मराठी इंटरनेट साइट्सवर स्त्रियांचे प्रमाण कमी का?
मनोगतावर दिसणारे स्त्री-पुरूषांचे प्रमाण एकूणच इंटरनेटवर दिसणार्या प्रमाणासारखेच आहे. मायबोलीवर पुरूषांचे प्रमाण माफक प्रमाणात जास्त (over-represented) आहे. मिसळपाव, उपक्रम आणि मीमराठीवर स्त्रियांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात कमी (greatly under-represented) आहे. ऐसी अक्षरेचे (हा न्यू किड ऑन द ब्लॉक असल्यामुळे) स्टॅट्स उपलब्ध नाही. पण ऐसीवरचे प्रमाण मायबोली किंवा मनोगताप्रमाणे असावे असे वाटते. या स्टॅट्सपैकी मायबोलीच्या स्टॅट्समधे Confidence: medium असं आहे तर इतर स्टॅट्सबद्दल Confidence: low आहे. पण या साईट्सवर पाहिल्यास लॉगिन केलेल्या पुरूषांची संख्या जास्त आणि स्त्रियांची संख्या कमी हे दिसतेच.
मराठी इंटरनेट वापरणारे लोक महाराष्ट्र किंवा भारताच्या शहरी भागातले, आणि परदेशात असणारे बहुसंख्येने असणार. या लोकांमधे शिक्षण, समृद्धी, इंटरनेटची उपलब्धता या अडचणी नसाव्यात. तरीही इंटरनेटवर व्यक्त होण्यात स्त्रियांचे प्रमाण कमी का असावे? गेल्या काही दिवसांतच पुरुषप्रधान लेखनाबद्दल तक्रारी वेगवेगळ्या साइट्सवर दिसून आल्या. मराठी इंटरनेट साइट्स पुरुषप्रधान मनोवृत्तीच्या आहेत का?
८ मार्चला थोडी का होईना चर्चा घडावी म्हणून घाईघाईत लिहील्यामुळे काही मुद्दे सुटले आहेत. त्यातले काही इथे लिहीते.
इंटरनेट-वापरकर्ती घरं सुशिक्षित असतील असं समजून, सांख्यिकदृष्ट्या नेट वापर करणार्यांमधे स्त्रिया आणि पुरूषांचं प्रमाण ढोबळमानाने समान असेल अशी माझी अपेक्षा होती. आपलं लिखाण ब्लॉगांपुरतेच मर्यादित ठेवणार्यात किंवा मराठीतून, इंटरनेटवर व्यक्त होणार्या व्यक्तींमधे स्त्रिया आणि पुरूषांचं प्रमाण थोड्याबहुत फरकाने समान असेल हे एक गृहीतक. (चुकीचं असल्यास का ते वाचायलाही आवडेल.)
विचार करण्यासाठी आणि/किंवा इंटरनेटवर किंवा कुठेही व्यक्त होण्यासाठी, विशेषतः राजकीय, सामाजिक, आर्थिक, चर्चा आणि कला या संदर्भात विचार करता स्त्रिया आणि पुरूष मुळात वेगळे नसतात हे ही मागच्याच शतकात पुढे आलेलं आहे. तर स्त्रिया एकूणच कमी प्रमाणात का व्यक्त होतात याबद्दल थोडी चर्चा करणं मला जिव्हाळ्याचे वाटते.
विशेषतः हा आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या एलिट म्हणावा असा गट आहे, जो मराठी इंटरनेटवर वावरतो. सामान्यतः समाजाची मूल्य, दिशा या वर्गातून ठरवली जाते. (पूर्वीही ब्राह्मणांना एलिट समजले जायचे आणि त्यांच्या घरच्या रूढींचे पालन करणे फॅशनेबल समजले जायचे.) त्यामुळे या वर्गाची मतं काय आहे हा विचार करणं मला महत्त्वाचं वाटतं. 'सुपरमॉम' संस्कृतीने आधीच काही स्त्रियांच्या व्यक्तीमत्त्वाचे नुकसान केलेले आहे; ते अधिक प्रमाणात झिरपू नये असं मला मनापासून वाटतं आणि त्यादृष्टीने मला अशा व्यक्ती ज्या समाजगटांत अधिक प्रमाणात आढळतात त्या लोकांची मतं महत्त्वाची वाटतात.
"एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकतं" हे थोडं जुनंच झालं. त्याच धर्तीवर एक स्त्री घराबाहेरही जे जग आहे त्याबाबतीत जागरूक झाल्यास संपूर्ण कुटुंबात ही जागरूकता येऊ शकते.
निदान अशा प्रकारच्या चर्चांमधून काही चुकतं आहे का असा विचार झाला तरी खूप.
In reply to आला गं बाई आला गं बाई आलाऽऽ by रेवती

In reply to धन्यवाद by सुहास..
In reply to आला गं बाई आला गं बाई आलाऽऽ by रेवती
In reply to छान चर्चा विषय. by परिकथेतील राजकुमार
"मराठी संकेतस्थळ" यापासून बदलून मी विचारलेला प्रश्न एकूण भारतातच "जागतिक सरासरीपेक्षा" इंटरनेटचे स्त्री-वापरकर्ते कमी का? हा स्त्रियांच्या रोजीरोटी आणि सबलीकरणाशी संबंधित होतो. मला तरी हा व्यापक प्रश्न मुळीच भंपक वाटत नाही.मला हाच कळीचा मुद्दा वाटतो. आंतरजालावर कमी दिसणारा स्त्रियांचा वावर हा प्रश्न नसून तो एका व्यापक प्रश्नाचा दृश्य परिणाम आहे. स्त्रियांचं सबलीकरण अजूनही झालेलं नाही हा मुद्दा रहातोच. अनेकांनी मांडलेली कारणं हेच अधोरेखित करतात. - घरी एकच कॉंप्युटर असतो - तो नवऱ्यालाच मिळतो. (असमानता, पुरुषांना प्रथमस्थान) - बायकांना संध्याकाळी स्वयंपाक वगैरे करायचा असतो, त्यामुळे त्यांना वेळ मिळतो. (चूल आणि मूल हेच जीवन) - बऱ्याच घरी कॉंप्युटर नसतो, पण पुरुषांना मात्र नोकरीच्या ठिकाणी कॉंप्युटर वापरता येतो. (असमानता, नोकऱ्या पुरुषांनाच अधिक असतात) - स्त्रिया वाद घालायला कचरतात (दबलेपणाची भावना) - स्त्रियांना जालीय वावराची भीती वाटते (असुरक्षितता) - स्त्रियांना तंत्रज्ञानाची भीती वाटते (लहानपणापासून धोका पत्करण्याचं, नवीन वस्तु हाताळण्याचं स्वातंत्र्य वा शिक्षण न दिल्यामुळे ही भीती येत असावी) म्हणजे समाजात एकंदरीतच स्त्रियांमध्ये - अगदी वरच्या वर्गातल्या स्त्रियांतही (अदिती ज्यांना एलिट म्हणते) - हे वेगवेगळ्या पातळीवर दडपलेपण आहे. या चर्चेतून हा मुद्दा पुढे येतो हे या चर्चेचं यश आहे. यात विशेष काय, हे इतर ठिकाणी दिसतंच वगैरे म्हणणं म्हणजे आहे ती परिस्थिती वाईट आहे हे नाकारणं.
In reply to छान चर्चा विषय. by परिकथेतील राजकुमार
In reply to 'जागतिक महिला दिन व by जेनी...
In reply to 'जागतिक महिला दिन व by जेनी...
In reply to मला तरी त्या धाग्यात काही by शुचि
In reply to चांगला चर्चा by रेवती
आपला एवढा दीर्ध प्रतिसाद पहिल्यांदा पहात आहे. (( ते माझे राखीव कुरण आहे)
आणी त्याच्याशी सहमत आहे.
In reply to जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा by निनाद मुक्काम …
In reply to हा हा हा. हो, वरचा प्रतिसाद by रेवती
In reply to रेवतीताई, प्रतिसाद लांबला तरी चालेल :-) by Pearl
In reply to चांगला विषय.. by Pearl
In reply to स्त्रियांचा by चित्रा
अनेक वेबसाईट्स स्टॅटीस्टीकल मॉडेल्स वापरुन तुम्ही स्त्री आहात का पुरुष हे शोधतात. (गुगल प्रोफाईलवर मी माझे 'लिंग' दिले नव्हते. पण आता गुगल स्वतःचाच मला पुरुष असे दाखवतो) अलेक्साने अर्थातच मराठी संस्थळावरून तुम्ही पुरुष आहात का स्त्री हे ओळखलेले नाही. तुमच्या इतर इंटरनेट वापरावरून (इतर सर्च क्लायंट्सकडून?) ही माहीती मिळलेली आहे.मला हे पटतं. हा मुद्दा फार गौण नसला तरी चर्चा त्याबद्दल रेंगाळू नये अशी अपेक्षा आहे. त्यातून मायबोलीबद्दल जो डेटा आहे तो मला थोडा मजेशीर वाटला. पण मिपा, मीम, उपक्रमावर मी जे पहाते त्यात प्रचंड male-bias जाणवतो. ऐसीअक्षरेवरही (विदा गोळा केलेला नाही) मी पहाते तेव्हा स्त्री-आयडींचे प्रमाण बर्यापैकी दिसते.
