तुला जमावे मला जमावे
त्रास जीवाचे सोडून देणे
डोळ्यामधल्या पाण्यालाही
जमून जावे वाहून जाणे
दोन मनांच्या मधले अंतर
आहे केवळ टोचत राहणे
कसे कळावे खुळ्या मनाला
निवडुंगाचे बहरून येणे
भास जगाचे खासच फसवे
त्यात जडावे दुर्धर रुसवे..
ओठांवरचे शब्द गरिबडे
श्वासागणती खडतर होणे
आठवणींचे गुलाब हळवे
नको उशाशी काटे जपणे
निर्माल्याचे प्राक्तन घेउनी
जन्मा यावे आपले जगणे
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2002
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
आठवणींचे गुलाब हळवे नको उशाशी
तुमच्या सगळ्या कविता मला
सुंदर!
सुंदर आहे कविता !!! आठवणींचे
ही कविता बरी वाटली..
छान्,सुंदर्,अप्रतिम्,खास.....
आभार
आवडली
वा... सुंदर कविता.
छान आहे