नमस्कार मंडळी,
मराठी शिर्षक सुचले नाही म्हणून ईंग्रजीमधेच लिहिले त्याबद्दल माफी असावी.
काल एका क्लिष्ट विषयावर चर्चा पाहिली आणि त्याबददल इथे लिहावसं, चर्चा करावीशी वाटली.
सध्या हा एक ज्वलंत प्रश्न आहे आणि केवळ उच्चभ्रू/अतिश्रिमंत समाजाशी निगडीत न रहाता सर्वसामान्यांच्या घरात देखील घुसू पाह्तो आहे. हा मुद्दा विवाहित, अविवाहित लग्नाळू मुला-मुलींचे पालक या सर्वांनाच लागू होतो. आजकाल घटस्फोटांचे वाढते प्रमाण आपण पहातोच आहे. त्याचप्रमाणे लग्न न करणार्यांची संख्या देखील झपाट्याने वाढते आहे. "लिव ईन" ला पसंती देणारे भारतातही आता कमी नाहीत.
वरील सर्व गोष्टींमधे बरेच चर्चेचे मुद्दे आहेत पण आजचा मुद्दा हा आहे की आयुष्यात एकदाच लग्न करणे, किंवा एकप्त्नीक रहाणे हे गरजेचे राहिले आहे की नाही? आहे तर का आणि नही तर का नाही?
लग्न म्हणजे जबाबदारी, कायद्याच बंधन आणि अॅडजस्टमेंट्स. कदाचित हे सर्व स्वतंत्र पिढीच्या मनाला पटत नसल्याने लिव ईन, किंवा सहज रित्या घटस्फोट घेऊन वेगळे होणे वाढते आहे. अगदी प्रेम विवाहामधेही लग्नानंतर स्वभावांमधे आणि अपेक्षांमधे खुप फरक पडत जातो आणि बर्याचदा शेवट वेगळे होण्यातच होतो. आजही घटस्फोटीत, वय उलटून गेले तरी अविवाहित आणि "लिव ईन" असणार्या व्यक्तीला समाज चांगल्या नजरेने पहात नाही. कारण आजही समाजाच्या मनात कुठेतरी "एकदाच आणि लग्न करणेच, आयुष्यभर एकपत्नीक रहाणे" यालाच सभ्य स्त्री किंवा पुरुष समजण्याची भावना आहे.
नोकरी करणार्या मुलींना नवर्याने घरकामात मदत करावी, वैयक्तीक स्वातंत्र्य असावं, काम दोघांनी मिळून करावं अशी अपेक्षा असते, पण बर्याच ठिकाणी मुले इथे कमी पडतात, अर्थात याला दुसरी बाजूही आहेच, त्यात नातेवाईक, मुलाचे आईवडील, मुलीचे आईवडील यांचा दबाव मुलगा आणि मुलगी दोघांवर असतोच, म्हणून लग्न कदाचित टिकून रहाते आणि मग एकदा प्रौढत्व, पालकत्व आले की नवरा बायको विचारी होऊन जुळवून घेण्यास शिकतात. इथे समाज आणि आईअवडील यांचा अप्रत्यक्ष दबाव असल्याने लहान सहान कारणाचे घटस्फोट होत नाहीत. याउलट जेथे समाज आणि पालक यांचा दबाव स्वीकरला जात नाही तेथे लहान सहान कारणावरून विभक्त होणे सोपे असते.
एका व्यक्तीबरोबर पुर्ण आयुष्य सहज काढणे सोपे नाही हे सत्य आहे. नवरा बायको एकमेकांवर प्रेम असल्याशिवाय अॅडजस्टमेंट करत नाहीत. आणि मॅचुरिटी दाखवणे, अॅडजस्टमेंट करणे म्हणजे माघार घेणे नव्हे तर एकमेकांचा आदर करणे आहे. इथे एक प्रकारची कमिटमेंट असते.