In reply to लेखातील सुरुवातीच्या दोन by मराठमोळा
In reply to >> भारतात/महाराष्ट्रात तरी by Pearl
In reply to ज्जे ब्बात!!! by मस्त कलंदर
In reply to अगदी अगदी by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अगदी अगदी by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to चर्चा करू by Pearl
In reply to अगदी अगदी by ३_१४ विक्षिप्त अदिती
वॅक्सिंगवरची प्रतिक्रिया वाचून तळपायाची आग मस्तकाला गेली होती.तुमच्या या बोलण्यातून मला एक किस्सा आठवला. फेसबुकवर माझी अहमदाबादची एक फ्रेंड आहे. ती अशीच स्वतंत्र विचाराची आहे. तिने फेसबुकवर डकवलेले बहुतांशी फोटो हे अगदीच शॉर्ट क्लोथस् मधले आहेत किंबहुना ती आजही असेच फोटो डकवत असते. यावर एका महारथीने ऑब्जेक्शन घेत आणि आपली हिरोगिरी दाखवत तिला असे फोटो येथे डकवू नकोस म्हणून स्पष्ट सांगितले. यावर तिने जो त्याला झापायला सुरवात केली. तो म्हणे तु असे फोटो काढू नको आणि ती म्हणे नालायका तू माझ्यावर बंधन आणणारा आहेस तरी कोण? जवळजवळ अर्धा तास या कमेंट वर कमेंट चालू होत्या. आणि आंम्ही मात्र यावर हसून-हसून बेहाल झालो होतो! ( अर्थात हे हसणे त्या मुलावर आणि त्याच्यावरच्या गाढवपणाच्या शिव्यांवर होते तिच्यावर नव्हे!) शेवटी शेवटी तर तिने त्याला इतक्या शिव्या हाणायला सुरवात केल्या की तो नंतर "मी तुला बहीण मानतोय आणि प्लिज तू असे कपडे घालू नकोस." असा काकूळतीला येऊन बोलू लागला. आणि त्यानंतरसुद्धा शिव्यांची तिव्रता वाढतच गेल्याने त्याची मग बोलतीच बंद झाली! आजसुद्धा ती किंचीतही बदललेली नाही. कोणाच्याही बंधनाला किंवा प्रतिक्रियेला न जुमानता ती आजसुद्धा तिला जे पटतेय जे योग्य वाटतेय तेच करते. तिच्या निडरपणाच्या परखड बोलण्याला खरंच माझा सलाम! :) जग काहीही म्हणेल हो, पण त्याला काहीच किंमत नाही, कारण जगाला तर बोलायची सवयच असते. पण तुम्ही काय विचार करता हे मात्र खरे महत्वाचे आहे.
In reply to >> भारतात/महाराष्ट्रात तरी by Pearl
In reply to >> भारतात/महाराष्ट्रात तरी by Pearl
(४) अजून एक. मिपाचे कट्टे. मी आजपर्यंत मिपाच्या कट्ट्यांचे अनेक व्रुत्तांत वाचले आहेत. त्यासंबंधीही मला असे प्रश्न पडतात, १) मिपाच्या बर्याचशा कट्ट्यांवर दारू मस्ट असते का? २) ९९% मिपा कट्ट्यांवर मुली/स्त्रिया का नसतात?गेल्या एका वर्षातील मुंबई कट्ट्यान्चा अभ्यास वाढवा. मदत पाहिजे असेल तर सांगा, मटेरियल पुरवण्याची व्यवस्था स्पा/सूड/किसन करतील.... टेस्टीमोनियल हवे असतील तर मस्त कलंदर किंवा माऊ ताईंना विचारा. बाय द वे, तुम्ही कुठल्या शहरात राहता? मुंबई किंवा पुण्यात असाल तर आता पावेतो रग्गड विनादारू कट्टे झाले आहेत. तुम्हाला इच्छा असेल तर पुढील वेळेस जरूर उपस्थिती लावावी. आता मुख्य मुद्दा... इथल्या बऱ्याच प्रतिक्रियांचा अंडरकरंट मला खटकतो आहे. म्हणे स्त्रिया जालावर व्यक्त होण्यास कचरतात, घाबरतात. व्यक्त होण्यास जाल हे माझ्या मते सर्वात सेफ माध्यम आहे. कोण येऊन गळा धरणार आहे का ?? त्यातून अगदीच भीती वाटत असेल तर टोपण नावाने काढावा आयडी आणि घालावा धुडगूस. कुणी अडवले आहे ?? मुळात सर्व जण मिळून आपली सर्व बाजूने कुचंबणा करत आहे, ही भावना स्त्रियांनी सोडली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपला हक्क मागून घ्या. हे इतर कुणी करणार नाही, तुमचे तुम्हीच केले पाहिजे. शाळेत एक धडा होता आम्हाला. आंबेडकरांनी लिहिलेला अग्रलेख होता. त्यात त्यांनी दलितांना उद्देशून लिहिले होते की "कुणी महात्मा येईल आणि आपला उद्धार करेल या अपेक्षेत राहू नका" इथेही तोच सल्ला लागू आहे. तुम्ही पुरेशा शिकलेल्या आहात. Exposure का काय म्हणतात ते उत्तम आहे तुम्हाला. सात समुद्रापार जाणार्या पण अनेक आहेत इथे. कित्येक पुरुषांपेक्षा कर्तृत्त्ववान पण आहेतच की बऱ्याच जणी. आणि काय पाहिजे ?? इतर कुणाची मदत कशाला पाहिजे ?? केवळ उदाहरण म्हणून कट्ट्याचा मुद्दा घेतो. दारूचे कारण ढाल म्हणून वापरणे आता बंद करावे. दारू असणार नाही असे जाहीर करून त्यावर शतकी भांडणे होऊनही झालेल्या कट्ट्यात केवळ तीन स्त्रिया आल्या होत्या. त्यात पण नवीन फक्त एकच. किती जणींनी इथे ठासून सांगितले आहे की कट्ट्याला दारू नसेल तर आणि तरच येऊ (आणि वाचनाला जागून आल्या आहेत?). इतकेच कशाला, तुम्हाला एकदम अनोळखी ग्रुप मध्ये जायचे नसेल तर महिला कट्टा करा ना. पुरुष दारू चे कट्टे करतात म्हणून आम्हाला जाता येत नाही असे गळे न काढता या पुढे आणि महिला स्पेशल कट्टा अरेंज करा. करताय??? पुढील एका महिन्यात करून दाखवा असा कट्टा, चालेंज आहे आपले. तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोन च्या बाहेर यायचे नाही तर इतर कुणी खेचून बाहेर काढेल अशी अपेक्षा करू नका. मला आजवर असे दिसून आले आहे की अनेकदा दिलेली कारणे ही निव्वळ धूळफेक असते. निव्वळ पलायनवाद आहे. कारणे देणे बंद करा आणि केवळ सावित्रीबाई फुल्यांचा वारसा न सांगता त्यांच्या एक दशांश हिम्मत दाखवा. कुठे शिव्या, दगड, शेण झेलून पण मुलींना शिकवणाऱ्या त्या आणि कुठे जालावर व्यक्त व्हायला घाबरणारी आजची स्त्री ? शंभर वर्षात बरीच प्रगती आहे. असो, एखादा शब्द अधिक उणा गेला असेल तर माफ करा !!! नाजूक, कोमल भावनांना दुखावण्याचे पातक नको माझ्या माथी.
In reply to (४) अजून एक. मिपाचे कट्टे. मी by विश्वनाथ मेहेंदळे
म्हणे स्त्रिया जालावर व्यक्त होण्यास कचरतात, घाबरतात.निश्चितच त्या कचरतात. विमे, तुमचा मुद्दा मान्य असला तरीही थोडं त्यांच्या कलाने घेऊनही बराच पल्ला गाठता येईल असं वाटतं.
