१ जानेवारी... चलो पेरणेफाटा...
In reply to ह्म्म्म by परिकथेतील राजकुमार
In reply to तुम्ही वादवाले डॉक्टर म्हणुन by शिल्पा ब
महार रेजिमेंट मधील २२ सैनिक कामी आले. त्यांच्या स्मरणार्थ १८२१ मध्ये ब्रिटिशांनी एक रणस्तंभ येथे भिमेकाठी उभारला. स्वतः बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी १ जानेवारी रोजी न चुकता येत असत व शूरवीरांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पित असत. कारण बाबासाहेबांचे वडील, चुलते इतर नातेवाईक देखील महार रेजिमेंटमध्ये ब्रिटिशांची चाकरी करीत होते. त्यांनीच या स्थळाला शौर्यभूमी असे नामाभिधान केले होते आणि आजतागायत पेरणेफाटा येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी देशभरांतून कितीतरी दलित बांधव येथे एकत्र येत असतात. शूरवीरांना अभिवादन करीत असतात. लष्करातर्फे पुष्पचक्र अर्पण केले जाते. एक प्रकारचा सद्भावनेने ओथंबलेला माहोल येथे पहावयास, अनुभवास मिळतो. दलित पुरस्कृत विविध पक्षांची नेते मंडळी व पुढारी येथे हजेरी लावून आपले शक्तीप्रदर्शनही करू पाहतात. तेथूनच घोषणा देत विविध संघटनांचे कार्यकर्ते विजयस्तंभाकडे चालत येतात. एक प्रकारचा भीमपराक्रम करून धारातिर्थी पडलेल्या सैनिकांप्रति भावांजली अर्पिण्यास भीमसैनिकांचा महासागर येथे लोटतो. यावेळी एक वेगळीच विरश्री अंगात भिनत चालल्याचा प्रत्यय येत जातो...अतिशय निरुपयोगी आणि विलासी असला तरी शेवटचा पेशवा आणि त्याचे सरदार हा इंग्रजांशी लढणारा तेव्हा एकमेव 'फोर्स' होता.. पराशी सहमत आहे. महार रेजिमेंटच्या वीरांचे दुसर्या महायुद्धातही मोठे योगदान होते आणी त्यानंतरही. त्यांच्या शौर्याबद्दल दुमत कधीच नाही. पण ज्या लढाईमुळे ब्रिटिशांचे स्थान भारतात पक्के झाले त्याचा आज जातीय दृष्टिकोनातून विजयोत्सव कराव हा कमालिचा संकुचितपणा आहे. या रेजिमेंटच्या विरोधात महादजी लढले असावेत. मग ते काय या दृष्टिने लढत होते का साम्राज्य टिकावे यासाठी ? सर्व वंशात अतिशय नालायक असला तरी दुसरा बाजीराव हा सातारच्या छत्रपतींचा पेशवाच होता ना? राज्य हे सातारहून शिक्के कट्यार मिळाल्याशिवाय करता येत नव्हते किंवा कधी त्याशिवाय मानलेच नव्हते. मग हा महार रेजिमेंटचा विजय हा मराठेशाहीचा इंग्रजांविरुद्धचा पराभव म्हणून स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी पण साजरा करणं किती सयुक्तिक आहे. आदरणीय बाबासाहेब हे या दृष्टीने वागण्यासारखे अजिबात नसावेत. ते अतिशय विद्वान आणि इतिहास जाणणारे होते.. ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा नीती इतकी उत्तम रीत्या वापरली की आज दोनशे वर्षांनंतरही आपल्याला जलियनवाला करणार्या ब्रिटिशांचा विजय हा जातीय दृष्टिने जास्त महत्त्वाचा वाटतो .. खरं तर अतिशय दु:खद गोष्ट आहे की हा विचार अजून रु़जून आहे आणि त्याला अजून खतपाणी घालण्याचा सुशिक्षित जनतेकडूनही प्रयत्न होतो आहे..
In reply to महार रेजिमेंट मधल्या by मनीषा
In reply to त्या काळात by पैसा
In reply to ब्रिटिश परकीय, वगैरे भावना by मनीषा
In reply to इंग्रज स्वकीय नाहीत हे न by llपुण्याचे पेशवेll
In reply to महार रेजिमेंट मधल्या by मनीषा
In reply to नाही हो... by मन१
In reply to थोडा ईतीहासाचा अभ्यास करायला पाहीजे. by चिंतामणी
थोडा ईतीहासाचा अभ्यास करायला पाहीजे.असेच म्हणतो.
