२६ जुलै २००८ ईस्ट-कोस्ट मिपा कट्टा - न्यू जर्सी!
प्रस्तावना - मिसळपावच्या ह्या कट्ट्याचे वैशिष्ठ्य असे की उत्तर अमेरिकेतला हा पहिलावहिला कट्टा! २६ जुलै २००८ रोजी न्यूजर्सीला झालेल्या ह्या कट्ट्याचे साद्यंत वर्णन लिहा म्हणून आम्ही मागे लागलो होतो मुक्तसुनीत यांच्या, तर त्याऐवजी ती जबाबदारी चतुरंगलाच द्या म्हणून सगळे एकमतले! झाले, ती जबाबदारी आता पार पाडणे आले (स्वगत - रंगा, ते काय विडंबन करण्याइतके सोपे वाटले काय तुला? आता बस!) सांगायचे कारण असे की अपेक्षा फार वाढवून ठेवू नका! ;) असो. तर आता 'नमनाला घडाभर' न करता थेट कट्ट्यावर जाऊयात!
पुण्यात झालेल्या कट्टयाला हजेरी लावून प्राजू नुकतीच भारतवारीहून परतली होती. तिनेजुलै १० च्या सुमारास कट्टा करायचा बूट काढला आणि पूर्व किनार्यावर गडबड उडाली! ह्या भागातल्या मिपाकरांची खानेसुमारी झाली. कट्टा करायची तारीख ठरली २६ जुलै. मुक्तसुनीत यांनी सर्वात प्रथम आमंत्रण दिले पण त्यांचे वॉशिंग्टन डी.सी हे ठिकाण बर्याच जणांना बरेच लांब (४०० - ४५० मैलांपेक्षा जास्त) पडत होते म्हणून हो-ना करता करता शेवटी एकदाचे न्यूजर्सी मुक्रर झाले. इथे दोन पर्याय होते एकतर सर्वांनी बीचवर जमायचे पण उन्हाची तीव्रता आणि बरोबरची लहान मुले लक्षात घेता हा पर्याय रहित झाला, दुसरा होता घरी जमायचे वरदाचे घर इथे असल्याने ते ठिकाण पक्के झाले (वरदा आणि तिचे मिस्टर समीर ज्यांच्या सहकार्याने हा कट्टा यशस्वी होण्यास मोलाचा हातभार लागला त्या दोघांना मिपाकरांतर्फे धन्यवाद).
आता मेनू - प्राजक्ता आणि शीतल ह्या कनेटिकटमधल्या मिपाकरणींनी वरदाच्या मदतीने मिसळ जमवायचा बेत पक्का केला. चतुरंग यांनी (सौं च्या पाककौशल्यावर विसंबून ;)) पेठकरकाकांची पावभाजी आणतो असे कबूल केले! मुक्तसुनीत हे फरसाण आणि अनामिक हा डी.सी हून येताना आम्रखंड घेऊन येतो म्हणाले. पुण्याच्या पेशव्यांनी पावांची जबाबदारी शिरावर घेतली. अशा रीतीने गोष्टींना आकार यायला सुरुवात झाली. आयत्या वेळी मानस आणि अनामिक ह्यांचे यायचे रहित झाले आणि धनंजयचे यायचे ठरले! शेवटी एकदाची २६ जुलै उजाडली.
प्राजू आणि शीतल ह्या ११ च्या सुमारास वरदाकडे पोचल्या. बाकी सगळेच लोक आणखीन दुरुन येणार होते त्यामुळे १२-१२.३० च्या सुमारास एकेक करुन मंडळी जमायला लागली. प्रथम मुक्तराव आणि धनंजय आले. मग चतुरंग आले पाठोपाठ लंबूटांग (हा तर बॉस्टनहून बस करुन आलेला) आणि पुण्याचे पेशवे ह्यांनी हजेरी लावली . जवळजवळ सगळेच एकमेकांना प्रथम भेटत होते त्यामुळे थोडी औपचारिकता होती ती पाचेक मिनिटात संपली!
वरदाताईंचे घर सुंदर आहे त्याच्या तळमजल्यावर सगळ्याच मंडळींची सोय केलेली होती. लंबूटांग, पुण्याचे पेशवे, मुक्तसुनीत, धनंजय, प्राजू, शीतल, वरदा आणि चतुरंग हे मिपाकर आणि अमर व यशराज (शीतलचे पतिराज व मुलगा), जगदीश व अथर्व(प्राजूचे पतिराज आणि मुलगा), चतुरंग याच्या पत्नी व मुलगा, आणि समीर हे नॉन मिपाकर हजर होते. हळूहळू गप्पा रंगायला लागल्या.