In reply to दारू वगळता अगदी १००% सहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to >>स्त्रिया ( किंवा भारतीय by Pearl
In reply to (४) अजून एक. मिपाचे कट्टे. मी by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to (४) अजून एक. मिपाचे कट्टे. मी by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to >> भारतात/महाराष्ट्रात तरी by Pearl
मराठी इंटरनेट साइटची मनोवृत्ती अमूक असे म्हणता येणार नाही. त्यावर लिहिणार्या लोकांविषयी काही संख्याशास्त्रीय निष्कर्ष काढता येऊ शकेल. माझ्या अनुभवात असे आले आहे की तात्रिक, राजकीय, क्रीडाविषयक अश्या (पूर्वी पुरुषप्रधान) चर्चांत हल्ली स्त्रियांचा जवळपास सारखाच सहभाग दिसून येतो. पण स्वयंपाक, सुशोभन, संगोपन, प्रसाधन अश्या (स्त्रीप्रधान) चर्चांत पुरुषांचे प्रमाण कमी दिसते.माझं उत्तरः
मृदुलाच्या प्रतिसादामधे मला जी शंका होती तीच पुन्हा खरी आहे का काय असं वाटतंय. पूर्वीच्या पुरूषी चर्चांमधे आता स्त्रियांनाही रस निर्माण झालेला आहे. आपल्या घराबाहेरही जग आहे त्याची जाणीव स्त्रियांना झाली आहे, होते आहे; ही गोष्ट मला पॉझिटीव्ह वाटते. पण घर, मुलं यात आपलीही समान जबाबदारी आहे याबद्दल पुरूषांमधे कितपत जागृती आहे याबाबत शंका आहे.या चर्चेत विचार करत असलेल्या सर्वच संस्थळांवर ही चर्चा सुरू केलेली आहे. त्यामुळे प्रतिसाद चोप्य-पस्ते करण्याचा मोह आवरत नाही; त्यातून तेच तेच पुन्हा टाईप करण्याचे कष्टही वाचवते आहे.
In reply to ८ मार्चला थोडी का होईना चर्चा by ३_१४ विक्षिप्त अदिती
पूर्वीच्या पुरूषी चर्चांमधे आता स्त्रियांनाही रस निर्माण झालेला आहे.सरसकट विधान वाटते आहे.
पण घर, मुलं यात आपलीही समान जबाबदारी आहे याबद्दल पुरूषांमधे कितपत जागृती आहे याबाबत शंका आहे.समान जबाबदारी म्हणजे प्रत्येक काम दोघांनी अर्धे अर्धे करायचे की वेगवेगळ्या कामांची वाटणी करायची हे स्पष्ट केल्यास त्याप्रमाणे विचारांना दिशा मिळेल. बाकी उद्बोधक चर्चा वाचत आहे.
In reply to पूर्वीच्या पुरूषी चर्चांमधे by नगरीनिरंजन
समान जबाबदारी म्हणजे प्रत्येक काम दोघांनी अर्धे अर्धे करायचे की वेगवेगळ्या कामांची वाटणी करायची हे स्पष्ट केल्यास त्याप्रमाणे विचारांना दिशा मिळेल.हा खासगी आयुष्यात अदितीचा हस्तक्षेप ठरेल. ;-) माझं व्यक्तिगत मत चाक पुन्हा पुन्हा शोधू नये, असं आहे. वरच्या प्रतिसादात 'माझं उत्तर' च्या आधीचा परिच्छेदही मृदुला यांच्या प्रतिसादामधलाच आहे. लेख संपादित करून दिल्याबद्दल आभार.
In reply to दुर्दैवाने एकेकाळी सरसकट by ३_१४ विक्षिप्त अदिती
हा खासगी आयुष्यात अदितीचा हस्तक्षेप ठरेल.खासगी बाबतीत सल्ला विचारला नव्हता हे नम्रपणे ध्यानात आणून देऊ इच्छितो. :) नोकरी करणे म्हणजेच स्वातंत्र्य अशा विचारांनी पछाडलेल्या काही 'केसेस' पाहण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे असा प्रश्न पडतो. माझं व्यक्तिगत मत दुसर्याच्या अनुकरणाला स्वातंत्र्य म्हणू नये असे आहे. :)
In reply to हा खासगी आयुष्यात अदितीचा by नगरीनिरंजन
In reply to सदर संदर्भात स्वातंत्र्य by ३_१४ विक्षिप्त अदिती
पडलेला प्रश्न स्वातंत्र्याबद्दल फारसा नसून व्यक्त होण्याच्या उदासीनतेमधे असणार्या जेंडर बायसबद्दल आहेमलाही असंच वाटत होतं, पण (सरसकट) पुरुषांच्या जबाबदारीच्या समजेबद्दलच्या शंका व्यक्त केलेले प्रतिसाद अंतर्भूत झाल्यामुळे काही प्रश्न पडले ते विचारले एवढेच. असो. अवांतर थांबवतो.
In reply to पडलेला प्रश्न by नगरीनिरंजन
पुरुषांच्या जबाबदारीच्या समजेबद्दलच्या शंका व्यक्त केलेले प्रतिसाद अंतर्भूत झाल्यामुळे काही प्रश्न पडले ते विचारले एवढेच.मायबोलीवर बालसंगोपन, सुशोभन अशा प्रकारचे अनेक धागे असतात, इतर कोणत्याही संस्थळापेक्षा जास्त असं मला दिसतं. त्यावर मृदुला यांच्या निरीक्षणाच्या विरुद्ध काही डेटा, निरीक्षण आहे का? अतिशय निगुतीने वेगवेगळे पदार्थ बनवणारे गणपा आणि पांथस्थ हा संस्थळांवर अपवादच दिसतो. पाकृ विभागात वैविध्यपूर्ण लिखाण करणार्या स्त्री आयडींची संख्या जास्त दिसते.
In reply to पुरुषांच्या जबाबदारीच्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
मायबोलीवर बालसंगोपन, सुशोभन अशा प्रकारचे अनेक धागे असतात, इतर कोणत्याही संस्थळापेक्षा जास्त असं मला दिसतं. त्यावर मृदुला यांच्या निरीक्षणाच्या विरुद्ध काही डेटा, निरीक्षण आहे का?नाही.
अतिशय निगुतीने वेगवेगळे पदार्थ बनवणारे गणपा आणि पांथस्थ हा संस्थळांवर अपवादच दिसतो. पाकृ विभागात वैविध्यपूर्ण लिखाण करणार्या स्त्री आयडींची संख्या जास्त दिसते.बरोबर. पण म्हणून घर आणि मुले यात आपली समान जबाबदारी आहे याची इतरांमध्ये जागृती नाही असा निष्कर्ष निघत नाही. शिवाय पदार्थ बनवण्याची आवड असणारे पण त्यावर लिहीण्याची आवड नसलेलेही पुरुष असतीलच की. मुळात अशा विषयांमध्ये रुची असणाराच पुरुष जबाबदार असतो याला काही आधार आहे का? हा सगळा व्यक्तिगत आवडी-निवडींचा मामला आहे त्यावरून लिंगभेदाच्या अभिव्यक्तीवरील परिणामांबद्दलच फक्त निष्कर्ष काढणे योग्य होईल.
In reply to मायबोलीवर बालसंगोपन, सुशोभन by नगरीनिरंजन
In reply to आवड असणार्या विषयांवर by ३_१४ विक्षिप्त अदिती
आवड असणार्या विषयांवर प्रतिसाद दिला जातो आणि नावडीचे विषय टाळले जातात. यातही लिंगभेद असेल का?कदाचित असेल. पण फक्त लिंगभेदच असेल असे नाही. माझ्या बहुतेक आवडीच्या विषयांवर मी "वा वा छान छान" व्यतिरिक्त प्रतिसाद देत नाही कारण त्यावर लिहीण्यापेक्षा ती गोष्ट करणे मला महत्त्वाचे वाटते. पण त्याचवेळी न आवडलेल्या विषयांवर (किंवा विषयांविरुद्ध) मी बर्याचवेळा व्यर्थपणे माझी मते लिहीत बसण्यास उद्युक्त होतो. सगळ्या पुरुषांचे असे होत असेल असे नाही. शेवटी व्यक्ती तितक्या प्रवृत्ती.
पण सातत्य सांख्यिकीत महत्त्वाचं ठरतं.हे खरं असलं तरी सगळ्या गोष्टी सांख्यिकीने पूर्णत: सिद्ध होणार नाहीत. नुसत्या स्त्रियांचा मराठी आंजावरील कमी सहभाग आणि स्त्रियांची एकूण प्रगती यांच्यातला परस्परसंबंध (Correlation) ठरवणे तर खूपच विदाखनन (Data Mining) केल्यासारखे होईल. एकूणच आंतरजाल सुविधा असणे याचा एकवेळ स्त्रियांच्या प्रगतीशी परस्परसंबंध असू शकतो. पण आंतरजालावर वावर असणार्या स्त्रिया मराठी आंजावर वावरत नसल्या तर त्याची भाषिक, वैयक्तिक कारणे असतील. त्यावरून लिंगभेदाधारित निष्कर्ष काढला तरी त्याची विश्वासार्हता किती असेल ही शंकाच आहे. अर्थात हे माझे व्यक्तिगत मत झाले.