या प्रथांविरूध्द आवाज उठवणारे स्वकीयच होते.पण मग तो आवाज त्यांनी इंग्रज आल्यानंतरच का उठवला? दुसरे म्हणजे असा आवाज उठवलेल्यांनी (राजा राममोहन राय आणि महात्मा फुले) इंग्रज राज्याचे गोडवेच गायले होते त्याचे काय? (रात्रीच्या वेळी झाडावर उलटे लटकणारे) पुण्याचे वटवाघूळ
In reply to असेच म्हणतो by पुण्याचे वटवाघूळ
In reply to थोडा ईतीहासाचा अभ्यास करायला पाहीजे. by चिंतामणी
In reply to चिंतामणराव, कुठे गेलात हो? मी by पुण्याचे वटवाघूळ
In reply to महार रेजिमेंट मधल्या by मनीषा
पण शत्रुला मदत करून , स्वकीयांच्या विरूद्ध शस्त्रे हाती घेणे --- याला काय म्हणावे?अमान्य. २०११-१२ मधले संदर्भ वापरून त्या काळातील परिस्थितीविषयी आपल्याला असेच वाटणार. ज्यांनी इंग्रजांना मदत केली त्यांना आपलेच लोक "स्वकीय" का वाटावेत? त्यांना इतरांनी अमुक एका जातीत जन्माला आल्यामुळे नीच दर्जाची वागणूक द्यायची आणि तरीही त्यांनी इतरांना "स्वकीय" मानावे ही अपेक्षा का?
काही कारणांनी, त्या काळात, त्या परिस्थीत लोकांनी ते केले असेल .. तर त्याचे उदात्तीकरण चालले आहे त्याचे वाईट वाटले.मान्य . पण यातून सगळ्यांनी एक धडाही घ्यायला हवा की आपल्याच समाजातील काही समाजघटकांना जन्म/जात किंवा अशा कोणत्याही कारणावरून दुय्यम वागणूक देणे म्हणजे शत्रूला घरात यायचे आमंत्रण देण्यासारखे आहे. (रात्रीच्या वेळी झाडावर उलटे लटकणारे) पुण्याचे वटवाघूळ
In reply to अमान्य-मान्य by पुण्याचे वटवाघूळ
In reply to अमान्य by मैत्र
काही कारणांनी, त्या काळात, त्या परिस्थीत लोकांनी ते केले असेल .. तर त्याचे उदात्तीकरण चालले आहे त्याचे वाईट वाटले.
मान्यसध्याच्या काळात जुन्या काळातील कारणांमुळे वैर वाढू नये म्हणून असे उदात्तीकरण करणे वाईट असेच माझेही मत आहे. त्याचबरोबर आपण सर्वांनीच एक धडा घ्यायला हवा तो पण वरच्याच प्रतिसादात लिहिला आहे. धन्यवाद. (रात्रीच्या वेळी झाडावर उलटे लटकणारे) पुण्याचे वटवाघूळ
In reply to माहितीपूर्ण लेखाबद्दल आभारी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to हे वाचा by अँग्री बर्ड
In reply to हे वाचा by अँग्री बर्ड
In reply to माहीती प्रचंड आवडली. प्रत्येक by शिल्पा ब
In reply to हे वाचा by अँग्री बर्ड
In reply to हे वाचा by अँग्री बर्ड
In reply to हे वाचा by अँग्री बर्ड
In reply to हे वाचा by अँग्री बर्ड
In reply to रोहित भिडे'जी...... by मृगनयनी
In reply to नेताजी पालकर by पैसा
नेताजी पालकर प्रचंड पराक्रमी सेनापती होते आणि नात्याने शिवरायांशी बांधले गेलेले होते. त्यानी आदिलशाहीला जाऊन मिळणे हा शिवरायांनी एका जाणीवपूर्वक घेतलेल्या निर्णयाचा भाग होता. त्यानी आदिलशाही फौज वापरून मुघलांवर हल्ले केले, तर महाराजानी मिर्झाराजाना आदिलशहाविरुद्ध मदत दिली, अशा तर्हेने दोन्ही बादशाह्याना खिळखिळ्या करण्याचे एक योजनाबद्ध काम महाराजानी केले होते.