मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कट्ट्यावरी

लीलाधर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
चला जाऊ कट्ट्यावरी कट्ट्यावरी कट्ट्यावरी री, रविवार कट्टेवार, मिळून आपण जाऊ सारं, कट्ट्याचं वाहू लागलं वारं, विचार नका करू फार, चला जाऊ कट्ट्यावरी कट्ट्यावरी कट्ट्यावरी री, खायची प्यायची असते चंगळ चंगळ, नका करू टंगळ मंगळ, मिळून सारे करू टिंगल टिंगल, कट्ट्याचे वातावरण करू मंगल मंगल, चला जाऊ कट्ट्यावरी कट्ट्यावरी कट्ट्यावरी री, आयोजक ते ५० फक्त, मिळून सारे होऊ टेन्शन मुक्त, सारे आपण मिपा भक्त कट्टेवार तो सार्थ करू फक्त, चला जाऊ कट्ट्यावरी कट्ट्यावरी कट्ट्यावरी री !!!!

वाचने 7661 वाचनखूण प्रतिक्रिया 37

In reply to by स्पा

@चाचांना तुम्हीच जिलब्या दिल्या म्हटल्यावर आम्ही फक्त ह्यपि बड्डे करू फार फार तर>>> अस्स काय...? तु गाव त मला १दिवस...! सारख्या पळवाटा काढ हं...! चांगलं आहे,,चान चान...! अवांतर-तुला अमच्याकडे खेचण्यासाठी मला अमच्या भुताटकी मार्गांचा अवलंब करावा लागणारसे देसते. (तंत्र विद्या जागृत) :ghost: अत्रुप्त आत्मा :evil:

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस 05/01/2012 - 12:16
चचा करील जिलेब्या फस्त पाडुनी चान चान कविता मस्त, त्या वाचुनी आत्मा होईल संत्रस्त, मग राक्षसी स्माईलीच येतील फक्त.

In reply to by प्रचेतस

@-चचा करील जिलेब्या फस्त पाडुनी चान चान कविता मस्त, त्या वाचुनी आत्मा होईल संत्रस्त, मग राक्षसी स्माईलीच येतील फक्त.... :-D >>>आपण अश्या जिलब्या टाकाल अशी कल्पनाच नव्हती ;-)

सूड 05/01/2012 - 10:53
उगा मेवेंची ही कविता आठवली. मेवे, केसुगुर्जी, मिपावरचे आणखीही विडंबनमहर्षी ऽऽऽऽ कुठे गेले... !! कोणीच दिसत नाहीये, तोवर चचा आमचं हे विडंबन रेफरन्स साठी वापरु शकतात.

In reply to by फिझा

लीलाधर 05/01/2012 - 12:36
मग होउन जाऊ दे तुमच्याकडून एखादी अशीच कविता. आणि हो मला गाण्याला प्रसिध्दी द्यायची नाही बरं मला तर कट्ट्याला प्रसिध्दी द्यायची आहे बरं फिझा तै :)

In reply to by मोदक

लीलाधर 18/06/2012 - 09:38
तुझी उणीव आजीबात भासली नाली ... नाली नाही रे नाही म्हणायचय का तुला :) आणि हो पण कट्ट्यावरीची तरी दखल घेतल्याबद्द्ल अत्यंत आभारी आहे रे मोदका :-D

In reply to by लीलाधर

मोदक 18/06/2012 - 10:14
कट्ट्यावरी या महान कलाकृतीची आत्तापर्यंत दखल न घेतल्याचे दु:ख होत आहे. प्रेरणेचे स्त्रोत, मूळ गाणे हे "गाणे" या प्रकारचे विडंबन असताना विडंबनाचे विडंबन करून तुझ्यात लपलेला एक असामान्य विडंबक दोन क्षणांसाठी बाहेर पडून वाकूल्या दाखवतो आहे असे वाटले.... पुढील कवीतेस शु भे च्छा. :-)

In reply to by सूड

सतिश गावडे 05/12/2014 - 23:40
माझी आजची संध्याकाळ कट्टामय झाली होती. व्यनि आणि फोनाफोनी चालू झाली तेव्हा माझे लाडके कवी लिलाधर यांची ही सुंदर कविता न आठवावी तर नवलंच.