पाकृ विभागातल्या इतर किती लोकांना काही मतं आहेत हे माहित आहे?त्यांना पाकृ टाकण्यातच रस असेल आणि इतर चर्चांमध्ये रस नसेल तर त्यावरून काही लिंगभेदाधारित निष्कर्ष निघाला तरी आवडी-निवडींव्यतिरिक्त स्त्रियांच्या स्थितीसंबंधी निष्कर्ष निघत नाही. काही स्त्रियांना पुरुषी चर्चांमध्ये रस उत्पन्न झाला म्हणून सगळ्यांनाच तो रस उत्पन्न झाला आहे असे नाही. त्याचवेळी घरी उत्तम स्वयंपाक करू शकणारे किती पुरुष इथे पाकृ टाकत नाहीत हे माहित आहे?
In reply to वावर सगळीकडेच कमी ? by चौकटराजा
गेल्या ५० वर्षात स्त्री जात मोडीत जात असून स्त्रैण शरीर रचना असलेली मानव असे तिचे रूपांतर होत आहे.Sorry! What? कदाचित तुमचे शब्द जे सुचवत आहेत ते तुम्हाला म्हणायचं नाही. "शरीररचना वगळता स्त्री-पुरूषांत काही फरक नाही" असं काही म्हणण्यासाठी ही वाक्यरचना आवडली नाही.
मुले नको मातृत्व नको असे म्हणणे म्हणजे स्त्री चे माणसात रूपांतर होणे नव्हेमुले असणे म्हणजे आयुष्याची इतिकर्तव्यता असते, वात्सल्य ही स्त्रीची अत्यावश्यक गरज आहे असं काही लिखाण आजही आजूबाजूला दिसतं. मुलं वाढवणं हा एक आनंदाचा भाग असतो, आवडता पदार्थ खाण्यासारखंच आणि काही व्यक्तींना मुलं वाढवण्यात फारसा आनंद असतो असं वाटत नाही हा विचार खूप अलिकडचा वाटतो, पुरूषांच्याही बाबतीत. समज येण्याच्या आतच लग्न झालं आणि लग्न झालं तर मुलं झालीच अशीच बहुसंख्या दिसण्याचं काळ फार जुना नाही, नाही का?
दास्याचा दोष कुणाचा ?पुरूषप्रधान व्यवस्थेचा आणि व्यवस्थेला बिनडोकपणे शरण जाणार्या सर्व स्त्री-पुरूषांचा. हा बिनडोकपणा आजही इंटरनेट सुशिक्षित, एलिट गटातही दिसतो असा भीतीदायक विचार आल्यामुळे लोकांचे विचार काय आहेत असा प्रश्न पडला.
In reply to गेल्या ५० वर्षात स्त्री जात by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to >>हा बिनडोकपणा आजही इंटरनेट by मराठमोळा
कामे जर वाटून घेतली तर समानता येतेच. पुरुषांनी त्यासाठी स्वयंपाकच केला पाहिजे असे काही नाही. उद्या जर पुरुषांनी लिपस्टीक, पावडर वापरावी, फ्रॉक घालावे, बाळाला जन्म द्यावा, त्याला पाजावे अशी अपेक्षा केली गेली तर ती रास्त ठरणार नाही. काही गोष्टी नैसर्गिक असतात.परफेक्ट ! - (कामे वाटून घेणारा*) सोकाजी * ह्यावर माझ्या बायकोचे मत सर्वस्वी भिन्न असू शकेल :D
In reply to >>हा बिनडोकपणा आजही इंटरनेट by मराठमोळा
उद्या जर पुरुषांनी लिपस्टीक, पावडर वापरावी, फ्रॉक घालावे, बाळाला जन्म द्यावा, त्याला पाजावे अशी अपेक्षा केली गेली तर ती रास्त ठरणार नाही.कोणत्याही गोष्टीचा ताप येणंही मला विचाररहित वाटतं. तुम्ही कर्करोगाबद्दल बोलत आहात. पण स्त्रियांसारखे लांबलचक कुडते घालणं, भारतीय किंवा हवाई प्रिंटचे शर्ट वापरणं, स्त्रियांप्रमाणेच डोक्यावरचे केस वाढवणं आणि चेहेर्यावरचे भुवया वगळून बाकीचे केस काढणे (हे स्त्रियांच्या चेहेर्याशी साम्य) इ. इ. अनेक गोष्टी माझ्या ओळखीतले अनेक पुरूष करतात. आणि आकर्षकही दिसतात. डोक्यावरचे* केस अगदी पेराएवढे ठेवणार्या काही मुली पाहिल्या आहेत, त्याही प्रचंड आकर्षक दिसतात.
सुशोभीकरण, रंगसंगतीची समज यात मुळातच नैसर्गिकरित्या स्त्रियांना मिळणार्या वरदानात्मक गोष्टी आहेत.कधीपासून? जगप्रसिद्ध चित्रकार, मूर्तीकार, कलाकार यांच्यात जेंडर बायस कुठे दिसतो? *काय करणार, इथे एक्सप्लिसिटली सगळे शब्द नाही वापरले तर अनर्थ आणि त्यातून विनोदशून्य अवांतर होण्याचीच भीती वाटते.
In reply to बिनडोक हा शब्द आवडला नसेल तर by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to बिनडोक हा शब्द आवडला नसेल तर by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अदिती, >>माझ्या स्वतःच्या by मराठमोळा
याला उत्तर नाही दिलेत?०. मुद्दा सोडून बोलण्यात मला फार रस नाही. १. तरीही, मी सांख्यिकी विदाबद्दल बोलते आहे, एकेका माणसाबद्दल नाही. ही सांख्यिकीचा अभ्यास करण्याची पद्धत नाही. २. तुमच्या ओळखीतल्या एकाही मनुष्याला मी अजिबात ओळखत नाही तेव्हा त्यांच्याबद्दल बोलणे इष्ट नाही. ३. लोकांच्या व्यक्तिगत आयुष्यात नाक खुपसायला मला आवडत नाही. ओळखीतले असोत वा अनोळखी. ४. तुम्ही दिलेली माहिती संपूर्ण माहिती आहे असे समजल्यास माझा जो तर्क आहे तो तुम्हाला आवडणार नाही. आणखी स्पष्ट उत्तर हवंय का?
डायरेक्ट माझ्या सहीवर हल्ला केलात?तुमच्याच भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तो तुम्हाला हल्ला वाटत असेल तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे. मला कोणी गणित, पदार्थविज्ञान, खगोलशास्त्राच्या भाषेत सांगितलं तर तो हल्ला वाटत नाही. ताप येणं, कर्करोग वगैरे शब्द इतर कोणी वापरू नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर ते कठीण आहे; इतर कोणी वापरले तर हल्ला होतो असं वाटत असेल तर सही बदला.
मग स्वयंपाक, सुशोभीकरण, ई. यात तुम्हाला जेंडर बायस कुठे दिसला?ते विधान मृदुला यांचं होतं. मी दुजोरा दिला तो तत्संबंधी धाग्यांमधे अॅक्टीव्ह सदस्य बहुतांश स्त्रिया असतात; पुरूष सदस्यांचं प्रमाण कमी असतं या निरीक्षणाला. त्यालाच आंजावरचा जेंडर बायस असे नाव दिले. प्रत्यक्षात हे पुरूष घरात काय करतात हे मी पहायला गेले नाही, जाणार नाही. कारण पुन्हा वरचा मुद्दा क्रमांक ३.
In reply to >>हा बिनडोकपणा आजही इंटरनेट by मराठमोळा
In reply to >>हा बिनडोकपणा आजही इंटरनेट by मराठमोळा
कृपया "बिनडोक" सारखे शब्द जपून वापरा. आपण आपल्या स्वकीयांचा किंवा कुणाचा अपमान तर करत नाही आहोत याची काळजी घ्यावी.हे काय नविन? अहो आम्ही तर जाणूनबूजून आणि काळजीपूर्वक अपमान करतो. आमचे अनेक स्वकीय बिनडोकच काय अगदी गाढव आहेत. इतरांचा अपमान तर आम्ही अगदी दिलखुलासपणे करतो. अजून काय प्रॉब्लेम असेल तर सांगा!!!
