ढक्कन खोलना नहीं आता ! इंदुरी दुकानदारीची एक झलक
नुकताच झालेला, शेअर करण्यासारखा फाऊंटन पेनचा किस्सा आहे.
आत्मशून्य इथे आला तेव्हा आम्ही असेच राजवाड्याशेजारच्या रोडवर बाजारातून फिरत होतो. जुनी कळकट दुकाने बंद व्हायची रात्रीची वेळ. एक फाऊंटन पेनचं दुकान दिसलं. फाऊंटनपेन भलेही रोज वापरत नसलो तरी दुकान दिसलं की पहावे, घ्यावे वाटतातच. त्या दुकानदाराने नेहमीचीच सत्तर, शंभर रुपयांची शाईपेनं समोर मांडली. त्यापैकी बरीच ऑलरेडी इथेतिथे पडून आहेत. मूड गेला. पण दुकानातून निघून कसं यावं म्हणून उगी शान मारत -
''अरे नहीं नहीं, ये तो सब चालू माल है, कलेक्शन के लिये कुछ है तो दिखाईये '' अशी वाक्ये फेकली.
दुकानदारी नजरेत आणि अत्यंत किंचीत तुच्छतेने पुन्हा नीट निरखून पहात -
''सब प्रकार के पीस मिलेंगे, आपका बजट कितना है ? ''
म्हटलं बुवा चांगला असेल तर घेऊ सात आठशेपर्यंत. मग त्यानं आतून एक लाकडी केस आणून दाखवली.
जिनहाओ - छोटे छोटे लाल डोळे असलेल्या बाकदार ड्रॅगनचं हूक आणि उत्थित चिनी अक्षरे, आकृत्यांनी सजवलेला फिकट राखाडी शाईपेन - व्वॉव्व!
मी आपलं घिसाडघाईत खस्स्कन झाकण उघडलं. सुरी हातात घ्यावी तसं वाटतं होतं.
दुकानदार महाशय जे पेटले ते तसं झाकण उघडलेलं पाहून, अरारा!
''आपके पास कितने पेन है? आपको ठिक से ढक्कन खोलना नहीं आता.'' मी चमकलो. नाटकी आवेशात हात जोडून म्हणालो -
''महाराज आपही कृपा करो''
पुन्हा त्याचा भडीमर - ''मुझसे कुछ सिख के जाईये, आप क्या खाक कलेक्शन में इसे रखोगे, इधर, इधर दिजीए. मै सिखाता हुं.'' म्हणून त्यानं एका हाताच्या तीन बोटांच्या आधारावर तर्जनी व अंगठ्यात शाईपेन पकडून, पायात मोडलेला काटा काढावा तसं हळुवार झाकणावर दाब दिला. क्लिक् ! वाजलेलं आम्हालासुद्धा ऐकू आलं.
''इसे ऐसा खोलते है, तलवार की तरह उखाडोगे तो इसका नीब् घीस घीस के खतम् हो जाता है, फिर इसमें मजा नहीं.. अब ये ध्यान में रखिए, यहांसे खरीद के ले गये तो भी...''
मग त्यानं त्या कोर्या पेनचं नीब् तसंच काळ्या शाईच्या दौतीत बुडवलं.. एकदोन रेषा काढून
''चलाईये, मख्खन की तरह चलता है''
ते पुरेसं वजनदार शाईपेन स्वत:च चालत असाव तसं हळुवारपणे नीब् मधून काळ्याभोर बाकदार महिरपी चितारु लागलं. आपण खलास! आत्मशून्याकडंही पेन दिलं - तो म्हणे अक्षर चांगलं नाहीय रे, तुच लिही. म्हटलं बघ तर. त्यानंही चालवून पाहिलं. तो म्हणे सेल्फ गायडेड मिसाईल आहे.
''चीज़ ही ऐसी रखतें है, हाथ में लोगे तो वापस नहीं रख पाओगे. जिंदगी गुजर गई कलम की दुनिया में, मै कोई दुकानदार लगता हुं?''
दुकानदार जबराट माणूस होता, ही खास इंदौरी दुकानदारी होती. दाम भी वाजिब, मुनाफा भी खरा. ग्राहकी नहीं, जैसे अपने ही घरवालों को कुछ बेच रहे हो. और जाओगे भी कहां?
काही बोलण्यासारखं नव्हतंच, पण एवढं ज्ञान मिळाल्यानंतर महाराष्ट्रातले लोकही कृतज्ञ असतात, हे त्याला जाणवावं म्हणून म्हणालो -
''आप भी फाऊंटन के चहेते है.. कितने तक के फाऊंटन पेन रखते हैं...''
तो काही बोलला नाही - आत निघून गेला. त्या फारशा झकपट नसलेल्या त्याच्या दुकानाबद्दलच्या कात्रणांचे बाड घेऊन परत आला. हिंदुस्तान टाइम्स, दैनिक भास्कर, दबंग दुनियाची कात्रणे काऊंटरवर विखरुन टाकत -
''ये डेढ लाख, ये दो लाख.. ये साडेसात लाख''
इंदुरमध्ये तो लाख लाख रुपयांचा शाईपेन आला तेव्हा तेव्हा बातम्या आलेल्या होत्या.