नेताजी पालकर पराक्रमी होते, याबद्दल दुमत नाही. तसेच ते जरी "प्रतिशिवाजी" म्हणून ओळखले जायचे आणि नात्याने शिवाजींचे व्याही होते, तरी ""त्यानी आदिलशाहीला जाऊन मिळणे हा शिवरायांनी एका जाणीवपूर्वक घेतलेल्या निर्णयाचा भाग होता. "" ही गोष्ट बिलकूल पटण्यासारखी नाही. कारण पन्हाळा गडावरील स्वारी करण्याबद्दल त्यान्नी शिवाजीराजेन्चा आदेश पाळला नाही. पन्हाळगडावर स्वारी करण्याचे ठरले होते १६ जानेवारी रोजी. आणि पाल्कर मुद्दाम १७ जनेवारी रोजी आले. त्यामुळे शिवरायान्ना लढाईत हार पत्करावी लागली होती. त्यावेळी महाराजांनी "समयांस कामास न आल्यामुळे" नेताजी पालकरान्ची मराठा सैन्यातून हकालपट्टी केली. व त्यामुळे चिडलेल्या नेताजी पालकरानी महाराजान्ची माफी मागण्याऐवजी आदिलशहास मिळणे पसन्त केले. त्यानन्तर तिथे काही वाद झाल्यामुळे मिर्झाराजेन्च्या सान्गण्यावरून , आदिलशाही सोडून नेताजी "मुघला"ना जाऊन मिळाले. मुघलान्शी ते जरी त्यावेळी एकनिष्ठ होते, तरी आग्र्याहून शिवाजी महाराज सुटल्यानन्तर प्रतिशिवाजी- नेताजी पालकर सुटू नये, म्हणून औरन्गजेबाने नेताजीच्या अटकेचे आदेश सोडले, तेव्हा नेताजी पालकर बीडनजीकच्या 'धारुर' या गावी होते. तेव्हा मिर्झाराजेन्च्याच्च सान्गण्यावरून ऑक्टोबर १६६६ मध्ये नेताजी धर्मान्तरास तयार झाले. व "महम्मद कुलीखान" असे नाव घेऊन अफगणिस्तानात औरन्गजेबाची चाकरी करत राहिले. इकडे शिवाजीराजेन्बरोबर सतत अपयशी ठरत असल्यामुळे औरन्गजेबाने नेताजी पालकर उर्फ महम्मद कुलीखान'ला पुन्हा दिल्लीला आणले. तब्बल १० वर्षे महम्मद कुलीखान उर्फ नेताजी पालकर औरन्गजेबाची चाकरी करत राहिले. पण पुन्हा भारतात्/दिल्लीला आल्यावर १६७६ साली त्यान्ना महाराष्ट्रात शिवाजीराजेन्शी लढाई करण्यास पाठविले गेले. कारण औरन्गजेबाचा पूर्ण विश्वास होता... की "महम्मद कुलीखान" हा आता पूर्णपणे मुघल झालेला आहे. पण यावेळी महाराजान्बरोबर गद्दारी केल्याबाबत पश्चाताप पावलेल्या नेताजी पालकरान्नी औरन्गजेबाचाही विश्वासघात केला. आणि मे १९७६ मध्ये मुघलछावणीतून पलायन करून रायगडावर महाराजांना भेटायला आले. व जून १६७६ मध्ये रायगडावरच महाराजांनी ब्राह्मणांकरवी महम्मद कुलीखान'ला पुन्हा "नेताजी पालकर" बनवले. अर्थात पुन्हा हिन्दु धर्मात सामावून घेतले. अर्थात नेताजी पहिल्यान्दा जेव्हा "बाटले" होते, आणि नन्तर पुन्हा महाराजान्ची माफी मागायला आले तेव्हा महाराजान्नी त्यान्ना तेव्हाही माफ करून स्वतःची मुलगी त्यान्च्या मुलाला- जानोजीरावास देऊन त्यान्ना स्वतःचे व्याही करवून घेतले...यामागे महाराजान्चा दुसरा उद्देश असाही होता.. की नेताजीसारखा मुत्सद्दी माणूस पुन्हा "बाटला" जाऊ नये.. पण शेवटी व्हायचे तेच्च झाले. नेताजी- महम्मद कुलीखान बनून औरन्गजेबाची चाकरी करत राहिला...त्यामुळे महाराजान्च्या उमेदीच्या- लढाईच्या काळात खूप कमी वेळा "नेताजी पालकर" महाराजान्च्या कामास आले. मग १६८० साली महाराजान्च्या निधनानन्तर नेताजी सम्भाजी महाराजान्ची चाकरी करत राहिले. :)
