बबडू ची कविता !!
लेखनविषय:
माझ्या ट्विन्स वर केलेली कविता !!
" माऊच्या कुशीत झोपलाय कोण
इटुकली पिटुकली पिल्ले दोन
मीच मीच डोळे तिरके कान
माऊ ची पिल्ले गोरी गोरी पान "
कुणी म्हणे माऊ कुणी म्हणे काऊ
आता आम्हाला सांगा इतके प्राणी कसे लक्षात ठेऊ
'बैलोबांची' गोष्ट आणि मग 'सिंहाचा ' किस्सा
इतके कसे 'कोल्हे' लबाड आणि तरीही त्यांचे लाड
भोलानाथ म्हणत म्हणत पाहतो आम्ही 'नंदीबैल'
आई बाबा आणतात नेहमीच बूट सैल
तबडक तबडक म्हणत बसतो जरा कुठे 'घोड्यावर '
मला 'गाढव' म्हणत दादू बसतो साइकलवर
इकडे तिकडे बघत बाबा म्हणतात " बोके कुठे गेले?"
आई म्हणते माझे दोन्ही 'वाघोबा' जरा फिरून आले
पोरे आमची 'गरीब गाय 'आज्या म्हणतात
'आमचे हे दोन शेर ' म्हणत आजोबाच गुरगुरतात
आमचे पुढचे डाव सगळ्यांना कसे काय ठाऊक असतात
बबडू बबडू म्हणत मग सगळे आमचेच लाड करतात !!
वाचने
3676
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
झक्कास. तुम्हाला जुळे आहे? :)
मजा येत असेल ना जुळ्या मुलांना वाढवायला.
छान छान कविता :)
मस्त! मस्त!
:)
बडबळ गीत आवडलं.
पहिल्या चार ओळी वाचुन जुने दिवस आठवले.
आमच्या कवितेतल माकड कुठे हरवल !
छान बालगीत, आवडले .
कविता एकदम क्व्वूटी पाय :-)
आमच्या कडून तुमच्या इटुकल्या पिटुकल्यांचे गालगुच्चे !
वा...! मजा आली वाचुन...मस्त मस्त मस्त :-)
हाहाहा! मस्तंय कविता!
आई बाबा आणतात नेहमीच बूट सैल.... फार आवडलं.
वा वा जुळी मुले! क्युट कविता.
क्युट! खुपच ग्गोग्गोड आहे कविता :)
तुमच्या "इटुकली पिटुकली पिल्ले दोन" चे फोटो टाका ना जमलं तर ....Please !!!! :)
झकास जमलीय कविता आवड्ली......
आवडली , मस्तच......
लहान बाळांशी संबंधित आणि त्यांच्याशी निगडीत कल्पनांवर तयार झालेलं काव्य खूपच छान असतं.
फिझाजी, तुमचं हे बडबड गीत मस्त आहे.
आवडलं.
झक्कास. तुम्हाला जुळे आहे?