१ जानेवारी... चलो पेरणेफाटा...
ऐतिहासिक पेरणेफाटा...
पेरणे गावापासून दोन किमीदूरवर नव्याने हायवेला झालेली नागरवस्ती म्हणजे पेरणेफाटा होय. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याची हद्द इथे समाप्त होते. भीमा नदीवरील पूल ओलांडला की शिरूर तालुका लागतो. नव्याने वसलेल्या गावास इतिहास असू शकतो का? पण होय. पेरणेफाट्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. मुळात दीड-दोन शतकांपूर्वी हा प्रदेश भीमा-कोरेगाव असा संबोधला जायचा आणि भीमा कोरेगाव हे इतिहासात लिहिले गेले ते शेवटच्या आंग्ल-मराठा लढाईमुळे...
सन १७७९ मध्ये पुण्याकडे कूच करतांना वडगाव येथे अंग्लांनी मराठ्यांना आव्हान देत लढाई छेडली खरी परंतु जवळपास पन्नास हजारांच्या संख्येने लढाईसाठी गर्जत येणाऱ्या मराठी सैन्यापुढे फक्त अडीच हजार अंग्लांचा पळभरही टिकाव लागला नाही. गनिमीकाव्याने ते हैराण झाले होते. त्यांची चाल पुण्याकडे होत असली तरी मुंबईकडून येणारी रसद तोडण्यात मराठे यशस्वी होत होते. अखेर त्यांना चारही बाजूंनी घेरून कोंडीत पकडल्यावर तहाची बोलणी करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. मराठ्यांविरुद्धच्या या लढाईत सपाटून मार खावा लागल्याने ईस्ट इंडिया कंपनीचे धाबे दणाणले. पुरंदरच्या तहात कमावलेलं सर्व काही मराठ्यांना परत करावं लागलं होतं. १७७३ पासून जिंकलेले प्रांत गमवावे लागले. शिवाय वीस वर्षे युद्धबंदीची अट पाळावी लागणार होती. वडगावच्या या तहानंतर काही काळ आंग्ल अधिकारी काहीएक हालचाल न करता गप्प होते. मनात धुमसत असलेला लाव्हा ते सहन करीत होते. पुणे प्रांतात कंपनीचा शिरकाव झालेला असला तरी पूर्णतः अंमल प्रस्थापित होऊ शकत नव्हता. हा आपला पराभव काही त्यांच्या पचनी पडेना झाला. ते संधीच्या शोधातच होते.
काळ पुढे जात राहिला. पेशवाई मध्ये फंदफितुरी माजली. भाटगिरी सुरु झाली. त्यावेळी दुसरा बाजीराव पेशवेपदावर विराजमान होता. त्याच्या भोवती वावरणाऱ्या भाटांनी अनेक नवे कायदे कानून लागू करण्यास पेशव्यांना भाग पाडले. दलित वर्गातील लोकांच्या गळ्यात मडके बांधून त्यात थुंकणे अनिवार्य केले गेले. महार, मांग, रामोशी इ. अस्पृश्य गटातील लोकांनी रस्त्याने जातांना आपल्या पार्श्वभागी एका खराटा बांधून रस्ता आपोआप झाडीत जावे अशी जाचक अट पाळावयास भाग पाडले गेले. हे चाणाक्ष ब्रिटिशांनी हेरले आणि पददलितांना आश्रय देऊन आपल्या सैन्यात सामावून घेतले. खरे तर हे लोक अतिशय शूरवीर होते. जीवाला जीव देणारे होते. त्यांच्यात कमालीची स्वामिनिष्ठ्ता असायची. शिवरायांनी आपल्या आरमारांत तसेच घोडदळ, पायदळात यांना मोलाचे स्थान दिले होते.
नोव्हेंबर १८१७ मध्ये पेशव्यांच्या फौजेने पुण्यातील ईस्ट इंडिया कंपनीची कचेरी उध्वस्त केली. जशास तसे उत्तर देण्यासाठी ब्रिटीशांच्या शिबंदीला कोणतीच संधी मिळाली नाही. तेव्हा पुण्यातील ब्रिटीश ऑफिसरने मुंबईच्या मुख्यालयाला साकडे घातले. मुंबईच्या दुसऱ्या बटालियनच्या पहिल्या रेजिमेंट मधील बॉम्बे नेटिव्ह लाईट इन्फन्ट्रीची तुकडी मदतीसाठी पाठवून देण्यात आली. या रेजिमेंटमध्ये जवळजवळ निम्मे-अधिक सैन्य जातीने महार होते, काही मुस्लीम होते तर काही रामोशी!