चेष्टामस्करी सुरु झाली. एकीकडे मुलांचा दंगा सुरु होता.
वेगवेगळ्या प्रकारच्या चिप्स, सालसा आणि भेळ हे स्टार्टर्स म्हणून टेबलावर सजले. जोडीला सॉफ्टड्रिंक्स होतीच (तात्या आणि पिडाकाकांची इथे फार आठवण झाली! ;) )
भेळ चाखून होते न होते तोच गरमागरम मिसळ आणि वाफाळती पावभाजी ह्यांनी टेबलावरच्या मोक्याच्या जागांचा ताबा घेतला.
सर्वांचेच लक्ष आता ह्या मुख्य पदार्थांकडे लागले होते.प्राजूने, शेफ़ संजीव कपूरच्या थाटात, कोल्हापुरी मिसळ कशी तयार करायची ह्याचे प्रात्यक्षिक दाखवले आणि लंबूटांगने त्याचे चित्रणही केले. प्राजू आणि शीतलने केलेली मिसळ अप्रतिम होती! तर्रीदार कटाचा भुरका पावासह तोंडात जाताच ब्रम्हानंदी टाळी लागत होती!
पेठकरकाकांची चीझ-पावभाजी अप्रतिम झाली होती (पेठकरकाका झिंदाबाद! :) )
एकीकडे हास्यविनोद कोट्या ह्यांना उधाण आले होते. केशवसुमारांची आठवण सगळ्यांना झाली त्यांनी माझ्याजवळ कट्ट्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या त्या दिल्या.
मिसळ जरा जिरते तोच अनामिक याने मुक्तरावांबरोबर पाठवलेले (गुणी बाळ अनामिक! ;)) थंडगार आम्रखंड सामोरे आले!
मग काय महाराजा सर्व लोक एकदम तब्बेतीत आले.
आम्रखंडाचा आस्वाद घेऊन झाला आणि धनंजयने अचानक त्याच्या पोतडीतून केळ्याच्या सांदणाची फर्मास भेट सर्वांसमोर खुली केली! अत्यंत चवदार अशा सांदणावर सर्वांनी ताव मारला. समस्त भगिनीवर्गाने त्यांना सांदणाची पाकृ विचारुन भंडावून सोडले! ह्याचाच परिपाक म्हणून की काय लगोलग सांदणाची कृती धनंजयने मिपा वर टाकली! ;)
मग तात्यांशी फोनवर गप्पा झाल्या. ते नुकतेच मधुभाई जोशांच्या मैफिलीतून आलेले असल्याने खुषीत होते! त्यांनी लगोलग मैफिलीत ऐकलेली एक चीज फोनवरुनच पेश केली! क्या बात है! माहोल एकदम खुलत चालला होता. एकीकडे बालकांचा दंगा सुरु होता तो आता वाढल्याने त्यांना खेळवण्यासाठी वरदाच्या घराजवळ असलेल्या तळ्याकाठी जायचे ठरले. एक बालक झोपल्याने स्त्रीवर्गाने घरातच थांबायचा निर्णय घेतला. आम्ही सगळे गप्पाटप्पा करीत बीचवर गेलो.
मुक्तसुनीत यांनी 'दयाघना' गाण्याची मूळ चीज आणि त्यानंतर गाणे सुरेख म्हटले! चांगलेच छुपे रुस्तुम निघाले.
लंबूटांगनेही बगळ्यांची माळ फुले म्हटले, त्याचाही आवाज छान आहे.
मग एक छानसे फोटोसेशन पूर्ण करुन आम्ही परत फिरण्याचा निर्णय घेतला.
वरच्या चित्रात डावीकडून पुण्याचे पेशवे, लंबूटांग, धनंजय, मुक्तसुनीत आणि चतुरंग
वरचे चित्र - प्राजू, वरदा आणि शीतल
डावीकडचे छोटा अथर्व, त्याच्यामागे अमर आणि त्यांच्यामागे समीर दिसताहेत बाकीचे नेहेमीचेच यशस्वी!
