मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मंद तारका

अन्या दातार · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
मंद तारका त्या तेजाळती नभी विश्वाची दिवाळी सदोदित । तुझा सहवास करे उल्हसित नको तो विरह जीवघेणा । अथांग सागर जैसे तुझे मन निराळेच पैलू दावितसे । तुझी-माझी साथ हातामध्ये हात घालू गगनास गवसणी । टीपः कवितेचा पहिलाच प्रयत्न आहे, सांभाळून घ्यावे.

वाचने 5208 वाचनखूण प्रतिक्रिया 28

प्रचेतस Tue, 03/27/2012 - 23:22
एक पकडलं झाड परि सावली नाही आड शोधू दुसरीकडे आता रानभूल.!! चैन पडत नाय का हो खडगपुरात आता? कविता आवडली. पहिलाच प्रयत्न जोरदार यशस्वी.
टीपः कवितेचा पहिलाच प्रयत्न आहे, सांभाळून घ्यावे.
नवकवीचे मिपावर स्वागत. इथे विडंबन पाडण्यास आत्मे टपलेले असतात, तुम्हास हे सांगण्याची जरूरी नाहीच. तरी सावधान. ;)

चौकटराजा Wed, 03/28/2012 - 05:02
अन्या जी, कमीतकमी शब्दात ( आणि अचूक शब्दात ) जास्त आशय ! आम्ही "धमकू " संघटना नाही . अशा संघटनेला घाबरतही नाही. पण खरीच मस्त कविता असताना काय उगाच लिहित बसायचं? पुन्हा लिहाच.

सांजसंध्या Wed, 03/28/2012 - 05:14
साडेतीन चरणाचे षष्टाक्षरी ओवी वृत्त आहे. मला खूप आवडते हे. छान प्रयत्न आहे. पुलेशु ( दुस-या आणि तिस-या चरणामधे यमक साधण्याचा प्रयत्न करा. )

In reply to by सांजसंध्या

चौकटराजा Wed, 03/28/2012 - 08:41
जौ द्या हो सांजसंध्याताई , त्या यमकाचं एवढं नका मनावर घेउ ! काय आहे कवि हा आत्मकेंद्रित असतो. त्याला जे "भावते" ते तो लिहितो. मन मोठं करा ! जाउ द्या !

५० फक्त Wed, 03/28/2012 - 09:59
छान थोडक्या शब्दात, उत्तम मानापमान खेळला आहात, अवांतर - तेवढं शेवटचं कडवं, दोन महिन्यापुर्वी लिहिलं असतं तर निवडणुकीच्या प्रचारात जाम भाव खावुन गेलं असतं, पण ज्या पार्टीला हे गाणं दिलं असतं ती जर पडली असती, तर मग तुमची काय खैर नव्हती.

राघव Wed, 03/28/2012 - 10:28
छान लिहिलंय. :) पुलेशु. राघव

In reply to by राघव

मूकवाचक Wed, 03/28/2012 - 12:20
पुलेशु. अन्याभाऊंची माफी मागून या कवितेची 'विधुर' आवृत्ती: मंद तारका त्या| तेजाळती नभात| माझ्या अंतरात| अमावस्या|| सखे हरपला| तुझा सहवास| आता वनवास| नित्याचाच|| गोठलेले तळे| झाले माझे मन| विरहाचे भान| सदोदित|| तुझ्या आठवात| विरताच श्वास| शेवटचा दिस| गोड व्हावा||

In reply to by मूकवाचक

चौकटराजा Wed, 03/28/2012 - 13:20
तुमचा या व्हर्शन मधून वाचत जाता स्तब्द झालो .विद्ध झालो. पण निर्दोष काव्य वाचून तृप्त झालो. आय लव्ह धिस ! पुन्हा लिहा आणखी की एका विषयावर !

प्रास Wed, 03/28/2012 - 10:48
नामे मंद तारका कविता रुपी खारका बहु मधुर बनल्या अन्याभाऊच्या पहिला तो काव्य यत्न हाती गवसले रत्न वाचकां केले कौतुक अन्याभाऊचे आमचाही असे जसा पहिला काव्य-प्रतिसाद असा कौतुकाचा तो प्रयत्न अन्याभाऊच्या मिपाच्या काव्य विभागात अन्याभाऊंचे स्वागत. :-)

वपाडाव Wed, 03/28/2012 - 12:30
अरेरे अन्या, कसा रे भाड्या, झाला तु असा, सद्गदित !! करुन दे वाट, वाहु दे पाट, बोळांचे दाट, तुंबलेले !!