पूर्वोत्तर पुण्याच्या शिरूर परगण्यात या रेजिमेंटचा तळ पडला. कॅप्टन फ्रान्सिस स्टाऊँटनच्या नेतृत्वाखाली ५०० पायदळ, २५० घोडदळ अन् २४ तोफा इतकाच लवाजमा घेऊन पुर्वोत्तरेकडून हल्ला करण्याचे निश्चित झाले होते. त्यांना थोपविण्यासाठी दुसरा बाजीराव पेशवा तब्बल २०००० घोडदळ आणि ८००० पायदळानिशी निघाला. तिकडून शिरूरवरून चालत येणाऱ्या ब्रिटीश सैन्याची गाठ मराठी फौजेशी जेथे पडली तोच हा पेरणेफाटा. त्याकाळी त्याला कोरेगाव भीमा असे संबोधले जायचे.
भीमेच्या तीरावर दोन्ही सैन्य एकमेकांना भिडले. न थकता ब्रिटीश सैन्याने जोरदार प्रतिकार सुरूच ठेवला. महार रेजिमेंट जीव तोडून लढत होती. इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या मराठी सैन्यापुढे आपल्या रेजिमेंटचा निभाव लागणार नाही हे ओळखून मुंबई मुख्यालयाने पुन्हा एकदा तह करावा लागेल या शंकेने जिंकण्याची आशाच सोडली होती. काहीच न खाता पिता सलग बारा तास हातघाईची लढाई चालली. ब्रिटिशांच्या योजनाबद्ध तोफमाऱ्यामुळे मराठा सैन्य जेरीस येऊ लागले. त्यांना धड खाता-पिता येईना की लढण्याची उमेद मिळेना. त्यांची पीछेहाट सुरु झाली. तसतसे ब्रिटीश सैन्य आणखी वेगाने मारा करू लागले. अखेरीस संध्याकाळी मराठी सैन्याने माघार घेतली. आपली कुवत अधिक असूनही ब्रिटिशांना हा विजय बहाल केला. या महत्वपूर्ण विजयामुळे पेशवे आपले साम्राज्य घालवून बसले. पेशवाई संपुष्टात आली. ब्रिटीशांचा झेंडा पुणे प्रांती फडकला.
या शेवटच्या आंग्ल-मराठा युद्धात ब्रिटिशांची सरशी झाली. महार रेजिमेंट मधील २२ सैनिक कामी आले. त्यांच्या स्मरणार्थ १८२१ मध्ये ब्रिटिशांनी एक रणस्तंभ येथे भिमेकाठी उभारला. स्वतः बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी १ जानेवारी रोजी न चुकता येत असत व शूरवीरांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पित असत. कारण बाबासाहेबांचे वडील, चुलते इतर नातेवाईक देखील महार रेजिमेंटमध्ये ब्रिटिशांची चाकरी करीत होते. त्यांनीच या स्थळाला शौर्यभूमी असे नामाभिधान केले होते आणि आजतागायत पेरणेफाटा येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी देशभरांतून कितीतरी दलित बांधव येथे एकत्र येत असतात. शूरवीरांना अभिवादन करीत असतात. लष्करातर्फे पुष्पचक्र अर्पण केले जाते. एक प्रकारचा सद्भावनेने ओथंबलेला माहोल येथे पहावयास, अनुभवास मिळतो. दलित पुरस्कृत विविध पक्षांची नेते मंडळी व पुढारी येथे हजेरी लावून आपले शक्तीप्रदर्शनही करू पाहतात. इतकी गर्दी व दाटीवाटी होत असते की चार-पाच तास हायवेची ट्राफिक जॅम होत असते. चोख पोलीस बंदोबस्त असतो. त्यामुळे अनुचित प्रकार सहसा घडत नाहीत. रस्त्याच्या दुतर्फा छोटे व्यावसायिक खेळणी, पुस्तके, गोंदणकाम, रसवंतीगृहे, खाद्यपदार्थ विकतांना आढळतात. दीड-दोन किमीपरिसरात येणारी वाहने पार्किंगसाठी लावलेली असतात. तेथूनच घोषणा देत विविध संघटनांचे कार्यकर्ते विजयस्तंभाकडे चालत येतात. एक प्रकारचा भीमपराक्रम करून धारातिर्थी पडलेल्या सैनिकांप्रति भावांजली अर्पिण्यास भीमसैनिकांचा महासागर येथे लोटतो. यावेळी एक वेगळीच विरश्री अंगात भिनत चालल्याचा प्रत्यय येत जातो...
वाचने
13803
वाचनखूण
प्रतिक्रिया
66
हं....!
ह्म्म्म
In reply to ह्म्म्म by परिकथेतील राजकुमार
संपादक काय भुमीका घेतात
डॉ. दिवटेंचा नेहमीच्या
त्याच ब्राह्मणसमाजातुन आगरकर,कर्वे,रानडेह्यासारखे थोर सुधारक आले
जातायेता बर्याच वेळेला हा
तुम्ही वादवाले डॉक्टर म्हणुन
In reply to तुम्ही वादवाले डॉक्टर म्हणुन by शिल्पा ब
गर्व शब्दाचा अर्थ मराठीतला कि
जे लढाई लढले त्यांना काय मिळाले?
