फ्राईड भेंडी
साहित्य : बोटाइतक्या लहान व कोवळ्या भेंड्या पाव किलो
शेंदेलोण व पादेलोण प्रत्येकी १/२ चमचा
लाल मिरचीपूड १/२ चमचा
दालचीन पूड पाव चमचा
तळणासाठी तेल अर्धी वाटी
भेंडी धुऊन देठे व शेंडे कापावे.
कढईमध्ये तेल तापवून पूर्ण आचेवर अखंड भेंड्या थोड्या थोड्या तळून घ्याव्या.
निवल्यावर एका ताटामध्ये पसरून प्रथम शेंदेलोण, पादेलोण व नंतर दालचीन पूड व लाल मिरचीपूड वरून भुरभुरावी. स्नॅक्स म्हणून खाण्यास चांगली.


वाचने
9087
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
छान झाला आहे हा आयटम :) पण चिरुन तळ्ल्या तर कुरकुरीत होतिल अस वाट्तय ,अन मसाला देखील व्यवस्थित लागेल...
In reply to छान झाला आहे हा आयटम पण by पक पक पक
चिरुन तळल्या तर भेंडीच्या आतल्या रसाचा आस्वाद मिळत नाहि. (मटणातल्या नळीसारखा...)
छान !
आणि हा सल्ला ;)
http://www.misalpav.com/node/13909 ;)
In reply to छान ! आणि हा सल्ला by सुहास..
नेमकी भेंडी खात असतानाच हा धागा आला. भेंडी म्हणजे आपला जीव की प्राण.
बाकी धागा वाचून सुहासने दिलेल्या पाकृचीच आठवण झाली पहिल्यांदा.
आवडली आहे :)
In reply to झटपट अशी पाकृ by सानिकास्वप्निल
धन्यवाद सानिकाजी. आपले सर्टिफिकेट मिळाले म्हणजे सगळ्यांचे मिळाल्यात जमा आहे.
भेंडीचे सगळे प्रकार मला आवडतात म्हणून हाही आवडेल.
अवांतर: भरल्या भेंडीची भाजी पोळीबरोबर कशी खायची हे अजूनही मला न उलगडलेलं कोडं आहे.
In reply to भेंडीचे सगळे प्रकार मला by रेवती
मी पोळीचा रोल करुन त्यात ती भरते अन खाते. एक घास भेंडी अन एक घास पोळी असं करण्यापेक्षा बरं !
In reply to भेंडीचे सगळे प्रकार मला by रेवती
भरल्या भेंडीची भाजी पोळीबरोबर कशी खायची हे अजूनही मला न उलगडलेलं कोडं आहे.अशा वेळी पोळी भरल्या भेंडीच्या भाजीबरोबर खायची.
भेंडी.. मला कधी भेंडी आवडली नाहीत. त्यामुळे पास.
- पिंगू
मस्त -- करुनच पहाते....
अर्धी भेंडी १०० किलो काजूत मिसळून जो पदार्थ होईल त्याला काजूभेंडी म्हणतात. हा भेडीचा प्रकार फारच छान लागतो.
१०० किलो काजू घेतल्यास गोव्यात अर्धी भेंडी फ्री मिळते. त्यामुळे भेंडीचा खर्च येत नाही.
छान झाला आहे हा आयटम पण