by स्पा
In reply to जुन ठाकुर्ली पाहिलयेस का? ते by शैलेन्द्र
In reply to मी तुम्हा सर्वांच्या by Madhavi_Bhave
In reply to मी तुम्हा सर्वांच्या by Madhavi_Bhave
In reply to मी तुम्हा सर्वांच्या by Madhavi_Bhave
आपली हि कॉमेंट रुचली नाही. It was not in a good spirit.नाही हो अगदी स्वच्छ मनाने दिला होता प्रतिसाद. अधिक स्पष्टिकरण दिले असते पण मग सारवा सारव करतोय असा आरोप झाला असता म्हणुन माझे शब्द मागे घेतो. आय एम स्वारी. :)
In reply to प्रचंड मोठा गैरसमज. तुम्ही by पिंगू
In reply to आंजा आणि मराठ्वाडा , विदर्भ by कपिलमुनी
पण आज जेव्हा मी कोकणात जाते तेव्हा वातावरणातील एकंदर असणारा तो उदासपणा आणि एकंदरीतच काही प्रमाणातील निष्क्रियता ह्यामुळे मला नेहमी वाईट वाटतेहे केवळ कोकणच नाही तर सर्वत्र लागू होते- मोठी शहरे आणि खेडी,जिल्हा शहरे ह्यांच्या राहणीमानात तफावत असल्याने तसे आपल्याला वाटते. उ.दा.मोठ्या शहरांमध्ये दुकाने ९.३० -१० पर्यंत चालु असतात तर ईतरत्र भारतात ८ वाजले की आवरते घ्यायला चालू होते. मल्याळी,उडपी लोकांचा कष्टाळू म्हणून मुंबईत उल्लेख केला जातो. पण दक्षिण कर्नाटकातली,उत्तर केरळातील गावे पाहिलीत तर ती "उदासपणात्,निष्क्रियतेत' कोकणाला मागे टाकतील.
In reply to चला वेगवेगळे गट करा पाहू मुलांनो... by योगप्रभू
In reply to चला वेगवेगळे गट करा पाहू मुलांनो... by योगप्रभू
In reply to कोकण हे अतिशय सुंदर आहे. by गोंधळी
कोकणातली माणस अतिशय मेहनति असतात.प्रचंड सहमत आहे. घरं कशी पोराबाळांनी बहरलेली असतात.
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
In reply to आळशी! by साती
देवळाच्या आत आणि आजूबाजूचा परिसर प्रचंड स्वच्छ होता. तिथल्या गुरवांकडे आम्ही जेवलो तर अतिषय स्वच्छ, चवदार आमटीभात आणि लोणचे वाढले. माझे काका कोकणात गेली पन्नास वर्षे तरी राहतायत. त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतल्यावर द्यायला पैसे नसले तर लोक शेतातले काहीबाही आणून देतात पण फुकट काही नको असते. मला तरी वर्षानुवर्षे चांगलाच अनुभव आला आहे. यापुढे बिल्डर्स, नेतेमंडळी काय वाट लावतील ती वेगळी.In reply to फक्त कोंकण आणि अस्वच्छ..? तेही विशेषतः पुर्ण भारतात by खादाड_बोका
In reply to ? by गणपा
In reply to माझे मत by प्रदीप
In reply to आवडला. by साती
In reply to मध्य पूर्वेत.. by प्रभाकर पेठकर
In reply to मध्यपूर्वेचा अनुभव by प्रदीप
In reply to कुठे कमी कुठे जास्त... by प्रभाकर पेठकर
मुद्दा त्यांच्या कमाईचा किंवा त्यांनी पाठवलेल्या पैशातून कोंकण विकासाचा नाही तर कोंकणी माणूसही शेती व्यतिरिक्त इतर व्यवसायात आणि भारता बाहेर कार्यरत आहे हे मला सांगायचे आहे.कोकणी माणसे बर्याच संख्येने मध्य पूर्वेत आहेत हे तुमचे निरीक्षण आहे, ते मान्य करतो. पण त्यांच्या मिळकतीचा कोकणावर अगदी अल्प परिणाम दिसतो, ह्याचे आश्चर्य मात्र वाटतच राहील. केरळात तर (म्हणे) आखाती मजूरांनी बंगले बांधले, (त्यातील काही मग देशोधडीलाही लागले, पण हे प्रमाण अल्प असावे), तिथे सुबत्ता आली. कोकण होता तसाच राहिला, असे सकृतदर्शनी दिसत आहे.
In reply to मुद्दा त्यांच्या कमाईचा किंवा by प्रदीप
कोंकण आणि अस्वच्छ..? विशेषतः