''हमें तो आप जैसे परखी मिल जाए, दुनिया के किसी भी कोने से जो चाहे वो फाऊंटेन पेन मँगवा लेते है''
''ये अपने बस की बात नहीं.. मै तो बस ऐसे ही..'' वाक्ये आपोआप बाहेर पडली.
''हम किसलिए है, इसीलिए सभी की बस की चीज़ लिए बैठे है...''
आता त्यानं रजिस्टर काढलं.
''ये कौन है? प्रोफेसर श्रीवास्तव, इन्होंने डेढ हजार का लिया है, ये हमारे डाक्टर शुक्ला, आठ सौ का, ये यहां देखीए एडवोकेट भाटिया..
शोधूनशोधून तो नावं बघायला लावत होता.. डेढ हजार.. ये हमारे सालों से ग्राहक है.. पसंदीदा चीज आ जाए, तो बस इन्हे फोन करने की देरी.. आकर ले जाते है...''
''बस, बस.. बस..इसको पैक कर दिजीए.. और आपका कार्ड हो तो दे दिजीए..''
कार्ड काही छापली नव्हती की संपली होती माहित नाही. रजिस्टरमध्ये नाव, फोन नंबर लिहून घेतला. शाईपेन कॅरीबॅगेत टाकलं, पैसे दिले.
''कुछ ऐसा ही आये तो जरुर बताईये.. मै आ जाऊंगा.''
''मार्च के एंड में नया माल आनेवाला है, फोन करुंगा''
''धन्यवाद!'' म्हणून बाहेर पडू लागलो.
''और एक बात..'' त्याला काहीतरी सांगायचं असावं.
हात जोडून म्हटलं, ''महाराज!''
''एकबार उस पेन का ढक्कन ठिक से खोलकर के दिखायेंगे..?''
खळखळून हसलो आणि जोडलेले हात डोक्यापर्यंत नेऊन झटकन् दुकानाबाहेर पडलो.
वाचने
14064
वाचनखूण
प्रतिक्रिया
56
ओहो..
In reply to ओहो.. by गवि
मिपवर असे किति यक्कु आहेत? कि
In reply to मिपवर असे किति यक्कु आहेत? कि by किचेन
किचेनकाकू/ताई, केलात ना माझा
In reply to किचेनकाकू/ताई, केलात ना माझा by यकु
लोक तुम्हाला यक्कु म्हणतील
In reply to लोक तुम्हाला यक्कु म्हणतील by धन्या
@ धन्या
मख्खन ...
आवडला आपल्याला हा प्राणी...
भारी........
मस्त
मस्त!
क्या बात है.
वा
मस्त सही किस्सा आवडला.
अच्छा तर म्हणुन आयडि बदलला
In reply to अच्छा तर म्हणुन आयडि बदलला by ५० फक्त
अगदी अगदी...सेम हियर..
In reply to अच्छा तर म्हणुन आयडि बदलला by ५० फक्त
जरा खूलासा करणार का???
In reply to जरा खूलासा करणार का??? by चिंतामणी
एकदा भेटु वैद्यांच्याकडे
यक्कुशेठ,
In reply to यक्कुशेठ, by प्रास
@काय नि कसली भाषांतरं करून
:-)
इंदूर वास्तव्यामुळे असेल कदाचित पण-
In reply to इंदूर वास्तव्यामुळे असेल कदाचित पण- by विसुनाना
भारद्स्त
मस्त रे.
स्सही किस्सा! शौकिन असावं तर
In reply to स्सही किस्सा! शौकिन असावं तर by अन्या दातार
शौकीन..
मस्त किस्सा
झकास. यकु रॉक्स.
मस्त !
In reply to मस्त ! by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to +१ by नंदन
+१
In reply to +१ by चित्रा
दर्दी दुकानदार
यक्कुशेठ, मला पण एक फांऊटन
मस्त अनुभव. फाऊंटन पेन मलाही
In reply to मस्त अनुभव. फाऊंटन पेन मलाही by रेवती
रेवतीआजी, हा बघा, हाच आहे
सही हो यकु!! मस्त
सही किस्सा!
अरे शापित गंधर्वा,,, मलापण
In reply to अरे शापित गंधर्वा,,, मलापण by अत्रुप्त आत्मा
मलापण जगण्यावर असेच पूर्ण
In reply to मलापण जगण्यावर असेच पूर्ण by प्रचेतस
@तुम्ही नेहमी अत्रुप्तच असता.
In reply to @तुम्ही नेहमी अत्रुप्तच असता. by अत्रुप्त आत्मा
तुमच्यासारखे आत्मे जेव्हा
In reply to तुमच्यासारखे आत्मे जेव्हा by प्रचेतस
@तेव्हा आम्हाला मध्ये पडणे
छान रंगवलाय प्रसंग!
किस्सा मस्तच रे यकु! आणि
लेख एकदम आवडला.
क्या बात.. मस्त किस्सा रे.
क्या बात.. मस्त किस्सा रे.
मस्त किस्सा यशवन्ता.
मस्त..
रंजक
मस्तच किस्सा
छानच!
+१
सही रे !!
किस्सा उत्तम, तो कथन करण्याची
लेख आणी प्रतिसाद दिसत नाहीत
धन्यवाद