In reply to बरं मग? by Nile
In reply to >>अहो आम्ही तर जाणूनबूजून आणि by मराठमोळा
In reply to गेल्या ५० वर्षात स्त्री जात by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to बराचसा नाही थोडासा आहे by चौकटराजा
In reply to स्त्रिया आणि पुरूषांचे लैंगिक by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to कारण by चौकटराजा
In reply to फ्रॉईडची अनेक मतं निखालस चूक by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to बरं बाई ! by चौकटराजा
नाहीतर सार्वजनिक पेपर चे ठिकाणी पेपर वाचन हे खांद्याच्या वरचेच काम चालते ना ? मग तिथे ललनांचा वावर कमी का?सार्वजनिक ठिकाणी अनेक ठिकाणी स्त्रियांसाठी वेगळी सोय असते, उदा: सार्वजनिक मुतार्या, शौचालये. (यांची अवस्था अतिशय दयनीय असते हा भलताच मुद्दा आहे.) उपनगरीय रेल्वे आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमधेही स्त्रियांचे डबे वेगळे असतात. भारतात उपलब्ध असणार्या गोष्टी आणि त्यांचा फायदा घेण्यार्या लोकांची संख्या यांचं प्रमाणही व्यस्त आहे. सगळीकडे जिथे मारामारी करून गोष्टी मिळवाव्या लागतात तिथे स्त्रिया मागेच रहाणार. पण माझा मुद्दा तो नाहीच्चे. मी उच्चभ्रू लोकांमधलंच प्रमाण पहाते आहे. मराठी उच्चभ्रू वर्गाततरी स्त्रियांचं प्रमाण पुरूषांच्या प्रमाणाच्या बरोबरीने असेल असा समज भारत महासत्ता होण्यातून होत होता. पण तिथेही हे प्रमाण miserable म्हणावं असंच आहे. शिवाय नोकर्या, आर्थिक सुबत्ता यांमधून उपलब्धतेचं प्रमाणही उच्चभ्रू, एलीट वर्गासाठी अधिक आहे. आणि तरीही स्त्रिया मागे का असा प्रश्न आहे. अण्णांच्या सभेबद्दलही तेच कारण. मी सर्वसामान्य लोकांबद्दल बोलतच नाहीये. पण त्याच बाबतीत आणखी एक निरिक्षणही नोंदवते. फेसबुकावर माझ्या यादीत साधारण ३५० ते ४०० लोकं तेव्हा होते. पैकी अर्ध्याधिक भारतीय. स्त्री-पुरूष प्रमाण अगदी समान नाही (याचं प्रमुख कारण मी पुरूष डॉमिनेटेड क्षेत्रात शिक्षण आणि नोकरी केली आहे.) पण तरीही मराठी आंजाएवढं वाईटही नाही. आणि तरीही फेसबुकावरून अण्णांना समर्थन देणार्या लोकांमधे स्त्री-पुरूष प्रमाण एवढं असमान नव्हतं, साधारण ४०-६० टक्के अशी विभागणी. (आणि या निरिक्षणाशी मिळतंजुळतं निरीक्षण विमे आणि धनंजय बोरगावकर यांनीही याच धाग्यात मांडलेलं आहे.)
In reply to फ्रॉईडची अनेक मतं निखालस चूक by ३_१४ विक्षिप्त अदिती
तरीही इंटरनेटवर व्यक्त होण्यात स्त्रियांचे प्रमाण कमी का असावे?ह्यावर ममो ह्यांनी दिलेला प्रतिसाद अतिशय चपखल आहे. - (इंटरनेटवर अभिव्यक्त न होणारी बायको असलेला) सोकाजी
In reply to ??? by सोत्रि
In reply to ??? by सोत्रि
इंटरनेटवर अभिव्यक्त व्हायला मुळात इंटरनेटचा अॅक्सेस हवा. जसा टीव्ही सरसकट सगळ्या घरांमध्ये पोहोचला आहे तसे इंटरनेट अजूनही घराघरात पोहोचले नाही. तसे जेव्हा होईल तेव्हा महिलांची संख्या लक्षणियरित्या वाढेल असे खात्रीने सांगता येईलमग फेसबुक वर कशा काय इतक्या संख्येने सांडलेल्या असतात हो या स्त्रिया ??? सबब, गृहीतकात काहीतरी गल्लत आहे.
In reply to इंटरनेटवर अभिव्यक्त व्हायला by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to आले का खवचट छिद्र्वान्वेशी by मराठमोळा
In reply to इंटरनेटवर अभिव्यक्त व्हायला by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to अतिशय रोचक निरीक्षण by ३_१४ विक्षिप्त अदिती
फेसबुकावरून मराठीत व्यक्त होणारे संस्थळांवर फारसे लिहीताना दिसत नाहीत. वाचक असतात का हे मला माहित नाही. पण या निरीक्षणाचा विचार जरूर व्हावा असं वाटतं.फेसबुक हे बिनडोकपणाचे आणि रिकाम्या भिंतीला तुंबड्या लावण्याचे माध्यम आहे. तिथे काय अकलेचे दिवे लागतात हे आपण बघतोच. जिथे Today I'm feeling SAD ह्याला १००० भर लाईक्स असतात तिथले भिंतींवर पिंका टाकणे म्हणजे अभिव्यक्त होणे ? :O फेसबूक आणि वरती नामोल्लेख केलेली मसं येथे मराठीत अभिव्यक्त होणे हे जर सारखेच आहे असे म्हणत असशील तर मग चर्चाच खुंटली. - (फेसबुकवर असणारा पण अभिव्यक्त मसंवर होणारा) सोकाजी
In reply to :O - सुपर अनलाईक by सोत्रि
फेसबुक हे बिनडोकपणाचे आणि रिकाम्या भिंतीला तुंबड्या लावण्याचे माध्यम आहे. तिथे काय अकलेचे दिवे लागतात हे आपण बघतोच.ह्यावर अधिक विदा दिल्यास आवडेल. त्यानंतर फेसबुकवर कोणत्याही मराठी संस्थळापेक्षा अधिक वैचारीक आणि विधायक गोष्टी होतात हे सिद्ध करण्याची जबाबदारी माझी. एखाद्याच्या फ्रेंड्सलिस्टमध्ये बिनडोक आणि तुंबड्यालावणारेच अधिक असतील तर तो फेसबुकचा दोष नाही. ८०० मिलियन लोकांच्यात तुमच्या आमच्यासारखे सगळेच येतात. मराठी संस्थळावर काय कमी बिनडोक लोक आहेत?
In reply to ह्यॅ? by Nile
फेसबुकावरून मराठीत व्यक्त होणारे संस्थळांवर फारसे लिहीताना दिसत नाहीतप्रत्यक नाण्याला दोन बाजू असतात ह्या न्यायाने फेसबुकवर वैचारीक (?) आणि विधायक गोष्टी होतही असतील. पण फेसबुक हे त्याचे प्रमुख माध्यम खचितच नाही. विधायक गोष्टींसाठी उत्तम 'मार्केटिंग प्लॅटफॉर्म' मात्र आहेच, त्याबद्दल दुमत नाहीयेय. - (फेसबुकावर तुंबड्या लावायला आवडणारा) सोकाजी
In reply to निळुभाऊ, माझा प्रतिसाद ह्या by सोत्रि
In reply to ते वाक्य धरूनही. by Nile
फेसबुकवर मराठीतूनही मराठी संस्थळांच्या तुलनेत होणारी अभिव्यक्ती असण्याची शक्यता नाही असे तुम्हाला वाटते का?काही ग्रुप्सवर लोक मराठीतून व्यक्त होतातच, पण त्यात एक प्रकारची क्लिष्टता येते. कोण कोणास उद्देशून बोलतोय, याचा माग काढणे एका मर्यादेनंतर अशक्य होऊन जाते. मसंवर तो प्रकार नाही. तदर्थ अनेक लोक हळूहळू तिथे मते व्यक्त करणे टाळतात (हे माझे निरीक्षण). पर्यायाने अभिव्यक्तिला मर्यादा येतात. लोक आपसूकच रिकाम्या भिंतींना तुंबड्या लावत सुटतात.
In reply to माझ्या मते by अन्या दातार
In reply to बिंगो! by सोत्रि
In reply to तोकडी तुलना by Nile
फेसबुक हे बिनडोकपणाचे आणि रिकाम्या भिंतीला तुंबड्या लावण्याचे माध्यम आहे. तिथे काय अकलेचे दिवे लागतात हे आपण बघतोच. जिथे Today I'm feeling SAD ह्याला १००० भर लाईक्स असतात तिथले भिंतींवर पिंका टाकणे म्हणजे अभिव्यक्त होणे ? Shock फेसबूक आणि वरती नामोल्लेख केलेली मसं येथे मराठीत अभिव्यक्त होणे हे जर सारखेच आहे असे म्हणत असशील तर मग चर्चाच खुंटली.हा झाला तुम्ही म्हणत असलेला सोत्रिंचा पहिला प्रतिसाद. यात त्यांनी एखादा स्पेसिफिक ग्रुप व मसं ही तुलना केलेली दिसत नाही. त्यानंतर तुमच्या या प्रतिसादात तुम्ही काही विदा मागितला होता. तसा विदा देणे जरी शक्य नसले तरी धागाकर्तीचे मत सोत्रिंच्या मुद्द्यास पुष्टी देणारे असल्याचे येथे आढळते. फेसबुक व मसं अशी चर्चा चालू नसल्याने खरंतर या उपचर्चेची गरज नव्हती, पण आता तशी झालीच आहे तर आमचे मत मांडून थोडी भर घालतो आहे.