In reply to नेताजी पालकर प्रचंड पराक्रमी by मृगनयनी
तेव्हा मिर्झाराजेन्च्याच्च सान्गण्यावरून ऑक्टोबर १६६६ मध्ये नेताजी धर्मान्तरास तयार झाले. व "महम्मद कुलीखान" असे नाव घेऊन अफगणिस्तानात औरन्गजेबाची चाकरी करत राहिले.याला काही ऐतिहासिक आधार नाही. उलट बायकामुलांच्या हालांच्या भीतीने नेताजींचं परिवारासकट धर्मांतर घडवून आणलं गेलं. ते जर स्वखुशीने असतं तर मिळालेल्या पहिल्या संधीबरोबर त्यानी महाराजाना परत येऊन शुद्धीसाठी विनवलं नसतं. महाराज गद्दाराना कधीही क्षमा करत नसत, मग तो नातेवाईक का असेना. मग नेताजीच्या बाबतीतच महराज इतके मऊ का राहिले, ही एकच गोष्ट नेताजी आणि महाराजांच्या संबंधातील शंकाना उत्तरे द्यायला पुरेशी आहे. (हे फारच अवांतर होतंय. आणखी काही चर्चा करायची असेल तर खव किंवा व्यनिमधे स्वागत आहे.)
In reply to पटत नाही by पैसा
In reply to पैसाताई, नेताजी पालकर'बाबत वर by मृगनयनी
In reply to हे वाचा by अँग्री बर्ड
In reply to हे वाचा by अँग्री बर्ड
In reply to हे वाचा by अँग्री बर्ड
दलित वर्गातील लोकांच्या गळ्यात मडके बांधून त्यात थुंकणे अनिवार्य केले गेले. महार, मांग, रामोशी इ. अस्पृश्य गटातील लोकांनी रस्त्याने जातांना आपल्या पार्श्वभागी एका खराटा बांधून रस्ता आपोआप झाडीत जावे अशी जाचक अट पाळावयास भाग पाडले गेले.खरा कळीचा मुद्दा इथे आहे. प्रजेचे/सैन्याचे मने दुखवून कोणताही राजा/पेशवा मोठया लढाया जिंकू शकत नाही. किंबहुणा मने दुखावलेले सैन्य कधीही त्या राजाच्या बाजुने त्वेषाने लढणार नाहीत. तत्कालिन परिस्थीतीत ( अभिजनांच्या लेखी शुद्र) सैन्याने इंग्रजांच्या दलात सामील होउन पेशव्यांविरुध्द लढणे काही वावगे वाटत नाही.
In reply to खरा कळीचा मुद्दा इथे आहे. by Dipankar
त्यात वावगे नक्किच नाहि, पण त्याचा(त्या घटनेचा) उपयोग दलितोद्धारा पेक्षा ब्राम्हणद्वेष पसरवण्या साठी करणे हे मात्र नक्कीच वावगे आहे.बस्स ! एका वाक्यात मनातल्या भावना उतरवल्यात. धन्यवाद. बाकी या तद्दन फालतू आणि भडकाऊ लेखानाचा एकच फायदा झाला की अत्यंत सुंदर अशी माहिती प्रतिसादातून वाचायला मिळाली. सर्वच प्रतिसादकांचे आणि विशेषतः भिडे साहेबांचे आभार. बाकी दरवेळी असे वादग्रस्त लिखाण टाकून स्वतः नामानिराळे राहून मजा बघणार्या लेखकांविरुद्ध काही एक ठोस कारवाई करण्याची गरज आता वाटू लागली आहे हे निश्चित. अर्थात मिसळपाव हे संपूर्णपणे खाजगी मालकीचे संस्थळ असल्याने काही एक निर्णय लवकर घेतला जाण्याची अपेक्षा आहे.
In reply to पेरणेफाटा ... जवळुन कित्येकदा by गणेशा
In reply to व्वा!! by किसन शिंदे
In reply to पेरणेफाटा ... जवळुन कित्येकदा by गणेशा
In reply to पेरणेफाटा ... जवळुन कित्येकदा by गणेशा
In reply to डॉ. साहेब, तुमचे लेख नेहमी by रेवती
In reply to ओ संपादिका मॅडम, तुम्ही त्या by शिल्पा ब
हं....!