मंद तारका
लेखनविषय:
काव्यरस
मंद तारका त्या
तेजाळती नभी
विश्वाची दिवाळी
सदोदित ।
तुझा सहवास
करे उल्हसित
नको तो विरह
जीवघेणा ।
अथांग सागर
जैसे तुझे मन
निराळेच पैलू
दावितसे ।
तुझी-माझी साथ
हातामध्ये हात
घालू गगनास
गवसणी ।
टीपः कवितेचा पहिलाच प्रयत्न आहे, सांभाळून घ्यावे.
वाचने
5210
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
सांभाळून आम्ही घेऊच. आणखी कोणाला सांगायचं आहे का?
झालं, गेले दातारसुद्धा कामातून.. ;-)
अवांतरः भार्री जमलंय
In reply to झालं, गेले दातारसुद्धा by यकु
गेले गेले.. साफ ख प ले :)
मस्तच रे अन्या
In reply to झालं, गेले दातारसुद्धा by यकु
+ ln(e).
असेच म्हणतो. जमलंय तर छानच.
शेवटचं कडवं एकदम कातिल आहे. पहिलाच प्रयत्न पण झक्कास जमलाय.
In reply to शेवटचं कडवं एकदम कातिल आहे. by सूड
तंतोतंत.
एक पकडलं झाड
परि सावली नाही आड
शोधू दुसरीकडे आता
रानभूल.!!
चैन पडत नाय का हो खडगपुरात आता?
कविता आवडली. पहिलाच प्रयत्न जोरदार यशस्वी.
टीपः कवितेचा पहिलाच प्रयत्न आहे, सांभाळून घ्यावे.नवकवीचे मिपावर स्वागत. इथे विडंबन पाडण्यास आत्मे टपलेले असतात, तुम्हास हे सांगण्याची जरूरी नाहीच. तरी सावधान. ;)
In reply to एक पकडलं झाड परि सावली नाही by प्रचेतस
:-)
अन्या जी,
कमीतकमी शब्दात ( आणि अचूक शब्दात ) जास्त आशय ! आम्ही "धमकू " संघटना नाही . अशा संघटनेला घाबरतही नाही.
पण खरीच मस्त कविता असताना काय उगाच लिहित बसायचं?
पुन्हा लिहाच.
साडेतीन चरणाचे षष्टाक्षरी ओवी वृत्त आहे. मला खूप आवडते हे. छान प्रयत्न आहे. पुलेशु
( दुस-या आणि तिस-या चरणामधे यमक साधण्याचा प्रयत्न करा. )
In reply to साडेतीन चरणाचे षष्टाक्षरी by सांजसंध्या
जौ द्या हो सांजसंध्याताई , त्या यमकाचं एवढं नका मनावर घेउ ! काय आहे कवि हा आत्मकेंद्रित असतो. त्याला जे "भावते" ते तो लिहितो.
मन मोठं करा ! जाउ द्या !
ओये होये अन्या तु पण :P
भारिच ..जाम आवडलं :)
वण्ण्कम्म..
या या.. छान जमतय..
चांगली जमली आहे.. :-)
छान आहे कविता
छान थोडक्या शब्दात, उत्तम मानापमान खेळला आहात,
अवांतर - तेवढं शेवटचं कडवं, दोन महिन्यापुर्वी लिहिलं असतं तर निवडणुकीच्या प्रचारात जाम भाव खावुन गेलं असतं, पण ज्या पार्टीला हे गाणं दिलं असतं ती जर पडली असती, तर मग तुमची काय खैर नव्हती.
छान लिहिलंय. :)
पुलेशु.
राघव
In reply to :) by राघव
पुलेशु.
अन्याभाऊंची माफी मागून या कवितेची 'विधुर' आवृत्ती:
मंद तारका त्या| तेजाळती नभात|
माझ्या अंतरात| अमावस्या||
सखे हरपला| तुझा सहवास|
आता वनवास| नित्याचाच||
गोठलेले तळे| झाले माझे मन|
विरहाचे भान| सदोदित||
तुझ्या आठवात| विरताच श्वास|
शेवटचा दिस| गोड व्हावा||
In reply to +१ by मूकवाचक
_/\_
भन्नाट.
In reply to +१ by मूकवाचक
तुमचा या व्हर्शन मधून वाचत जाता स्तब्द झालो .विद्ध झालो. पण निर्दोष काव्य वाचून तृप्त झालो.
आय लव्ह धिस ! पुन्हा लिहा आणखी की एका विषयावर !
नामे मंद तारका
कविता रुपी खारका
बहु मधुर बनल्या
अन्याभाऊच्या
पहिला तो काव्य यत्न
हाती गवसले रत्न
वाचकां केले कौतुक
अन्याभाऊचे
आमचाही असे जसा
पहिला काव्य-प्रतिसाद असा
कौतुकाचा तो प्रयत्न
अन्याभाऊच्या
मिपाच्या काव्य विभागात अन्याभाऊंचे स्वागत. :-)
अरेरे अन्या,
कसा रे भाड्या,
झाला तु असा,
सद्गदित !!
करुन दे वाट,
वाहु दे पाट,
बोळांचे दाट,
तुंबलेले !!
अन्या पहिल्याच प्रयत्नात एकदम अभंग लिहिलायेस तु ..
नक्कीच उच्च प्रयत्न आहे हा.
खुप छान
हुच्च आहे...
पहिला प्रयत्न आहे तर विषेश कौतुकास पात्र!!
अभिनंदन!
खूप छान!
- (पहिल्या प्रयत्नास संभाळून घेतलेला) सोकाजी
आले काही मनात
संचारले अंगात
सांगाया जनात
आले अन्याभाऊ..
येत रहा...स्वागतम !
मंद तारका त्या
तेजाळती नभी
विश्वाची दिवाळी
सदोदित ।
परत एकदा तपासा वर शांतरस आत शृंगार हा कसला प्रकार

In reply to मंद तारका त्या तेजाळती by ajay wankhede
शांतपणे शृंगार चालला असल्याने "शांत"रसच! ;)
१००/१००