In reply to :O - सुपर अनलाईक by सोत्रि
In reply to इंटरनेट / मराठी साइटच्या by नितिन थत्ते
In reply to इंटरनेट / मराठी साइटच्या by नितिन थत्ते
In reply to पडिक असतात. by कुंदन
In reply to पडिक असतात. by कुंदन
In reply to इंटरनेट / मराठी साइटच्या by नितिन थत्ते
या वर्गातले पुरुष जवळजवळ (जागे असण्याचा) पूर्णवेळ जालावर पडिक असतात.असे का!

In reply to तरीच, गेल्या काही दिवसात ही by कवितानागेश
In reply to तरीच, गेल्या काही दिवसात ही by कवितानागेश
In reply to तरीच, गेल्या काही दिवसात ही by कवितानागेश
तरीच, गेल्या काही दिवसात ही गोष्ट माझ्या लक्षात आली होतीच, की इथे 'मुली' कमी आहेत.कारण जरा कुठे ऑनलाईन आले की सगळ्या 'टग्यां'शीच बोलावे लागते!!आता कळली का आमची व्यथा ??
१. मुलीना नेटवर वेळ कमी मिळतो. कारण त्या वर्तमानात रहातात, आणि वर्तमानात 'कृती' करतात. वैचारीक ( थेअरेटिकल) चर्चा करणे अनेकवेळा निरर्थक वाटते.ते वर्तमानात राहण्याचे सोडा, पण वैचारिक काहीही आवडत नाही हे मान्य:-)
२.असलेल्या वेळात त्या पाककृती वाचतात.घ्या. म्हणजे परत चूल आणि मुल चा प्रकार का ??? तरी बरे, इथे आपण बाय चोइस मुद्द्यांबद्दल बोलत आहोत.
३. मूळात स्वभाव 'अॅग्रेसिव्ह' नसतो, त्यामुळे आपली मते ( काही पक्की मते असली तरिही) ती हिरिरीने मांडावीत अशी गरज वाटत नाही.कुणाचा स्वभाव 'अॅग्रेसिव्ह' नसतो ?? सर्व महिलांचा ?? अरे बाप रे. यावर प्रतिवाद करायची माझी कुवत नाही.
तसेही इथल्या कुठल्याही चर्चांमुळे रोजच्या आयुष्यात काहीही फरक पडणार नसतो.हा पलायन वाद झाला. फरक पडताच नाही असे तुम्ही म्हणू शकत नाही. अगदीच काही नाही तर इतरांची मते कळतात त्यातून आपली मते बदलू शकतात. ती क्षितिजे का कायसे म्हणतात ती विस्तारत नाहीत ? मिपा वर मी नसतो तर ओरिगामी शी ओळख झाली नसती, पक्षी निरीक्षण करायला शिवडीला गेलो नसतो.
४.आपली स्वतःची मते 'चव्हाट्यावर' मांडणे तितके सुरक्षित वाटत नाही.का कोण खाणार आहे ? मते चव्हाट्यावर मांडून कसली असुरक्षितता वाटते बुवा ??
५. पुरुष मूळ मुद्द्याला सोडून कधीही अचानक 'लागेल' अशी कॉमेंट टाकू शकतात. त्यामुळे सांभाळून रहावे लागते.महिला पण हे चोख प्रकारे करू शकतात. मिपा वर अशा अनेक ताई (माई, अक्का) आहेत की. नवे व्यनितून विचारा. नाही तर उगाच कुणाला तरी "लागेल"
६. स्वतःला व्यक्त करण्यासाठी अजून हजार ठिकाणे असतात. उदा.: मैत्रिणी, बहिणी, आई, मावशी वगरै. त्यांच्याशी बोलणे फोनवर होते, पुन्हा 'नेट' बाद!म्हणजे त्याच त्याच वर्तुळात फिरणे प्रेफर केले जाते. हम्म्म्म.... रोचक आहे.
७.शिवाय इतर काहीतरी कलाकुसरीचे उद्योग ८०% मुलींना असतातच. त्यात वेळ घालवणे जास्त आनंददायक असते.असेच काहीसे वर बिचारा ममो म्हणाला तर नॉन अॅग्रेसिव्ह रीतीने उत्तर आले की.
८.सामाजिक म्हणवल्या जाणार्या विषयांबद्दल उदासिनता. आपण बरे आपले घर बरे अशी वृतीज्जे बात !!!!
९. मुद्दा ३ चा पुढचा परिणाम. वाद घालणेदेखिल आवडत नाही. त्यामुळे आपले मत एकाच छोट्याश्या वाक्यात मांडण्याकडे कल.महिला आपले मत थोडक्यात मांडतात ??? देवा परमेश्वरा..... वाचव रे बाबा !!!!!
१०. मुलींना ( निदान ७०%) बोलायला खूप आवडते! त्यामुळे लिहणे कमी असते. फोनच पुष्कळ वापरला जातो, नेटची गरजच काय?मुद्दा ६ चेच उत्तर चला, पुढे बोला..... ;-)
In reply to तरीच, गेल्या काही दिवसात ही by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to तरीच, गेल्या काही दिवसात ही by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to मराठी ईंटरनेट साइट युजर हा by बाळ सप्रे
मराठी इंटरनेट साइट्सवर स्त्रियांचे प्रमाण कमी का?इंटरनेट साईट युजर हाच ऑब्जेक्ट ऑफ स्टडी आहे मालक.
In reply to व्यक्त होणं महत्वाचं.. by मस्त कलंदर
... म्हणूनच मला पुस्तकं वाचायला, सिनेमे बघायला आणि इथे लिहायला वेळ मिळतो असं काही महाभागांचं मत आहे. तेव्हा, असो!!!अशा प्रकारच्या लोकांची, विशेषतः पुरूष आयडी, उपस्थिती मिपावर अन्यत्र दिसते. या धाग्यावर अदितीचा बैल दूध देतो आहे का? :D
In reply to व्यक्त होणं महत्वाचं.. by मस्त कलंदर
In reply to आणि हो, इथं प्रतिसादांत by सुहास..
या प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात " सगळ्याच बायका रिकामटेकड्या नसतात " विशेषता नवर्याच्या जीवावर !!खरं आहे. पण नवर्याच्या जीवावरच कशाला, जवळच्या नात्यातल्या सर्वच पुरूषांच्या जीवावर. गुलामांना स्वातंत्र्य मिळतं तेव्हा त्यांना गुलाम बनवणार्यांची चैन कमी होतेच; गुलामी संपल्यावर गुलामीचा उपभोग घेणार्या मालकांना बुडं हलवून काम करावंच लागतं. आणि असं समाजव्यापी परिवर्तन घडवणार्यांना, या संदर्भात पुरुषांना, उदा: जगन्नाथ शंकरशेट, महात्मा फुले, विठ्ठल रामजी शिंदे, महर्षी कर्वे, र.धों. कर्वे, बाबासाहेब आंबेडकर, या सर्वांना समाजात अतिशय आदराचं स्थान असतं.
In reply to त्या मनाने विदेशी महिला by अविनाशकुलकर्णी
त्या मनाने विदेशी महिला जागरुक आहेत..सदर तुलना जगभरच्या इंटरनेट वापराशी केल्यामुळे हे वाक्य गृहीतच होतं. असो.
In reply to माझ्याही अकलेचे तारे by गणपा
In reply to उत्तर by विनायक प्रभू
In reply to नेट वरचा आमचा वावर by पैसा
In reply to पैसातै, प्रतिसाद आवडला. by मराठमोळा
In reply to नेट वरचा आमचा वावर by पैसा
In reply to हा सर्वे घ्या by चौकटराजा
In reply to बाबौ! by दादा कोंडके
In reply to "भारतातल्या बायकांनी दुसरं by रेवती
In reply to केवळ गंमत... by दादा कोंडके
In reply to स्त्रियांचं वस्तूकरण करण्यात by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to स्त्री ही पुरुषापेक्षा सुंदरच ! by चौकटराजा
स्त्री ही पुरूषापेक्षा दागिने, प्रसाधने न वापरताही सुंदर असतेअसं काही मला वाटत नाही. बहुतांश माणसं व्यवस्थित आहार, विहार आणि विचार यांच्यामुळे व्यवस्थितच दिसतात. सौंदर्य हे बघणार्याच्या दृष्टीवर असतं. मला फारच थोडी माणसं कुरूप दिसतात; विचारशून्य स्त्रिया आणि पुरुषही चेहेर्याने अनेकांना सुंदर वाटणारे असले तरी मला दखलपात्र वाटत नाहीत. सदर लेखाच्या लेखकाचाही पुरूष कुरूप पैदा होतात असा दावा नसून, सवयींमुळे ते कुरूप दिसतात असा दावा आहे; जो मला पटतो. असल्या ओंगळ सवयी नसणारे पुरूष अर्थातच कुरूप नसतात.