बाबो,१९७३!
नविन माहिती, १ तारखेला तरी
नवाबी शौकवाले लोक अजून इथे
दृष्टिकोन
सहमत.
वेगला विषय...
वाद
नवीन माहिती.
महार रेजिमेंट मधल्या
In reply to महार रेजिमेंट मधल्या by मनीषा
त्या काळात
In reply to त्या काळात by पैसा
ब्रिटिश परकीय, वगैरे भावना
In reply to ब्रिटिश परकीय, वगैरे भावना by मनीषा
इंग्रज स्वकीय नाहीत हे न
In reply to इंग्रज स्वकीय नाहीत हे न by llपुण्याचे पेशवेll
+१
In reply to महार रेजिमेंट मधल्या by मनीषा
नाही हो...
In reply to नाही हो... by मन१
थोडा ईतीहासाचा अभ्यास करायला पाहीजे.
In reply to थोडा ईतीहासाचा अभ्यास करायला पाहीजे. by चिंतामणी
असेच म्हणतो
In reply to असेच म्हणतो by पुण्याचे वटवाघूळ
+१
In reply to थोडा ईतीहासाचा अभ्यास करायला पाहीजे. by चिंतामणी
चिंतामणराव, कुठे गेलात हो? मी
In reply to चिंतामणराव, कुठे गेलात हो? मी by पुण्याचे वटवाघूळ
जातोय कुठे. आहे इथेच.
In reply to महार रेजिमेंट मधल्या by मनीषा
अमान्य-मान्य
In reply to अमान्य-मान्य by पुण्याचे वटवाघूळ
अमान्य
In reply to अमान्य by मैत्र
मान्य
माहितीपूर्ण लेखाबद्दल आभारी.
In reply to माहितीपूर्ण लेखाबद्दल आभारी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
<तुम्हाला काय वाटतं हो
विनोद१८
काहीच्या काही .
हे वाचा
In reply to हे वाचा by अँग्री बर्ड
उत्तम माहिती.
In reply to हे वाचा by अँग्री बर्ड
माहीती प्रचंड आवडली. प्रत्येक
In reply to माहीती प्रचंड आवडली. प्रत्येक by शिल्पा ब
जबरदस्त माहिती, इथं डकवलीत ते
In reply to हे वाचा by अँग्री बर्ड
उत्तम माहिती
In reply to हे वाचा by अँग्री बर्ड
उत्तम माहिती.
In reply to हे वाचा by अँग्री बर्ड
बरीच माहिती कळली.
In reply to हे वाचा by अँग्री बर्ड
रोहित भिडे'जी......
In reply to रोहित भिडे'जी...... by मृगनयनी
नेताजी पालकर
In reply to नेताजी पालकर by पैसा
नेताजी पालकर प्रचंड पराक्रमी
In reply to नेताजी पालकर प्रचंड पराक्रमी by मृगनयनी
पटत नाही
In reply to पटत नाही by पैसा
पैसाताई, नेताजी पालकर'बाबत वर
In reply to पैसाताई, नेताजी पालकर'बाबत वर by मृगनयनी
आँ??!!!
In reply to हे वाचा by अँग्री बर्ड
काहिसा सहमत....
In reply to हे वाचा by अँग्री बर्ड
खरच विचार करायला लावणारि माहिति
In reply to हे वाचा by अँग्री बर्ड
हा हा हा. सदर प्रतिसाद वाचून
सरदेसाई म्हणतात की
दलित वर्गातील लोकांच्या
खरा कळीचा मुद्दा इथे आहे.
In reply to खरा कळीचा मुद्दा इथे आहे. by Dipankar
यू सेड इट !
+१०० टु- बाकी दरवेळी असे
वादग्रस्त लिखाण हे
पेरणेफाटा ... जवळुन कित्येकदा
In reply to पेरणेफाटा ... जवळुन कित्येकदा by गणेशा
व्वा!!
In reply to व्वा!! by किसन शिंदे
कुठले अपराध रे? गणेशा म्हणजे
In reply to पेरणेफाटा ... जवळुन कित्येकदा by गणेशा
गणेशा, चाबूक प्रतिसाद !!!!
In reply to पेरणेफाटा ... जवळुन कित्येकदा by गणेशा
+११११११११११
गणेशा, प्रतिसाद आवडला आणि
डॉ. साहेब, तुमचे लेख नेहमी
In reply to डॉ. साहेब, तुमचे लेख नेहमी by रेवती
ओ संपादिका मॅडम, तुम्ही त्या
In reply to ओ संपादिका मॅडम, तुम्ही त्या by शिल्पा ब
नाय हो शिल्पातै. आम्ही