मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हवेचा रंग कुठला?

गणपा · · जनातलं, मनातलं
परवा लेक घरात शिरली ती एक प्रश्न मनात घेऊनच. “आई, हवा कुठल्या रंगाची असते?” इति लेक. “अगं हवेला रंग नसतो.” तिच्या बाला सुलभ प्रश्नाच बायकोने निरसन केल. “हरलीस?” “?” “अग हवेचा रंग गुलाबी असतो.” लेकीने तारा तोडला. आताशी बायकोच्या भूवयांच धनुष्य झाल होतं. “ते गाणं नाहीये कां ‘ही गुलाबी हवाऽऽऽऽऽऽ वेड लावी जीवाऽऽऽऽऽऽ’ येव्हाना लेकीने तालही धरला होता. मग एकदम खिदळली आणि म्हणाली “अग आई, पीजे होता”. “पण आई खरंच गुलाबी हवा म्हणजे काय?” बायकोचा छोटा पॉज. “कसला विंचार करतेयस आई.” “मोठ्या माणसांना वेगळ्या शब्दांत सांगाव लागत. लहान मुलांना साध्या सोप्प्या शब्दांत समजेल अस सांगाव लागत. म्हणून वेळ घेतेय.” “ओक्के. मी वाट पहातेय.” “प्रेम म्हटल की त्याचा रंग गुलाबी असतो असं म्हणतात. या गाण्यात कवि प्रेमात पडला आहे, आणि म्हणून तो हवेला गुलाबी म्हणतोय. कळलं कां?“ बायको जमेल तितक सोप्प करण्याचा प्रयत्न केला. “हो” लेकीचा एक-दोन सेकंदाचा छोटा पॉज “आता हेच तु मोठ्या माणसांना कस समजावशील?”

वाचने 11922 वाचनखूण प्रतिक्रिया 25

किचेन Sun, 01/01/2012 - 23:06
तुमच्या बायकोचा चेहरा समोर दिसतोय. ;) (परा काकांचा (माफी.. सन्माननीय पराशेठ चा ) तो लोटपोट हसणारा स्मायली इथे उधार घेउन इथे टाकलाय अस समजा.) आजकाल घराघरात हेच चालत. एक नाही अनेक प्रश्न आहेत.आमचा शेजारचा पिंट्या अन त्याचा भाऊ असेच भयंकर प्रश्न घेऊन येतात.तेव्हा मी खूप बिझी आहे अस दाखवते. आवरलेल घर पुन्हा आवरते.

In reply to by पैसा

सरळ गीतेतला एखादा श्लोक म्हणून दाखवायचा. त्याचा अर्थ ती विचारणार नाही, कारण त्याचा अर्थ म्हणजे "ही गुलाबी हवा..." असे तिला वाटणार. तसेही गीतेतल्या बऱ्याच श्लोकांचे अर्थ कसेही लावता येतात. कशी आहे आयडिया ??

धन्या Mon, 01/02/2012 - 06:15
मस्त किस्सा !!! तुमच्या कन्येचा “आता हेच तु मोठ्या माणसांना कस समजावशील?” हा प्रश्न ऐकल्यावर वहिनींनी कपाळावर हात मारुन घेतला असेल. :)

सुमो Mon, 01/02/2012 - 11:57
एकवेळ मनीष तिवारींशी वादविवादात जिंकता येईल.. पण मुलांच्या प्रश्नांना उत्तरे देणे महाकर्मकठीण !!!

निश Mon, 01/02/2012 - 12:58
आजकाल मुल आईवडिलाना काय काय विचारतिल ह्याचा नेम नसतो. लेख तुमच्या पाककॄतिंसारखा मस्त व खुशखुशित झाला आहे. मस्त

इरसाल Mon, 01/02/2012 - 15:14
म्हणजे मी एकटाच नाहीये तर !!!!! सध्या मीही ह्याच फेज मधून जातोय. मी सध्या टीवी मध्ये असणाऱ्या प्रत्येक कार्टून चे आई, वडी,भाऊ-बहिण किंवा मित्र-मैत्रीण कोण? कुठे चालले? का चालले? कधी परत येतील, मग जेवणार कधी आणि जेवतील तर काय खातील, वगैरे अश्या प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधात असतो. असंच:- खिडकीच्या बाजूने खारुताई जर चूक चूक करून गेली तर माझी लेक म्हणते "वो मुझे बुला रही गोलूबाई गोलूबाई आ जाओ खेलने" (हे बाई प्रकरण कामवाली बाई वरून शिकली बहुतेक.......बाकी काय नाय हा !!!!) आता समजतंय कि गणितातली प्रमेये, रसायन शास्त्रातली सूत्रे आणि रासायनिक प्रक्रिया, जीव शास्त्रातल्या आकृत्या किती सोपे काम होते.

In reply to by इरसाल

५० फक्त Mon, 01/02/2012 - 23:13
इरसाल, आपण सगळे एका नावेतले एकत्र येउन याबद्दल लिहित जावु, कधी कुठं अन काय विचारतील अन बोलतील ही पोरं याचा नक्की अंदाज आला ना तर शपथ्थ, परवा एका लग्नाला गेलो होतो, नवरा नवरीला स्टेजवर भेटलो, पाकिट दिलं, त्या नव-यानं ते पाकिट मागं बसलेल्या पोरीकडं दिलं, माझा पोरगा तिला जाउन सांगतोय,' वन हंड्रेड रुपिज आहे त्यात, नीट ठेव पर्समध्ये. '

In reply to by ५० फक्त

दादा कोंडके Mon, 01/02/2012 - 23:21
खत्रा प्रसंग आहे हो ५०राव! :) कुठंसा वाचलेला विनोद आठवला. म्हैला मंडळाच्या मीटींग मध्ये एक बाई म्हणाली, "हल्ली लहान मुलांचं खोटं बोलण म्हणजे एक समस्याचा होउन बसलीये". त्यावर दुसरी एक अनुभवी बै म्हणाली, "त्याही पेक्षा गंभीर समस्या म्हणजे ती भलत्या वेळेला खरं बोलतात!" :D

रेवती Tue, 01/03/2012 - 00:10
हा हा हा. अडचणीत टाकणारा प्रश्न.;) भारतात असताना सुदैवाने मुलाला दोन, तीन खेळगडी मिळाले होते आणि रोज क्रिकेट खेळत असत. बराच वेळ मानस नावाच्या मुलाला हाका मारूनही तो आला नाही म्हणून मी मुलाला नंतर विचारले की मानस का आला नाही रे? त्यावर तो म्हणाला की नक्की माहीत नाही पण दुसर्‍या मुलाने सांगितले की मानसला डिस्टर्ब करू नका तो सध्या प्रेमात पडलाय.