In reply to स्त्री ही पुरूषापेक्षा by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to केवळ गंमत... by दादा कोंडके
In reply to हा सर्वे घ्या by चौकटराजा
आजच्या कॉलेज मधे एक परिक्षा मुलींची घ्या. त्याना आजची पेपरमधली हेड लाईन विचारा .अचूक उत्तरे २० टक्याच्या वर येणार नाहीत.अच्छा, आणि मुलांची उत्तरं किती टक्के बरोबर येणार आहेत? तुमच्या करता एक क्वीक क्वेश्चनः खालील वाक्य कोण म्हणालं? “All generalizations are false, including this one.” आलं नाहीतर खुशाल गुगल वर शोधा.
In reply to मुलांचं काय? by Nile
In reply to हा सर्वे घ्या by चौकटराजा
नेट चे जाळे आयएस पी चा रेंज वगैरे नका आता लक्षात घेउ. पेपर तर सर्वत्र दिसतो ना ?हे माझ्या मुद्द्याच्या अगदी विरुद्ध आहे. माझा मूळ विचार असा आहे की एलीट लोक, ज्यांची कॉपी समाजात मारली जाते, जे अगदी १-२ टक्के असतील, त्यांच्यात काय दिसतं. सामान्यतः परिस्थिती प्रचंड दयनीय आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. फक्त मुली-स्त्रियांना (आणि पुरूषांनाही) दोष शोधण्यापेक्षा, परिस्थिती काय आहे, लोकांची त्याबद्दल काय मतं आहे आणि त्यात काही बदल करायचा असेल तर काय करता येईल याचा विचार मी करते आहे.
In reply to स्त्रीयांचं प्रमाण by मराठे
एक प्रश्न; लेखात दिलेला विदा हा प्रत्येक संस्थळावरच्या सर्व सदस्यांचा आहे की फक्त काँट्रीब्युटींग / अॅक्टीव सदस्यांचा?बहुदा भेट देणार्यांचा असावा.
फक्त मराठी संस्थळांविषयी बोलायचं तर प्रत्येक संस्थळाचा एक स्वभाव आहे (त्या त्या संस्थळांच्या सदस्यांप्रमाणे) त्यामुळे एखाद्या संस्थळावर आवर्जून लिखाण करणारी स्त्री इतर संस्थळांवर फक्त वाचनमात्र राहात असणार.याचा अर्थ बहुसंख्य एलिट स्त्रियांना आवडेल असं संस्थळ अजून बनलेलं नाही. किंवा असलेल्या संस्थळांची पुरूषप्रधान वृत्ती या स्त्रियांना आवडत नाही? एकूण उत्तरं न आवडणारी आहेत खरी!
In reply to काही ऑन सिरियस नोट अणि काही टुकार ... by छोटा डॉन
मुळात मराठी आंतरजालावर स्त्रीया किती हे शोधणे मला कितकेसे फ्रुटफुल वाटत नसल्याने पर्टिक्युलर संस्थळाबाबत स्त्रीयांचा काय ट्रेन्ड आहे हा विदा तर त्याहुन युसलेस आहे असे वाटते.सहमत आहे. वर लीमाउजेट यांनी म्हटल्याप्रमाणे "तसेही इथल्या कुठल्याही चर्चांमुळे रोजच्या आयुष्यात काहीही फरक पडणार नसतो. " म्हणून ही चर्चा सुरु आहे. :)
मुळात मराठी आंतरजालावर स्त्रीया किती हे शोधणे मला कितकेसे फ्रुटफुल वाटत नसल्याने पर्टिक्युलर संस्थळाबाबत स्त्रीयांचा काय ट्रेन्ड आहे हा विदा तर त्याहुन युसलेस आहे असे वाटते.अगदी नेमके हेच, लिटरली हेच, मनात आले होते हा लेख वाचल्या वाचल्या. त्यामुळेच विडंबन टाकायचे मनात आले होते पर ईस ममो ने भांजी मार दी :( - (डॉन्याशी चक्क सहमत व्हावं लगलेला) सोकाजी
In reply to १००% सहमत by सोत्रि

निदान एखादी गोष्ट अजिबातच आवडली नाही किंवा आता हे अति होतयं, सहन करण्यापलिकडचं लिखाणं आहे असं वाटलं त्याबद्दल तर आवर्जून लिहा.याच्याशी अगदी सहमत. फक्त लिहीताना भावनेच्या भरात भरकटण्याची शक्यता अधिक. तेव्हा डोकं शांत ठेवून लिहा; दोन-चार तासांनी व्यवस्थित मुद्देसूद न पटणार्या गोष्टींचा समाचार घेता येतो. थंड डोक्यानेही गरळ ओकणारे लोकं असले तरी ते अल्पसंख्य आहेत. डॉन्याच्या प्रतिसादातला गंभीरपणे लिहीलेला भाग पहाता आणि त्या भागाला अनेक स्त्री आयडींकडून, पैसा, रेवती, इ. आलेलं अनुमोदन पहाता, ज्या वर्गाला आपण (का मी) एलिट समजतो (आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक बाबतीत) त्यांच्यातही स्त्रिया घर, संसार, सजावट, व्यवस्थितपणा, मुलं यांच्यापुढे जग असतं त्याचा विचार करण्यात कमी पडत आहेत असं वारंवार दिसून येत आहे. डॉन अगदी मस्करीत जरी म्हणतो, "स्त्री ह्या पुरुषांएवढ्या रिकामटेकड्या आणि बेशिस्त नसतात" तरी त्यात दुर्लक्ष करण्याजोगतं मला दिसत नाही. हे असं का याबद्दल सिमॉन दी बोव्वारने 'द सेकंड सेक्स' या पुस्तकात अतिशय सुंदर विवेचन दिलेलं आहे. (जमेल तेव्हा या पुस्तकाबद्दलही लिहायचं आहे.) किंबहुना डॉन्या, तू हा मुद्दा जेवढा लाईटली घेत होतास, मी ही तशीच होते. पण त्यामागचं विवेचन माझ्यासाठीतरी त्रासदायक आहे.
गर्ल्स Vs बॉईज चांगलीच धोबीपछाड चालू आहेअजिबात नाही. माझा असा काहीही उद्देश नाही. संकेतस्थळ वापरकर्ते म्हणून आपण कुठे कमी पडतो का असा विचार करून लोकांची त्याबद्दल मतं काय आहेत असा मला प्रश्न पडला आहे.
मुळात मराठी आंतरजालावर स्त्रीया किती हे शोधणे मला कितकेसे फ्रुटफुल वाटत नसल्याने पर्टिक्युलर संस्थळाबाबत स्त्रीयांचा काय ट्रेन्ड आहे हा विदा तर त्याहुन युसलेस आहे असे वाटते. ह्याहुन संस्थळाच्या इमेज किंवा सभ्य-असभ्यतेची व्याख्या ठरवण्याचा प्रश्न जरी तूर्तास आला नसला तरी ते ही हास्यास्पद ठरेल असे वाटते.इंग्लिशमधून फार विचार केल्यामुळे लेखात फार इंग्लिश शब्द आले आहेत. डॉन्या, त्याबद्दल तुला विशेषतः सॉरी. आंजावर स्त्रिया असण्याबद्दल मला अधिक कळकळ का आहे हे लेखाच्या सुधारलेल्या आवृत्तीच्या शेवटी आहेच. हा विचार मला मराठी संस्थळांबद्दल करायचा असल्यामुळे ही चर्चा या पाचही संस्थळांवर टाकलेली आहे. संस्थळाची इमेज आणि सभ्यासभ्यता, याबद्दल मला काहीही टिप्पणी करायची नव्हती. पण लेखाला आलेल्या प्रतिक्रियेत हा विषय आलेला असला तरीही याबद्दल, विशेषतः मिपाबद्दल, मी बोलणं अयोग्य असेल. माझ्याकडून बायस्ड आणि निगेटीव्ह अनुमानं मिळण्याचीच शक्यता अधिक.
In reply to पर्लचा संपूर्ण प्रतिसाद by ३_१४ विक्षिप्त अदिती
डॉन्याच्या प्रतिसादातला गंभीरपणे लिहीलेला भाग पहाता आणि त्या भागाला अनेक स्त्री आयडींकडून, पैसा, रेवती, इ. आलेलं अनुमोदन पहाता, ज्या वर्गाला आपण (का मी) एलिट समजतो (आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक बाबतीत) त्यांच्यातही स्त्रिया घर, संसार, सजावट, व्यवस्थितपणा, मुलं यांच्यापुढे जग असतं त्याचा विचार करण्यात कमी पडत आहेत असं वारंवार दिसून येत आहे.अधोरेखित भाग हा पूर्णपणे त्यांच्या प्रायॉरिटीजचा (आणि म्हणूनच वैयक्तिक) आहे. पुरोगामी किंवा एलिट म्हणवून घेण्यासाठी कुटुंबाचा रोष पत्करणे प्रत्येकाला पटेलच असं नाही. मसंवर अक्कल जमवण्यापेक्षा/आजमावण्यापेक्षा घराकडे आणि माणसांकडे लक्ष दिले तर त्यात चुकीचे काही आहे असं नसावे. पुरुष मंडळींनीही त्यात हातभार लावावा ही अपेक्षाही रास्तच आहे.