वरदाच्या घरी परतल्यावर मुक्तसुनीत यांनी पुढच्या कट्ट्यासाठी सर्वांना डी.सी. ला येण्याचे आग्रहाचे आमंत्रण दिले. त्यांचा प्रवास बराच लांबचा असल्याने त्यांनी सर्वांचा निरोप घेतला. पाठोपाठ आम्ही इतर मंडळीसुद्धा हळूहळू गप्पा आवरत पुढचा कट्टा कुठे करायचा ह्याची चर्चा करत आपापल्या दिशांना पांगलो.
पहिला वहिला मिपा कट्टा यशस्वीपणे पार पाडण्याचे श्रेय जमलेल्या सर्व मिपाकरांना तर जातेच पण मिपाचे मेंबर्स नसलेल्या त्यांच्या इतर कुटुंबियांची मोलाची मदत आणि सहकार्य असल्याखेरीज हा कट्टा पूर्णत्त्वाला गेला नसता.
चतुरंग
ता.क. लंबूटांगने काढलेल्या मिसळीच्या चलचित्राचा यू-ट्यूबवरचा दुवा आत्ताच प्राजूने मला पाठवला, खास लोकाग्रहास्तव तो इथे डकवत आहे! ;) एंजॉय!!
(स्वगत - चला आता लोकांची पूर्ण जळजळ होईल! )
http://www.youtube.com/watch?v=VI9eVFOLJ-g

वाचन
21301
प्रतिक्रिया
60
अजूनही भरपूर चित्रे काढलेली आहेत पण जागेअभावी
In reply to अजूनही भरपूर चित्रे काढलेली आहेत पण जागेअभावी by चतुरंग
चतुरंग..
झकास....
झकास!
In reply to झकास! by प्रमोद देव
असेच म्हणतो
सही रे
In reply to सही रे by आनंदयात्री
हेच म्हणते
In reply to हेच म्हणते by मनस्वी
अगदी
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
वावा...
वाह!!
यम्म्म्मीईईईए
In reply to यम्म्म्मीईईईए by टारझन
असं कशाला? हा घे उपाय!!
In reply to असं कशाला? हा घे उपाय!! by पिवळा डांबिस
वा !!!!
मस्त
:)
अमेरीकेती
In reply to अमेरीकेती by श्री
:)
मस्त!
गाणी चुकली ना आमची
अभिन॑दन
वृत्तांत आवडला !!!
मस्त.............
मिसळीच्या
कृतज्ञता
In reply to कृतज्ञता by मुक्तसुनीत
नक्की काढ पुस्तक सुनीतराव.
छान वाटले
भेटण्या आधी..
In reply to भेटण्या आधी.. by प्राजु
भारदस्त
In reply to भेटण्या आधी.. by प्राजु
प्राजू,
In reply to भेटण्या आधी.. by प्राजु
अर्थातच
:(
मिसळीला मिसलो !!
फोटोनी पुन्हा आठवणी
सहीच धमाल
वा!
In reply to वा! by केशवसुमार
वाह वाह ... आम्ही पण येणार !
In reply to वाह वाह ... आम्ही पण येणार ! by छोटा डॉन
या या..
कांग्राचुलेशन, रंगाभाऊ!
In reply to कांग्राचुलेशन, रंगाभाऊ! by पिवळा डांबिस
हा हा हा..
In reply to हा हा हा.. by केशवसुमार
आयला हे बरंय!
In reply to हा हा हा.. by केशवसुमार
ह ह पु वा!!!
In reply to कांग्राचुलेशन, रंगाभाऊ! by पिवळा डांबिस
पिडाकाका,
वॉव!
In reply to वॉव! by ब्रिटिश टिंग्या
आणि हो,
In reply to वॉव! by ब्रिटिश टिंग्या
आणि
सुपरहिट
In reply to सुपरहिट by चित्तरंजन भट
असेच..
In reply to असेच.. by कोलबेर
छान वृत्तांत आणि फोटो
In reply to छान वृत्तांत आणि फोटो by चित्रा
असेच म्हणते
आई शप्पथ !!! सही रे सही.
In reply to आई शप्पथ !!! सही रे सही. by बबलु
मी तयार आहे
In reply to मी तयार आहे by बेसनलाडू
+१
In reply to मी तयार आहे by बेसनलाडू
मी पण लॉस
In reply to मी तयार आहे by बेसनलाडू
असं म्हणतोस!
तिच्यायला .....
अमेरीकेती
मी लॉस
In reply to मी लॉस by घाटावरचे भट
वा!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to वा! by नंदन
ए नंदन! तु माझ्याकडे ये आधल्या रात्री!
२६ जुलै २००८ ईस्ट-कोस्ट मिपा कट्टा - न्यू जर्सी!