मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उनाड दिवस .... मेणवली घाट.

प्यारे१ · · कलादालन
वल्लीनं आमच्या अनुपस्थितीत आमच्या खोर्‍यात चढाई करुन सारा मुलूख काबीज केला म्हटल्यावर आम्हालाही स्फुरण आलं. पूर्वीच कधीतरी काढलेली ही प्रकाशचित्रं आम्हाला खुणावू लागली आणि आम्ही ठरवलं की काही अस्पर्श भूभाग लोकांसमोर आणावा. बघा आवडला तर.... १. मेणवली घाट. पायर्‍या आणि झाड (स्वदेस ) २. मेणवली घाट. मंदिर (शिंगम/चिंगम) ३. मेणवली घाट. ४. डु. ५. हेच ते सिंघम मधले मंदिर . ६. कृष्णा नदी. ७. घाट थोडा शेवाळलाय. temple ८. घंटा (स्वदेस मधलं चरणपूर वालं मंदिर) ९. शिवमंदिर (सिंघम) १०. राजपाल यादव च्या लेडिज टेलरचं शूटिंग पण इथेच झालेलं. (लक्ष्याच्या तीळ वाल्या बाईच्या शोधा च्या फालतू पिक्क्चरचा फालतू रिमेक) :( ११. विष्णूमंदिर.

वाचने 10739 वाचनखूण प्रतिक्रिया 35

In reply to by छोटा डॉन

प्यारे१ Wed, 12/28/2011 - 09:16
@छोटा डॉन. धन्यवाद चरणपूर मंदिराच्या ऐवजी आधीचाच फोटो आला आहे तो बहुधा लिंक मध्ये मिळू शकेल . शेवाळलेला घाट हा फोटो दिसत नाहीये. @ ऑल, ह्या मंदिरांचा इतिहास मला खरंच ठाऊक नाही. नाना फडणवीसांचं मूळ गाव हेच आहे आणि त्यांच्या काळात ही मंदिरं उभारली गेली असावीत. नानांचा वाडा जवळच आहे . पण तिथं भव्य दिव्य अथवा पेशवे कालीन विशेष काही मला तरी आढळले नाही. वल्ली अथवा आणखी कोणी इतिहासकार जर बरोबर येईल तर त्याला हे डिटेल्स कळू शकतील. हल्ली इथं चित्रपटाची/ जाहिरातींची चालणारी शूटींग्ज फारच जोरात असतात. म्हणून तो उल्लेख केला इतकंच. जे जे चांगलं दिसतं/ दिसलं ते ते टिपावं एवढीच इच्छा मनी बाळगून हे फटु काढले आहेत. बस्स. उगाच चुकीची माहिती न दिली जावी . माहिती करुन घेण्याची इच्छा एकाचवेळी आहे नी नाही देखील. कालौघात सगळंच बदलतं. इतिहासाला कवटाळून बसण्यापेक्षा त्यातून काही शिकून नवीन काही घडवता आलं पाहिजे. हे आपलं व्यक्तीगत मत. घर या परिसरात असल्यानं थोडंसं 'घर की मुर्गी दाल बराबर' झालंय हे मात्र तितकंच खरं.

निवांत पोपट Tue, 12/27/2011 - 19:30
जिस देशमे गंगा रहता है मध्ये गोविंदा ज्या पारावर बसलेला दाखवलाय तो पार १० नंबरच्या फोटो मध्ये दिसतो.शिवाय खालील गाण्याचे शूटिंग पण मेणवली येथे झालेय.

प्रचेतस Tue, 12/27/2011 - 19:44
दिसले रे. फटू शेवटी दिसले. लैच भारी आहेत. ही मंदिरे सगळी नाना फडणवीसांनी बांधलेली आहेत का? नानांच्या मेणवलीतल्या वाड्याचे फोटो पण अपलोड कर. (अन्याशी सहमत. शिवाय तो घंटा-स्वदेस मधलं चरणपूर वालं मंदिराचा फटू गायबलेला दिसतोय.)

मी-सौरभ Wed, 12/28/2011 - 00:17
ईथे एवढे पिक्चर बनलेत प्रत्येक फोतोतली जागा बघितल्यासारखी वाट्ते प्रकाश झा च तर हे आवडतं मिनी बिहार आहे. गंगाजल, अपहरण ईथेच बनवलेत त्याने.

पाषाणभेद Wed, 12/28/2011 - 00:58
चित्रपटांच्या उल्लेखांनी ह्या रमणीय परिसराची ओळख करून देणे योग्य नाही. आपल्या पुर्वजांनी केलेले अतूलनिय कर्तूत्वाची साक्ष या पुरातन वास्तू देत आहेत. त्याबद्दल आधी चार शब्द लिहून मग एखाद्या ओळीत चित्रपटांचा उल्लेख आला असता तर चांगले झाले असते असे वाटते. फोटो बाकी फारच सुरेख आले आहेत. विष्णूमंदिरे फारशी आढळत नाहीत. येथील विष्णूमंदिरदेखील असल्याच मोजक्या मंदिरांपैकी असावे.

In reply to by गवि

प्यारे१ Wed, 12/28/2011 - 10:05
पुणे महाबळेश्वर राज्य महामार्गावर वाई नावाचे एक तालुक्याचे शहर आहे. वाईपासून २.५-३ किमी वर थोडे आत हे सुंदर ठिकाण आहे. कधी येताय? ;)

In reply to by गवि

प्यारे१ Wed, 12/28/2011 - 10:19
तसंच पुढं धोम धरणाकडं जा. धरण देखील मस्त आहे. धोम गावात नृसिंह मंदिर आहे. तेही अतिशय सुंदर आहे. तिथली पुष्करिणी तर लाजवाब आहे. फटु आहे बहुतेक. बघतो. (साला, फोटो टाकणं अजून नीट जमत नाय ओ आमाला)

अमृत Wed, 12/28/2011 - 15:36
रविवारीच तुनळीवर 'स्वदेस' पाहिला आणि विकीवर जाऊन मेणवली विषयी वाचाले. आणि आता हे सगळे फोटो. ठिकाण नक्कीच भेट देण्यासारखे आहे. फोटोंबद्दल धन्यवाद. अमृत

पैसा Wed, 12/28/2011 - 18:42
गेले २/३ दिवस नेट बंद असल्याने मोबाईलवरून हे फोटो पाहता आले नव्हते. पण आज रुखरख गेली. फार छान. त्या पिच्चरांच्या कहाण्यात मला फार रस नाही, पण नानांच्या वाड्यात जुनी चित्रं होती. त्यांचे फोटो मिळतील का?