In reply to डॉन्याच्या प्रतिसादातला by अन्या दातार
कुटुंबाचा रोष पत्करणे प्रत्येकाला पटेलच असं नाही.घराबाहेरच्या जगाचा विचार केल्यामुळे कुटुंबाचा रोष पत्करावा लागत असेल तर त्या व्यक्तीला पुरोगामी आणि त्या व्यक्तीच्या इतर कुटुंबीयांना सनातनी म्हणण्याचा मोह आवरत नाही. घर, संसार, मुलंबाळं यांची काळजी घेऊनही पुरोगामी व्यक्ती, विशेषतः स्त्रिया, नसतातच असं काही नाही. घराबाहेरच्या जगाचा विचार करणं हे एव्हरेस्ट चढण्यापेक्षा बरंच सोपं आहे.
In reply to पुरोगामी किंवा एलिट म्हणवून by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to पुरोगामी किंवा एलिट म्हणवून by ३_१४ विक्षिप्त अदिती
घराबाहेरच्या जगाचा विचार केल्यामुळे कुटुंबाचा रोष पत्करावा लागत असेल तर त्या व्यक्तीला पुरोगामी आणि त्या व्यक्तीच्या इतर कुटुंबीयांना सनातनी म्हणण्याचा मोह आवरत नाही.आजूबाजूच्या जिवंत लोकांकडे दुर्लक्ष करुन आंजावर (बर्यापैकी) व्हर्च्युअल जगात जगण्याला जर पुरोगामी म्हणत असाल तर प्रश्नच मिटला. जेंव्हा गरज पडते तेंव्हा सगळ्यात आधी आजूबाजूची माणसे मदतीला धावून येऊ शकतात, आभासी जगातील लोक (आयडी?) येतीलच याची शाश्वती नाही. अर्थात तुम्ही कुठे राहता वगैरे यावरही अवलंबून आहे. पण अजुनतरी शेजारच्या घरातील व्यक्तिशी नेटवर चॅट करण्यापेक्षा प्रत्यक्ष बोलणेच जास्त सोयीस्कर व श्रेयस्कर आहे (ही माझी समजूत) (तुमच्या प्रतिसादानुसार प्रतिगामी/सनातनी) अन्या
(तुमच्या प्रतिसादानुसार प्रतिगामी/सनातनी) अन्याहे मी म्हटलेलं नाही. बाकी आपण दोघे लंब दिशांमधे बोलत आहोत. त्यामुळे आणि मी न बोललेले शब्द माझ्या तोंडी येत असल्यामुळे मी थांबते.
In reply to (तुमच्या प्रतिसादानुसार by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to आंतरजालावर स्त्रियांच्या by सूड
यासाठी काय करता येईल हे सुचवून ते अमलात आणण्यासाठीही पावले उचलेल यात शंका नाही.आंम्हालाही असंच वाटत. अति अवांतरः- चित्रावरुन तरी मॉडर्न झाशीच्या राणी शोभतात.
सपललो तर उगीच हान्त्याल धरुन! पला पला पला... 
In reply to यासाठी काय करता येईल हे by अन्नू
यासाठी काय करता येईल हे सुचवून ते अमलात आणण्यासाठीही पावले उचलेल यात शंका नाही.हा विदा बघितल्यावर निदान आजूबाजूच्या लोकांना या संदर्भात जागरूक करणे हे एक पाऊल नव्हे का? या धाग्याच्या निमित्ताने, याच धाग्यावर किमान दोन-चार स्त्रीसदस्यांनी आपल्या तक्रारी नोंदवल्या हा त्याचा पुरावा नव्हे? (त्या तक्रारी मला किती वैध वाटतात वा नाही हा मुद्दा नाही. माझा मुद्दा स्त्रियांनी न घाबरता, कंटाळता आपली मतं मांडणं हा आहे. मतं ग्राह्य का अग्राह्य ही पुढची पायरी आहे) कोणत्याही बाबतीत बदल घडवण्यासाठी आधी "काहीतरी चुकतं आहे" हे अनेकांना समजावण्याची आवश्यकता आहे. अजूनही अनेकांना "काय फरक पडतो बायका नसल्या तरीही!" असा प्रश्न पडला आहे. अनेकांना "जिच्या हाती पाळण्याची दोरी", "मुलगी शिकली प्रगती झाली", "एक बाई शिकली की संपूर्ण कुटुंब शिकतं" या आपल्या कानांवर, डोळ्यांवर अगदी नियमितपणे पडणार्या विचारांचा २१ व्या शतकातला भाग, स्त्रिया आंजावरही समप्रमाणात असाव्यात, त्यांनी स्वतःला व्यक्त करावं हे पटत नाहीये. चूल आणि मूल यात धन्यता मानणार्या स्त्रियांच्या मुलांना, भावांना माया मिळणारच* पण लहानपणी विस्तारलेल्या दृष्टीतून जगाकडे न बघितल्यास आपलीही जगाकडे बघण्याची दृष्टीही लघु रहाण्याची शक्यताच जास्त हे अनेकांना अजूनही पटत नाहीये, हे याच धाग्यावरचे प्रतिसाद वाचल्यास समजेल. मुळात काही पावलं उचलण्यासाठी आपण तिसर्या मजल्यावर आहोत का तळघरात हे समजायला नको. माझा असा तद्दन गैरसमज होता की आपण आत्ता नदीत पोहतो आहोत आणि समुद्रात कसं जायचा याचा विचार करायला हवा. अनेक प्रतिसाद वाचून आपण विहीरीच्याही बाहेर नाहीत याची जाणीव होत आहे.
चित्रावरुन तरी मॉडर्न झाशीच्या राणी शोभतात.फ्युचुरामा ही मालिका तुम्ही पाहिली असेल तर त्यात लीला हे पात्र (जिचं हे चित्र आहे) ती मारामारी करणारी नाही. ती ड्रायव्हर आहे. पण ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे. स्वतःच्या कामाशी प्रामाणिक, जगाकडे बघण्याची दूरदृष्टी असणारी आणि स्वतःकडे स्त्री म्हणून न पहाता माणूस म्हणून पहाणारी व्यक्ती आहे. मला 'लीला'चं पात्र आवडतं ते या कारणासाठी! बंदूक फक्त इन्सिडेंटल आहे. आजच्या झाशीच्या राणीच्या हातात तलवार किंवा बंदूकीऐवजी कीबोर्डच जास्त शोभून दिसेल. हिंसेवर माझा विश्वास नाही. *आपल्या माणसावर माया असणं ही मानवी वृत्ती आहे. त्यात स्त्री-पुरूष असा काही अपवाद मला दिसलेला नाही. ना जगाकडे बघण्याच्या दृष्टीकोनाने फरक पडत. मला माझ्या आईबद्दल प्रेम वाटणं हे तिच्या पाककौशल्याशी निगडीत नाही. पण तिच्याबद्दल आदर वाटणं हे तिच्या स्वातंत्र्याच्या कल्पना आणि तिने मला दिलेल्या घराबाहेरच्या जगाकडे बघण्याच्या दृष्टीमुळे आहे. आई, बहिण, मैत्रीण अशा नात्यातल्या स्त्रियांकडून जशी माया मिळते तशीच वडील, भाऊ, मित्र या लोकांकडूनही मिळतेच.
In reply to यासाठी काय करता येईल हे by ३_१४ विक्षिप्त अदिती
माझा मुद्दा स्त्रियांनी न घाबरता, कंटाळता आपली मतं मांडणं हा आहेअनुमोदन!
आई, बहिण, मैत्रीण अशा नात्यातल्या स्त्रियांकडून जशी माया मिळते तशीच वडील, भाऊ, मित्र या लोकांकडूनही मिळतेच.मानल ब्वॉ! :)
In reply to यासाठी काय करता येईल हे by ३_१४ विक्षिप्त अदिती
माझा मुद्दा स्त्रियांनी न घाबरता, कंटाळता आपली मतं मांडणं हा आहे.मान्य. पण त्यासाठी प्लॅटफॉर्म कोणता वापरावा हे ज्याचे त्याने ठरवावे, निदान तेवढे स्वातंत्र्य तरी दिले जावे. व्यक्त होण्यासाठी मराठी आंजा हा काही एकमेव पर्याय नाही हेही काही प्रतिसादांमधून दिसून येते.
आला गं बाई आला गं बाई आलाऽऽ