मान्य आहे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, निर्णय घेण्याची मुभा आहे. पण लहान सहान कारणावरुन विभक्त होणे आणि दुसरा जोडीदार शोधणे किंवा आयुष्यभर लिव ईन रहाणे कितपत योग्य आहे? तुम्हाला काय वाटते?
वाचने
8004
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
You say.े >>>>>> ...पण लहान
-१
In reply to You say.े >>>>>> ...पण लहान by गवि
ठीक आहे... स्त्री की पुरुष
In reply to -१ by मन१
लहान सहान....
In reply to ठीक आहे... स्त्री की पुरुष by गवि
गवि आणि मनोबा, >>लहान सहान"
In reply to लहान सहान.... by मन१
सहमत. नाहीतर अशा गोष्टी शेवटी
In reply to You say.े >>>>>> ...पण लहान by गवि
सहमत आहे.
In reply to सहमत. नाहीतर अशा गोष्टी शेवटी by किचेन
गवि आणि मनोबा दोघांनी दिलेली
असहमत,
In reply to गवि आणि मनोबा दोघांनी दिलेली by पिंगू
सहमत
In reply to असहमत, by ज्ञानोबाचे पैजार
लग्न म्हटलं की तडजोड आलीच, पण
>>लग्न म्हटलं की तडजोड आलीच,
In reply to लग्न म्हटलं की तडजोड आलीच, पण by गणपा
शीर्षक
असं कसं म्हणता थत्ते
In reply to शीर्षक by नितिन थत्ते
एखाद्या व्यक्तीने लग्न केले
In reply to असं कसं म्हणता थत्ते by मराठमोळा
एका जोडीदाराला सोडून
In reply to एखाद्या व्यक्तीने लग्न केले by अप्पा जोगळेकर
"एकपत्नीत्व किंवा एकपतीत्व
In reply to असं कसं म्हणता थत्ते by मराठमोळा
सिरियल पॉलिगॅमी
In reply to "एकपत्नीत्व किंवा एकपतीत्व by नगरीनिरंजन
"सीरियल मोनॉगमी" अधिक प्रचलित
In reply to सिरियल पॉलिगॅमी by मन१
भारिच....
In reply to "सीरियल मोनॉगमी" अधिक प्रचलित by धनंजय
सीरियल मोनोगॅमी हे जास्त
In reply to "सीरियल मोनॉगमी" अधिक प्रचलित by धनंजय
ननि, प्रतिसाद आवडला.. >>मुळात
In reply to "एकपत्नीत्व किंवा एकपतीत्व by नगरीनिरंजन
लग्नसंस्थेचे मूळ कारण
In reply to ननि, प्रतिसाद आवडला.. >>मुळात by मराठमोळा
विचार
राक्या, येव्हढा विचार करुन
म्या हाय , ती हाय ..खेळ
In reply to राक्या, येव्हढा विचार करुन by सुहास..
आँ
ओ मास्तर!
In reply to आँ by विनायक प्रभू
खेळ (पुन्हा) सुरू.. :-)
In reply to ओ मास्तर! by Nile
खेळ हा सुरुच राहणार. कलाकार
In reply to खेळ (पुन्हा) सुरू.. :-) by मोदक
अरे भुता !!!
मिथ
मोनोगॅमी !!
>>अपत्यपालन एक अत्यंत
In reply to मोनोगॅमी !! by अर्धवटराव
मग तुच आता मोनोगामी मिथ नै हे
In reply to >>अपत्यपालन एक अत्यंत by मराठमोळा
काही वर्ष.
In reply to मग तुच आता मोनोगामी मिथ नै हे by शिल्पा ब
शिल्पातै, मोनोगॅमस रहायचं की
In reply to मग तुच आता मोनोगामी मिथ नै हे by शिल्पा ब
नवा ट्रँड !!
In reply to >>अपत्यपालन एक अत्यंत by मराठमोळा